मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

जमीर इब्राहीम 'आझाद' · · जनातलं, मनातलं
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती.. दुकानदार त्या कुत्र्यापाशी आला तर कुत्र्याने ती पिशवी त्याला दिली... पिशवी मध्ये एक कागद होता आणि त्यावर लिहिले होते, "हा आमचा फेसबुक आहे, त्याच्या पिशवीत १ लिटर दुध, आजचा पेपर, एक ब्रेड आणि १ सुगारेत चे पाकीट द्या, पैसे पिशवीतच आहेत..." बाजूलाच एक नोट होती... त्याला कुतूहल वाटले .. त्याची सुद्धा दुकान बंद करायची वेळ झाली होती.. त्याने सगळे सामान पिशवीत ठेवले आणि गम्मत म्हणून त्या कुत्र्यामागोमाग चालु लागला.. कुत्र्या व्यवस्थित रस्ता क्रॉस करून दुस-या रस्त्याला लागला.. मग एक चौकातून उजवीकडे गेला, लाल सिग्नल असल्यामुळे झेब्रा क्रोस्सिंग वर इतर लोकांबरोबर थांबला.. सगळेजण त्याच्याकडे कुतूहल मिश्रित नजरेतून पहात होते.. मग त्याने डावीकडून सिग्नल हिरवा होताच रस्ता क्रॉस केला आणि पुन्हा सरळ चालु लागला.. हा दुकानदार अजूनही त्याच्या मागे जात होता.. त्याचे आत्तापर्यंत असणारे कुतूहल आता जबरदस्त आदरयुक्त भावनेत बदलले होते.. इतका कॅनाक्ष आणि हुशार कुत्रा तो पहिल्यांदाच पाहत होता... कुत्र्याच्या चाणाक्ष आणि हुशारीने तो खूप इम्प्रेस झाला होता.. नंतर तो कुत्रा एका कॉलोनीमध्ये शिरला.. एका पाठोपाठ एक सारखी घरे ओलांडून तो एका भव्य मोठ्ठ्या दारापाशी आला.. त्याने त्याच्या तोंडातली पिशवी हळूच बाजूला ठेवली.. आणि दारावर धडाका द्यायला सुरुवात केली... चार - पाच वेळा दारावर धडका मारून सुद्धा दार काही उघडेना... ... मग तो बागेत गेला, बागेच्या भिंतीवरून व्यवस्थित तोल सांभाळत तो खिडकी पाशी गेला.. खिडकी ला मग त्याने ४-५ वेळा धडका दिल्या आणि पुन्हा मेन दरवाज्यापाशी येवून उभा राहिला.. थोड्या वेळाने दार उघडले गेले.... एक मध्यमवयीन माणसाने दार उघडले आणि त्या कुत्र्याला काठी ने मारायला सुरुवात केली... आश्चर्यचकित दुकानदार धावत धावत तिथे गेला आणि म्हणाला, "आहो, आहो...., इतक्या हुशार आणि चाणाक्ष कुत्र्याला का मारत आहात..? कित्ती जिनिअस आहे तुमचा हा फेसबुक... याला तर कोणीही न्यूजचानेल वाले आरामात फेमस करतील...त्याची हुशारी तर अजबच आहे..!!!!" त्यावर तो मालक म्हणाला, "याला तुम्ही हुशारी म्हणता..??? आहो त्याला काडीचीही अक्कल नाही....!!!! ही या आठवड्यातली तिसरी वेळ आहे हा नालायक मेन दरवाजाची किल्ली घरीच विसरून गेला..! नेहमी सांगावे लागते त्याला.. विसरभोळा आहे नुसता..!! काही कामाचा नाही..!" ********** मतितार्थ: जिथे आपण काम करतो.. तिथे सुद्धा असे बरेच मालक (म्यानेजर) असतात जे आपल्यातील खरे गुण, हुशारी, काम पटापट उरकण्याची कला, कामाबद्दल असणारा आपलेपणा, कामाबद्दलची खरी कळकळ, ओढ, या गोष्टी मुद्दाम दुर्लक्षित ठेवतात.. खूप क्वचितच मनापासून अप्रिशियेट करतात.. प्रोत्साहन, उमेद देतात.. पण जर का चूक झाली तर ती कितीही लहान का असेना त्यावर लेक्चर मात्र लांब लचक देतात... मीच सांगतो ते कसे बरोबर, तेच करायला हवे, तुम्ही कामच कसे टाळता, उशिरा कसे येता, इ. इ... आपले दुर्दैव म्हणजे असे खाष्ट, कडक, अतिशय काटेकोरपणे नियमावर बोट ठेवणारे म्यानेजर ९०% आहेत.. आणि तिथेच लोकांची प्रोडक्तिविटी, सीनसियरीटी, काम करण्याची इच्छा आपोआपच कमी होते.. आणि ते फक्त पाट्या टाकायची कामे करू लागतात... कामचुकारपणा वाढतो.. पण जिथे १०% चांगले म्यानेजर आहेत तिथे याच्या उलट स्थिती असते..! सगळे आनंदाने काम करताना दिसतात... आम्हाला प्रश्न पडतो.. जर हे ९०% म्यानेजर खरेच हे म्यानेजर लोक जर का थोडेसे प्रेमाने वागले, कामात व्यवस्थित मोटिवेशन दिले, ठीक आहे चुका झाल्यात तर होऊ देत पण पुढे जरा खबरदारी घ्या आणि चुका न होण्याची काळजी घ्या.. असे साधे सोप्पे सिम्पल आपलेपणाने का वागू शकत नाहीत..? काय कारण असेल..? ******** जमीर..!

वाचने 11372 वाचनखूण प्रतिक्रिया 38

In reply to by गणपा

आनंद गुरुवार, 12/15/2011 - 22:35
त्यांचाच आहे अस दिसतय. आणि छान आहे ब्लॉग. या कविते खाली त्यांचच नाव आहे. (हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम.... ~जमीर इब्राहिम "आझाद")

In reply to by आनंद

गणपा गुरुवार, 12/15/2011 - 22:58
त्यांचच लिखाण असेल तर आनंदच आहे. पण त्याच कवितेखाली आणि वरील लेखा खाली Posted by साधा माणुस... असही दिसलं म्हणुन विचारणा केली.

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

गणपा Fri, 12/16/2011 - 12:49
खुलाश्या बद्दल धन्यवाद जमीर इब्राहीम 'आझाद'. लेखन चौर्य बळावल्याने खात्री करुन घेतली. राग नसावा. तुमचा ब्लॉग आणि लिखाण आवडले. :)

In reply to by गणपा

"साधा माणुस" हे झाले ब्लोग चे आणि लेखन करण्यासाठीचे टोपण नाव... धन्यावाद.. तुमची प्रतिक्रिया मिळाली..! माझ्या ब्लोग ला भेट देऊन कविता (गजल) वाचली.. त्या बद्दल आभार..!

मोदक गुरुवार, 12/15/2011 - 22:05
कदाचीत ९०% चे मॅनेजर तसेच असावेत. हे त्यांच्या हाताखाली तयार झालेले म्हणून.. (हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक

In reply to by मोदक

(हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक:- हे हे हे ... तुमचे उत्तर म्हणजे अगदी चाणक्य नीती आहे राव..!! तुम्हाला फ ईयरली अ‍ॅप्रेजल साठी आल दी बेस्ट..!!:-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

मोदक Fri, 12/16/2011 - 13:52
धन्स... http://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig हे पण वास्तव आहे. मोदक

In reply to by प्राजु

(सर्वव्यापी)प्राजक्ता तुम्हाला माझे लिखाण आवड्ले हे मला आवर्जून सांगावेसे वाटले.... आम्ही धन्य झालो..!!! मनापासुन आभार..!!

अमृत Fri, 12/16/2011 - 09:12
अहो जमीर साहेब वरिल भाषांतर( मतितार्थ सोडून)हे जालावरिल फोर्वड ईमेलचे आहे हे तर नमूद करा की जरा.... त्यामूळे मतितार्थ देखिल तुम्ही लिहिला आहे याविषयी शंका येते आहे... कृपया प्रकाश टाकावा... बाकि भाषांतर छान जमले आहे ... धन्यवाद अमृत...

In reply to by अमृत

अम्रुत साहेब... माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!:-) तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..!

मराठी_माणूस Fri, 12/16/2011 - 09:26
काम चुकार पणाचे विश्लेषण आवाडले. हे बरेचसे आजुबाजुला पाहीले आहे. आमच्याच ऑफिस च्या एका फ्लोर वर खेळीमेळीचे आणि दुसर्‍या फ्लोर वर ताणलेले वातावरण असते. हे जे ९०% लोक असतात ते बहुतांशी लायक नसतात मग स्वतःच्या सरव्हायव्हल साठी लॉबी करतात आणि लायक व्यक्तीना पुढे येउ देत नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

मराठी_माणूस ... मला जे लिहायचे होते ते तुम्ही अगदी कमी शब्दात सांगितलेत.,.! काम चुकार पणाचे विश्लेषण आवडल्याबद्दल आभार..!

रमताराम Fri, 12/16/2011 - 09:32
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? (स्वतंत्र) रमताराम

In reply to by रमताराम

"कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर" आवड्ले.. तुमचे हे या वेगळ्या पधतीने विचार करणे.. बरोबर बोललात.. परन्तू एम्प्लॉई पेक्षा म्यानेजर ९०% तसे असतात.. (उदा. वरील एक लाइव्ह प्रतिक्रिया बघा) आणि जिथे १०% पोझीटीव द्रुश्ष्टीकोन असणारे म्यानेजर असतात तिथे खेळमेळीचे वातावरण असणारच..!!! तुमचे आभार..!

In reply to by रमताराम

सुहास.. Sun, 12/18/2011 - 11:09
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? >>> अनुभवाचे बोल ?

क्रान्ति Fri, 12/16/2011 - 12:27
जमीर, मिपावर स्वागत. ब्लॉग खासच आहे. विशेषतः छोकरीचा फोटो. :) वरचा धागा आणि प्रतिक्रिया वाचून एक गोष्ट जाणवली, घरोघरी मातीच्या चुली. कामाचं ठिकाण सरकारी असो की निमसरकारी की गैरसरकारी, कामचुकार नेहमीच सुखात रहातात आणि मनापासून काम करणारे ओझ्याची गाढवं होतात.

In reply to by क्रान्ति

वाह..... क्रान्ति ताई..!!! :-) तुमचा प्रतिसाद पाहुन मी कित्ती खुश झालोय...!! छोकरीचा फोटो हा सुद्धा माझाच कोपीराईट आहे..! :-) (स्पष्ट करतो म्हणजे काही लोक आक्षेप घेणार नाही..! ;-)) आता मी सुद्धा इकडे असेन...!!!! धन्यवाद..!! :-)

आदिजोशी Fri, 12/16/2011 - 12:57
A small story for all salaried Employee(For Fun)..: A shopkeeper watching over his shop is really surprised when a dog coming inside the shop, he shoos him away. But later, the dog is back inside again. So he goes over to the dog and notices that it has a note in his mouth. He takes the note and it reads “Can I have 12 soaps and shampoo bottle, please. The money is with the dog.” The shopkeeper looks inside the dog’s mouth and to his surprise there is a 100 rupees note in his mouth. So he takes the money and puts the soap, shampoo and change in a bag, and then places it in the dog’s mouth. The shopkeeper is so impressed, and since it is the closing time, he decides to follow the dog. The dog is walking down the street, when it comes to the zebra crossing; he waits till the signal turns green. He walks across the road till the bus stop. He waits on the stop and looks up the timetable for the bus. The shopkeeper is totally out of his mind as the dog gets into the bus and sits on the a vacant seat. The shopkeeper follows the dog. The dog waits for the conductor to come into his sheet. He gives the change to the conductor and shows him the neck belt to keep the ticket. The shopkeeper is almost fainting at this sight and so are the other people in the bus. The dog then moves to the front exit of the door and waits for the bus to arrive, looking outside. As soon as the stop is in his sight he wags his tail to inform the driver to stop. Then not even waiting for the bus stop to arrive the dog jumps out and runs to the house nearby. It opens an big iron gate and rushes towards the door, he changes his mind and walks towards the garden. The dog walks up to the window and beats his head several times on the window. It then walk backs to the door and waits. The shopkeeper maintaining his senses walks up to the door and watched a big guy open the door. The guy starts beating, kicking and abusing the dog. The shopkeeper is surprised and runs to stop the guy. The shopkeeper questions the guy “what is the heaven are you doing.? The dog is genius he could be famous in life.” The guy responds “you call this clever? This is the 3rd time in this week that the dog has forgotten the door keys.” The moral of the story:: You may continue to exceed onlookers expectations.... but will always fall short of the bosses expectation.

In reply to by आदिजोशी

माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!Smile तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..! :-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

अन्या दातार Fri, 12/16/2011 - 14:51
साबण व शँपू बॉटलच्या ऐवजी "१ लिटर दुध, आजचा पेपर, एक ब्रेड आणि १ सुगारेत चे पाकीट" याने अस्सल भारतीय टच कसा काय बरे आला? साबण-शँपू भारतात वापरत नाहीत कि त्याऐवजी दूध, ब्रेड, आजचा पेपर व सुगारेत(म्हणजे काय कुणास ठावूक, सिगरेट म्हणायचे आहे हे गृहित धरतोय) चे पाकिट वापरतात? (अति सामान्य) अन्या

In reply to by अन्या दातार

आदिजोशी Fri, 12/16/2011 - 15:14
अरे बस ने जाण्या ऐवजी कुत्रा चालत गेला, एका घराऐवजी कॉलनीत गेला, मालकाने लाथा बुक्क्यांऐवजी काठीने कुत्र्याला बदडला असे अनेक भारतीयीकरणाचे दाखले आहेत की कथेत. न्युजचॅनलवाले फेमस करतील हा तर खास भारतीय टच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कुत्रा कॅनाक्ष आहे हे विसरलास कि अन्या

In reply to by आदिजोशी

५० फक्त Sun, 12/18/2011 - 10:11
ही टच संस्था फार माजली आहे सध्या.... असो, ना मुळ स्टोरीतलं काही कळालं ना टचड भाषांतरातलं काही समजलं, असो, लेखकजी तुमचा ब्लॉग पाहिला मस्त आहे. गजल आणी कविता यांच्याशी विडंबने करणे ती सुद्धा भागीदारीत एवढाच आमचा संबंध त्यामुळ तिथं पास. ..

In reply to by किचेन

५० फक्त Sun, 12/18/2011 - 23:33
''एक्धाच नव्हे तर बोलत असलेल्या त्या दुकानच चीत्रीकारंही चालू होत.'' या वाक्याचा अर्थ समजवल्यास आम्ही टचगदित होउ.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार, आदिजोशी आणि ५० फक्त ही सगळी अवलक्षणी माणसे आहेत. झारीतले शुक्राचार्य आहेत सगळे. आज त्यांच्या प्रतिक्रिया बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. अहो ज्याच्या नावातच 'आझाद' आहे त्या माणसाला तुम्ही भाषीक साहित्यात कोंडायला बघता ? भगवदगीता ही अशीच दुर्बोध होती. ज्ञानेश्वर माउलीनी ती ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली. तिचे गुढार्थ उकलले. आज तेच पवित्र कार्य श्री. आझाद करित आहेत. आमच्या सारख्या शाट इंग्रजी न कळणार्‍या अडाण्यांना ने खास भारतीय भाषांतर उपलब्ध करुन देत आहेत, आणी ते देखील माय मराठीत. श्री. आझाद, तुमचे हे भाषांतर, त्याला दिलेला अतिशय सुरेख असा भारतीय टच आणि प्रत्येक प्रतिक्रियेवरती स्वतःची उपप्रतिक्रिया देण्याची स्टाईल अतिशय जबरदस्त आहे. तुमचा अजून देखील एक धागा नुकताच पाहीला. आता लगेच तो धागा वाचायला पळणार आहे. तुमच्या ह्या पवित्र कार्यात आड येणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करून असेच छान छान भाषांतर आम्हाला उपलब्ध करून देत रहा. तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाह... म्हणजे तुमच्या सारखी चांगली मन्डळी सुद्धा आहेत तर..!!!! :-) बरे वाटले...! आणि खुप आनन्द झाला... एक मिपाकर म्हणून तुम्हाला शरम वाटायला नको सर... इतर संपाद्क मंड्ळी असतीलच ना ... लक्ष ठेवायला..!!! सगळीकडे विघ्नसंतोषी लोक असतातच... आणि आत्ताचा जमाना तर सोकवलेल्या लोकांचाच आहे ... काही लोकांना अतिशय फालतू गोष्टी भरपुर आवड्तात जसे की - अशा लोकांना कुटूंबासहित "बिग बोस" नावाच्या फालतू आणि विक्रुत कार्यक्रमामध्ये व्यावसायिक पोर्न स्टार आलेली चालते... आणि दुसरे म्हणजे ते तमीळ गाणे सध्या धुमाकुळ घालत आहे.. काहितरी अर्थ आहे का त्याला..? ज्ञानेश्वर माउलीनी दुर्बोध अशी भगवदगीता ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली आणि ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रात होउन गेले हे आपले थोर भाग्य आहे.. !!! त्यांची आणि माझी बरोबरी क्रुपया नको..! तो मान पु.लं, व.पुं, प्र.के., वि.वा, आणि सुरेश भटांचा आणि त्यांसाऱख्या इतर दिग्गजांचा....!! मी तर आपला त्या वाटेवर चालू इछीणारा साधा माणूस..! :-) धन्यवाद..!! लोभ असावा..

इरसाल Fri, 12/16/2011 - 14:26
तुमचा ब्लॉग आवडला काही लेखन घरी जावून वाचेन. आता लेखाबद्दल.... ऑफिस मध्ये जर मी काम केले तर बाकीचे काय करतील. म्हणून मी मधेमधे काचुपणा करत असतो.