प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे.
साहित्य
तांदळाचे पिठ
मिठ
१ ओला नारळ खरवडून
गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप
पाककृती
तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला.
थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.
आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत. जास्त पिठ टाकु नका. पिठ ओलसर राहील एवढेच टाका.
पिठ परातीत काढा व थोडे थंड झाले की पाण्याने मळायला घ्या. जास्त पाणी लावु नका. हलकेच हात भिजेल एवढेच घेत रहा व चांगले मळून घ्या.
आता मोदक करायला घेताना परत थोडे पिठ जरा मळा व लिंबाएवढा गोळा घेउन त्याची पातळ वाटी करा.
वाटीत तळाला नारळाचे सारण भरा. आता वाटीच्या बाहेरच्या बाजुला दुमडत कमी अंतरावर कळ्या करा. मग वाटीच्या वरच्या भागाच्या कळ्यांना हलके आतल्या बाजुला गोल गोल फिरवत वरच्या दिशेने जुळवा. टोकाची शेंडी टोकदार करा.
आता हे मोदक २० ते ३० मिनिटे मोदक पात्रात वाफवुन घ्या.
मोदकांबरोबर आमच्याकडे करंज्या (शिंगर्या) व खापट्या (पिठाची चपटे गोल) करण्याची पद्धत आहे.
अधिक टिपा :
उकळवणी घेताना काही जणं पाण्याबरोबर दुध किंवा तेलही घालतात.
वाटी वळताना काही जणं ती पातळ होण्यासाठी हाताला तेल लावतात. मी नेहमी पाणीच वापरते.
मोदकाच्या सारणात आक्रोड जास्त चांगला लागतो हा माझा अनुभव आहे.
साखरचौतीच्या गणपतीला नारळाच्या सारणात गुळाऐवजी साखर घालतात.
(नागपंचमीच्या दिवशी ऑफिसला जायच्या घाईमुळे सगळे फोटो काढू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. पण परत केल्यावर सगळे फोटो इथे लोड करण्याचा प्रयत्न करेन.)

वाचने
9667
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडाला पाणी सुटले
कसले खत्तर्नाक दिसत आहेत
+१
In reply to कसले खत्तर्नाक दिसत आहेत by गणपा
+१
In reply to +१ by पंगा
सुंदर फोटो
सुंदर मोदक! इतके एकसारखे!!!
सुंदर मोदक! इतके एकसारखे!!!
In reply to सुंदर मोदक! इतके एकसारखे!!! by प्राजु
+१००
In reply to सुंदर मोदक! इतके एकसारखे!!! by प्राजु
मोदक कसले सुरेख दिसतायेत
जागुताई
ही टीप खरोखरच चांगली आहे
In reply to जागुताई by निवेदिता-ताई
निवेदिता- ही कृतीसुद्धा बघ उकड काढायची.
In reply to जागुताई by निवेदिता-ताई
जागुतै जबरा
सुंदर
क्या बात है. इतके रेखीव आणि
आम्हीही तुंदिलतनू होत आहोत कलेकलेने (म्हणजेच किलो किलोने हो.)
सुंदर
एकदम सुंदर
रेखीव..
In reply to एकदम सुंदर by प्रचेतस
आमच्या घरी
In reply to रेखीव.. by स्वाती दिनेश
धन्यवाद
In reply to रेखीव.. by स्वाती दिनेश
_/\_
जिवघेणे फोटो व पाककृती..
आई शप्पथ!
खुपच सुंदर.... त्या
काय भारी मोदक लय भारी
_/\_
एकापेक्षा एक
तै लयं ग्वाड ! (मोदक प्रेमी)