राजीव दिक्षित - ??
सातवी-आठवीत असताना एकदा घरात राजीव दिक्षीतांच्या ''आजादी बचाओ आंदोलन'' च्या वीस कॅसेट्सचा संच (1996-97) दाखल झाला. हिंदी वक्तृत्वाची ओळखच राजीव दिक्षीत यांच्या भाषणातून झाली. कितीतरी दिवस घरात त्या कॅसेट लावल्या जायच्या आणि राजीव दिक्षीतांचे विचार, त्यांचा इतिहासाचा अभ्यास आणि एक स्वातंत्र्यप्राप्त 'देश' म्हणून भारतात होत नसलेल्या गोष्टींची तळमळ शब्दाशब्दातून दिसायची. राजीव दिक्षीतांची भाषणे ही काही फक्त राणा भीमदेवी थाटाची बाजारू भाषणे नव्हती - त्यांच्या प्रत्येक मुद्याला इतिहासातील साधार विवेचन, संदर्भ, विश्लेषणाची जोड असे. ती भाषणं ऐकूनच किराणा दुकानातून घरात येणार्या काही विशिष्ट ब्रॅण्डच्या वस्तू आणणे बंद झाले.
स्वदेशी-विदेशी, इंग्रजांनी कशी देशाची वाट लावली आहे.. अजूनही विदेशी कंपन्यांमुळे कशी वाट लागत आहे, आपणही त्यात अजाणता कसा भाग घेतोय वगैरे मुद्यांवरुन कित्येकदा वाद घालून झाले.. अशीच काही वर्षे गेली.
राजीव दिक्षीतांच्या कॅसेट आणि काही प्रमाणात तेही विस्मरणात गेले. काल-पर्वा फेसबुकवर पुन्हा एकदा राजीव दिक्षीतांच्या भाषणाची लिंक समोर आली. त्यात मात्र राजीव दिक्षीत रामदेव बाबांसोबत बसून आजही ( मी ऐकले तेव्हाचा काळ 96-97 ते 2010) तेच विचार, त्याच तळमळीने, त्याच तडफेनं श्रोत्यांसमोर मांडताना दिसत होते. मन आपोआप कितीतरी वर्षे मागे गेले. क्लिप संपली.
पुढची क्लिप मात्र काळीज चिरुन गेली. त्या क्लिपवर राजीव दिक्षीत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताना दाखवले गेले होते. हे कधी झालं? आपल्याला कळलं कसं नाही? कदाचित काहीतरी घोळ असेल म्हणून राजीव दिक्षीतांच्या निधनाबद्दलची बातमी शोधू लागलो. गुगलची कितीतरी पाने उलटवली.. पण एकाही पेपरनं राजीव दिक्षीतांच्या निधनाची बातमी दिलेली नव्हती.
फार दिवस नाही झाले ते जाऊन.. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये राजीवजी गेले.
त्यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी अंतर्जालावरील मंचांवर केलेल्या चर्चा तेवढ्या दिसल्या.
डोकं सुन्न झालंय!
अशा व्यक्तीकडे, चळवळीकडे माध्यमांकडून एवढे दुर्लक्ष होऊ शकते, व्हावे का?
माध्यमे खरंच विकली गेलेली आहेत?
राजीव दिक्षीत जन्मभर विदेशी कंपन्यांविरोधात, सरकार विरोधात, प्रचलित कायद्यांविरोधात बोलत राहिले. त्यांचा असा एक विचार होता. तो खरंच दुर्लक्ष करण्या सारखा होता?
एक ध्येय घेऊन जीवन झोकून देणारी राजीव दिक्षीतांसारखी माणसे समाजाला, माध्यमांना, शासनसंस्थेला खरंच नको असतात?
ही असं वेड्यासारखं एकच एक ध्येय घेऊन जीवन समर्पित करणार्या राजीवजींची शोकांतिका की नेहमी स्वत:मध्ये मश्गुल असलेल्या तथाकथित 'समाजाची' शोकांतिका?
राजीव दिक्षीत - अधिकृत संकेतस्थळ: http://www.rajivdixit.com/
छायाचित्र साभार.
![]() |
वाचने
16215
वाचनखूण
प्रतिक्रिया
38

कायपण विषय
In reply to कायपण विषय by अन्या दातार
धागाकर्ता म्हणून विनंती करतो
In reply to धागाकर्ता म्हणून विनंती करतो by यकु
धागाकर्ता म्हणून विनंती करतो
In reply to धागाकर्ता म्हणून विनंती करतो by अन्या दातार
गल्ली चुकलात अन्या भाऊ. मला
In reply to गल्ली चुकलात अन्या भाऊ. मला by विश्वनाथ मेहेंदळे
असेच असावे असे मानतो..राजीव
In reply to गल्ली चुकलात अन्या भाऊ. मला by विश्वनाथ मेहेंदळे
इतर मुद्दे
:-(
In reply to :-( by मोदक
+१
राजीव दिक्षित गेले?
मला माहित होतं...
:(
ओह..मला पन राजीवजी गेल्याचे
ओह..मला पन राजीवजी गेल्याचे
मी ही त्यांच्या काही कॅसेट
(No subject)
श्रद्धांजली पण....
In reply to श्रद्धांजली पण.... by मन१
त्यांचे विचार ऐकताना भारावून
In reply to त्यांचे विचार ऐकताना भारावून by गवि
+१
In reply to त्यांचे विचार ऐकताना भारावून by गवि
समजले.
In reply to त्यांचे विचार ऐकताना भारावून by गवि
+१
आमच्या वर्गात आले होते ते....
खरं सांगतो यशवंत एकनाथ जी
काही प्रतिक्रियांचा रोख कळला
In reply to काही प्रतिक्रियांचा रोख कळला by मराठी_माणूस
ह्यावर....
In reply to ह्यावर.... by मन१
+१
In reply to ह्यावर.... by मन१
मन, ह्यावर नवीन धागा
In reply to ह्यावर.... by मन१
एकदम मान्य पण तरीही काही
In reply to एकदम मान्य पण तरीही काही by मराठी_माणूस
राजीव दिक्षीत जन्मभर विदेशी
मला वाटते...
In reply to मला वाटते... by विकास
मला वाटतात.
In reply to मला वाटतात. by मन१
म्हणून तर
In reply to म्हणून तर by विकास
अभ्यास नीट करा.
In reply to मला वाटते... by विकास
हा हा हा.
राजीव दिक्षित - ??
आदरांजली
प्रकाटाआ
छान
आश्चर्य