मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐल-पैल

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ऐल मळा पैल तळे जायचे कुठे ना कळे टाकता पाऊल वळे पुन्हा माघारी ऐल दिवा पैल वात भेट नाही आयुष्यात मिट्ट काळोख घरात अवस दारी ऐल गंध पैल जाई मधे गूढ खोल खाई आक्रोश घुमत जाई कडेकपारी ऐल चंद्र पैल निशा घेरतात सुन्न दिशा घुमतात वेड्यापिशा स्वप्नांच्या घारी ऐल प्राण पैल सखा जीव भेटीला पारखा खुपतो काट्यासारखा सल जिव्हारी ऐलपैलाच्याही पार तुझ्या महालाचे दार त्याच्या पायरीशी थार दे रे मुरारी

वाचने 5708 वाचनखूण प्रतिक्रिया 24

किसन शिंदे गुरुवार, 12/15/2011 - 19:59
चेपुवर टाकलेल्या तुमच्या शायरी असोत वा इथे टाकलेल्या कविता पाहिल्यावर वाचण्याची खुप उत्सूकता असते.

मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 12/15/2011 - 20:08
लॉग ऑऊट केलेले परत लॉग इन केले शिस्तीत !! निव्वळ अप्रतिम रचना!! असे काही वाचले की संदिपदांची माझ्या स्वाक्षरीतली ती ओळ परत परत येऊन आदळते कानावर. फिटावीत जरा तरी जगण्याची देणी........

प्रास गुरुवार, 12/15/2011 - 20:08
मस्तच काव्य! सुंदर कल्पना, चपखल शब्द आणि जबरदस्त सुसूत्रता. कविता आवडली. ___/\___

चतुरंग गुरुवार, 12/15/2011 - 21:14
क्या बात है! मस्तच काव्य. ऐल-पैल शब्दांच्या विरोधातून अप्रतिम रचना साकारली आहे क्रांतीतै! __/\__ अर्थात काव्य आवडलं की आमचा नाईलाज होतो आणि दुसर्‍यांदा दाद द्यावीशी वाटतेच वाटते, ती इथे वाचायला मिळेल! ;) -चतुरंग

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/15/2011 - 22:59
वाचुन मन पूर्ण सुखावलेलं आहे. बाकी काव्याची तारिफ मी करणार नाही,कारण ती मुळ काव्यापुढे सगळी अत्यंत खुजी होइल,त्यामुळे..... मनःपूर्वक धन्यवाद!.....अन्य काहीही नाही.

नंदन Fri, 12/16/2011 - 08:22
रचना अतिशय आवडली. विशेषतः शेवटचे कडवे.
ऐल गंध पैल जाई
रामाणींची 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले' ही ओळ आठवून गेली.

प्यारे१ Fri, 12/16/2011 - 10:05
द्वंद्वांच्या पल्याड जाऊन नक्की कसं वागायचं तेच तर समजून उमजून सुद्धा 'करत नाही' आम्ही पढतमूर्ख... :( >>>ऐलपैलाच्याही पार तुझ्या महालाचे दार त्याच्या पायरीशी थार दे रे मुरारि बस्स एवढंच मागणं मागावं. संतशिरोमणी नामदेव महाराजांसारखं. तकनीकी : मुरारी की मुरारि? पहिली वेलांटी असावी असं वाटतंय.