निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार
In reply to सहमत-असहमत by सुनील
उमेदवार एकदा निवडून गेला की तो संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो (निदान तशी अपेक्षा आहे). केवळ त्याला निवडून दिलेल्या मतदारांचे नव्हे. तेव्हा त्याला परत बोक्लावण्याचा अधिकार (मिळालाच तर) तो संपूर्ण मतदारसंघालाच मिळायला हवा.एकुण मतदानापैकी विजयी उमेदवाराला साधारणता ३०-४० ( किंवा फार्फार तर ३५-४५) % च मते मिळतात. म्हणजे ऑलरेडी मेजॉरिटी त्याच्या विरोधात आहे, पण विरोधातली मते विभागली गेल्याने त्याच्या विरोधी ह्या विजयी उमेदवारपेक्षा जास्त मते घेऊ शकत नाही. मात्र जेव्हा परत बोलावण्याचा प्रस्ताव येईल तेव्हा 'परत बोलवावे का?' ह्या प्रस्तावाला आधीच्या विरोधातल्या मेजॉरितीची पुन्हा आरामात मेजॉरिटी होईल व त्याला परत बोलवावेच लागेल. जरी त्याच्या समर्थकांनी त्याला पहिल्याइतकीच मते दिली तरी ह्यावेळी विरोधातली मते 'संघटीत' असल्याने पराभव अटळ आहे. पण दुसरा पर्याय द्या म्हटल्यावर ह्या विरोधातल्या बहुमताचे पुन्हा त्यांच्यात ३५-३०-१५-१०-८-७ असे टक्केवारीत विभाजन होत जाईल त्याचे काय ? >>निवडून येणार्या उमेदवाराला किमान ५०% (एकूण मतदानाच्या) मते पडली असलीच पाहिजेत अशी अट व्यवहार्य ठरेल काय? नाही. बहुपक्षीय पद्धतीत हे व्यवहार्य नाही होणार, बहुतांशी स्पष्तीकरण वर दिलेले आहेच. >>तसे झाले तर परत बोलावण्याचा अधिकार (तूर्तास) नसला तरी चालेल. बहुपक्षीय पद्धतच रद्द केली तर हा अधिकार नसला तरी चालेल ह्याच्याशी सहमती. - छोटा डॉन
In reply to सर्व अटी ओके आहेत ... by छोटा डॉन
'ह्यातला कोणीही नको' हा ही रडीचा डाव वाटतो आणि हे अन्यायकारक आहे असे वाटते.रडीचा डाव काय ? मूळातच आम्ही लोकशाही विरोधी आहोत हा मुद्दा ध्यानात घ्यावा.
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to ओके by छोटा डॉन
महाराजांच्या कृपेने हा माझाच मुलगा आहे.प्रजेच्या दैनंदिन बाबतीत महाराज जर इतके जातीने लक्ष घालत असतील तर ते त्या प्रजेचं भाग्यच म्हणायला हवं. ;) बाकी उमेदवारच नाकारायला हवा या मताशी असहमत. जो उमेदवार आपल्याला नकोय त्याला मत न देऊन जनता त्याला नाकारतेच की.
In reply to ओके by छोटा डॉन
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to सर्व अटी ओके आहेत ... by छोटा डॉन
In reply to १. जे लोक मुळात पहिल्या by इरसाल
In reply to मुद्दा क्र. ४ शी by सविता
In reply to मुद्दा क्र. ४ शी by सविता
In reply to कलमाडी ला मी गेल्या निवडणुकीत by llपुण्याचे पेशवेll
In reply to चांगला विषय by विकास
त्याच बरोबर हे देखील समजते की संसदीय लोकशाहीत "आयाराम-गयाराम" मुळे सरकारही पडू शकते. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा हवा तर आहेच.विकास रावांनी एक फार छान मुद्दा मांडला आहे. काधी कधी उमेदवार बरा नसला तरी केवळ त्याचा पक्ष पाहुन मतदान केले जाते. अश्यावेळी जर त्या (जिंकलेल्या) उमेदवाराने पक्षांतर केले तर तो मतदारांचा एक प्रकारे विश्वास घातच म्हणायला हवा. बाकी चच्चांचा एकंदर चर्चा प्रस्ताव आवडला. चर्चा वाचतोय.
In reply to निवडून आलेल्या प्रतिनीधीला by विजुभाऊ
In reply to सर्वच उमेदवार नालायक आहेत असे by नितिन थत्ते
- २००३ मध्ये कॅलीफोर्नियाचा तत्कालीन गव्हर्नर ग्रे डेव्हीस ला असेच परत बोलावण्यात आले. त्यानंतर झालेल्या विशेष निवडणुकीत अर्नॉल्ड श्वार्झेनगर निवडून आला होता.
- मध्यंतरी विस्कॉन्सीन राज्यातील युनियनचे बरेचसे हक्क काढून टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यावरून तेथे, राजकीय हेतूने प्रेरीत पण कायद्याचा वापर करत, राज्यातील सहा ठिकाणच्या रीपब्लीकन लोकप्रतिनिधींना बोलावण्याचा प्रयत्न झाला. त्याला अंशतःच यश आले. आता तसाच प्रयत्न रिपब्लीकन्स दोन डेमोक्रॅट्सना बोलावून करत आहेत. दोन्ही कडील मतदार कायदे करणारे बहुमत बदलण्यासाठी हे करत आहेत यात शंका नाही. पण दोन्ही बाजूंना वाटले तितके ते सोपे ठरले नाही.
- मॅसॅच्युसेट्स मधील लॉरेन्स नावाच्या गावच्या भ्रष्टाचारी आहे म्हणून, महापौरास बोलावण्यासाठी जितक्या सह्या लागतात तितक्या गोळ्या केल्या गेल्या. पण निवडणूक आयोगाने दाखवून दिले की त्यातील अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत, जरी ते मतदार होते तरी आणि महापौरास "सत्याचा जय" झाला असे म्हणता आले - तात्पुरतेच! कारण विरोधक परत एकदा चुका दुरूस्त करून पुढे जायचा प्रयत्न करत आहेतच! पण त्याला परत बोलावले गेले, तर तेथे परत निवडणूक होईलच.
In reply to निवडून आलेल्या प्रतिनीधीला by विजुभाऊ
In reply to चूक ... by छोटा डॉन
In reply to चूक ... by छोटा डॉन
सहा महिन्यात पुन्हा निवडणूक घ्यावी. या निवडणुकीत परत बोलावलेल्या उमेदवाराला भाग घेता येऊ नये. पुढच्या रेग्युलर निवडणुकीत त्याला भाग घेता यावा.परत बोलावलेल्या उमेदवारावर निदान काही वर्षे तरी निवडणुक लढवायला बंदी पाहिजे असे मला वाटते.अकार्यक्षम लोकप्रतिनिधींवर वचक ठेवायला याचा थोडा तरी उपयोग होईल.
In reply to स्पष्टीकरण by सुनील
In reply to स्पष्टीकरण by सुनील
In reply to कशासाठी by आळश्यांचा राजा
In reply to मायनेता by विकास
In reply to दोन माहितींचा फोकस इतका वेगळा by नितिन थत्ते
हम्म्म