मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छोले व लछ्छा पराठा

Mrunalini · · पाककृती
साहित्यः १. छोलें साठी साहित्यः छोले - १ वाटी कांदे - ३ टोमॅटो - ३ आले-लसुण पेस्ट - १ चमचा मिरे - २-३ लवंगा - २-३ दालचिनी - १ इंच तुकडा चहाची पावडर - १ चमचा आवळा सुपारी - २-३ जिरे - १ चमचा हळद - १ चमचा लाल तिखट - २ चमचे गरम मसाला - १ चमचा धने पावडर - १ चमचा जिरे पावडर - १/२ चमचा रेडिमेड छोले मसाला - २ चमचे आमचुर पावडर - २ चमचे आले - लांब चिरुन १/२ चमचा हिरवी मिरची - १ लांब चिरुन तुप - २ चमचे कोथिंबीर सजावटी साठी मिठ चवीनुसार २. लछ्छा पराठा साठी साहित्यः मैदा - १ वाटी बटर - १/२ वाटी अंडे - १ दुध - १/४ वाटी मिठ चवीनुसार कृती: १. छोले करण्याच्या आदल्या रात्री भिजत टाकावेत. २. दुसर्‍या दिवशी छोले शिजवताना आधी एका कापडा मधे मिरे, लवंग, दालचिनी, चहाची पावडर, आवळा सुपारी घेउन त्याची एक पोटली बांधावी व छोल्यां मधे टाकावी. छोले बोटचेपे होइ पर्यंत कुकर मधे शिजवुन घ्यावेत. ३. छोले शिजवल्यावर कापडाची पोटली टाकुन द्यावी. ह्या पोटली मुळे छोलेंना काळसर रंग येतो व आवळा सुपारी मुळे आंबटसर चव येते. ३. कांद्यांची व टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. ४. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकुन परतावे. जिरे थोडे परतल्यावर त्यात कांद्याची पेस्ट टाकावी. ५. पेस्ट बदामी रंगाची होइ पर्यंत परतावी. त्या नंतर त्यात आले-लसुण पेस्ट टाकुन २ मिनिटे परतावे. ६. आता त्यात टोमॅटोची पेस्ट टाकावी. टोमॅटोची पेस्ट चांगली परतल्यावर त्यातुन तेल सुटायला लागेल. ७. मग त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, छोले मसाला व आमचुर पावडर टाकुन चांगले परतावे. ८. ह्याचे तेल सुटु लागल्यावर त्यात शिजवलेले छोले टाकुन निट मिक्स करावे. ते मिक्स झाल्यावर त्यात छोले शिजवतानाचे उरलेले पाणी व चवीनुसार मिठ टाकावे. एकदम जास्त पाणी टाकु नये. नाहितर छोले पुर्ण mash होतील. ९. सगळ्यात शेवटी एका दुसर्या छोट्या कढई मधे तुप गरम करावे. त्यात लांब चिरलेले आले व मिरची परतुन घ्यावी. ह्याचा छोलेंना वरतुन तडका द्यावा. आवडत असल्यास वरतुन थोडे लिंबु पिळावे. गरम छोले तयार आहेत. chole १०. पराठ्यां साठी मैदा चाळुन घ्यावा. त्यात चवीनुसार मिठ , १ चमचा बटर, १ फेटलेले अंडे व दुध टाकुन त्याची कणिक मळुन घ्यावी. १/२ तास हि कणिक झाकुन ठेवावी. ११. पोळी साठे जेवढा कणकेचा गोळा घेतो, तेवढा घेउन त्याची पोळी लाटुन घ्यावी. १२. त्यावर हातानेच पुर्ण पोळीला बटर लावावे व त्यावर थोडा मैदा भुरभुरावा. poli १३. आता त्याचा आपण कागदाचा fan करतो, त्या प्रमाणे fan करुन घ्यावा. fan १४. ह्या fan चा आता गोल करुन घ्यावा व ह्याचा हलक्या हाताने पराठा लाटावा. role role2 १५. तव्यावर नेहमी प्रमाणे पराठा भाजुन घ्यावा व शेवटी वरतुन बटर सोडावे. poli3 १६. गरम पराठा तयार आहे. हा पराठा वाढताना आधी हातात थोडा press करुन घ्यावा. त्यामुळे त्याचे सगळे layers वेगळे होतात. chole and paratha

वाचने 13103 वाचनखूण प्रतिक्रिया 38

सुहास झेले Mon, 09/05/2011 - 09:35
अहाहाहाहाहा.... मेलो ठार मेलो !! :) सकाळी सकाळी हा धागा बघितला, आज निदान हॉटेलातून तरी मागवावे लागणार छोले-पराठा... :D

५० फक्त Mon, 09/05/2011 - 11:43
लई भारी आणि लई धन्यवाद, मधे गोल करुन ठेवलेला गोळा माडर्न आर्ट म्हणुन बिनधास्त खपेल. आणि शेवटच्या फोटोतले दोन झुट्टु असलेला लिंबु तर लैच भारी. बटर बटर आणि बटर, प्रत्येक पायरीला बटर, मला वपाडावची आठवण झाली , आठवण झाली म्हंजे हाय अजुन आयडि, उडालेला नाही. बाकी असले पराठे पुण्याला रेल्वेस्टेशनच्या समोर एका टपरी छाप हाटेलात मिळ्तात, घरी जमले तर ठिक नाही तर तिथुन आणुन खाल्ले जातील. आणि सानिकातैच्या चमच्यावर जसा डोळा ठेवला आहे ना तसा तुमच्या माश्यासारख्या दिसणा-या सर्विंग बाउलवर डोळा ठेवावा लागेल असं दिसतंय.(चिनी मातीचं आहे का प्लॅस्टिकचं ?)

In reply to by ५० फक्त

Mrunalini Mon, 09/05/2011 - 15:02
हा हा हा.... खुपच छान.. धन्यवाद. :) आहो आणि तो बाउल प्लॅस्टिकचा आहे. तुम्हाला हवा असल्यास, भारतात आल्यावर घरपोच करण्यात येइल. :)

In reply to by Mrunalini

५० फक्त Tue, 09/06/2011 - 11:35
नही$$$$, प्लॅस्टिकची भांडी हा माझा आणि बायकोचा आवडता वादाचा मुद्दा आहे, असो तुम्हाला एक ऑप्शन देतो, मी गेली बरेच वर्षे काचेचे, चिनी मातीचे नव्हे, काचेचे पारदर्शक चमचे हुडकतोय, तुम्हाला मिळु शकतील अशी आशा आहे. मिळत असतील तर किंमत काय असेल जरा सांगाल काय ?

स्मिता. Mon, 09/05/2011 - 15:39
कसले भारी फोटो आहेत... आणि अर्थातच पाकृसुद्धा! :) शेवटचा फोटो बघून तर राहवत नाहीये. ती प्लेट उचलून खायला सुरूवात करावी म्हणते.

जाई. Mon, 09/05/2011 - 21:23
उत्तम पाककृती दिल्लीत असताना लच्छा पराठा चटणी व पंजाबी लोणच्याबरोबर खाल्ला होता अप्रतिम लागतो

In reply to by रेवती

स्पंदना Tue, 09/06/2011 - 12:29
सहमत ! तसे मला सलमान अन जॉन् भाउजींच्या फोटो पेक्षा ही भारी वाटतात. ( द्राक्ष आंबट?????????) रेसिपी आवडलेली आहे, करण्यात येइल, पण माझे छोले या पेक्षा भारी होतात. पराठा मात्र ट्राय केला जाइल.

In reply to by स्पंदना

स्पंदना Wed, 09/14/2011 - 05:56
पराठा अतिशय सोपा पडला करायला इतक्या इनस्ट्रकश्न्स डिटेल मध्ये होत्या, अन छान झाला. धन्स !