मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पालक वडी

Mrunalini · · पाककृती
साहित्यः पालक - १ जुडी बेसन - १/२ कप तांदुळाच पीठ - ३ चमचे आले-लसुण पेस्ट - १ चमचा हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/४ चमचा हिंग - १/४ चमचा ओवा - १ चमचा तिळ - १ चमचा तेल - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. पालक धुवुन १ तास निथळत ठेवावा. जितका जास्त कोरडा करता येईल, तेवढा कोरडा करुन घ्यावा. २. पालक बारीक चिरुन घ्यावा. ३. त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, आले-लसुण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, हळद, ओवा, लाल तिखट, गरम मसाला, तिळ व चवीनुसार मिठ टाकावे. ४. हे पीठ निट मिक्स करावे. हे करताना पालकाला पाणी सुटल्यामुळे पीठ ओले होते. ५. १ चमचा तेल गरम करुन घ्यावे. हे गरम केलेले तेल ह्या पालकामधे टाकावे. ६. कोथिंबीर वडी करताना जसे आपण त्याचे लंबगोलाकार गोळे करतो, तसेच पालकाचे पण गोळे करुन घ्यावेत. ७. एका पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवावे. एका चाळणीला तेल लावुन त्यात हे गोळे ठेवावे. ८. हे गोळे १०-१५ मिनिटे वाफवुन घ्यावेत. ९. १०-१५ मिनिटांनी गोळे बाहेर काढुन गार होउ द्यावेत. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात. १०. ह्या वड्या shallow fry कराव्यात. तशाच छान लागतात. ११. ह्या वड्या तळुन किंवा नुसत्या उकडलेल्या पण चांगल्या लागतात. Image removed.

वाचन 19512 प्रतिक्रिया 0