नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय.
नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो.
आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे.
त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये.. आटपाट नगरामध्ये... लोक यायचे ते दोनचार दिवस आराम करायला. हसायला, खेळायला, मस्ती करायला. कधी दु:ख विसरायला तर कधी नवीन काही शिकायला. कुणी शिकलेलं विसरायला देखील यायचं. काही तरुण पोरं यायची टवाळक्या करायला. काही म्हातारे शिंगं मोडून पोरांच्यात वासरु बनून दम्गा देखील करायचे.
आणि व्हायचं काय की आपल्या आटपाट नगरात यायला आणि निवारा करायला नवीन कुणाला बन्दी अशी नव्हती. बरेचसे नवीन लोक आटपाट नगरात यायचे आणि तिथे रुळायचे. अर्थात बरेच लोक आटपाट नगरात येताना आपले मोठेपण, आपले पद, आपले वय, सगळं सगळं विसरुन यायचे. कारण वर सांगितल्याप्रमाणे बरेचसे इथे निवांत व्हायला यायचे. निवांतपणा मिळवायचे मार्ग वेगळे असले तरी उद्देश निवांतपणाच ना !
आता या निवांतपणामध्ये सगळे लोक जेव्हा एकत्र यायचे तेव्हा प्रत्येकाला काही ना काही करता यायचे. कुणी कविता कर, कुणी गोष्टी ऐकव, कुणी आणखी काही बनवून लोकाम्ना दाखव, कुणी नवीन कुठला पिक्चर बघितला ते लोकांना सांग. नवीन वाचल्या गेलेल्या पुस्तकांची, कलाकृतींची, बातम्यांची अगदी खुसपट संदर्भाची देखील चर्चा व्हायची.
एखादा नवीन यायचा सुटाबुट घालून. जणू कामासाठीच आटपाट नगरात आला आहे. कामाच्या व्यापात एखादा असतो कातावलेला म्हणून आपण समजून जातो. बरं ठीक आहे म्हणून थोड्या वेळाने येईल कपडे बदलून असे म्हणून घेतो समजून. बरेचसे नवीन लोक पटकन समजूनही घेतात. सुटबुट उतरवतात. सुट्टीचे कपडे घालतात. पण म्हणतात ना 'अपवादाला नियम' असतात का काय ते....! एखादा असतो. जो आटपाट नगरात पण तसाच वागू पाहतो. कळत नाही त्याला तो त्याच्या कंपनीत असेल मोठ्या हुद्द्यावर म्हणून आटपाट नगरात थोडीच त्याचा अम्मल सगळीकडे चालणार असतो ?
काही लोक फारच भारी असतात. त्यांनी त्यांच्या घराचं वस्तुसंग्रहालय केलेलं असतं.चाणि आटपाट नगरात ते आपल्या घरच्या काही वस्तु घेऊन येतात आनि सगळ्यांना सांगतात तुम्ही बघा आणि काहीही करुन कौतुक करा. काही लोक खूपच हुशार अस्तात आणि खरंच खूप प्रामाणिक आणि प्रवीणही असतातं त्यांच्या त्यांच्या कामामध्ये. पण होतं कसं ना की सगळ्या लोकांना नसते ना आवड सुट्टीत क्लास करायची. :P
हल्ली थोडी अडचण आलीय. कदाचित मलाच जाणवतेय का काय कुणास ठाऊक. आटपाट नगरामध्ये एक नवीन गृहस्थ (नागरीकच म्हणूया त्याना) आलेत असं ऐकलंय. जास्त हुशार आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घराचं बुकींग-बंगल्याचंच खरंतर- १३ व्या वर्षी केलं आणि १५ व्या वर्षी राहायला पण आले. हल्लीच आटपाट नगरीचं नागरीकत्व त्यांनी घेतलं पण झालंय काय की त्यांनी त्यांचं घर आटपाट नगरात आणलंय आणि नुसतं घरच नाही महाराजा त्यांनी त्यांचं ऑफिस पण आणलंय.
होतंय कसं की त्यांच्या घरच्या काही वस्तु आणि बर्याच वस्तुंचा कचरा सगळ्या आटपाट नगरीत पसरायला लागलाय हो.
त्यांनी एक नवीन स्कीम देखील आणली आहे. त्यांच्या ऑफिस मध्ये नवनवीन गोष्टींचे आराखडे मिळणार आहेत म्हणे. इथल्या सगळ्या नागरीकांना आवाहन करुन झालंय की आराखडा घ्या आणि त्याचं का ही ही... करा. तास दिड तास खूप त्यांना १० आराखडे करायला.
मला प्रश्न पडलाय की या नागरीकाला आटपाट नगरीत हवे तसे कौतुक आणि आराखड्यांवर काम करणारे लोक मिळणार आहेत का? की या नव नागरीकाची प्रतिभा आणि अगाध ज्ञान याचा म्हणावा असा उपयोग आटपाट नगरी करुन घेऊ शकणार नाही?
काय करायला हवे?
डिस्क्लेमरः टाकायलाच पायजे? ;)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8629
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
न आवडणार्या...
मी
तुम्हा डायबेटीसवाल्यांचा काय
In reply to मी by प्रचेतस
नाय हो
In reply to तुम्हा डायबेटीसवाल्यांचा काय by गणपा
आहा रे लेका, मग तुमची स्वतःची
In reply to नाय हो by प्रचेतस
आमच्यात
In reply to आहा रे लेका, मग तुमची स्वतःची by गणपा
जाउदे. आवांतरकरुन गण्याने
In reply to आमच्यात by प्रचेतस
वादचर्चा खवत करु. काय म्हणता? :)चालेल
In reply to जाउदे. आवांतरकरुन गण्याने by गणपा
गणपा भाऊ, तुमचे म्हणणे १००%
In reply to तुम्हा डायबेटीसवाल्यांचा काय by गणपा
विमे, तुम्ही सुद्धा? स्वगतः
In reply to गणपा भाऊ, तुमचे म्हणणे १००% by विश्वनाथ मेहेंदळे
>>विमे, तुम्ही सुद्धा? तुमचा
In reply to विमे, तुम्ही सुद्धा? स्वगतः by प्रचेतस
तुमचा रोख नाही कळला. नाही
In reply to >>विमे, तुम्ही सुद्धा? तुमचा by विश्वनाथ मेहेंदळे
कृपया माननीय परा यांनी इकडे
कोणत्या चक्कीतलं दळण खाता ओ?
प्रकाटाआ
.
है तिच्यायला
हम कूsssssssssssssच नही बोलेगा.......ऊ .......शाबजी
रो मत प्यारे... अरे, ये
काय करायला हवे?
हे काय आनि कुनाबद्द्ल चल्लेलय?
मला देखील कुणितरी सांगा
आत्ताच मिपा वर आणखी काही लेख
सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक