खाली-वर, खाली-वर
.
उसळणार्या लाटांत
सोडून दिली एक बोट
अलगद
सोडवून घेतले बोट
वर-खाली, वर-खाली
हेंदकाळतंय पाणी
बोट...............
आता दिसतही नाही
:
मी
तिथेच.............
बोटाकडे बघत
खाली-वर, खाली-वर
====================
स्वाती फडणीस............२९-०१-२००८
वाचने
7588
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
पण अस्पष्टसे काहीतरी रूपक बोटाला लागले.त्यावर विचार करतो आहे फिंगर चिप्स खात खात :)
(विचारमग्न)बेसनलाडू
In reply to नक्की कळली नाही by बेसनलाडू
म्हणजे विडंबन येणार तर वाट बघते
In reply to अरे वा! by स्वाती फडणीस
पण सॉल्लिड 'विद्रोही' वगैरे ठरेल. 'बोट' आणि 'खाली-वर,खाली-वर' यासाठी सुचलेले व योजलेले पर्यायी शब्द,रूपके वादळी असून ती चपखल बसतात की नाही यावर चर्चा झडेल.सगळे तुटून पडतील.ढसाळ ढसाढसा हसतील.त्यापेक्षा ही विडंबनाची अपेक्षा (कोणाकडेतरी) पास् केलेली बरी :)
(विद्रोही)बेसनलाडू
In reply to सुचले तर आहे by बेसनलाडू
तुमच्या मनात हळूच 'दादा कोंडके' डोकावून गेले काहो? आम्हाला दिसल्यासारखे वाटले. ;)
चतुरंग
कविता वाचून प्रतिसाद दिलात :)
मला खरोखर कळली नाही कविता. कृपया रसग्रहण कराल का ह्या कवितेचं?
http://sucheltas.blogspot.com
उसळणार्या लाटांत
सोडून दिली एक बोट
एक (कोणतिही) कृती केली आहे
जस की लहान मुलाला पहील्यांदाच शाळेत सोडण
अलगद
हळूवार पणे/ सांभाळुन
सोडवून घेतले बोट
वर-खाली, वर-खाली
हेंदकाळतंय पाणी
त्याच वेळेला मनात खूप चल बिचल होत आहे.
भिती ,काळजी, ताटातूट .. अश्या संमिश्र भावनांनी मन हळव झालय.
बोट...............
आता दिसतही नाही
तो क्षण ,ती कृती आता घडून गेली आहे.
आता हातात काहीच उरलेले नाही
मी
तिथेच.............
बोटाकडे बघत
हळव्या झालेल्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत.
आपण केलेली कृती चूक की बरोबर या संभ्रमात पडून ती कृती करणार्या बोटा कडे बघत मी तिथेच थांबून आहे.
खाली-वर, खाली-वर
अगदी बोटीत असल्या प्रमाणे
लाटांसोबत्/बोटीसोबत हेंदकाळत
====================
स्वाती फडणीस............२९-०१-२००८
In reply to थोडक्यात अर्थ by स्वाती फडणीस
मस्त अर्थ समजावुन दिला आहे.
सुंदर
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
In reply to थोडक्यात अर्थ by स्वाती फडणीस
स्वातीताई चांगली कविता
आवडली
अवांतरः कवितेचे असे उघड विशलेषण करू नये असे वाटते . निदान स्वतः कविने तरी.. एखाद्या वाचकाला समजली नसेल कविता तर व्यनिचा मार्ग आहे..
प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात..
(सपष्ट वाचक)केशवसुमार
In reply to वा! by केशवसुमार
प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात..
In reply to वा! by केशवसुमार
हा असा उपदव्याप मी पहील्यांदाच केला :D
पुन्हा करणार नाही :)
(स्वगतः एव्हडी सोपी कविता कुणाला का समजू नये )
In reply to थोडक्यात अर्थ by स्वाती फडणीस
रसग्रहणाबद्दल धन्यवाद.
कविता कळली नाही म्हणून विचारलं. ह्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही.
http://sucheltas.blogspot.com
In reply to धन्यवाद by सुचेल तसं
ह्यात काही वावग नाही
पण कविता रसीकांन पर्यंत स्वतः हून पोहचावी असे वाटले .
आणि ती तशी पोहचवण्यात मी कमी पडले असे मला म्हणायचे होते
आणि हो..........
मला तरी ती एवढी सोपी वाटली नाही.
http://sucheltas.blogspot.com
In reply to आणि by सुचेल तसं
मलाही कविता वाचून नव्हती कळली..रसग्रहण वाचूनच समजली...
छान कविता...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
चांगला इफेक्ट साधला आहे.
कविता छान आहे. आपण वर अर्थ दिला आहे त्याही पेक्षा वेगळ्या छटा दिसल्या.
चतुरंग
In reply to स्वातीताई, by चतुरंग
आपणाला आढळलेल्या छटा जाणून घ्यायला आवडतील :)
कविता समजली नाही!
असो, पुलेशु...
आपला,
(साध्या, सोप्या व गेय कविता अधिकतर आवडणारा) तात्या.
अधिक आवडली.
शब्दांच्या आकृतीचे सौष्ठव उत्तम आणि बांधणीत नाजूक गुंतागुंत दिसते.
(अर्थ येथे समजावून द्यायला नको होता - व्यनि किंवा खरडीत द्यायला हवा होता हे अन्य रसिकांचे मत पटते.)
कविताच्या कागदाची
प्रवाहात ठेवलीस बोट
अलगद
बोट सोडवून घे.
तिला हेंदकाळू दे
स्वतंत्र.
बोटात गुंतून
:
ती
तरणार नाही
बुडेल अडकून
नक्की कळली नाही