काश्मिरी पुलाव ..
काश्मिरी पुलाव :
हा माझा आवडता प्रकार आहे बर्याच दिवसापासून विचार करत होते कि ,एकदा वीकेण्ड्ला बनवावा ,पण साहित्याची जमवाजमव होत नव्हती.
गाजर आहे तर अननस नाही , अननस आहे तर सफरचंद नाही ,हिरवे मटार आहेत तर काजुबदाम संपलेले !
शेवटी या विकेंडला ठरवलंच सर्व साहित्य जमा करायचं आणी पुलाव बनवायचाच !
योगायोग बघा ,घरातले सर्वजण साखरपुड्याला बाहेर गेलेले ,घरात फक्त मी आणि आज्जी .
म्हटलं चला आज श्री गणेशा करूनच टाकूया .
एरवी किचनमध्ये माझी लुडबुड चालू असते तेव्हा " झाले हिचे उपद्व्याप सुरु ,,"हिला काय अवार्ड-बिवार्ड मिळणार आहे का? "उगा का संजीव कपूरच्या पोटावर पाय " असेच टोमणे ऐकायला मिळतात पण आज कुणी नव्हत टोमणे मारायला ;)
असो ..
चला मग लागा तयारीला .....
साहित्य :
२ कप बासमती तांदूळ (लांब शीत असणारा )
२ कप दुध
१ कप मलई
१ चमचा साखर ,मीठ चवीनुसार
जीर अर्धा चमचा
लवंग ३-४ ,
दालचिनी १-२ तुकडे ,
हिरवी इलायची ४-५
१ तेज पत्ता ( तमाल पत्र )
२ चमचे तूप
मनुके २ चमचे
गाजराचे काप अर्धी वाटी
हिरवा मटार ३ चमचे ,
बिन्स २ चमचे
मक्याचे दाने उकडलेले १ चमचा (ऑप्शनल)
अननसाचे तुकडे अर्धी वाटी (तुम्हाला जी फळे आवड्तात त्या नुसार)
काजू ,बदाम आवडीनुसार हवे तेवढे
सुके काळे मनुके २ चमचे
केसर चुटकी भर
कृती :
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून १५ - २० मिनिट ड्रेन करा
दुध ,मलाई ,साखर ,केसर यांचे मिश्रण करून घ्या .
एका नॉनस्टिक पॅनमध्ये /कुकरमध्ये मध्ये २ चमचे तूप गरम करा
त्यात जीरा ,दालचिनी ,लवंग ,तेजपत्ता याचा तडका द्या
आता यात धुतलेले तांदूळ ३-4 मिनिट हळुवार परतून घ्या
चवीनुसार मीठ घाला
आता यात मिश्रित दुध घालून पॅनवर झाकण ठेवा
तांदळाची शीत अखंड राहावी या करिता त्याला एकदाच व्यवस्थित हलवून घ्या.
तांदूळ अर्धा शिजला कि , त्यात गाजराचे काप,बिन्स ,सुके मनुके ,अननसाचे काप ,काळे मनुके ,तळुन घेतलेले काजु घाला.
(फळे शिजायला जास्ती वेळ लागत नाही म्हणून ,तांदूळ अर्धा शिजल्यावर फळे घालावीत ,नाहीतर फळांचा लगदा होईल )
हा पुलाव चवीला गोडसर आणि यम्मी लागतो :)
(तुम्ही यात तुमची आवडती फळे पण घालू शकता संत्र ,सफरचंद ,अननस ,काळी द्राक्ष इत्यादी )

वाचन
13103
प्रतिक्रिया
28
मस्तच!! म्हणजे भात दुधात
धन्यवाद हो ते सोया क्युब्स
हा गोड भात डायबेटीस असलेल्या रूग्णांना शाप आहे की वरदान ?
भारी जम्या है !
ओह्ह.. आय सी .. ते सोय
In reply to ओह्ह.. आय सी .. ते सोय by स्पा
#$#@*^&@ तुझ्या कल्पनाशक्तीला
लै भारी.
@ गणपा धन्यवाद गुरुवर्य
व्वा !
गोड पुलाव केल्याबद्दल निषेध..
In reply to गोड पुलाव केल्याबद्दल निषेध.. by पिंगू
गोड पुलाव केल्याबद्दल निषेध..
In reply to गोड पुलाव केल्याबद्दल निषेध.. by पियुशा
बाप आणि मुलाची जोडी
फटू दिसत नाहीये.
कलरफुल फोटो मला तर बुवा गोड
मस्त ग ...करुनच पहाते...पुलाव
मस्त गं
मस्त फोटो
शेवटी या विकेंडला ठरवलंच सर्व
In reply to शेवटी या विकेंडला ठरवलंच सर्व by पिवळा डांबिस
बिचारी आज्जी! या वयात तिला
चान चान
सुंदर फोटो. पुलाव ही छान
सुंदर फोटो. पुलाव ही छान
पियुशा
फोटो खुप छान आला आहे.....
मस्त रेसिपी. पुलाव आवडला.
आमचाही प्रयोग !
In reply to आमचाही प्रयोग ! by देशीसंत्रा
फटुत तरी चांगला दिसत आहे.
@ देशी सन्त्रा अहो फोटो दिसत