फिल्म दि मेसेज
लेखनप्रकार
![]() |
![]() |
![]() |
वाचने
6953
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
छान परीचय. कुठे मिळाला तर बघेन एकदा.
आम्ही तिकडे पल्याड असताना जे वेडयासारखे सिनेमे पाहीले (अर्थात जालावर ;) ) त्यातलाच हा एक. एव्हढाही काही खास नाही. वेळ जात नसेल तर पीरीयड मुव्ही म्हणून पाहायला हरकत नाही. :)
इस्लामपूर्व काळातही मक्का व्यापाराचं केंद्र होती, आणि मसाल्याच्या व्यापारातून मक्केची भरभराट झाली होती. मक्का हे इस्लामपूर्व काळात पेगन धर्माच्या देवळांचं केंद्र होतं आणि काबा हे या धर्माच्या हुबाल देवतेचं देऊळ होतं. (विकि)
इस्लामचा सुरुवातीचा इतिहास वाळवंटातील लढायानी भरलेला होता. या चित्रपटातील वाळवंटातील लढायांची दृश्य नक्कीच प्रेक्षणीय असणार. अँथनी क्वीन हा संपूर्ण पडदा व्यापून टाकणारा अभिनेता असल्याने त्या दृष्टीनेही चित्रपट प्रेक्षणीय असावा.
एक इंटरेस्टिंग गोष्ट या चित्रपटाबद्दल वाचली, ती म्हणजे हॉलिवुडमध्ये कोणीही या चित्रपटाला आर्थिक मदत करायला तयार न झाल्यामुळे दिग्दर्शक मुस्तफा अक्कड यानी लिबिया आणि मोरोक्कोमधे या चित्रपटचं शूटिंग केलं ते गद्दाफीच्या आर्थिक मदतीच्या जोरावर.
In reply to चित्रपटाची सुंदर ओळख by पैसा
खर्या सैन्यातील सैनिक या चित्रपटात एक्स्ट्रॉ म्हणून घेतले होते म्हणे.
In reply to चित्रपटाची सुंदर ओळख by पैसा
तुमची इंटरेस्टींग गोष्ट खरी आहे पण त्याचे कारण काही असे आहे,
Director Akkad faced resistance from Hollywood to making a film about the origins of Islam because they do not allow the physical representation of Prophet Mohammed himself, or Any other Prophet like Isaa(Jejus) or Musa (Moses) , as it against the Principles of Islam !
तुम्ही दिग्दर्शक अक्क्ड याची मुलाखत येथे पाहू शकता
http://video.google.com/videoplay?docid=7642488031125398567
In reply to तुमची इंटरेस्टींग गोष्ट खरी आहे पण त्याचे कारण काही वेगळे आहे by वाहीदा
तुम्ही दिग्दर्शक अक्क्ड याची मुलाखत येथे पाहू शकतावाहिदा तु दिलेली लिंक म्हणजे सोने पे सुहागा !! कुठ्ल्याही चित्रपटाची मेकींग पहाणे म्हणजे क्या बात. धन्यवाद.
हा चित्रपट ६ वर्षांपूर्वीच पाहीला आहे,पण त्या अधीच मी शेषराव मोरेंनी लिहिलेलं मुहंमद पैगंबरांचं संपूर्ण जिवन चरित्र वाचलेलं असल्यानी सिनेमातल्या उर्दू डायलॉगचा प्रभाव सोडता मला हा चित्रपट विशेष आवडला नाही... अर्थात बद्रची लढाइ कशी दाखवलीये ही उत्सुकता होतीच...ती ही काही विशेष प्रभाव टाकू शकली नाही...चवथे खलीफा अली यांची दोन पात्यांची तलवार 'झुल्फीकार' दिसली तोच काय तो त्या लढाइतला सत्याचा अंश...बाकी इस्लामच्या खय्रा तत्वज्ञानाचा आणी चित्रपटाचा संबंध फारसा कुठेही विशेषत्वानी त्यात येतही नाही...बालशिवाजी सारखा हाही बालइस्लाम आहे...एवढेच!
In reply to हा चित्रपट ६ वर्षांपूर्वीच by अत्रुप्त आत्मा
शेषराव मोरेंचं ते पुस्तक मी वाचलेलं आहे.
त्यात ईस्लाम स्थापन झाल्यानंतरचं जे काही वर्णन आहे ते चित्रपटात जुळत नाही.
मोरेंचं पुस्तक ईस्लामी राज्यविस्तार समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे.
In reply to सहमत by यकु
@-मोरेंचं पुस्तक ईस्लामी राज्यविस्तार समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे....हो ते तर आहेच पण त्यातून प्रेषितांच्या काळातला ओरिजनल म्हणजेच मुळ इस्लाम काय आहे?हे विशेषत्वानी कळतं...बरोबर ना?..कारण प्रास्ताविकात मुहंमद मुस्तफ्फा यांनी म्हटल्याप्रमाणे ''मराठी भाषा या विषयात यापूर्वी कोरडी आहे...
---तिरपे आमचे...
ओळख करुन दिल्याबद्दल आभार.
१९६० च्या दशकात १०-१२ ऑस्कर मिळालेला बेन्-हर आठवतोय? त्यातही एक महत्वाची व्यक्तिरेखा -- येशू हिचा चेहरा दाकह्वलेला नाही. हीच टेक्निक भारत्-एक खोज मध्ये गौतम बुद्धाबद्दल वापरण्यात आलेली होती.
>> 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे.
म्हंजे?
शहनशाह ए फारीस, शहनशाह ए बाझन्तीन (byzantine), शहनशाह ए मिस्र
मला वाटते ह्यासोबतच अतिदूरच्या चीनच्या सम्राटालाही हे पत्र गेले होते. तेव्हा कुणीच नसणार्या पैगंबराने थेट तीन चार सर्वात मोठ्या सम्राटांना असे पत्र पाठवणे ह्यातून अफाट आत्मविश्वास जाणवतो.
बादवे, त्या पत्राला, "ख़त ए मुबारकबाद" म्हणतात.(उर्दु शैली नुसार "ख" नंतर नुक्ता द्यायचा प्रयत्न केला आहे.)
"खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात.
ह्यात एखादे मुसेलिमा किंवा मुसैलिमा/मुसयलिमाह ह्या नावाचं पात्र आहे का?(पैगंबराच्या समग्र जीवनावर चित्रपट असेल तर असायला हवे.)
"हबशाच्या बादशहा" म्हणजे अॅबिसिनियाचा आफ्रिकन ख्रिश्चन राजा असावा.
>> कुराणात मदर मेरी आणि येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख असल्याने सुखावलेला बादशहा (तुममे और हम में फर्क सिर्फ इस लकीर जितना है ) गुलाम व मक्केच्या लोकांना परत मक्केत पाठवण्याचे नाकारतो.
माझ्याकडची माहिती वेगळी होती.
काही काळाने मुहम्मद मक्का सोडून मदिना मध्ये रहायला जातात.
ह्याला हिजरा किंवा हिज़रत म्हणतात. अत्यंत म्हत्वाची घटना. इस्लामी वर्षाची कालगणना इथूनच सुरु होते. जसे आपल्याक्डे शालीवाहन शक आहे, शिव शक आहे किंवा आता जगभर वापरले जाणारे सिअवीसन येशूच्या ज्ञ्मापासून सुरु होते तसेच.
युद्ध सगळिच आहेत का? अल बद्र, खैबर, ट्रेंच वगैरे ची?
एका वेगळ्या चित्रपटाची ओळख झाली; पुनश्च आभार
In reply to बघावा लागणार. by मन१
मन१,
१९६० च्या दशकात १०-१२ ऑस्कर मिळालेला बेन्-हर आठवतोय? त्यातही एक महत्वाची व्यक्तिरेखा -- येशू हिचा चेहरा दाकह्वलेला नाही. हीच टेक्निक भारत्-एक खोज मध्ये गौतम बुद्धाबद्दल वापरण्यात आलेली होती.आठवतोय.. म्हणजे दि मेसेज, बेन हर, १० कमांडमेंट्स आणि अजुन एक वाळवंटातील प्रेषिताबद्दलचाच असे चार चित्रपट असलेली डिव्हीडी होती माझ्याकडे. बेन हर मध्ये मात्र आता ख्रिस्त दिसेल.. मग दिसेल असं करुन फार परेशान झालो होतो..
>> 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे. म्हंजे?म्हणजे चित्रपटाबद्दल वाद झाल्यानंतर त्यातील प्रसंग आणि त्यांची सत्यता तपासून पाहिली आहे. अल अझर कैरो मधले ईस्लामी विद्यापीठ.
"खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात. ह्यात एखादे मुसेलिमा किंवा मुसैलिमा/मुसयलिमाह ह्या नावाचं पात्र आहे का?(पैगंबराच्या समग्र जीवनावर चित्रपट असेल तर असायला हवे.)हमजा ज्याला झापड मारतो तेच ते पात्र असावे.. वर फोटो दिलाय.
"हबशाच्या बादशहा" म्हणजे अॅबिसिनियाचा आफ्रिकन ख्रिश्चन राजा असावा.जी हां!
युद्ध सगळिच आहेत का? अल बद्र, खैबर, ट्रेंच वगैरे ची?तीन-चार आहेत.. त्यात बद्रचे आहे.. पण बाकीची दोन बहुतेक नावांचा घोळ असेल. वाहिदाने दिलेल्या दुव्यात कळले की या चित्रपटाची एक अरेबिक आणि एक इंग्लिश अशा दोन आवृत्त्या एकाच सेटवरुन काढल्या होत्या. दोन्हीत कलाकार वेगळे... अरेबिक आणि इंग्लिशची डबींग अवघड जाते म्हणून हा खटाटोप.. खरं म्हणजे हा चित्रपट्च एक प्रचंड खटाटोप होता... डायरेक्टरला मानायला पाहिजे.
In reply to मन१,१९६० च्या दशकात १०-१२ by यकु
पण एक समजत नाही, तेव्हा अरब स्त्रिया बुरखा वापरत नव्हत्या का? वापरताना दिसल्या नाहित तिथे म्हणून विचारतोय.
तेव्हा स्त्रिया घोड्यावर बसायच्या ना? आता अरबस्थानात त्यांना गाड्या का चालवू देत नाहित?
चित्रपटाबद्दलः- ह्याच धाटणीचा, डॉक्युमेंट्री कम् चित्रपट अंगाने जाणारा "सरदार" पाहिला होता. परेश रावल त्यात मुख्य भूमिकेत होता. तो चित्रपट काहिहि काल्पनिक न घुसवता जसाच्या तसा बनवूनही रंजक वाटला, किंवा पुढला भाग पहावासा वाटत होता. मात्र इथे नक्की काय गडबड झाली आहे ते माहित नाही, पण जSSरासा संथ/रटाळ वाटला अधेमधे.
विषयनिवडीबद्द्ल १०/१० आहेतच,एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे; पण थोडा अजून रंजक नसता का बनवता आला?
की काही गोष्टी प्रेक्षकाला आधीच माहित असणं गृहित धरण्यात आलय?
चोप्रांची महाभारत ही सिरियलही महभारत ह्या कथेची ज्यांना पार्श्वभूमी ठाउक नाही अशांना व्यवस्थित समजली, आवडली होती.
चित्रपट परिक्षण आवडलं.
:-)
छान रे..



छान परीचय. कुठे मिळाला तर