मंदी, वाढ मंदावण्याची भीती, अमेरिका आणि शंका
In reply to मार्केट पाडायचं असलं की by JAGOMOHANPYARE
In reply to मार्केट पाडायचं असलं की by JAGOMOHANPYARE
In reply to उपलब्ध विद्याद्वारे अमेरिका by अन्या दातार
In reply to उपलब्ध विद्याद्वारे अमेरिका by अन्या दातार
In reply to उपलब्ध विद्याद्वारे अमेरिका by अन्या दातार
अमेरिकेची अर्थव्यवस्था (कर्ज विचारात घेऊन) ३५.७५ ट्रिलिअन डॉलर्सची आहे.यात डबल काऊंटिंग होत आहे. अमेरिकेचे जीडीपी साधारण १४-१५ ट्रिलिअन डॉलर्स आहे. जीडीपीमध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव होतो: १. C: Consumption, I: Investment, G: Government Expenditure, NX: Net Export तेव्हा GDP= C+I+G+NX यातील Government Expenditure साठी सरकार पैसा कुठून उभा करते?तर तो स्वत:च्या उत्पन्नातून (कर) आणि इतरांकडून घेतलेल्या कर्जातून. मुळातच सरकारचा खर्च मोठा आहेच (संरक्षण,सोशल सेक्युरिटी इत्यादी). त्यात दोन युद्धे आणि २००८-०९ या काळातील स्टिम्युलस पॅकेज यावरील खर्च यांची भर पडली. परिणामी सरकारचे उत्पन्न या खर्चाला पुरे पडणे शक्य नव्हते.अमेरिकेचे सरकार गेल्या अनेक वर्षांपासून बॉंड जारी करून कर्जाऊ पैसे घेत होतेच.अगदी २००० साली (खरे) बिल क्लिंटन अध्यक्ष असताना काही काळ बजेट सरप्लस असतानाही बॉंड जारी करून कर्जाऊ पैसे घेतले जातच होते.पण या वाढीव खर्चामुळे अधिकाधिक कर्ज घेणे गरजेचे झाले आणि आजची परिस्थिती आली. तेव्हा या कर्जाचा अंतर्भाव Government Expenditure मध्ये झाला असल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विचार करता त्याचा परत अंतर्भाव करू नये.नाहीतर डबल काऊंटिंग होईल . त्यापेक्षा सरकारचे कर्ज आणि एकूण जीडीपी याचे गुणोत्तर हा अधिक योग्य घटक असेल.
In reply to डबल काऊंटिंग by क्लिंटन
१.अमेरिका म्हणे कर्जात आहे. जर जगातील सर्वात धनाढ्य्/श्रीमंत समजला जाणारा देशच खड्ड्यात आहे, तर सगळा पैसा (cash,currency,gold,liquidiy) शिंची आहे तरी कुणाकडे ?अमेरिकेचे कर्ज आहे ह्याचा अर्थ त्यांचे सरकारी रोखे (सॉव्हरीन बाँड्स) त्यांनी बरेच इश्यू केलेलेल आहेत. सगळेच देश रोखे इश्यू करूनच पैसा उभारतात, काही केसेसमध्ये हे प्रमाण अति होते, जसे ते आता अमेरिकेचे झाले आहे. आताचा तात्काळ निर्माण झालेला प्रॉब्लेम असा आहे की इश्यू केलेल्या बॉंड्सचे सर्व्हिसिंग करण्यासाठी त्या देशाकडे तात्काळ उपलब्ध असा पुरेसा पैसा नाही. ('सर्विसिंग' म्हणजे काही रोखे पूर्ण परतफेड करायचे असतात, तर इतरांचे नैमित्तिक व्याज चुकते करायचे असते). तेव्हा ह्यासाठी पैसा उभारायचा तो अजून जागतिक बाजारपेठेतून कर्जे काढून (म्हणजे नवे रोखे इश्यू करून). हे करण्यासाठी तेथील सरकारला तेथील कायद्यानुसार ह्यावेळी काँग्रेसची परवानगी असणे जरूरीचे आहे, कारण कर्जाची पूर्वी ठरवून दिलेली लिमीट आता येऊन पोहोचली आहे. ती लिमीट वाढवून देण्याविषयी तसेच तशी ती दिली तर पैसा ह्यापुढे कसा उभारायचा व बचत कशा प्रकारे करावयाची ह्याविषयी तेथील प्रमुख दोन पक्षात तीव्र मतभेद आहेत. २ ऑगस्टपर्यंत जर ती मुदत वाढवून दिली नाही, तर अमेरिकन सरकार काही रोख्यांच्या सर्विसिंगमध्ये डिफॉल्ट करील. तसे झाले तर त्यांच्या पतीवर वाईट परिणाम होईल इ. सगळा पैसा आहे कुणाकडे-- अमेरिकन सरकारचे रोखे अनेक देशी व परदेशी वित्तसंस्था विकत घेतात तसेच इतर सरकारेही. चीनकडे त्यातील बरेच रोखे आहेत. तसेच मध्यपूर्वेच्या देशांकडेही असावेत.
२.अमेरिकेचं राष्ट्रोय उत्पनाचं कर्जाशी प्रमाण हे इतर काही प्रगत देशांपेक्षा बरच बरं आहे,(उदा फिनलंड, फ्रांस, जर्मनी वगैरे वगैरे) मग हे नेमकं अमेरिकेतच थोडस्स खुट्ट म्हणुन झालं की सगळ्यांना घाम का फुटतोय?जीडीपीच्या प्रमाणात अमेरिकेचे कर्ज इतर काही देशांपेक्षा कमी आहे हे खरे आहे. पण इथे काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली, अशा इतर देशांच्या मानाने अमेरिकेची जागतिक मार्केटातील पत अधिक चांगली आहे. ती घसरली तर त्याचे दीर्घ परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर, व त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. दुसरी ही, की अमेरिकन डॉलर ही सध्यातरी जगातील रिझर्व करन्सी आहे. तिला अजून दुसरा पर्याय नाही. युरो आज मरेल की उद्या अशी परिस्थिती आहे, चिनी येन ही जागा इतक्यात भरून काढू शकणार नाही. तिसरी, अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यामुळे तिच्या बर्यावाईट स्थितीचे बरेवाईट परिणाम सर्व जगावर होणे स्वाभविक आहे.
३.अमेरिका पाकिस्तान वगैरे देशांना दणक्यात पैसा पुरवते म्हणे. स्वतःच्या खिशात दमड्या नसताना कुणीही दुसर्याला पैसे देउच कसा शकेल? नक्की गोम काय आहे.कर्ज आहे म्हणजे स्वतःच्या खिशात दमड्या नहीत असे नव्हे. कर्ज काढूनही तो देश ह्या उचापत्या करत रहातो. हा राजकारणाचा भाग झाला.
४. अमेरिका हा काही आत्ताच कर्जात गेलेला देश नाही. निदान मागचं आख्खं दशकभर तरी कर्जाच्या ढिगाखालीच आहे. स्वतःच्या डोक्यावर कर्ज असताना इराक अन् अफगाणिस्तानवगैरे सोबत लढायला ह्यांच्या कडे पैसा कुठुन आला?वरीलप्रमाणेच, ५ व ६ ची उत्तरे वरीलप्रमणेच.
७. आज अॅपल कडे म्हणे अमेरिकन सरकारपेक्षा अधिक cash reserve आहे म्हणे. हे कसे शक्य आहे? जर अॅपल (आणि इतर अमेरिकन कंपन्या) फायद्यात आहेत, तर त्याम्च्याकडुन कररुपाने पैसे घेणारे शासन्/सरकार कसे काय कर्जबाजारी होइल? असेच भारतात झाले तर सरकार थेट त्या कंपनीचे राष्ट्रियीकरण करु शकेल असे वाटते. अमेरिकन सरकार ते का करत नाही?(इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत १९६७ च्या आसपास राष्ट्रियीकरणाची लाट आली होती. )अॅपलकडे लिक्वीड कॅश सरकारपेक्षा जास्त आहे, ही वस्तुस्थिती असावी (मला त्यात 'कसे शक्य आहे' असे म्हणण्याइतके आशचर्य वाटत नाही). तुम्ही म्हणता तशा तर्हेने एका कंपनीचे सरकारीकरण करायचे म्हणजे तेथील सर्वच राजकीय पक्षांस व पर्यायाने तेथील जनतेस सर्वमान्य असलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या मुळावरच घाला आहे,
८. कितीही नाही म्हटलं तरी बहुतांश प्रमुख राष्ट्रांवर आज अमेरिकेची पकड आहे. बारक्या देशांना ते कधीही बेधडक हल्ले करत असतातच. तर मग सध्या अशा हल्ल्यातुन त्यांना पुरेशी लूट मिळवता येत नाहीये का?इराकवरील हल्याचे कारण हेच होते की.(तेलावर डोळा), पण ती मोहीम अंगाशी आली. विसाव्या व आता एकविसाव्या शतकात ह्या प्रकारे इतर छोट्या देशांवर डल्ला मारणे इतकेसे सोपे राहिलेले नाही. कारण त्या बारक्या देशांमागेही अमेरिकेचे प्रतिस्पर्धि देश उभे असतात.
In reply to काही उत्तरे by प्रदीप
In reply to अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद. by अन्या दातार
In reply to जबरदस्त माहिती अतिशय धन्यवाद by ५० फक्त
In reply to काही उत्तरे by प्रदीप
In reply to आमेरीकेत मंदी आहे म्हणून by डीलर
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by गणपा
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by गणपा
In reply to क्लिंटन यांचे लेख by धनंजय
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by विजुभाऊ
नोटा छापून श्रीमंती वाढत नसतेअगदी सहमत., तरीही अमेरिकेने अलिकडेच QE1 आणि QE2 ह्या नावांखाली खरे तर हेच केले. ह्यांत मंदीतून उभारी आणण्यासाठी बक्कळ कर्जरोखे इश्यू केले गेले. एकार्थी हे नोटा छापण्यासारखेच होते. चलनवाढीचा वेग अनावर झाला (hyper- inflation) की विचित्र परिस्थिती उद्भवू शकते. जर्मनीत गेल्या शतकात एकदा तशी ती उद्भवली होती. असे म्हटले जाते की रेस्टॉरॉमधे गेल्यावर पदार्थ मागवतांना त्याची जी किंमत होती, ती, तो पदार्थ खाऊन संपेपर्यंत बदललेली असायची! Hyper inflation विषयी कुणीतरी छान लेख इथे लिहावा.
In reply to बरोबर आहे, तरीही by प्रदीप
In reply to जर्मनीत गेल्या शतकात एकदा तशी by सुनील
Inflation in Zimbabwe means buying a loaf of bread costs millions of dollars
In reply to ह्म्म्म झिंबाब्वे मध्ये by गणपा
dailymarkets.com मधून
In reply to अरे मग हे लोकं नव्या नोटा का by विजुभाऊ
नोटा छापून श्रीमंती वाढत नसते.१००% मान्य. जर नोटा छापून प्रश्न सुटत असते तर जगात कोणी गरीब राहिलेच नसते. नोटा छापून प्रश्न का सुटत नाही हे थोडक्यात बघू या-- पैसा हे आपण ज्या वस्तू/सेवा उपभोगू/विकत घेऊ शकतो हे मोजायचे एकक आहे.समजा बिंदू अ आणि ब मधील अंतर माझ्या चालीने ५० पावले असेल तेच एखाद्या लहान मुलाच्या चालीने १०० पावले असेल.तेव्हा ५०/१०० या आकड्यांमुळे मुळातील दोन बिंदूंमधले अंतर बदलत नाही.नेमकी तीच गोष्ट नोटा छापून बाजारात आणल्या तर पैशाबाबत होते. असे समजू की जगात एकूण चलन १०० रूपयेच आहे आणि पूर्ण जगात एकूण एकासारख्या शंभर वस्तू आहेत.म्हणजे १०० रूपयांमधून १०० वस्तू विकत घेता येतील म्हणजेच एका वस्तूची किंमत १ रूपया झाली.उद्या सरकारने ठरवून आणखी १०० रूपयांच्या नोटा छापून बाजारात आणल्या तर एकूण चलन २०० रूपये पण वस्तू शंभरच राहतील.म्हणजे एका वस्तूची किंमत २ रूपये होईल.म्हणजे हिशेब एकूण एकच राहतो-- वस्तू आहेत तितक्याच पण महागाई वाढलेली .तेव्हा पैशापेक्षाही आपण त्या पैशातून काय विकत घेऊ शकतो हा मुद्दा महत्वाचा आहे. तेव्हा वस्तूंचे उत्पादन वाढवायला (म्हणजेच मागणी, लोकांची क्रयशक्ती वाढवणे) योग्य परिस्थिती निर्माण करणे हे अधिक महत्वाचे आहे त्यातूनच जीवनमान सुधारते नोटा छापून नव्हे.
In reply to १००% मान्य by क्लिंटन
In reply to अनिर्बंध भांडवलशाही आणि by नगरीनिरंजन
In reply to आजच by विकास
In reply to होय प्रश्न तत्पुरता सुटतो. by डीलर
In reply to नवीन माहिती :--- US less than by मदनबाण
In reply to महागाई कमी करण्यासाठी नुसते by विजुभाऊ
In reply to सहमत by पिवळा डांबिस
In reply to ये by विनायक प्रभू
In reply to मंदीचा उल्लेख आला म्हणून फार by आत्मशून्य
In reply to +१ by गणपा
In reply to +२ by मदनबाण
In reply to +२ by मदनबाण
In reply to रियलईस्टेटचा फुगा अजुन फुटला by विजुभाऊ
In reply to मला नाही वाटत.. चटके बसायला by शैलेन्द्र
In reply to आपली टरकलीए..... by धमाल मुलगा
In reply to आपली टरकलीए..... by धमाल मुलगा
In reply to नुसत्या मंदीच्या कल्पनेनं by मदनबाण
In reply to आपल्या पुरतं बघायचं तर..... by मन१
In reply to जन्म by विनायक प्रभू
मार्केट पाडायचं असलं की