अमेरिका......मंदीची (दाट) शक्यता.
आयटी वाले (पुन्हा एकदा) धोक्यात
हे आणि असलं काही मागचे काही दिवस सगळीकडे दिसतय, ऐकु येतय आणि आता आभाळ फाटणार आहे असं वाटु लागलेल आहे. हे सगळं बघुन काही अतिसामान्य आयटी वाल्यांप्रमाणेच माझ्याही डोक्यात काही शंका आल्यात; माहितगार्/जाणकार मंडळींनी ह्याबद्दल काही सांगितलं तर आंतरराष्ट्रिय अर्थशास्त्राची निदान तोंडओळख तरी मला आणि इथल्या वाचकांना होइल म्हणुन खाली माझ्या डोक्यातल्या शंका टंकतोयः-
१.अमेरिका म्हणे कर्जात आहे. जर जगातील सर्वात धनाढ्य्/श्रीमंत समजला जाणारा देशच खड्ड्यात आहे, तर सगळा पैसा (cash,currency,gold,liquidiy) शिंची आहे तरी कुणाकडे ?
२.अमेरिकेचं राष्ट्रोय उत्पनाचं कर्जाशी प्रमाण हे इतर काही प्रगत देशांपेक्षा बरच बरं आहे,(उदा फिनलंड, फ्रांस, जर्मनी वगैरे वगैरे) मग हे नेमकं अमेरिकेतच थोडस्स खुट्ट म्हणुन झालं की सगळ्यांना घाम का फुटतोय?
३.अमेरिका पाकिस्तान वगैरे देशांना दणक्यात पैसा पुरवते म्हणे. स्वतःच्या खिशात दमड्या नसताना कुणीही दुसर्याला पैसे देउच कसा शकेल? नक्की गोम काय आहे.
४. अमेरिका हा काही आत्ताच कर्जात गेलेला देश नाही. निदान मागचं आख्खं दशकभर तरी कर्जाच्या ढिगाखालीच आहे. स्वतःच्या डोक्यावर कर्ज असताना इराक अन् अफगाणिस्तानवगैरे सोबत लढायला ह्यांच्या कडे पैसा कुठुन आला? म्हणजे, दुसर्या शब्दात म्हणायच तर हा किस्सा बघा :-
"शोले मधल्या ठाकुरसमोर त्याची तिजोरी रामलालने उघडली. त्या ठणठणीत रिकाम्या तिजोरीतुन पन्नासेक हजार रुपये काढुन जय्-वीरु च्या हातावर ठेवले;' गब्बर शी लढण्यासाठी!" आता हे वाचताना विचित्र वाटातय ना? मग अमेरिकेच्या युद्धाच्या बातम्या वाचुन का वाटत नाही? ह्या दोन्ही परिस्थितींमध्ये नक्की काय फरक आहे?
५.दर दोन दिवसाआड आपण बातमी वाचतो :- "अमेरिकेनं अमक्या देशावर निर्बंध लादले. तमक्याची मदत रोखली. ढिमक्याला तेलाच्या-बदल्यात अन्न ह्या मोहिमेखाली फक्त अन्न पुरवठ्यालाच परवानगी दिली" वगैरे वगैरे.
पुन्हा तेच. दमड्या नाहित ना ह्यांच्या खिशात? मग हे इतरांना कसे काय पैसे देतात?(ताजे उदाहरण :- तामिळ निर्वासितांच्या केलेल्या दयनीय स्थितीतुन अमेरिकेने फंडिंग थांबवण्याचा लंकेला दिलेला इशारा)
६. पैसे पृथ्वीवरचा एक अमेरिका नावाचा देश चालवायला पैसे नसतील तर हे लोक धडाधड मंगळ वगैरे वर स्वार्या करायला आणी प्रचंड खर्चिक अशा अंतराळ मोहिमांना पैसे कुठुन आणतात?
७. आज अॅपल कडे म्हणे अमेरिकन सरकारपेक्षा अधिक cash reserve आहे म्हणे. हे कसे शक्य आहे? जर अॅपल (आणि इतर अमेरिकन कंपन्या) फायद्यात आहेत, तर त्याम्च्याकडुन कररुपाने पैसे घेणारे शासन्/सरकार कसे काय कर्जबाजारी होइल? असेच भारतात झाले तर सरकार थेट त्या कंपनीचे राष्ट्रियीकरण करु शकेल असे वाटते. अमेरिकन सरकार ते का करत नाही?(इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत १९६७ च्या आसपास राष्ट्रियीकरणाची लाट आली होती. )
८. कितीही नाही म्हटलं तरी बहुतांश प्रमुख राष्ट्रांवर आज अमेरिकेची पकड आहे. बारक्या देशांना ते कधीही बेधडक हल्ले करत असतातच. तर मग सध्या अशा हल्ल्यातुन त्यांना पुरेशी लूट मिळवता येत नाहीये का?(हा प्रश्न मध्ययुगीन मानसिकतेचा वाटेल्/असेल पण वस्तुस्थितीजन्य वाटला म्हणुन टंकला.)
असो. इतरही प्रश्न संभाव्य जागतिक slowdown/recession संबंधित डोक्यात येत राहतील तसे तसे प्रतिसादात टंकत जाइन. ज्यांना जितकी माहिती देता येइल तितकी न विसरता द्यावी.
आभार.
आपलाच
मनोबा.
वाचने
14920
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
मार्केट पाडायचं असलं की
+१००००००००जागो मोहन प्यारेशी सहमत
In reply to मार्केट पाडायचं असलं की by JAGOMOHANPYARE
कुठलं मार्केट?
In reply to मार्केट पाडायचं असलं की by JAGOMOHANPYARE
ओ.....आमची कंपनी अर्धी
उपलब्ध विद्याद्वारे अमेरिका
+१
In reply to उपलब्ध विद्याद्वारे अमेरिका by अन्या दातार
उलथापालथ
In reply to उपलब्ध विद्याद्वारे अमेरिका by अन्या दातार
डबल काऊंटिंग
In reply to उपलब्ध विद्याद्वारे अमेरिका by अन्या दातार
चूक झाली असल्याची शक्यता
In reply to डबल काऊंटिंग by क्लिंटन
न्यूयॉर्क टाईम्स
धन्यवाद
काही उत्तरे
अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to काही उत्तरे by प्रदीप
जबरदस्त माहिती अतिशय धन्यवाद
In reply to अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद. by अन्या दातार
+१
In reply to जबरदस्त माहिती अतिशय धन्यवाद by ५० फक्त
अॅपल वगैरे...
In reply to काही उत्तरे by प्रदीप
आमेरीकेत मंदी आहे म्हणून
मंदीमुळे पैसे संपत आले....
In reply to आमेरीकेत मंदी आहे म्हणून by डीलर
भरघोस माहितीपूर्ण प्रतिसाद
अरे मग हे लोकं नव्या नोटा का
त्याची पण गरज नाही
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by गणपा
क्लिंटन यांचे लेख
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by गणपा
हो "पैशाची कहाणी" सुरेख मालिका खरोखरच उपयुक्त आहे.
In reply to क्लिंटन यांचे लेख by धनंजय
अरे मग हे लोकं नव्या नोटा का
बरोबर आहे, तरीही
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by विजुभाऊ
जर्मनीत गेल्या शतकात एकदा तशी
In reply to बरोबर आहे, तरीही by प्रदीप
ह्म्म्म झिंबाब्वे मध्ये
In reply to जर्मनीत गेल्या शतकात एकदा तशी by सुनील
अजून काही !
In reply to ह्म्म्म झिंबाब्वे मध्ये by गणपा
१००% मान्य
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by विजुभाऊ
धन्यवाद क्लिंटन साहेब.
In reply to १००% मान्य by क्लिंटन
अनिर्बंध भांडवलशाही आणि
ह्याविषयी
In reply to अनिर्बंध भांडवलशाही आणि by नगरीनिरंजन
आजच
सुरूच आहे
In reply to आजच by विकास
उत्तम धागा व प्रतिसाद
अजून एक प्रश्न
होय प्रश्न तत्पुरता सुटतो.
सहमत आणि...
In reply to होय प्रश्न तत्पुरता सुटतो. by डीलर
नवीन माहिती :--- US less than
अजून नवीन माहिती... कालाय तस्मै नमः
In reply to नवीन माहिती :--- US less than by मदनबाण
आभार.
महागाई कमी करण्यासाठी नुसते
सहमत
In reply to महागाई कमी करण्यासाठी नुसते by विजुभाऊ
कुठे?
In reply to सहमत by पिवळा डांबिस
अभ्यासपूर्ण प्रतिसाद
ये
निवासी भावा!
In reply to ये by विनायक प्रभू
नविन माहितीत आता रेटिंगची भर
मंदीचा उल्लेख आला म्हणून फार
+१
In reply to मंदीचा उल्लेख आला म्हणून फार by आत्मशून्य
+२
In reply to +१ by गणपा
इई
In reply to +२ by मदनबाण
+३
In reply to +२ by मदनबाण
रियलईस्टेटचा फुगा अजुन फुटला
मला नाही वाटत.. चटके बसायला
In reply to रियलईस्टेटचा फुगा अजुन फुटला by विजुभाऊ
दुरूस्ती
In reply to मला नाही वाटत.. चटके बसायला by शैलेन्द्र
स्वामिनाथन ह्यांचे विश्लेषण http://swaminomics.org/?p=2030
आपली टरकलीए.....
भरीला भर म्हणुन...
In reply to आपली टरकलीए..... by धमाल मुलगा
नुसत्या मंदीच्या कल्पनेनं
In reply to आपली टरकलीए..... by धमाल मुलगा
आपल्या पुरतं बघायचं तर.....
In reply to नुसत्या मंदीच्या कल्पनेनं by मदनबाण
बहुदा तसं नसावं. ही कटकट २००८
In reply to आपल्या पुरतं बघायचं तर..... by मन१
जन्म
असेच म्हणतो.
In reply to जन्म by विनायक प्रभू