पालक वडी
साहित्यः
पालक - १ जुडी
बेसन - १/२ कप
तांदुळाच पीठ - ३ चमचे
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १/४ चमचा
हिंग - १/४ चमचा
ओवा - १ चमचा
तिळ - १ चमचा
तेल - १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. पालक धुवुन १ तास निथळत ठेवावा. जितका जास्त कोरडा करता येईल, तेवढा कोरडा करुन घ्यावा.
२. पालक बारीक चिरुन घ्यावा.
३. त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, आले-लसुण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, हळद, ओवा, लाल तिखट, गरम मसाला, तिळ व चवीनुसार मिठ टाकावे.
४. हे पीठ निट मिक्स करावे. हे करताना पालकाला पाणी सुटल्यामुळे पीठ ओले होते.
५. १ चमचा तेल गरम करुन घ्यावे. हे गरम केलेले तेल ह्या पालकामधे टाकावे.
६. कोथिंबीर वडी करताना जसे आपण त्याचे लंबगोलाकार गोळे करतो, तसेच पालकाचे पण गोळे करुन घ्यावेत.
७. एका पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवावे. एका चाळणीला तेल लावुन त्यात हे गोळे ठेवावे.
८. हे गोळे १०-१५ मिनिटे वाफवुन घ्यावेत.
९. १०-१५ मिनिटांनी गोळे बाहेर काढुन गार होउ द्यावेत. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात.
१०. ह्या वड्या shallow fry कराव्यात. तशाच छान लागतात.
११. ह्या वड्या तळुन किंवा नुसत्या उकडलेल्या पण चांगल्या लागतात.


वाचने
19512
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
व्वा व्वा.. सहीच !!! भुक
छान आम्ही कोथिम्बिर वडया पण
In reply to छान आम्ही कोथिम्बिर वडया पण by पियुशा
>>>आम्ही कोथिम्बिर वडया पण
In reply to छान आम्ही कोथिम्बिर वडया पण by पियुशा
धन्स पियुशा. अगं मी पण
सहीच दिसते आहे राव.
मस्त.
पालक वडे !!
मस्तं....
वाह!! छानच
झकास!
In reply to झकास! by मेघवेडा
मायक्रोवेव्ह मध्येपण होईल.
In reply to झकास! by मेघवेडा
चाळणी नसेल तरी काही प्रॉब्लेम
In reply to झकास! by मेघवेडा
पालकात आधीच पाणी जास्त असते
मस्त आहे पालकवडी
वा... भुक चाळवली गेली आहे.
मस्त!
छान कल्पना
वड्या छानच दिसतायत.
करुन बघते. लेकीला आवडली तर
पालकची पाने अळूवडीप्रमाणे
फोटो पालक वडीचा वाटत नाही.....
अंमळ स्पष्ट लिहितो, मलिंगानं