मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(काय साला त्रास आहे!)

मेघवेडा · · जे न देखे रवी...
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे 'सा' मधूनी 'रे' निघाला, बांधली पेटी कुणी गं? सूरसूर्या लागलेले त्वदग्रहण खग्रास आहे! रोज शिक्षा कृष्ण-पाण्याची, जरा बक्षी जिवाला चार क्षण झोपेन म्हणता, काय साला त्रास आहे! |- त्रासलेला निद्राप्रेमी -| (रोजचंच आहे. तारीख कुठली द्यायची?) मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा वृत्त : नीजभंगा

वाचने 9203 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by पुष्करिणी

मेघवेडा गुरुवार, 12/15/2011 - 02:23
मूळ कवितेत त्या ओळीत यतिभंग असल्याकारणाने इथंही तेच. विडंबनांत मूळ कवितेतल्या यतिमात्रादि जशाच्या तशा उतराव्यात या मताचा मी असल्याने इथंही ते तसंच उतरवलं. :)

क्रान्ति गुरुवार, 12/15/2011 - 08:59
अफाट विडंबन! मात्रा आणि वृत्तनिर्मितीबद्दल साष्टांग दंडवत...................... :)

विदेश गुरुवार, 12/15/2011 - 09:15
" मस्त " लगावली : त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा वृत्त : रोजदंगा

गवि गुरुवार, 12/15/2011 - 09:23
परफेक्ट मीटरात विडंबन.. ठ्ठो... ठार... खल्लास... क्या बात.. क्या बात.. क्या बात...

चतुरंग गुरुवार, 12/15/2011 - 09:34
काल कविता वाचली तेव्हाच म्हंटलं हाप्पिच डिलिवरी आहे कुणी स्टेडियम बाहेर कशी नाही टोलवली! ;) गानत्रागा आणि नीजभंगासाठी पेश्शल मार्क्स! ;) (समानशील) चतुरंग

रमताराम गुरुवार, 12/15/2011 - 09:52
ये म्मारा. हा मेव्या साला केसुगुर्जींची उणीव भासू देत नाही हल्ली. मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा वृत्त : नीजभंगा येकदम हिट्टं.

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/15/2011 - 19:43
मस्त... सुरेख. पहिल्या कडव्याची शेवटची ओळ सोडली तर वृत्तातही चपखल.. सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे (इथे 'सांग कैसी पटवू पोरगी, बाप हा गावास आहे' कसे वाटते?) मला वाटतं, वृत्तातही ही ओळ तांत्रिकदृष्ट्या बसते आहे. पण "काढु" या दोनाक्षरी जडाक्षराने अविचारी ताण बसतो आहे.. वृत्तात म्हणताना नेमके "काढु" वर तोडावे (काळजी घेण्याचे ठिकाण) लागत असल्याने बोचरा कोपरा झाला असावा.. हे एरवी जाणवायचं अजिबात कारण नव्हतं. पण बाकीच्या ओळी बर्मुडात आणि हिच ओळ टाईटस असल्यानेच जाणवतंय रे.. तुझ्या कवितांमधे हाच प्रॉब्लेम असतो. हँड रमी सारखी नशिबवान असते त्यामुळे टेबलावरती एकच नोट असल्यासारखे बोचतं..

पैसा Sat, 12/17/2011 - 22:48
सध्या मेवेला हापिसात झोपा काढायला मिळत नाहीत बहुतेक! सगळाच त्रास एकदम आठवलाय!

सुहास.. Sun, 12/18/2011 - 11:17
हाण्ण हाण्ण लेका !! तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे =)) =)) =)) मान मोडिशी कामाशी , वृषभास जुंपल्याशी वक्र गतीच त्या खुरांची..त्रासच ! मुंग्यास आहे