(काय साला त्रास आहे!)
लेखनविषय:
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :)
भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे
सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे
झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं
सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे
तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी
गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे
'सा' मधूनी 'रे' निघाला, बांधली पेटी कुणी गं?
सूरसूर्या लागलेले त्वदग्रहण खग्रास आहे!
रोज शिक्षा कृष्ण-पाण्याची, जरा बक्षी जिवाला
चार क्षण झोपेन म्हणता, काय साला त्रास आहे!
|- त्रासलेला निद्राप्रेमी -|
(रोजचंच आहे. तारीख कुठली द्यायची?)
मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा
वृत्त : नीजभंगा
वाचने
9206
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
चांगल 'खत' मिळाल्याने हल्ली विडंबकांचं पीक ही जोर धरु पहातय. ;)
मस्त रे.
शेवटच्या कडव्याची पहिली ओळ नाही बसत मिटरमधे..
In reply to शेवटच्या कडव्याची पहिली ओळ by पुष्करिणी
मूळ कवितेत त्या ओळीत यतिभंग असल्याकारणाने इथंही तेच. विडंबनांत मूळ कवितेतल्या यतिमात्रादि जशाच्या तशा उतराव्यात या मताचा मी असल्याने इथंही ते तसंच उतरवलं. :)
मुळ कविताही सुंदर आणि विडंबनही झकास :)
In reply to मुळ कविताही सुंदर आणि विडंबनही झकास :) by वीणा३
ह्येच म्हणतो :)
झक्कास.
मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा
वृत्त : नीजभंगा
LOL! :D
कामं नाहीयेत का रे ऑफिसमध्ये मेव्या सद्ध्या! :)
अफाट विडंबन! मात्रा आणि वृत्तनिर्मितीबद्दल साष्टांग दंडवत...................... :)
" मस्त "
लगावली : त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा
वृत्त : रोजदंगा
परफेक्ट मीटरात विडंबन..
ठ्ठो...
ठार...
खल्लास...
क्या बात.. क्या बात.. क्या बात...
यशोमावशीशी पुर्णतः सहमत ...
मेव्याला सध्या हापिसात काम नाहीये. :)
:)) =
In reply to यशोमावशीशी पुर्णतः सहमत by प्रीत-मोहर
मावशी होंगे हमारे दुश्मन! :P
In reply to मावशी होंगे हमारे दुश्मन! by यशोधरा
बरां तर यशोताय मिया तुका मावशी म्हणानय ना आयच्यान.
In reply to भगल करी होतंय गो... by प्रीत-मोहर
बाप्रे. एकदम आईपरेंत पोहोचू नको गं. :)
बाकी ठीक.
In reply to बाप्रे. एकदम आईपरेंत पोहोचू by यशोधरा
अग बै आजपासुन म्हणा होतय मी.
In reply to अग बै आजपासुन म्हणा होतय मी. by प्रीत-मोहर
LOL! असंय होय! वक्के, वक्के मग. :)
काल कविता वाचली तेव्हाच म्हंटलं हाप्पिच डिलिवरी आहे कुणी स्टेडियम बाहेर कशी नाही टोलवली! ;)
गानत्रागा आणि नीजभंगासाठी पेश्शल मार्क्स! ;)
(समानशील) चतुरंग
सत्ते पे सत्ता............. :-)
ये म्मारा. हा मेव्या साला केसुगुर्जींची उणीव भासू देत नाही हल्ली.
मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा
वृत्त : नीजभंगा
येकदम हिट्टं.
खी खी खी खी.
(हे कवितेसाठी की विडंबनासाठी असे कृपया विचारु नये . ;) )
च्यायला! :D
वाह !!
ख्या : ख्या : :D
__/\__
चपखल विडंबन फारच चान चान :)
झकास विडंबन
अप्रतिम विडंबन.... खल्लास... हहपुवा....मार डाला :D
फोटो छान आलेले आहेत.
शेवटून दुसर्या फोटोत आनंद बक्षी आहे काय?
कॅमेरा कुठला वापरलात?
झकास जमलय विडंबन!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
जबराट विडंबन.
वाहवा !!!!! वाहवा !!!!! अतिउत्तम !!!!!!
मस्त... सुरेख.
पहिल्या कडव्याची शेवटची ओळ सोडली तर वृत्तातही चपखल..
सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे (इथे 'सांग कैसी पटवू पोरगी, बाप हा गावास आहे' कसे वाटते?)
मला वाटतं, वृत्तातही ही ओळ तांत्रिकदृष्ट्या बसते आहे.
पण "काढु" या दोनाक्षरी जडाक्षराने अविचारी ताण बसतो आहे.. वृत्तात म्हणताना नेमके "काढु" वर तोडावे (काळजी घेण्याचे ठिकाण) लागत असल्याने बोचरा कोपरा झाला असावा..
हे एरवी जाणवायचं अजिबात कारण नव्हतं. पण बाकीच्या ओळी बर्मुडात आणि हिच ओळ टाईटस असल्यानेच जाणवतंय रे.. तुझ्या कवितांमधे हाच प्रॉब्लेम असतो. हँड रमी सारखी नशिबवान असते त्यामुळे टेबलावरती एकच नोट असल्यासारखे बोचतं..
मुळ कविता आणी दोन्ही विडंबनं(एक विजुभौंनी केलेलं आणी दुसरं हे) मस्तच आहेत.
झकास...
ह्म्म!! बरं झालंय विडंबन...
सध्या मेवेला हापिसात झोपा काढायला मिळत नाहीत बहुतेक! सगळाच त्रास एकदम आठवलाय!
हाण्ण हाण्ण लेका !!
तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी
गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे
=)) =)) =))
मान मोडिशी कामाशी , वृषभास जुंपल्याशी
वक्र गतीच त्या खुरांची..त्रासच ! मुंग्यास आहे
चांगल 'खत' मिळाल्याने हल्ली