मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बबडू ची कविता !!

फिझा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझ्या ट्विन्स वर केलेली कविता !! " माऊच्या कुशीत झोपलाय कोण इटुकली पिटुकली पिल्ले दोन मीच मीच डोळे तिरके कान माऊ ची पिल्ले गोरी गोरी पान " कुणी म्हणे माऊ कुणी म्हणे काऊ आता आम्हाला सांगा इतके प्राणी कसे लक्षात ठेऊ 'बैलोबांची' गोष्ट आणि मग 'सिंहाचा ' किस्सा इतके कसे 'कोल्हे' लबाड आणि तरीही त्यांचे लाड भोलानाथ म्हणत म्हणत पाहतो आम्ही 'नंदीबैल' आई बाबा आणतात नेहमीच बूट सैल तबडक तबडक म्हणत बसतो जरा कुठे 'घोड्यावर ' मला 'गाढव' म्हणत दादू बसतो साइकलवर इकडे तिकडे बघत बाबा म्हणतात " बोके कुठे गेले?" आई म्हणते माझे दोन्ही 'वाघोबा' जरा फिरून आले पोरे आमची 'गरीब गाय 'आज्या म्हणतात 'आमचे हे दोन शेर ' म्हणत आजोबाच गुरगुरतात आमचे पुढचे डाव सगळ्यांना कसे काय ठाऊक असतात बबडू बबडू म्हणत मग सगळे आमचेच लाड करतात !!

वाचन 3668 प्रतिक्रिया 0