सौंदर्याचा बाजार
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय. नटनट्यांच्या अंगावरचे एकेक वस्त्र मात्र फिटत चाललेय...
कुठे त्या मधुबालेचा सोज्वळ अन् कुठे आजच्या हिरॉईन्सचे स्वीमिंग पुलावरचे देहप्रदर्शन, खोलवरचे किसींग शॉटस्, अन् बेडवरचे नग्न सीन्स. ही त्रयी असल्याशिवाय पिक्चर चालणारच नाही काय? चित्रपटाच्या कथेवर संवादावर मेहनत घेण्यापेक्षा अशा अश्लीलतेवरच भर देण्याचा प्रयत्न निर्माता, दिग्दर्शक व नट नट्यासुद्धा करतात. अभिनयाच्या बाबतीत पूर्णतः शून्य कामगिरी बजावून अंगप्रदर्शनाच्या वेळी मात्र शंभर टक्के योगदान देणाऱ्या कैक अभिनेत्री (खरे तर बायाच!) पैशाला पासरी झाल्यात.
एखादी नवी नटी तिच्या अंगभूत अभिनयाऐवजी तिच्या उघड्या अंग'ऊता'नेच जाणली गणली जाते. तिला जर जास्तीच ऊत असेल तर पटकन नको ते पिक्चर्स मिळत जातात आणि ती भाबडी त्या ऊतातच ऊतू जाते. इतकी की भानावर आल्यावर अंगावर तसेच मनावर बरेच परिणाम झालेले असतात. आपली इमेज सुधारण्यात तिची जिंदगी जाते. काही नट्या लवकर सावरतात तर काही वाहतच जातात. आजच्या नंबर वन अभिनेत्रीँचे पहिले चारपाच चित्रपट आठवून पहा. तेव्हा त्यांनी कशी स्वस्तात मदमस्त कामं केली होती ते कळेल. मग तो खिलापमधला किस असो वा परिंदामधला बेडसीन, तालमधली फोटोग्राफी असो वा आजुबामधली आरसेमहालाची न्हाणी किंवा जंगललवमधले मध चाटणे असो वा हममधला चिल्लर काढण्याचा शॉट. कुठलीच नटी या देहप्रदर्शनाला मुकली नाही अन् ते शॉट देतांना एकदाही चुकली नाही हे विशेष!
वाचने
8635
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
डॉ. साहेब
सुमार
हायला !
मी
In reply to मी by विनायक प्रभू
चालेल
बराच अभ्यास दिसतोय !!
शॉट
In reply to शॉट by विनायक प्रभू
अग्गायायायायाया......
अकलेचा बाजार
अकलेचा बाजार
अकलेचा बाजार
In reply to अकलेचा बाजार by इंटरनेटस्नेही
इंटया, कबुल आहे विषय तुझ्या
कशाला
काही नट्या लवकर सावरतात तर
कमाल आहे!
श्यामच्या मॉमचा सल्ला
In reply to श्यामच्या मॉमचा सल्ला by योगप्रभू
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
तर तर!
In reply to तर तर! by धमाल मुलगा
चुकून...
In reply to चुकून... by पंगा
आणखी चूक
In reply to आणखी चूक by ३_१४ विक्षिप्त अदिती
?
In reply to ? by पंगा
माझ्या नजरचुकीबद्दल आणखी
In reply to ? by पंगा
अग्ग्ग्ग्ग्गं.....
अरेरे..
In reply to अरेरे.. by योगी९००
बोंबला!
In reply to बोंबला! by धमाल मुलगा
ऑ ?
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
या सर्व प्रतिक्रियाना मिळून ..
_/\_
कोएना मित्राला कसे विसरलात
मधुबाला
इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील
मागणी तसा पुरवठा....
"ओन्ली सेक्स अॅन्ड शाहरुख
काय अभ्यास
असे का ?
In reply to असे का ? by इरसाल
असहमत. माझा सातवा आठवा असेल.