गरीब बिचार्या, दम खा
लेखनविषय:
गरीब बिचार्या, दम खा
| गरीब बिचारा शोधतोय तो सायबिणीचे पडके घर - मी म्हणतो, "विचार, जवळ चांगला बार असला तर..." . बुरसट चिरे न्हाते-धूते अश्रू भले सुकवू नको कुळाचारांस आसूसले भाव भले आटवू नको . म्हटले कोणी : "रिबेलो मूळचे अहो, त्या वाडीचे" पात्रांव, छ्या! रिबेलो आहेत सांगा किस झाडीके? . ब्रागांस, कून्य, नोरोन्या कसची गोत्रे, कसची कुळे, ईश्वराच्या डोळ्यापुढे बामणांचेही गू पिवळे . . | . सोड बाबुश - पीच थोडी दर्जेदार काजूफेणी सोनसळी फेसाळणारे उसळणारे जादू-पाणी . प्याल्यात ओतते आहे बघ साकी छोकरी गोड कोवळी झोकात झुकते जणू काही झुळकेसरशी डुले पोफळी . बारवाला बघतोच आहे काळीज माझे झाले कलम पैसे मोजून घेऊन माझे दुखण्यावरती लावतो मलम . माझ्यासाठी खास आणला उंची दारू भरून प्याला त्याच्या हातून माझ्या हातात - मध्यस्थ नको द्याला-घ्याला . | . . हाती आहे नाही ते उदारपणे लुटत राहा उद्या येत्या गरिबीचा उगी कशास धाक पाहा? . पैसे टाकून दारू झोकत गाणारा तो औरच आहे पडक्या वाड्यांत उकीरडे रडत फुंकणे नकोच आहे . मला रोक-टोकणार्यांनो तुमचे म्हणणे ऐकू आलेय माफ केले तुम्हा तरी खरेच आता पुरे झालेय . सल्ला म्हणून दिला असता मानले असते तुमचे बोल मात्र तुमची शेरेबाजी काही नाही - नुसता सल! |
वाचने
3558
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पार्श्वभूमी
सायबिणीचे पडके घर
उत्कृष्ट भावानुवाद
In reply to उत्कृष्ट भावानुवाद by विसुनाना
बामण
In reply to बामण by पैसा
किरिस्तांव बामण
In reply to किरिस्तांव बामण by विसुनाना
बामण हाच "तांत्रिक" शब्द
In reply to बामण हाच "तांत्रिक" शब्द by धनंजय
ओके
In reply to बामण हाच "तांत्रिक" शब्द by धनंजय
यावरुन आठवण झाली.
In reply to यावरुन आठवण झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किरवंत
In reply to किरवंत by पैसा
धन्स
In reply to किरवंत by पैसा
सायबीण म्हणजे कुलस्त्री (सेन्योरा), विशेषकरून येशूची आई मेरी
आवडली
मजा येतीये वाचताना... जे
ब्रागांस, कून्य,