साहित्य
१ ओला नारळ खरवडून.
१५-२० कोकमे (आमसुल)
४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल)
१ चमचा जिर
तुप
कढीपत्ता
साखर
मिठ
मिरची पुड पाव ते अर्धा चमचा
पाककृती
कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा. उकळी आली की ५ मिनीटांत गॅस बंद करा.
खवलेल्या नारळाच्या किसात लसुण पाकळ्या घालुन (ऑप्शनल) थोडे थोडे पाणी टाकुन मिक्सरमध्ये फिरवा. मग एखा भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने गाळून घ्या. साधारण तिन वेळा पाणी टाकुन दुध काढून घेता येते.
जिरे तव्यावर भाजुन गार झाल्यावर कुटून घ्या.
कोकमाचा रस कोमट झाला की तो दुधात मिसळा. मस्त दुधकोल्ड्रिंगचा रंग येतो. त्यातच कुटलेले जिरे, मिठ, साखर घाला.
आता जर फोडणी हवी असेल तर तुप गरम करा त्यात कढीपत्ता घालुन थोडी मिरचीपुड घाला व ती फोडणी वरिल मिश्रणात ओता. झाली सोलकढी झटकेपट.
(कढीपत्याचा घरात पत्ता नसल्याने मी घातला नाही, वाचकांनी समजुन घ्यावे)
अधिक टिपा:
सोलकढी ही लगान मोठ्या दोन्ही ग्रुपची आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते.
ज्यांना लसुण आवडत नाही त्यांनी घालु नये.
हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.
वाचने
30303
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वाह वाह !
छान हो तै!
मी हेच म्हणणार होतो.
In reply to छान हो तै! by वसईचे किल्लेदार
झक्कास !
सोलकढीची चव अजूनही तोंडात
मस्त.
अगदी अशीच
In reply to मस्त. by गणपा
आम्ही यात लाल तिखटाच्या फोडणी
In reply to मस्त. by गणपा
+१
In reply to मस्त. by गणपा
१+
In reply to +१ by मेघवेडा
+१११
In reply to +१ by मेघवेडा
+१
In reply to मस्त. by गणपा
हो मी सुद्धा लाला तिखट नाही
In reply to मस्त. by गणपा
हेच..
In reply to मस्त. by गणपा
अरे वाह
मस्त ...झालेली दिसतेय??.........विनाफोडणीचीच सोलकढी छान लागते
आम्ही आलं आणि हिर्वी मिर्चीही
In reply to मस्त ...झालेली दिसतेय??.........विनाफोडणीचीच सोलकढी छान लागते by निवेदिता-ताई
मस्तच दिसतेय
छळवादी
छान.. आगळ म्हणजे कोकम लिक्विड
छान.. आगळ म्हणजे कोकम लिक्विड का?
In reply to छान.. आगळ म्हणजे कोकम लिक्विड by JAGOMOHANPYARE
असंही करुन बघा...
आगळ वापरून नक्की कशी करायची
रेशिपी आवडली पण कोकमाशी आमची
आहाहा....
तुम्हाला हेही पेय आवडतं
In reply to आहाहा.... by धमाल मुलगा
खॅ खॅ खॅ!!!
In reply to तुम्हाला हेही पेय आवडतं by रेवती
धम्या हेसुध्दा पितो.
In reply to तुम्हाला हेही पेय आवडतं by रेवती
काका, ते फोटुच्या खाली
In reply to धम्या हेसुध्दा पितो. by चिंतामणी
हा हा हा!
In reply to काका, ते फोटुच्या खाली by ५० फक्त
आता मी तुमच्या पद्धतीने करुन
आज सोलकढीचा बेत पक्का.. -
झकास.. चटकदार. पाकृबद्दल
ताकतई म्हणजे बेसिकली ताकाची
In reply to झकास.. चटकदार. पाकृबद्दल by गवि
कढीच होय. मला काहीतरी वेगळं
In reply to ताकतई म्हणजे बेसिकली ताकाची by मेघवेडा
मदत हवी आहे
ह. आता मिरचीच घालणार मी
मदत हवी आहे Submitted by
सुधारणा
In reply to मदत हवी आहे Submitted by by विजुभाऊ
व्वा
छान