उपोषण, कायदेभंग, सरकार इत्यादी
In reply to चांगला लेख by सुनील
सरकारने तसे विस्तृत स्पष्टीकरण आंदोलनकर्त्यांना तसेच जनतेला द्यावे. दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नयेप्रश्न तेव्हाच येतो जेव्हा आंदोलनकर्त्यांना सरकारने (विस्तृत) स्पष्टीकरण अमान्य असते किंवा त्यांना ऐकून घ्यायचे नसते / चुकीचे वाटते / ऐकून घेऊन चालणार नसते. अश्यावेळी सरकारला जर आंदोलनकर्त्यांची भुमिका मान्य असेल व आंदोलनकर्ते ऐकत नसतील तर सरकारने काय करावे असे वाटते? असा प्रश्नाचा रोख आहे
In reply to एक शंका by पंगा
हे जे काही आंदोलन चाललेले आहे, त्याच्या तपशिलांचा अभ्यास केलेला नाहीचर्चा विषय कोणत्याही एका आंदोलनाशी थेट संबंधित नाहि. (अर्थात सध्या चालु असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने आहे.. मात्र त्यावरच सिमीत नाही). तेव्हा मत मांडावे.. वाचायला आवडेल :)
"वी, द पीपल" वगैरे म्हटलेले आहे, ते "वी, द पीपल" म्हणजे नेमके कोणते 'वी, द पीपल' इथेच सिमीत नसून 'वी, द पिपल ऑफ इंडिया' आहे. तेव्हा यात ज्याचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे असा प्रत्येक जण येतो असे वाटते. शिवाय हा लेख अधिकची माहिती देईलच
In reply to मत मांडावे by ऋषिकेश
ते 'वी, द पीपल' इथेच सिमीत नसून 'वी, द पिपल ऑफ इंडिया' आहे.बरोबर.
तेव्हा यात जुआचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे असा प्रत्येक जण येतो असे वाटते.बरोबर. भारताचा/ची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती. प्रश्न विचारण्याचे कारण एवढेच की, याचाच अर्थ ही घटना 'वी, द पीपल ऑफ इंडिया'नी अंगीकारलेली, 'वी, द पीपल'नी स्वतःला दिलेली, 'वी, द पीपल'ची आणि 'वी, द पीपल'साठी आहे. ("WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved ... do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.") म्हणजे अंतिम महत्त्व कोणाला, घटनेला की जनतेला? अर्थात जनतेला. तेव्हा एखादा मार्ग हा केवळ घटनाबाह्य आहे एवढ्याच कारणाकरिता तो जनतेला निषिद्ध असू शकत नाही. विशेषतः तो मार्ग जर अहिंसक आणि शांततामय असेल आणि त्याने कायदा आणि सुव्यवस्थेस कोणतीही बाधा येत नसेल तर. बाकी, दुसर्या प्रश्नाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आंदोलकांच्या मागण्या या जर जनतेच्या मागण्या असतील, आंदोलकांस जनाधार असेल, तरच आंदोलन दीर्घकाल चालू शकेल. तेव्हा लोकप्रतिनिधींनी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे नाही जायचे तर कोणाच्या म्हणण्याप्रमाणे जायचे? शेवटी कायदे हे संसदेत लोकप्रतिनिधींनी आणि संसदेच्या प्रोसिजरप्रमाणे बनवायचे असतात वगैरे हे ठीकच आहे, परंतु लोकप्रतिनिधींनी मुळात कायदे करताना लोकांचे मत विचारात घ्यायला नको का? अर्थात आंदोलकांची (म्हणजेच लोकांची) भूमिका ही रास्त कारणांसाठी मान्य होण्यासारखी नसेल (जसे अन्याय्य मागण्या किंवा घटनेच्या एखाद्या तरतुदीच्या विरोधात जाणार्या - केवळ घटनाबाह्य नव्हे - मागण्या किंवा ज्याचे परिणाम व्यापक राष्ट्रहितास घातक असू शकतील अशा मागण्या वगैरे) तर त्या मान्य न करणे योग्य आहे. पण त्या परिस्थितीतही व्यापक जनसंपर्क अभियान, वाटाघाटी वगैरे माध्यमांतून सरकार या मागण्या मान्य का होऊ शकत नाही हे जनतेला (केवळ आंदोलकांनाच नव्हे) पटवण्याच्या पायर्या घेऊ शकतेच. पण केवळ एखादा मार्ग हा घटनाबाह्य आहे म्हणून तो निषिद्ध करणे हे पटण्यासारखे वाटत नाही. (अर्थात हे झाले माझे अनइन्फॉर्म्ड मत, फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ तत्त्वावर.)
In reply to ठीक. मग... by पंगा
म्हणजे अंतिम महत्त्व कोणाला, घटनेला की जनतेला? अर्थात जनतेला. तेव्हा एखादा मार्ग हा केवळ घटनाबाह्य आहे एवढ्याच कारणाकरिता तो जनतेला निषिद्ध असू शकत नाही.याच्याशी पूर्ण सहमत नाही. जनतेने (अप्रत्यक्षरित्या) घटना बनविली आहे, त्यामुळे घटनेच्या बाहेर जाऊन जनता वागल्यास फारसे गैर नाही या सुराशी सहमत नाही. घटना बनवितानाच ती लवचिक बनविली आहे. जर घटनेत घालून दिलेले नियम बहुसंख्यांना चुकीचे/अपूर्ण/अन्याय्य वाटत असतील तर घटनेत बदल करण्याच्या पद्धतीदेखील घटनेत दिल्या आहेत. तेव्हा एखादा मार्ग हा केवळ घटनाबाह्य आहे एवढ्याच कारणाकरिता तो जनतेला निषिद्ध असू शकत नाही हे जरी एका दृष्टीने योग्य असले/वाटले तरी बहुसंख्यांचे पाठबळ असतानाही घटनेत बदल करण्याऐवजी मुद्दाम घटनाबाह्य मार्ग वापरणे कितपत सयुक्तीक आहे?
तेव्हा लोकप्रतिनिधींनी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे नाही जायचे तर कोणाच्या म्हणण्याप्रमाणे जायचे
अर्थात आंदोलकांची (म्हणजेच लोकांची) भूमिका ही रास्त कारणांसाठी मान्य होण्यासारखी नसेल (जसे अन्याय्य मागण्या किंवा घटनेच्या एखाद्या तरतुदीच्या विरोधात जाणार्या - केवळ घटनाबाह्य नव्हे - मागण्या किंवा ज्याचे परिणाम व्यापक राष्ट्रहितास घातक असू शकतील अशा मागण्या वगैरे) तर त्या मान्य न करणे योग्य आहे.या सगळ्यात सरकारचा कस लागतो तो कोणत्या मागण्या 'योग्य - अयोग्य' आहेत. उदा. तेलंगाणाच्या निर्मितीच्या उपोषणावेळी ते स्वतंत्र राज्य ही केवळ तेथील जनतेची मागणी आहे इतक्या कारणासाठी मान्य करणे कितपत योग्य आहे? आणीबाणीआधी विद्यार्थ्यांचे आंदोलन व त्याला मोरारजींच्या उपोषणाची जोड मिळून दबावात येऊन बरखास्त झालेल्या बहुमतातील विधानसभेचे उदा. आठवावे. तेव्हा जसे मार्ग हा केवळ घटनाबाह्य आहे एवढ्याच कारणाकरिता तो जनतेला निषिद्ध असू शकत नाही तसे सरकारच्या एखाद्या कृतीविरुद्ध जनाधार आहे एवढ्याच कारणाकरीता घटनाबाह्य कृतीला कसे समर्थन करावे?
In reply to काहिसा असहमत by ऋषिकेश
सरकारच्या एखाद्या कृतीविरुद्ध जनाधार आहे एवढ्याच कारणाकरीता घटनाबाह्य कृतीला कसे समर्थन करावे?सरकारच्या एखाद्या कृतीविरूध्द जनाधार आहे हे ठरविणार कोण आणि कसे? अण्णांच्या समर्थनार्थ लाखो लोक रस्त्यावर आले हा जनमत मोजायचा मापदंड झाला का? १९९२ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना पाच कोटी लोकांच्या सह्यांचे एक निवेदन दिले (ते निवेदन नक्की कसले होते हे सांगायची गरज नाही) तेव्हा शर्मांनी केवळ एकच प्रश्न विचारला: ५ कोटींनी सह्या दिल्या ठिक आहे पण उरलेल्या ८५ कोटी भारतीयांचे काय? तेव्हा रस्त्यावर लाखो लोक येणे हाच एखाद्या गोष्टीला जनाधार आहे का हे ठरवायला योग्य मापदंड आहे का? दुसरे म्हणजे अनेक लोक म्हणतात की निवडणुकांना अर्थ नाही कारण निवडणुका manipulate केल्या जातात म्हणून निवडणुकांमधील कौल हा जनाधाराचे द्योतक नाही! तसे असेल तर रस्त्यावर आलेल्यांचे मत पण manipulate होऊ शकते ही शक्यता का विचारात घेतली जात नाही?आजच आमच्या इमारतीच्या watchman शी इतर काही कारणाने बोलणे झाले तो बोलता बोलता म्हणून गेला की अण्णा हजारे करत आहेत ते योग्य आहे आणि भ्रष्टाचार निपटून काढायला लोकपाल बिल संमत झालेच पाहिजे. मी त्याला विचारले की नक्की काय आहे त्या बिलात? त्यावर त्याला दोन शब्दही सांगता आले नाहीत तरीही लोकपाल बिल आले की भ्रष्टाचार संपेल ही खात्री त्याला होती.आता सध्याच्या वातावरणात जो hysteria तयार केला जात आहे त्यातूनच त्याचे मत असे बनले असे म्हटले तर त्यात चूक काय? लोकपाल बिलासाठी रस्त्यावर आलेले बहुसंख्य लोक कशावरून असे नसतील? (काहींना वाटत असेल की भ्रष्टाचार १००% संपेल तर काहींना वाटेल तो ५०% संपेल) तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे निवडणुकांना त्या manipulate केल्या जातात या कारणासाठी निवडणुकीतील कौलाला फारसे महत्व न देणारे लोक अशा रस्त्यावर आलेल्या लोकांकडे बघूनही ते अशा कोणत्या कारणाने manipulate झाले असतील ही शक्यताच मुळी लक्षात घेत नाहीत. ते का? तेव्हा प्रश्न आहे की असा जनाधार मोजणार कोण आणि कोणत्या आधारावर?
In reply to +१ by क्लिंटन
५ कोटींनी सह्या दिल्या ठिक आहे पण उरलेल्या ८५ कोटी भारतीयांचे काय?उरलेल्या ८५ कोटींपैकी बहुतांशांचा मागणीला पाठिंबा असेल किंवा नसेल, पण निदान ५ कोटींचा (ही थोडीथोडकी संख्या नव्हे) पाठिंबा आहे ही बाब त्यावर साधकबाधक विचार आणि चर्चा (केवळ संसदेतच नव्हे, तर एकंदर समाजात) सुरू होणे इष्ट आहे याकरिता चांगली निर्देशक ठरावी. एकदा समाजात याचा उहापोह होत आहे म्हटल्यावर दोन्ही (किंवा असतील तितक्या) बाजू त्याबद्दल आपापली बाजू जनतेसमोर मांडू शकतात. त्याआधारे या ना त्या बाजूने जनमत तयार करता येऊ शकते. मग जनमताचे आधिक्य नेमके कोणत्या बाजूस आहे याचा अंदाज घेण्यासाठी काही पायर्या योजणे (सार्वमत किंवा इतर काही) मला वाटते अशक्य नसावे. पण 'उरलेल्या ८५ कोटींचे मत माहीत नाही' म्हणून मुद्दा मुळात (सह्यामोहिमेद्वारे, आंदोलनाद्वारे किंवा अन्य मार्गांनी) पुढेच येऊ न देणे हे सयुक्तिक वाटत नाही. विशेषतः 'वी, द पीपल'च्या राज्यात आणि घटनेखाली. (१९५०पूर्वीच्या घटनांची गोष्ट कदाचित थोडी वेगळी असावी. तिथे 'वी, द पीपल'ला घटनेत कितपत महत्त्व होते किंवा घटनेवर किंवा एकंदरीतच राज्यकारभारावर 'वी, द पीपल'ची कितपत मालकी होती, याबद्दल साशंक आहे.) (५ कोटींच्या सह्या आहेत किंवा लाखो लोक रस्त्यावर आहेत म्हणजे ऑपॉप ताबडतोब मागण्या मान्य केल्या पाहिजेत, बिल पास केले पाहिजे असे म्हणणे नाही. पण ५ कोटींच्या सह्या आहेत किंवा लाखो लोक रस्त्यावर आहेत म्हणजे काहीतरी जळते आहे, त्याची दखल घेऊन योग्य पाऊल हे जनतेला विश्वासात घेऊनच उचलणे इष्ट आहे.)
रस्त्यावर आलेल्यांचे मत पण manipulate होऊ शकतेThe game can be played both ways, एवढेच सुचवू इच्छितो.
आता सध्याच्या वातावरणात जो hysteria तयार केला जात आहे त्यातूनच त्याचे मत असे बनले असे म्हटले तर त्यात चूक काय?निवडणुकांच्या काळातही असा हिस्टीरिया अनेकदा तयार केला जाऊ शकतो आणि त्याचा मतदानावर प्रभाव पडू शकतो, हेही निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यामुळे हाच न्याय लावायचा झाला तर निवडणुका याही कशाचेच द्योतक म्हणता येणार नाहीत. सबब, (बरोबर असो वा चूक, पण जनमतास मान देऊन) निवडणुका आणि जनआंदोलने या दोहोंनाही सारखेच महत्त्व देणे (म्हणजे महत्त्व देणे, सारखेच कचर्याच्या टोपलीत टाकणे नव्हे.) हे निदान मला तरी सयुक्तिक वाटते. (अतिअवांतर: प्रेसिडेंट शर्मा यांना दिलेले ५ कोटी सह्यांचे निवेदन नेमके कसले होते? त्यातील मागण्या नेमक्या कशा प्रकारच्या होत्या?) (अर्थात, ही झाली म्या अडाण्याची मते. तज्ज्ञांच्या मताशी मिळतीजुळती असतीलच, असे नव्हे. काय ते म्हणतात ना, 'जनमत' वगैरे, त्यातला भाग. फक्त, fairly stubborn, and not easily manipulable, एवढाच काय तो फरक. ;))
In reply to . by पंगा
In reply to +१ by क्लिंटन
In reply to काहिसा असहमत by ऋषिकेश
तेव्हा जसे मार्ग हा केवळ घटनाबाह्य आहे एवढ्याच कारणाकरिता तो जनतेला निषिद्ध असू शकत नाही तसे सरकारच्या एखाद्या कृतीविरुद्ध जनाधार आहे एवढ्याच कारणाकरीता घटनाबाह्य कृतीला कसे समर्थन करावे?समर्थन हे योग्यायोग्यतेच्याच निकषावर होऊ शकते, हे मान्य. मात्र, याच धाग्यावर इतरत्र म्हटल्याप्रमाणे, ज्या अर्थी सरकारी कृतीविरुद्ध जनाधार आहे त्याअर्थी काहीतरी जळते आहे एवढे निश्चित, तेव्हा जी काही कार्यवाही करायची ती जनमतास मान देऊन, जनतेस विश्वासात घेऊन, प्रसंगी जनमत बनवूनच करणे सयुक्तिक आहे. त्याकरिता मुळात जनतेच्या अभिव्यक्तीला धुडकावून चालणार नाही. आणि अशा अभिव्यक्तीकरिता जनता जो काही मार्ग अवलंबेल, तो जोपर्यंत (१) शांततामय आहे, (२) अहिंसक आहे, (३) त्यातून जीवित, वित्त किंवा मालमत्ता यांची हानी होत नाही, आणि (४) कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षा यांना बाधा येत नाही (पैकी ४मधील 'कायद्या'च्या मुद्द्याबद्दल किंचित साशंक आहे), किमान तोपर्यंत अभिव्यक्तीचा असा मार्ग केवळ घटनाबाह्य आहे म्हणून निषिद्ध असू नये, आणि उपलब्ध असला पाहिजे, एवढेच म्हणणे आहे.
In reply to . by पंगा
तेव्हा जी काही कार्यवाही करायची ती जनमतास मान देऊन, जनतेस विश्वासात घेऊन, प्रसंगी जनमत बनवूनच करणे सयुक्तिक आहे. त्याकरिता मुळात जनतेच्या अभिव्यक्तीला धुडकावून चालणार नाही.सहमत आहे. अधोरेखिताशी जास्तीची सहमती :) बाकी शांततामय, अहिंसक, कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षा यांना बाधा न येणे वगैरे सापेक्ष आहे असे वाटते.

In reply to अतिशय छान पद्धतीने मांडलेला by राजेश घासकडवी
अतिशय छान पद्धतीने मांडलेला चर्चाप्रस्ताव. ऋषिकेश यांच्याकडून नेहेमीच एखाद्या प्रश्नाकडे संतुलित मांडणीची अपेक्षा असते. ती आजही पूर्ण झाली.हेच म्हणतो. चर्चा वाचतोय.
In reply to सहमत by Nile
In reply to मंडळ आभारी आहे by ऋषिकेश
In reply to चर्चा वाचते आहे. ऋ, by ३_१४ विक्षिप्त अदिती
समाजमन आधी तयार करावं लागेलनेमकं मत. समाजमन तयार न करता निर्णय घेतले तर की कितीही योग्य असोत लोकांच्या गळी उतरणं कठीण असतं. केवळ एखाद्या आंदोलनाचा जनाधार आहे म्हणून ती कृती करण्यापेक्षा जनाधार का आहे हे समजून ते मत बदलण्यासाठी समाजमन 'तयार करणं' ही महत्त्वाची पायरी आपल्याकडे गाळली जाते आहे असं वाटतं
In reply to मंडळ आभारी आहे by ऋषिकेश
१. उपोषण, सविनय कायदेभंग वगैरे मार्ग संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे कितपत (किती प्रमाणात) योग्य वाटतात?योग्य वाटतात. लोहशाहीत लोकांचे, पर्यायाने देशाचे, नुकसान होत असेल तर अशा प्रकारची आंदोलने योग्यच किंवा गरजेची वाटतात. कोणता मार्ग निवडावा हे मात्र आंदोलकांनी ठरवावे. कोणत्या आंदोलनात सहभाग घ्यावा हे मी त्यावेळेचा आणि आंदोलनाच्या प्रकार, लक्ष्य इत्यादींनुसार ठरवेन.
अश्या पद्धती तुम्हाला ब्लॅकमेलिंग आहेत असे वाटते का?सर्वच पद्धती ब्लॅकमेलिंग वाटत नाहीत. मात्र आंदोलकांनी बिनाशर्त अटी मान्य करा असा मुद्दा कायम ठेवल्यास ते ब्लॅकमेलिंग ठरू शकते. पण काही वेळी ब्लॅकमेलिंग जरी असले तरी ते आवश्यकही असू शकते. पण जर परीस्थिती फार वाईट नसली, उदा. सद्ध्याचे आंदोलन, तर ब्लॅकमेलिंग नसावे असे माझे मत आहे.
२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते?जोपर्यंत लोकशाहीला धोका नसेल तोवर सरकारने दडपशाही तंत्राचा वापर करू नये. शक्यतो आंदोलकांशी बोलणी करावीत. त्यांची बाजू आणि सरकारची बाजू लोकांसमोर मांडावीत.त्यास आपोआपच समाजातील नि:पक्ष लोकांचा प्रतिसाद येईल आणि पर्यायाने आंदोलनाची पुढील दिशा* आपोआप ठरवली जाईल असे वाटते. (*लोकांचा पाठिंबा इ.)
३. संसदीय लोकशाहीत संसदेत जनतेचा आवाज उठत नसेल तर जनतेने कोणत्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा असे वाटते?वर म्हणल्याप्रमाणे परिस्थीचा विचार करून मार्गाचा अवलंब करावा लागेल. वेळ तशी असल्यास सशस्त्र क्रांती करूच/होऊच नये असे माझे मत नाही. ही चर्चा फार महत्त्वाची आहे, विशेषकरून सद्ध्याच्या अण्णांच्या आंदोलनाला बर्याच तरूण वर्गाचा आंधळा पाठिंबा आहे असे माझे (छोट्या निरिक्षण-गटावरून) मत झाले आहे. हे चांगले नाही. तुम्ही जर एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असात तर त्याबद्दल तुम्ही तुमचे मत आधी बनवले पाहिजे, त्यातून होणार्या संभाव्य फायद्या तोट्याबद्दल (आंदोलनाच्या व्याप्तीनुसार, लोक, देश राष्ट्र इ. ला) आधी विचार केला पाहिजे.
In reply to अतिशय उत्तम धागा by फारएन्ड
जोपर्यंत त्याच मुद्द्यावर निवडणूका लढल्या जात नाहीत तोपर्यंतहेच करायचे नसल्यावर इतर मार्गांनी आंदोलन केले जाते का? भारतात अनेक स्तरांवर सतत निवडणूका होत असतात. तेव्हा प्रत्येक प्रकारच्या मागणीसाठी ५ वर्षे थांबावे लागेलच असे नाही
In reply to काही उत्तरे by समंजस
या बद्दल तुमचं काय मत आहे? हे प्रकार संसदीय लोकशाहीमधे अवलंबणे योग्य आहे का ? संबंधित प्रशासन, सरकारनी हा प्रकार चालवून घेतला ते योग्य आहे का? ही ब्लॅकमेलिंग आहे का? असल्यास मागील कित्येक दशकांपासून आणि सध्याही हे का चालू ठेवण्यात आलं आहे?अश्या मागण्या करताना व्यापक जनाधार असणे शक्य वाटत नाही कारण ही समस्या त्या संस्थेपुरती (इथे रेल्वे महामंडळ वगैरे) मर्यादीत आहे. अशावेळी आंदोलन करणार्यांपुढे राजकीय आंदोलन करणार्यांपेक्षा अधिक सिमीत मार्ग उरतात. हे प्रश्न हाताळणे सरकारचे काम नसून ते त्या संस्थेचे आहे. संसदीय लोकशाही असो वा नसो हे प्रश्न येतातच
In reply to जनाधार असणे शक्य वाटत नाही by ऋषिकेश
In reply to घटनाबाह्य, संसद विरोधी, by समंजस
सरकार आणि प्रशासन अश्या प्रकारांना स्विकारून मागण्या मान्य करत असेल (कित्येक दशकांपासून हे चालूच आहे)कित्येक दशके हे चालु आहे हे सत्य असले तरी हा मार्ग योग्य नाही असे वाटते. दुर्दैवाने बस/रेल्वे/ब्यांका वगैरे संस्थात हा पायंडा पडत चालला आहे की असा संप/बंद वगैरे केल्याशिवाय तुमच्या मागण्यांकडे लक्षच दिले जात नाही.
इथे तर त्यांच्या मागे व्यापक जनाधार आहे मग या व्यापक जनाधाराला सुद्धा लोकशाही विरोधी, घटना विरोधी, संसद विरोधी समजावं का ??अश्या आंदोलनाचा धोका असा की जनाधार खरोखरच किती व्यापक आहे हे समजत नाही. या चर्चेत अन्यत्र पंगा यांनी म्हटल्याप्रमाणे असा जनाधार बघता, सरकारने ते मत विचारात घेतले पाहिजे, त्यावर चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. मात्र केवळ सरकावर दबाव आणायची शक्ती आहे म्हणून मागण्या मान्य झाल्याच पाहिजेअ हा हट्ट चुकीचा वाटत नाहि का?
अण्णा आणि सिवील सोसायटी याचं आंदोलन हे राजकीय आंदोलन नाही.असहमत. राजकीय आंदोलन म्हणजे राजकीय पक्षाने किंवा संसदीय राजकारणाला पुरक अश्या राजकारणाशी संबंधित आंदोलन नाहि. अगदी अरविंद केजरीवाल यांनीही त्यादिवशी सीएनेन-आयबीएनच्या मुलाखतीत सांगितलं की आमचा राजकीय पक्ष नसला तरी मागणी राजकीय असल्याने आमच्या आंदोलनाला एका अर्थी राजकीय म्हणता येईलच
In reply to सरकार आणि प्रशासन अश्या by ऋषिकेश
In reply to उत्तम चर्चाप्रस्ताव by विकास
In reply to उत्तम चर्चाप्रस्ताव by विकास
तरी देखील प्रश्न क्रमांक १ चे माझ्या लेखी उत्तरः उपोषण, निषेध-मोर्चा वगैरे मान्य आहे. पण सविनय कायदेभंग मान्य नाही. कुठल्याही कारणास्तव कायदेभंग हा गुन्हाच असावा असे वाटते.'सविनय कायदेभंगा'च्या तत्त्वातसुद्धा संबंधित कायदेभंग हा संबंधित प्रचलित कायद्याच्या दृष्टीने गुन्हाच आहे, हे मला वाटते मान्यच असते. फक्त, त्या गुन्ह्यावरची जी काही कारवाई आणि शिक्षा आहे ती भोगण्याची पूर्णपणे तयारी दर्शवून आणि त्या कारवाईच्या किंवा शिक्षेच्या अंमलबजावणीस कोणत्याही प्रकारे विरोध न करता अथवा अडथळा न आणता, जाणूनबुजून तो कायदेभंग केला जातो, असे वाटते.
In reply to एक बारीक मुद्दा by पंगा
In reply to प्रश्नासंदर्भात by विकास
अगदीच सविनय कायदेभंगासारखी हुक्की असेल, तर जेलभरो आंदोलन करायची हिंमत ठेवावी.नेमका मुद्दा. सविनय कायदेभंग यालाच तर म्हणतात. नाहीतर तो नुसताच कायदेभंग होतो. मला वाटते फरक आहे.
अण्णांसारखे ते ठेवू शकतील पण एक दिवस गर्दीत जाऊन निषेध नोंदवणारे अथवा आर्मचेअर अॅक्टीव्हिस्ट तसे करू शकतील असे वाटत नाही...कदाचित. पण नुसता निषेध नोंदवण्यात काय गैर आहे? मात्र, त्यात जर कायदेभंग होणार असेल, तर त्याबद्दल पकडले जाण्याची आणि कोणतीही तक्रार न करता त्याबद्दल शिक्षा भोगण्याचीही तयारी हवी.
In reply to प्रश्नासंदर्भात by विकास
In reply to इंटरेस्टिंग... by श्रावण मोडक
In reply to उत्तम चर्चाप्रस्ताव by विकास
""अरे पण का? बहुसंख्यांनी सरकारला ५ वर्षे निवडले आहे. जर त्यांचा कारभार नाहि आवडला तर त्यांना मी मत देणार नाही"
, हे जर मत असेल तर सरकारदरबारी कुठलीही मागणी करणे अयोग्यच आहे. जनतेची जबाबदारी फक्त मतदान करणे इतकीच रहाते. अर्थात हे विधान मला पटलेले नाही.सहमत आहे. मलाही पटलेले नसले तरी असा मतप्रवाह आहे आणि तो अनेकदा ऐकायला मिळतो. चर्चा प्रस्ताव मांडताना लिहिलेली अवतरणे अनेकदा विविध लोकांच्या तोंडून ऐकलेली आहेत. वरील पद्धतीने प्रस्ताव मांडताना त्यातील प्रत्येक विधानाशी मी सहमत असुच शकत नाही कारण विविध मते चर्चेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. माझे मत अजून थोडी चर्चा झाल्यावर देईनच :)
विचार करा, खाजगी उद्योगात कंत्राटावर कुणाला घेतले असेल आणि त्याने जर कामात हलगर्जीपणा केला, सांगितले त्यापेक्षा भलतेच काम केले तर कंपन्या काय कंत्राट संपेपर्यंत गप्प बसतील का?उदा. मात्र चपखल (वाटले) नाही. खाजगी उद्योग आणि सरकार चालणणे यात फारच तफावत आहे.
पण सविनय कायदेभंग मान्य नाही. कुठल्याही कारणास्तव कायदेभंग हा गुन्हाच असावा असे वाटतेकेवळ उपोषण हा कायदेभंग नसला तरी आमरण उपोषण हा कायदेभंग ठरतो. तेव्हा तो गुन्हा आहे असे वाटते का?
माझ्या लेखी, ब्लॅकमेलींग करणारी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीचे नुकसान करत असते. तर अशा प्रकारच्या दबावतंत्रात उपोषण करणारी व्यक्ती ही समाजासाठी सरकारने योग्य बदल करावे म्हणून मागणी करत असते.पण ती मागणी योग्य आहे की नाही हे कोण ठरवणार. का केवळ जनाधार आहे, प्रसिद्ध नावे जोडली गेली आहेत म्हणून ती मागणी योग्य होते? या दबावतंत्रामुळे मागणी योग्य आहे की नाहि यावर निकोप चर्चा होऊ शकत नाहि असे वाटते का? केवळ जनाधार आहे म्हणून कित्येकदा या दबावामुळे अयोग्य प्रसंगी घातक मागण्या मान्य केल्या जाण्याचा संभव असतो.
२. अश्यावेळी सरकारला आंदोलकांची भुमिका मान्य नसल्यास सरकारने काय करावे असे वाटते? आंदोलनाच्या ताकदीवर आणि गांभिर्यावर सरकारची भुमिका अवलंबून असावी. त्यात वाटाघाटी, समित्या नेमणे, वगैरे सर्व येईल. पण आंदोलन चिरडून टाकणे मात्र अयोग्य आहे.आंदोलनाच्या ताकदीवर सरकारची भुमिका असावी म्हणजे नीटसे समजले नाहि. म्हणजे जसे मणिपूरची उपोषणकर्ती, गंगा वाचवा म्हणणार्या स्वामींकडे गांभिर्य असले तरी केवळ जनाधार नसल्याने (=आंदोलनाच्या ताकदीच्या अभावाने) त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हे योग्य वाटते का? थोडक्यात सरकारने मागण्या मान्य करताना जनाधाराला कितपत महत्त्व द्यावे? ---------------------------------- बाकी चर्चाप्रस्तावात जो काही संवाद लिहीला आहे त्यासंदर्भातः
राज्य-केंद्र सरकारे ही जनतेने निवडून दिलेली आहेत, त्यांना आता जनतेचा विकास करण्याचे हक्क आहेत, म्हणून सरदार सरोवराविरुद्धचे मेधा पाटकर यांचे आंदोलन चुकीचे आहे असे आपले म्हणणे आहे का? आपल्या मुद्याप्रमाणे, त्यांनी करायलाच नाही पाहीजे. अण्णांनी जेंव्हा महाराष्ट्रात असाच सरकारविरोधात लढा दिला तो पण मग आपल्या दृष्टीने चुकीचा होता का? त्याला आलेले माहीती अधिकाराचे फळ देखील मग विषारीच आहे असे म्हणायचे आहे का?वर म्हटल्याप्रमाणे चर्चा सुरु करताना मी विविध मते दिलेली आहेत. तुमचा ते मत माझे आहे असा समज झाल्याने तुम्ही "आपल्या मुद्याप्रमाणे" लिहिले आहे त्याकडे दुर्लक्ष करतो.
मेधा पाटकर यांचे आंदोलन चुकीचे आहे असे आपले म्हणणे आहे का?माझे मतः नाही. मात्र सरकारला त्यांचे मत अयोग्य वाटल्याने त्यांनी शेवटी प्रकल्प कोर्टात जाऊन पुढे रेटला यातही काहि गैर नाही
त्याला आलेले माहीती अधिकाराचे फळ देखील मग विषारीच आहे असे म्हणायचे आहे का?मला असे वाटत नाही
संसदीय लोकशाही आहे, निवडून दिले आहे तेंव्हा त्याच्या विरोधात काही करणे कसे चुकीचे आहे वगैरे विधाने मला पटत नाहीत आणि (तुम्ही करता असे अजिबात म्हणायचे नाही/स्वप्नात देखील वाटत नाही, पण) दिशाभूल करणारी वाटतात.अधोरेखीत सत्य आहे. :) ============= यामार्गांशिवाय प्रत्येक नागरीकाला 'कायद्याचा मार्ग' असतोच फक्त प्रत्येक जण तो अवलंबतोच असे नाही
In reply to चांगला मार्ग by नितिन थत्ते
- सुचना टंकीत स्वरूपात असाव्यात
- सुचना 'डबल स्पेसिंग' वापरून टंकलेल्या असाव्यात (वर्डमधे पेज लेऑअट --> स्पेसिंग मधे डबल स्पेसिंग द्यावे)
- सुचनांच्या दोन प्रती वरील पत्त्यावर १५ दिवसांच्या आत (४ सप्टेंबर २०११) पोहोचल्या पाहिजेत
- संसदीय स्थायी समितीपुढे जर तोंडी पद्धतीनेही सुचना समजवायच्या असतील तर तसे स्पष्टपणे नमुद करावे म्हणजे स्थायी समिती गरज वाचाल्यास तुमचे म्हणणे ऐकण्यास तुम्हाला नवी दिल्लीला बोलवेल.
In reply to एक सुचना by ऋषिकेश
In reply to ऋषिकेश म्हणतायेत त्याप्रमाणे by इरसाल

विनंती