आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!
In reply to >>लहान मुलीवर झालेल्या या by विश्वनाथ मेहेंदळे
काहीतरी गैरसमज होत असावा.हे तर मी ही म्हटलं पाहिजे. पूर्वजन्मीची पापं वगैरे म्हणणार्यांना हा प्रश्न होता. असो. विरामचिन्हांचा उपयोग, लिखाणातल्या खाचाखोचा, उपरोध समजणं, सुस्पष्ट बोलणं खरोखरच एवढं कठीण का असावं?
In reply to आधारा साठी वळायच तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>बाहेरचा आधार, तोही by स्पंदना
In reply to >>बाहेरचा आधार, तोही by स्पंदना
तुम्हा आम्हा धर्म पाळकांच्याही वर जी एक सर्वात्मक अशी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेला मी देव माणते.अशी संकल्पना माझ्या डोक्यात नाही. त्यामुळे माझ्या लेखी देव हा फक्त एक शब्द आहे, जसा सैतान हा देखील एक शब्द आहे.
बर्याचदा चिडुन जाउन बदला घेण्यासाठी ... पण अश्या वेळी मी माझ्या मनाच्या आरश्यात मला निर्भेळ पाहु शकते का?प्रचंड राग आला तरीही कोणी असभ्य वर्तन करू नये यासाठी जर कोणी भीती दाखवून देव आहे असं सांगत असेल तर मग "धर्म भीतीवर आधारित आहे" हे शंभर वर्षांपूर्वी सांगणारा बर्ट्रांड रसल थोर वाटतो. "जो दुसर्यावरी विश्वासला" हे चारशे वर्षांपूर्वी सांगणारे रामदास मला थोर वाटतात. "Je pense, donc je suis" (मी विचार करते म्हणून मी आहे) असं साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणणारा दे कार्ते मला थोर वाटतो; तुमच्या भाषेत माझी विचारशक्ती हाच माझा आधारवड. काडीचा आधार शोधण्यापेक्षा मला पोहायला शिकणं, शिकवणंच योग्य वाटतं. आब म्हणजे नक्की काय हे मला अजून समजलेलं नाही. हा शब्द मला नवीन आहे. बाकी आहार, निद्रा, भीती आणि मैथुन या मनुष्याच्या प्रमुख गरजा आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? झोप झाली की आपण उठून रोजच्या व्यवहारांस लागतो, भीती घालवण्याचा प्रयत्न करतो, पोटात खड्डा पडतो म्हणून खातो आणि एका ठराविक वयानंतर शरीराची भूक असते म्हणून मैथुन. त्यात कसलं आलंय पाश्चात्य आणि भारतीय? आणि कसलं भोग भोगून रितं होणं? लैंगिकदृष्ट्या डिप्रेस्ड लोकं शोधली तर भारतातही चिक्कार सापडतील. मूल होणं हा शरीराचा व्यापार नसतो काय? (अरे बाप रे, मिपावर काय वयाची लोकं येतात?) बरं हे मीच म्हणते असं नव्हे, तर नटसम्राट नाटकात "आमच्या वासनेच्या शिड्यांवरून आलेले जीव" असा काहीसा उल्लेख वि. वा. शिरवाडकरांनीही केला आहे. कामदेव, मदन, रति अशी पात्र जिथे पुराणात वगैरे असतात तिथे मैथुनाचा, रोमँटीक प्रेमाचा उल्लेख असा क्षुल्लक गोष्ट म्हणून व्हावा ही गोष्ट मलातरी समजत नाही.
जस की आई वडिलांसमोर धुम्रपान वा मद्यपान न करणे हे त्यांचा आदर दाखवण्या साठी असत, तसच काहिस श्रावण पाळण, त्या मुळे का असेना पण तुम्ही आत्म्संयम दाखविता हे ही नसे थोडके, नाहितर साराच नंगा नाच.धूम्रपान, मद्यपान, मांसाहार यात काय आलाय नंगानाच हे अजूनही समजलेलं नाही. असो. एक मजेशीर किस्सा सांगते, आधीही एक-दोनदा लिहिलेला असेल, पण तरीही: तुम्ही ज्या पाश्चात्यांना नंगानाचप्रेमी म्हणता आहात, त्यांच्यापैकीच एका देशातली गोष्ट. नोव्हेंबरच्या दिवसात, संध्याकाळी साडेचारलाच गुडुप्प अंधार होत असे. मी रात्री आठच्या सुमारास, पाणी आणि ब्रेक्स गोठवणार्या थंडीत, किर्र अंधारात, खेड्यातल्या रस्त्यावरून सायकलने घरी जात होते. ओरडले असते तरी ऐकायला कोणी नसेल एवढी निर्जन जागा. थोडा वेळ सायकल चालवून हाताला घाम आला म्हणून हातमोज्यांची एक जोडी काढून पाठीवरच्या झोळीत टाकण्यासाठी थांबले तर एक चारचाकी शेजारी थांबली. खिडकीची काच खाली झाली आणि एक गोरा, मध्यमवयीन माणूस बोलला, "तू ठीक आहेस ना? काही मदत हवी आहे का?". "हो, मी ठीक आहे, थोडं उकडलं म्हणून हातमोजे काढत होते." "कुठे चालली आहेस? सायकल मोडली वगैरे नाही ना?" "नाही, नाही. इथेच, त्या टेलिस्कोपच्या इथेच. इथून निघाले की पाच-सात मिनीटांत पोहोचेन." "ठीक आहे, काळजी घे, गुडनाईट" असं म्हणून मी पुन्हा सायकलवर बसायच्या आत गाडी रस्त्यावरून दिसेनाशी झाली. त्या गोर्याला श्रावण म्हणजे काय हे ही माहित नसेल, पण संयम आणि सभ्यपणा नक्की माहित असावा. नाही का? असो. आमचीच काय ती संस्कृती आणि पाश्चात्य म्हणजे नंगानाच या विचारांचा मी निषेध करते.* या विषयावर आणखी लिहीण्याची माझी इच्छा नाही. असो. तर मुद्दा असा की चांगलं वागणारे सगळ्या देशांत असतात; तसेच निरीश्वरवादीही असतात. सज्जन आणि सभ्य असण्यासाठी भारतात जन्म होणं, मोठं होणं आणि देवावर निरंतर विश्वास असणं हे काही सक्तीचं नाही. फक्त आपणच काय ते सज्जन, सभ्य आणि वेगळा विचार करणारे ते नंगानाच करतात हा खांब सोडण्यासाठी किंऽचित विचार करावा लागतो. *आम्हीच काय ते पुढारलेले आणि तुम्ही हातांनी जेवणारे आणि धुणारे म्हणजे अविकसित, रानटी टोळ्यावाले याची विचारांचा प्रतिवाद करून मी दमले आहे.
In reply to स्वारी; मी धर्म पाळत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आपली कशी काय संस्कृती? हे कोण by स्पंदना
त्याचा वा कशाचाही अतिरेक हा नंगानाचच !आत्मसंयमाचाही?
श्रावण, अन तस्तम प्रकार हे जर आपण मनोबला साठी म्हणुन वापरले तरी चालतात. सारच का सोडायच्?नाही हो, मी अजून अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा सोडलेल्या नाहीत. शब्दशः कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं नाही. ;-) आणि कशातही काय संयम आणि काय? भूक लागली की उपलब्ध असेल, परवडेल, पचेल, बनवायला जमेल, तब्येतीला झेपेल ते सगळं खावं आणि कामाला लागावं. त्यात कसला महिना बघायचा? आणि हिवाळ्यात मी देवगड हापूसचा हट्ट मी करत नाही हा संयमच नव्हे काय? भूक लागली असली तरी जेवण शिजत असताना स्नॅक्स तोंडात न टाकणं हा संयम नव्हे काय?
ख्रिश्चन लग्नात फक्त थोड्याजणी पांढरा वेडींग गाउन घालतात. बाकिच्या कुठेतरी क्रिम, जरासा कमी पांढरा वापरतात. का ते विचार आहेस तिथच तर.सध्या तरी कोणाशी एवढी ओळख नाही. पण विकीपीडीया हे म्हणतो आहे: Brides from wealthy families often wore rich colors and exclusive fabrics. It was common to see them wearing bold colors and layers of furs, velvet and silk. त्यातूनही तुम्हाला काय सुचवायचं आहे हे मला समजलं असं वाटलं; म्हणून रॉजर फेडरर आणि मिर्का वाव्हरीनेच यांच्या लग्नाचे फोटो पाहिले. काय सुंदर पांढरा शुभ्र वेडींग ड्रेस होता मिर्काचा! असो. ज्यू लोकांत म्हणे धार्मिक पद्धतीने लग्न केलं तर वधूचं कौमार्य शाबूत आहे का असं जाहीरपणे विचारतात. अनेक इस्रायली ज्यू लोकांनाही हे पटत नाही म्हणून ते लोकं चूपचाप अमेरिकेत येऊन लग्न करतात आणि परत जातात अशी माहिती तिथे काही वर्ष रहाणार्या मैत्रिणीकडून मिळाली. "पितृसत्ताक पद्धतीमधली खुळं सगळी, योनीशुचिता वगैरे" ... हे वाक्य कविता महाजन यांच्याकडून साभार.
अन शिरवाडकर लिहुन गेले, करुन नाही गेले. हा फरक आहे.म्हणजे बोलले तसे वागले नाहीत? "बोले तैसा चाले" वगैरे आम्हाला शाळेत उगाच शिकवलं का??
नक्की फक्त शरिराचा व्यापार? मग झाल्या वर ती सोडुन दिली चालतील? कशाला त्यांना वाढवायच? आपल्या आपण दुसरा साथिदार शोधायचा अन मज्जा करायची.अरे कर्मा! सगळे, यच्चयावत पाश्चात्य लोकं असंच करतात का काय? बाळंतपणानंतर जर्मनीत सहा महिने (का एक वर्ष?) सक्तीची सुटी असते, आई-वडीलांपैकी कोणाला एकाला किंवा दोघांनाही घ्यावी लागते. अनेक पाश्चात्य देशांत मूल झाल्यानंतर मुलासाठी म्हणून पहिली काही वर्ष ठराविक रक्कम मिळते, मुलाच्या पोषणासाठी, ते काय आई वडील अर्भकांना वार्यावर सोडतात म्हणून? जोडीदाराशी जमत नाही म्हणून सरळ वेगळं होणारे पालक पोरांना वार्यावरच सोडून देतात का काय? आणि उदाहरणच द्यायचं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लहानाचं मोठं करणारी त्यांची अमेरिकन आईच होती. पाश्चात्य देशांतल्या माझ्या पहिल्या ख्रिसमसला मला स्वतःच्या घरी बोलावणारे माझ्या मित्राचे आईवडील काय त्याची पीएच.डी. सुरू झाल्यावर त्याच्यावर प्रेम करायला लागले होते का काय? लग्न केलेल्या किंवा ज्याच्याबरोबर रहात आहोत अशा व्यक्तीमधला आपला रोमँटीक इंटरेस्ट संपला आहे हे लक्षात आल्यावर वेगळं होणार्या लोकांबद्दल मला अजिबात राग नाही, असलाच तर थोडाबहुत आदर आहे. सुख मिळवताना दुसर्याला दु:ख होऊ नये अशी अपेक्षा रास्त आहे, पण त्याशिवाय मज्जा करण्यात काय गैर आहे? कोणाला सुखच टोचत असेल तर माझा काही इलाज नाही. (hedonist) अदिती आणि उकीरड्यात, कचर्यात सापडणार्या, दुधाच्या भांड्यात जन्माला येताच बुडणार्या बालिका कोणत्या देशात असतात? त्यांच्या आईबापांनातर दुसर्या व्यक्तीत रस आहे हे ही कारण नसतं. निष्कारणच बालिका मरतात नाही का?
In reply to त्याचा वा कशाचाही अतिरेक हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वाद देवावरून सुरु होऊन by नगरीनिरंजन
... देवाची गरज संपली आहे.माझ्या बुद्धीला देवाचं अस्तित्व पटलं नाही तेव्हा माझ्यासाठी देवाची गरज संपली. ज्या कोणाला देवाची गरज आहे त्यांच्याबद्दल माझी "नो कमेंट".
व्यक्तिशः मला गीतेत सांगितलेला परमेश्वर आणि निसर्गाची संकल्पना यात साम्य वाटते.यावर थोडं जास्त विस्तारीत लिहीलंत, कदाचित वेगळ्या धाग्यात, तर वाचायला आवडेल. Gaia सिद्धांतावर तुमचा विश्वास आहे काय?
In reply to वाद देवावरून सुरू होऊन इथे या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to त्याचा वा कशाचाही अतिरेक हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्वारी; मी धर्म पाळत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to देवाबद्दल... by चित्रगुप्त
In reply to डॅनिकेन by प्रियाली
In reply to अरेरे by नंदन
In reply to देवाबद्दल... by चित्रगुप्त
In reply to 'माणूस पॄथ्वीवर उपराच' असे एक by अप्पा जोगळेकर
In reply to क्षीरसागर की नाडकर्णी? by प्रियाली
In reply to क्षीरसागर की नाडकर्णी? by प्रियाली
In reply to लेख आत्ता वाचला.. देवाचं काय by अर्धवट
In reply to लेख आत्ता वाचला.. देवाचं काय by अर्धवट
In reply to लेख आत्ता वाचला.. देवाचं काय by अर्धवट

काहीतरी गैरसमज होत असावा. हे