मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खाली-वर, खाली-वर

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
. उसळणार्‍या लाटांत सोडून दिली एक बोट अलगद सोडवून घेतले बोट वर-खाली, वर-खाली हेंदकाळतंय पाणी बोट............... आता दिसतही नाही : मी तिथेच............. बोटाकडे बघत खाली-वर, खाली-वर ==================== स्वाती फडणीस............२९-०१-२००८

वाचने 7583 वाचनखूण प्रतिक्रिया 21

बेसनलाडू गुरुवार, 07/17/2008 - 12:07
पण अस्पष्टसे काहीतरी रूपक बोटाला लागले.त्यावर विचार करतो आहे फिंगर चिप्स खात खात :) (विचारमग्न)बेसनलाडू

In reply to by स्वाती फडणीस

बेसनलाडू गुरुवार, 07/17/2008 - 12:21
पण सॉल्लिड 'विद्रोही' वगैरे ठरेल. 'बोट' आणि 'खाली-वर,खाली-वर' यासाठी सुचलेले व योजलेले पर्यायी शब्द,रूपके वादळी असून ती चपखल बसतात की नाही यावर चर्चा झडेल.सगळे तुटून पडतील.ढसाळ ढसाढसा हसतील.त्यापेक्षा ही विडंबनाची अपेक्षा (कोणाकडेतरी) पास् केलेली बरी :) (विद्रोही)बेसनलाडू

सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 12:54
मला खरोखर कळली नाही कविता. कृपया रसग्रहण कराल का ह्या कवितेचं? http://sucheltas.blogspot.com

स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 13:57
उसळणार्‍या लाटांत सोडून दिली एक बोट एक (कोणतिही) कृती केली आहे जस की लहान मुलाला पहील्यांदाच शाळेत सोडण अलगद हळूवार पणे/ सांभाळुन सोडवून घेतले बोट वर-खाली, वर-खाली हेंदकाळतंय पाणी त्याच वेळेला मनात खूप चल बिचल होत आहे. भिती ,काळजी, ताटातूट .. अश्या संमिश्र भावनांनी मन हळव झालय. बोट............... आता दिसतही नाही तो क्षण ,ती कृती आता घडून गेली आहे. आता हातात काहीच उरलेले नाही मी तिथेच............. बोटाकडे बघत हळव्या झालेल्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत. आपण केलेली कृती चूक की बरोबर या संभ्रमात पडून ती कृती करणार्‍या बोटा कडे बघत मी तिथेच थांबून आहे. खाली-वर, खाली-वर अगदी बोटीत असल्या प्रमाणे लाटांसोबत्/बोटीसोबत हेंदकाळत ==================== स्वाती फडणीस............२९-०१-२००८

In reply to by स्वाती फडणीस

केशवसुमार गुरुवार, 07/17/2008 - 14:24
स्वातीताई चांगली कविता आवडली अवांतरः कवितेचे असे उघड विशलेषण करू नये असे वाटते . निदान स्वतः कविने तरी.. एखाद्या वाचकाला समजली नसेल कविता तर व्यनिचा मार्ग आहे.. प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात.. (सपष्ट वाचक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/17/2008 - 14:31
प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात..

In reply to by केशवसुमार

स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 14:32
हा असा उपदव्याप मी पहील्यांदाच केला :D पुन्हा करणार नाही :) (स्वगतः एव्हडी सोपी कविता कुणाला का समजू नये )

In reply to by स्वाती फडणीस

सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 15:08
रसग्रहणाबद्दल धन्यवाद. कविता कळली नाही म्हणून विचारलं. ह्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 15:34
ह्यात काही वावग नाही पण कविता रसीकांन पर्यंत स्वतः हून पोहचावी असे वाटले . आणि ती तशी पोहचवण्यात मी कमी पडले असे मला म्हणायचे होते

In reply to by स्वाती फडणीस

सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 15:39
गैरसमज नसावा. कवितेतला मी फारसा जाणकार नाही तरीही आपल्या आधीच्या कविता मला समजल्या होत्या. ही कविता वाचुन काहीच समजलं नाही म्हणुन अर्थ म्हणून अर्थ विचारला. http://sucheltas.blogspot.com

सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 15:14
आणि हो.......... मला तरी ती एवढी सोपी वाटली नाही. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

वरदा गुरुवार, 07/17/2008 - 23:34
मलाही कविता वाचून नव्हती कळली..रसग्रहण वाचूनच समजली... छान कविता... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग गुरुवार, 07/17/2008 - 16:25
कविता छान आहे. आपण वर अर्थ दिला आहे त्याही पेक्षा वेगळ्या छटा दिसल्या. चतुरंग

विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 00:33
कविता समजली नाही! असो, पुलेशु... आपला, (साध्या, सोप्या व गेय कविता अधिकतर आवडणारा) तात्या.

धनंजय Fri, 07/18/2008 - 00:50
अधिक आवडली. शब्दांच्या आकृतीचे सौष्ठव उत्तम आणि बांधणीत नाजूक गुंतागुंत दिसते. (अर्थ येथे समजावून द्यायला नको होता - व्यनि किंवा खरडीत द्यायला हवा होता हे अन्य रसिकांचे मत पटते.) कविताच्या कागदाची प्रवाहात ठेवलीस बोट अलगद बोट सोडवून घे. तिला हेंदकाळू दे स्वतंत्र. बोटात गुंतून : ती तरणार नाही बुडेल अडकून