"संभवामि युगे युगे" असे वचन देऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण अण्णांच्या रूपात आले आहेत!
काव्यरस
दिल्लीची कैरोच्या दिशेने वाटचाल?
अलीकडे पैसे खाऊन ते पैसे स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करताना त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरत नाहींत! आताशी तर हे चोरलेले पैसे शून्ये न वापरता 10^6, 10^8, 10^10 असे लिहायची गरज भासू लागली आहे. लहानपणी शिकलेले (पण कधीही न वापरलेले) अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंख, महाशंख, परार्ध असले एकक (units) नव्याने वापरावे लागत आहेत. अगदी अलीकडचे गुंडांनी वापरलेले "पेटी", खोका" हे शब्दही अपुरे पडत आहेत. मधे एक अलीकडच्या 'खाबूवीरां'च्या 'सन्मानार्थ त्यांची नावे वापरून केलेले नवे अंकगणितच आता उपयोगी पडेल असे वाटते. (त्यात शेवटचे नांव कुणाचे होते हे बहुतेकांना आठवत असेलच.)
सध्या भल्या-भल्या नेत्यांनी व त्यांच्या "पुण्यकर्मा"त सहभागी झालेल्या त्यांच्या साथीदारांनी हडप केल्याबद्दलच्या त्यांच्यावरील दोषारोपात जे आकडे वाचायला मिळतात त्यांचा हिशेब तोंडी तर सोडाच, पण सामान्य कॅलक्युलेटरवरही करता येणे शक्य नाहीं. त्यासाठी "स्प्रेडशीट"च वापरावा लागेल.
ही हडप केलेली सर्व संपत्ती भारतीय जनतेची, त्यांनी दिलेल्या करांतून जमविलेली आहे. तीच हडप केल्यामुळे सामान्य जनता संतापल्यास नवल ते काय? पूर्वी एक-दोन लाख खाल्ले तरी "अबब" व्हायचे, पुढे कोटी रुपये खाल्ले तरी कांहीं वाटेनासे झाले. संवयच झाली म्हणा ना! मग चारा-घोटाळ्यापासून (fodder scam) हजार कोटींचा आकडा वाचनात येऊ लागला व पचूही लागला. पण आता? "इतके लक्ष कोटी"पर्यंत मजल गेली. (कधी कधी असे वाटते कीं अकाउंटिंगच्या परिक्षांत हिशेब कसे ठेवायचे व हिशोबातल्या चोर्या कशा पकडायच्या हे शिकवायचे सोडून "नको ते" शिक्षण दिले जात आहे कीं काय!) काय करणार आहेत ही मंडळी या पैशांचे? कांहीं लाज, लज्जा, शरम? आम जनता १० हजार ते १० लाखांपर्यंत पगार मिळवते. पण हल्ली वाचनात ज्या राशी येतात त्या वाचल्यावर वाटते कीं "यत्र- यत्र धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" अशा परिस्थितीत "संभवामि युगे युगे" असा आशिर्वाद देऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण आता कशाची वाट पहात आहेत? कीं तेच आज अण्णा हजारेंच्या रूपाने प्रकट झाले आहेत?
पण आपल्या सरकारचे रागरंग पहाता त्याला अद्याप जनतेच्या क्षोभाच्या तीव्रतेचा किंवा तो क्षोभ किती खोल आहे याचा अंदाजच आलेला नाहीं. कालची राजघाटावरील अण्णांच्या चिंतनाबद्दलची बातमी टीव्हीवर पाहिल्यावर असे वाटले कीं सरकारने नीट विचार केला नाहीं तर राजघाटाचा किंवा जयप्रकाश नारायण उद्यानाचा तेहरीर चौक व्हायला वेळ लागणार नाहीं. मनिष तिवारींचे अण्णासाहेबांच्या बाबतीत ’तुम’ ’तुम्हारी’ सारखे सौजन्यहीन उद्गार, कपिल सिब्बल यांच्या चेहर्यावरचे "अतिहुशारी" दर्शविणारे लबाड हास्य आणि अंबिका सोनींचे एकाद्या ४-५ वर्षाच्या मुलाला समजावे तसे जनतेला सांगणे म्हणजे कहरच झाला आहे असे वाटते.
पण अण्णांना उपोषण करायला बंदी घालून "आताचे गांधी" इंदिरा-जींचे अनुकरणच करत आहेत कीं काय? त्यांना या देशात पुन्हा आणीबाणी आणयची आहे काय? हे देशाचे तारू भरकटत कुठे न्यायचे आहे त्यांना? काय म्हणून उपोषण करण्याचा हा अधिकार अण्णांना हे सरकार नाकारीत आहे? आपल्याला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालेलेच नाहीं असे अण्णा म्हणाले ते खरेच आहे. फक्त "गोर्या इंग्रजां"च्या जागी "सावळे इंग्रज" आले. जी बंदी गोर्या इंग्रजांनी महात्मा गांधींच्या उपोषणावर घातली नाहीं ती बंदी हे गांधींचे नाव घेणारे आजचे "सावळे इंग्रज" आजच्या युगातल्या गांधींच्या नव्या अवताराला कां नाकारत आहेत? आणि ते आता बंदिवासात अन्नच काय पण पाणीही त्यजून उपोषणाला बसले आहेत तर अटकेने सरकारने काय साधले? आज भारतभर-अगदी केरळ-तामिळनाडूपासून उत्तरेत हरियानापर्यंत व राजस्थानपासून आसामपर्यंत सारे लोक अण्णांच्या मागे उभे आहेत. एकादी ठिणगीच पडायचाच अवकाश आहे. मग असे पेटेल कीं कैरोतल्या तेहरीर चौकाचीच पुनरावृत्ती होईल.
मागे फिलिपीन्समध्ये जेंव्हां अशीच चळवळ कोरी अक्वीनोबाईंनी सुरू केली त्यावेळी त्यावेळी जनसमुदाय असाच चौकात जमला होता. त्यातल्या कॉलेजकन्यकांनी मशीनगनधारक थाय सैनिकांना गुलाबाची फुले दिली. ती कृती इतकी परिणामकारक ठरली कीं सारे सैनिक कोरीबाईंच्या बाजूला आले व पाठोपाठ रामोस हे संरक्षणमंत्रीही कोरीबाईंना येऊन मिळाले. दिल्लीच्या गर्दीतही खूप स्त्रिया दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला हवी. मग हे बंधू काय या निदर्शकांवर हल्ला करतील? काय बिशाद!
अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यासाठी २२ अटी? कशाला? एक नि:शस्त्र अहिंसावादी देशभक्त भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला उभा रहातोय् व तेही फक्त स्वत: अन्न नाकारून, तर यात पोलिसांना "सुरक्षे"ची काय समस्या दिसली? अतिरेक्यांना सोडून ते या आधुनिक महात्म्याच्या कां मागे लागले आहेत? आणि तीनच दिवसांची परवानगी काय म्हणून? आमरण उपोषण तीन दिवसात कसे संपेल? शिवाय ५००० पेक्षा जास्त लोक येणार नाहींत याची खात्री अण्णा कसे देतील? ती व्यवस्था गर्दीचे योजनाबद्धपणे नियंत्रण करून पोलिसांनाच करायला हवी! कार पार्कमध्ये ५० पेक्षा जास्त गाड्या किंवा दुचाकी वाहने चालणार नाहींत हीही जबाबदारी अण्णांची कशी? ती व्यवस्थाही पोलिसांनीच नको कां पहायला?
"सरकारचे डोके टिकाणावर आहे कां?" असेच म्हणायची आता पाळी आलेली आहे. सरकारला सुबुद्धी सुचो व या "भ्रष्टासुरा"चा संहार होवो ही आशा करत-करत आत पुढच्या शुभ वार्तेची वाट पाहू या!
वाचने
18232
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
काका पयले हा लेख इथून हलवा हि
लेखातील भावनेशी संपूर्णपणे
In reply to लेखातील भावनेशी संपूर्णपणे by अप्पा जोगळेकर
मग ती इटालियन बारबाला असूदे
In reply to लेखातील भावनेशी संपूर्णपणे by अप्पा जोगळेकर
निषेध
In reply to निषेध by शाहिर
का द्वेश्टेपणा स्वीकारता आहात.
Nothing succeeds like success
In reply to Nothing succeeds like success by सुधीर काळे
कुठले लोक?
In reply to कुठले लोक? by प्रियाली
नेहमी असा संशय घेऊ नकोस.....
In reply to नेहमी असा संशय घेऊ नकोस..... by सुधीर काळे
संशय
In reply to संशय by प्रियाली
जकार्तात झी व समय या दोन वाहिन्या सर्व भारताला cover करतात
In reply to जकार्तात झी व समय या दोन वाहिन्या सर्व भारताला cover करतात by सुधीर काळे
समय
In reply to समय by प्रियाली
पहा वाचून! महाराष्ट्र आणि दिल्लीतील बातम्या ठळक केलेली नाहींत
In reply to पहा वाचून! महाराष्ट्र आणि दिल्लीतील बातम्या ठळक केलेली नाहींत by सुधीर काळे
धन्यवाद
काका तूम्ही खूप चांगले लेखन करताय या विषयावर..
In reply to काका तूम्ही खूप चांगले लेखन करताय या विषयावर.. by आत्मशून्य
शिवाय तहरीर चौकानंतर काय झाले?
In reply to काका तूम्ही खूप चांगले लेखन करताय या विषयावर.. by आत्मशून्य
कुठल्याही क्षणी मनमोहन सिंग यांचा "आतला आवाज" सजीव होईल....
In reply to कुठल्याही क्षणी मनमोहन सिंग यांचा "आतला आवाज" सजीव होईल.... by सुधीर काळे
पण खरे सांगायचे तर आता
In reply to पण खरे सांगायचे तर आता by गणपा
+१
In reply to +१ by विकास
मनमोहन सिंग इतके "पोचलेले" नाहीत असेच वाटते
In reply to पण खरे सांगायचे तर आता by गणपा
+१
In reply to पण खरे सांगायचे तर आता by गणपा
प्रकाटाआ
लेखाचे शीर्षक वाचल्यावर
In reply to लेखाचे शीर्षक वाचल्यावर by नितिन थत्ते
?
In reply to लेखाचे शीर्षक वाचल्यावर by नितिन थत्ते
टाळ्या
छोटेखानी परंतु सुंदर
भारतीय भ्रष्टाचारविरोधी
अरेच्चा
In reply to अरेच्चा by श्रावण मोडक
हॅ हॅ हॅ
In reply to अरेच्चा by श्रावण मोडक
आठवण
जितका प्रचंड भ्रष्टाचार तितकी उदंड प्रगती असे समीकरण?
In reply to जितका प्रचंड भ्रष्टाचार तितकी उदंड प्रगती असे समीकरण? by सुधीर काळे
हम्म
हम्म २
काळेकाका एकदा इंडिया अगेन्स्ट
In reply to काळेकाका एकदा इंडिया अगेन्स्ट by ईश आपटे
एका वेळी एक समस्या सोडवू या.
http://www.esakal.com/esakal/20110817/5266424372071605546.htm
'ई-सकाळ'वरील लेखाने वाचकांच्या मनाला स्पर्श केला आहे असे वाटते
मान्य नाही
In reply to मान्य नाही by क्लिंटन
सहमत
In reply to मान्य नाही by क्लिंटन
हे साध्य करायला अण्णांसारख्या ऋषितुल्य देवमाणासाची गरज आहे!
In reply to हे साध्य करायला अण्णांसारख्या ऋषितुल्य देवमाणासाची गरज आहे! by सुधीर काळे
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
देशद्रोह्यांशी आपण आजही असेच कडकपणे वागतो
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
इतर चार मुद्द्यांविषयी काय?
In reply to इतर चार मुद्द्यांविषयी काय? by क्लिंटन
कुणी चांगलं काम करत असेल तर जास्त कीस काढण्याच्या मी विरुद्ध आहे
In reply to मान्य नाही by क्लिंटन
पुचाटपणा आणि बोटचेपेपणा
जेपी धुतल्या तांदळासारखे असे
In reply to जेपी धुतल्या तांदळासारखे असे by मराठी_माणूस
अण्णानी चमत्कार (अकल्पित,
In reply to अण्णानी चमत्कार (अकल्पित, by आत्मशून्य
तूला लेखकाचे म्हणणे भावना
In reply to तूला लेखकाचे म्हणणे भावना by आशु जोग
हे तू मला सांगू नकोस.
सर्वोत्कृष्ठ प्रतिसाद
अण्णांना "तुम-तुम" करणार्या मनिष तिवारीना चिरंजीव होऊ दे!
लोकपालाची निवड कशी करायची?
विनंतीवजा आवाहन
- सुचना टंकीत स्वरूपात असाव्यात
- सुचना 'डबल स्पेसिंग' वापरून टंकलेल्या असाव्यात (वर्डमधे पेज लेऑअट --> स्पेसिंग मधे डबल स्पेसिंग द्यावे)
- सुचनांच्या दोन प्रती वरील पत्त्यावर १५ दिवसांच्या आत (४ सप्टेंबर २०११) पोहोचल्या पाहिजेत
- संसदीय स्थायी समितीपुढे जर तोंडी पद्धतीनेही सुचना समजवायच्या असतील तर तसे स्पष्टपणे नमुद करावे म्हणजे स्थायी समिती गरज वाचाल्यास तुमचे म्हणणे ऐकण्यास तुम्हाला नवी दिल्लीला बोलवेल.
माझ्यामते संसदीय स्थायी समितीला आपली मते कळविणे गरजेचे आहे. स्थायी समिती ही विविध पक्षांच्या खासदारांनी बनलेली असते. या समितीपुढे आपली मते ठेवल्यानंतर समिती मसुद्यात योग्य वाटतील ते बदल घडवून आणु सहते. जर सर्व सुचना, आक्षेप वगैरे वाचुन समितीला मुळ मसुद्याच्या ढाच्यामधेच तृटी आढळल्यास ती मसुदा रद्द (रिजेक्ट) करू शकते. मात्र या सार्यासाठी तुमच्या सुचना समितीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मी माझ्या सुचना कालच पोस्टाने पाठवल्या आहेत. असे विनंतीवजा आवाहन करतो की ज्यांना लोकपाल विधेयक २०११ मधे तृटी वाटत असतील किंवा जे काहि मत असेल त्यांनी त्यांच्या सुचना/ आक्षेप/सुचवण्या वगैरे समितीला जरूर पाठवून (निदान) आपले कर्तव्य पार पाडावे.In reply to विनंतीवजा आवाहन by ऋषिकेश
यांना ई-मेलने सूचना पाठवू शकतो का?
In reply to यांना ई-मेलने सूचना पाठवू शकतो का? by सुधीर काळे
इमेल अॅड्रेस
In reply to इमेल अॅड्रेस by ऋषिकेश
कलम ५
आज जन्माष्टमी....
In reply to आज जन्माष्टमी.... by नितिन थत्ते
केक
In reply to केक by कुंदन
केक आणणारच असाल तर
जकार्ताची "अण्णा हजारे टीम"
In reply to जकार्ताची "अण्णा हजारे टीम" by सुधीर काळे
बराच मोठा चमु
In reply to बराच मोठा चमु by ऋषिकेश
मला वाटते कीं एक-एक करून काँग्रेसमधून खासदार बाहेर पडू लागतील
In reply to मला वाटते कीं एक-एक करून काँग्रेसमधून खासदार बाहेर पडू लागतील by सुधीर काळे
'नक्कीच कमकुवत' अशी संभावना
In reply to मला वाटते कीं एक-एक करून काँग्रेसमधून खासदार बाहेर पडू लागतील by सुधीर काळे
क्या से क्या हो गया!
In reply to क्या से क्या हो गया! by सुनील
सज्जन माणसामागे सारे उभे रहात आहेत!
"उपोषण संपले नसून स्थगित केले आहे"