छोले व लछ्छा पराठा
साहित्यः
१. छोलें साठी साहित्यः
छोले - १ वाटी
कांदे - ३
टोमॅटो - ३
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
मिरे - २-३
लवंगा - २-३
दालचिनी - १ इंच तुकडा
चहाची पावडर - १ चमचा
आवळा सुपारी - २-३
जिरे - १ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
जिरे पावडर - १/२ चमचा
रेडिमेड छोले मसाला - २ चमचे
आमचुर पावडर - २ चमचे
आले - लांब चिरुन १/२ चमचा
हिरवी मिरची - १ लांब चिरुन
तुप - २ चमचे
कोथिंबीर सजावटी साठी
मिठ चवीनुसार
२. लछ्छा पराठा साठी साहित्यः
मैदा - १ वाटी
बटर - १/२ वाटी
अंडे - १
दुध - १/४ वाटी
मिठ चवीनुसार
कृती:
१. छोले करण्याच्या आदल्या रात्री भिजत टाकावेत.
२. दुसर्या दिवशी छोले शिजवताना आधी एका कापडा मधे मिरे, लवंग, दालचिनी, चहाची पावडर, आवळा सुपारी घेउन त्याची एक पोटली बांधावी व छोल्यां मधे टाकावी. छोले बोटचेपे होइ पर्यंत कुकर मधे शिजवुन घ्यावेत.
३. छोले शिजवल्यावर कापडाची पोटली टाकुन द्यावी. ह्या पोटली मुळे छोलेंना काळसर रंग येतो व आवळा सुपारी मुळे आंबटसर चव येते.
३. कांद्यांची व टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी.
४. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकुन परतावे. जिरे थोडे परतल्यावर त्यात कांद्याची पेस्ट टाकावी.
५. पेस्ट बदामी रंगाची होइ पर्यंत परतावी. त्या नंतर त्यात आले-लसुण पेस्ट टाकुन २ मिनिटे परतावे.
६. आता त्यात टोमॅटोची पेस्ट टाकावी. टोमॅटोची पेस्ट चांगली परतल्यावर त्यातुन तेल सुटायला लागेल.
७. मग त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, छोले मसाला व आमचुर पावडर टाकुन चांगले परतावे.
८. ह्याचे तेल सुटु लागल्यावर त्यात शिजवलेले छोले टाकुन निट मिक्स करावे. ते मिक्स झाल्यावर त्यात छोले शिजवतानाचे उरलेले पाणी व चवीनुसार मिठ टाकावे. एकदम जास्त पाणी टाकु नये. नाहितर छोले पुर्ण mash होतील.
९. सगळ्यात शेवटी एका दुसर्या छोट्या कढई मधे तुप गरम करावे. त्यात लांब चिरलेले आले व मिरची परतुन घ्यावी. ह्याचा छोलेंना वरतुन तडका द्यावा. आवडत असल्यास वरतुन थोडे लिंबु पिळावे. गरम छोले तयार आहेत.
१०. पराठ्यां साठी मैदा चाळुन घ्यावा. त्यात चवीनुसार मिठ , १ चमचा बटर, १ फेटलेले अंडे व दुध टाकुन त्याची कणिक मळुन घ्यावी. १/२ तास हि कणिक झाकुन ठेवावी.
११. पोळी साठे जेवढा कणकेचा गोळा घेतो, तेवढा घेउन त्याची पोळी लाटुन घ्यावी.
१२. त्यावर हातानेच पुर्ण पोळीला बटर लावावे व त्यावर थोडा मैदा भुरभुरावा.
१३. आता त्याचा आपण कागदाचा fan करतो, त्या प्रमाणे fan करुन घ्यावा.
१४. ह्या fan चा आता गोल करुन घ्यावा व ह्याचा हलक्या हाताने पराठा लाटावा.
१५. तव्यावर नेहमी प्रमाणे पराठा भाजुन घ्यावा व शेवटी वरतुन बटर सोडावे.
१६. गरम पराठा तयार आहे. हा पराठा वाढताना आधी हातात थोडा press करुन घ्यावा. त्यामुळे त्याचे सगळे layers वेगळे होतात.

वाचन
13103
प्रतिक्रिया
0