मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोलकढी

जागु · · पाककृती
साहित्य १ ओला नारळ खरवडून. १५-२० कोकमे (आमसुल) ४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल) १ चमचा जिर तुप कढीपत्ता साखर मिठ मिरची पुड पाव ते अर्धा चमचा पाककृती कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा. उकळी आली की ५ मिनीटांत गॅस बंद करा. Image removed. खवलेल्या नारळाच्या किसात लसुण पाकळ्या घालुन (ऑप्शनल) थोडे थोडे पाणी टाकुन मिक्सरमध्ये फिरवा. मग एखा भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने गाळून घ्या. साधारण तिन वेळा पाणी टाकुन दुध काढून घेता येते. Image removed. जिरे तव्यावर भाजुन गार झाल्यावर कुटून घ्या. कोकमाचा रस कोमट झाला की तो दुधात मिसळा. मस्त दुधकोल्ड्रिंगचा रंग येतो. त्यातच कुटलेले जिरे, मिठ, साखर घाला. Image removed. आता जर फोडणी हवी असेल तर तुप गरम करा त्यात कढीपत्ता घालुन थोडी मिरचीपुड घाला व ती फोडणी वरिल मिश्रणात ओता. झाली सोलकढी झटकेपट. (कढीपत्याचा घरात पत्ता नसल्याने मी घातला नाही, वाचकांनी समजुन घ्यावे) Image removed. अधिक टिपा: सोलकढी ही लगान मोठ्या दोन्ही ग्रुपची आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते. ज्यांना लसुण आवडत नाही त्यांनी घालु नये. हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.

वाचन 30303 प्रतिक्रिया 0