गंमतशीर बातमी - गंमतशीर निर्णय - गंमतशीर कनेक्टिव्हीटी - गंमतच गंमत ...
आज बर्याच दिवसांनी एक निखळ मनोरंजन करणारी बातमी वाचायला मिळाली व ह्या बातमीची आम्हाला खुप गंमत वाटल्याने ती मिपाकरांसमोर ठेवण्याच्या मोह आम्हाला आवरला नाही.
गंमतच गंमत ...
http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm
थोडक्यात सार असे ...
"कनेक्टिंग इंडिया'चा नारा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडने आता "कनेक्टिंग ओबीसी मिशन' हाती घेतले आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क "ओबीसी टू ओबीसी ः अनलिमिटेड फ्री ग्रुप कॉलिंग'ची अभिनव योजना सुरू केली आहे, त्यामुळे "ओबीसी' असणाऱ्या सर्वांना अगदी फुकटात गप्पा मारता येणार आहेत. मंडल आयोगात समाविष्ट करण्यात आलेल्या ओबीसींच्या 357 जाती या योजनेत एकमेकांशी जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यात ओबीसींच्या जातींचे संघटन करणाऱ्या ओबीसी सत्यशोधक परिषदेच्या मेंदूतून या योजनेने जन्म घेतला आहे. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर बीएसएनएलच्या मुख्य महाव्यवस्थापकांसमोर ही योजना मांडली. अर्थात, त्यांनीही या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर "ओबीसी टू ओबीसी' फ्री कॉलिंगची संकल्पना अस्तित्वात आली, असे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी "सकाळ'ला सांगितले. मंडल आयोगात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातील रंगारी, भावसार, शिंपी, साळी, तेली, परीट, नाभिक, सुतार, लोहार, आतार, बागवान, कासार, झुल्लीया, माळी, कोळी, धनगर, बंजारा, वंजारी, गुरव, गवळी, जैन, कोष्टी आदींसह 357 जातींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सत्यशोधक ओबीसी परिषदेमार्फत येत्या तीन महिन्यांत सहा हजार ओबीसींना या योजनेच्या माध्यमातून बीएसएनएल व सत्यशोधक ओबीसी परिषदेशी "कनेक्ट' करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.आहे की नाही गंमत ? म्हणजे एकगठ्ठा मतांसाठी केले जाणारे राजकारण आणि त्यासाठी आणल्या जाणार्या योजना किती गंमतशीर असतात ह्याची उदाहरणे कित्येक आहेत, पण आज ह्या निर्णयाने सर्वांवर डायरेक्ट धोबीपछाड डाव टाकला आहे. मला ह्यातले लॉजिक नाय समजले. सध्या ओबीसी समाजाला किती आरक्षण आहे वगैरे ह्या भानगडीत न पडता मी साधारणता भारतातले ३०% लोक ओबीसी आहेत असे मानतो ( अरे, ही फिगर तर 'बहुसंख्य' कडे चालली आहे, असो ). त्यांना 'संधी' उपलब्ध व्हाव्यात म्हणुन मदत, शिक्षणाच्या पद्धतीत सवलत, आर्थिक फायदे, नोकर्यात आरक्षण वगैरे समजु शकतो पण हे 'अनलिमिटेड बोला' ही सवलत म्हणजे नक्की काय ? असो, मला टिका वगैरे करायची नाही, टिका करणारे आम्ही कोण व त्याने काय फरक पडतो हे सत्य माहित आहेच. पण लेट्स एंजॉय. आपण काय करु की ह्या सरकारी संस्थांना अशाच 'सुपीक' आयडिया सुचवु, म्हणजे कसे विकासाचा मक्ता एकटा काय सरकारनेच घेतला नाही, आपणही मदतीचा हात देऊ शकतो अशी माझी प्रामाणिक भावना आहे. असो, तर खालील उपाय मला 'पटकन' सुचले आहेत, पुढेमागे ह्याची अंमलबजावणी झाली तर माझा एखाद्या 'पद्मश्री' वगैरे पुरस्कारासाठी विचार व्हावा असा एक प्रस्ताव जाताजाता मांड्तो. १. 'अबक' ह्या जाती-जमातींवर खुप वर्षे अन्याय झाला आहे व त्यांना आता ह्याबाबत बोलता यावे म्हणुन मोबाईल बीलात ५०% सवलत. २. 'क्ष' वर जरा जास्तीच अन्याय झाला किंवा त्यांना सुधारण्याची संधी दिली जावी म्हणुन संपुर्ण बील माफ. ३. 'ख' हे फारच मागास आहेत, त्यांना त्वरित 3G तंत्रज्ञान असलेला फोन फुकट दिला जावा व आयुष्यभर बील माफ असावे. ४. 'म' ला जास्त शैक्षणिक संधी मिळाव्यात म्हणुन अनलिमिटेड इंटरनेट उपलब्ध करुन द्यावे. ५. 'र' वाले फार माजले आहेत, वर्षानुवर्षे ह्यांनी शोषण केले आहे म्हणुन त्यांचे मोबाईल हिसकावुन घ्यावेत किंवा त्यांना भरमसाट बील येईल व्यवस्था करावी किंवा त्यांना अत्यंत मर्यादीत अशी बँडविड्थ द्यावी. ६. 'प' ह्यांचे आत्तापर्यंत खुप कौतुक झाले आहे, आता त्यांनी एकदम बेसिक हँडसेट वापरावेत व दिवसातुन दोनच फोन्स करावेत, इनकमिंगला पैसे पडतील, एसेमेसचे लाड चालणार नाहीत ७. 'ग' ह्यांची कंडिशन आता सुधारली आहे, सबब त्यांनी आता येईल ते बील भरावे, न भरल्यास निषेध खलिता पाठवीला जाईल. ८. 'ज्ञ' हे लोक खुप धोकादायक आहेत, त्यांना मोबाईल वापरण्यास सोडा पण पाहण्यासही बंदी असावी, तसे आढळल्यास देशद्रोहाचा खटला भरण्यात येईल. ९. 'ट' लोकांचा संवाद वाढावा म्हणुन त्यांना 'व्हिडिओ कॉलिंग, कॉल कॉन्फरंस' वगैरे सुविध मोफत मिळाव्यात, वापरणे जमत नसल्यास खास 'प्रशिक्षक' पद निर्माण करुन त्यांच्या उपलब्ध संधीत वाढ केली जावी. . . . इथेच थांबतो ... काय आहे, आत्ताच एक फोन आला आहे, ते मोबाईल कंपन्यांचे धोरण बिरण बदलायच्या आधी 'इनकमिंग फ्री' म्हणुन बोलुन घेतो, उद्याचे कुणी पाहिले आहे हो. बाकी ते 'पद्मश्री'चे वगैरे विसरु नका बरं का सर्कारी बाबूलोकं, काही शंका वगैरे असतील तर 'मिस्स कॉल' द्या, मी फोन करतो, कसे ? ;) एक उद्धट आणि अवांतर चौकशी : बीएसएनएलकडे 'मुर्ख टु मुर्ख कॉलिंग फ्री' अशी बीलिंग स्कीम आहे का ? असल्यास मी ह्यासाठी अर्ज करु इच्छितो, सदर चौकशी कुठे करावी हे कळावे. आवश्यक ती प्रमाणपत्रे सादर केली जातील ( सदर लेखही 'मुर्खपणा'चा पुरावा म्हणुन ग्राह्य धरला जावा ही नम्र विनंती )
वाचन
19778
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
वाचुन सकाळ्पसुन गुदगुदल्या होत होत्याच..
In reply to वाचुन सकाळ्पसुन गुदगुदल्या होत होत्याच.. by मुलूखावेगळी
हा हा हा..................
ही बातमी बहुधा फक्त सकाळ ने
नमस्कार, मिसळपाव.कॉमवर
In reply to नमस्कार, मिसळपाव.कॉमवर by सुहास..
मराठी?
In reply to मराठी? by धमाल मुलगा
हे शेवटचं !
In reply to हे शेवटचं ! by सुहास..
आता ह्याचं कसं अर्थ घ्याचं?
In reply to मराठी? by धमाल मुलगा
निशेध
कटकट आहे राव @३$%^&*(@#$%^&
In reply to कटकट आहे राव @३$%^&*(@#$%^& by आत्मशून्य
मेंदू गूढघ्यात गेल्याचा आणखी
सकाळी पहिली बातमी हिच
एक सुधारणा
आम्ही ही बातमी गांभीर्याने
In reply to आम्ही ही बातमी गांभीर्याने by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to +१ by धमाल मुलगा
..कुठवर हा असंतोष पेरत राहणार
In reply to ..कुठवर हा असंतोष पेरत राहणार by यकु
सरकारी गाढवं आणि
In reply to ..कुठवर हा असंतोष पेरत राहणार by यकु
गाढव
उगा इथे शब्दांचा किस पाडून
In reply to उगा इथे शब्दांचा किस पाडून by परिकथेतील राजकुमार
पर्या
In reply to उगा इथे शब्दांचा किस पाडून by परिकथेतील राजकुमार
एका व्यक्तीला एकच कार्ड
In reply to एका व्यक्तीला एकच कार्ड by मृत्युन्जय
@ कुंदन :- तुला दुबै टू ठाणे
मूर्खपणा
In reply to मूर्खपणा by स्मिता.
:)
In reply to :) by छोटा डॉन
जातीभेद
In reply to :) by छोटा डॉन
छोटा डॉन १००% सहमत
चला!
फुकट्या लोकांचा कनवाळू
कृषी कार्ड
काय सांगता!!! अभिनंदन हो
एखादा अधिकृत दुवा मिळू शकेल काय?
In reply to एखादा अधिकृत दुवा मिळू शकेल काय? by धनंजय
च्यायला!
लेखकाशी सहमत. काल ही बातमी
चतुर निर्णय
हे हे हे
घोषणांविरुद्ध कोर्टात जाता
गंमत की विनोद
In reply to गंमत की विनोद by श्रावण मोडक
ऑ ?
In reply to ऑ ? by छोटा डॉन
मूर्ख
In reply to ऑ ? by छोटा डॉन
मिळायला हवी
In reply to गंमत की विनोद by श्रावण मोडक
सहमत
In reply to सहमत by पंगा
बाकी ठिक ...
In reply to बाकी ठिक ... by छोटा डॉन
उत्तर...
In reply to बाकी ठिक ... by छोटा डॉन
किमान निकष
In reply to किमान निकष by पंगा
अधिक...
In reply to सहमत by पंगा
माझा संभ्रम
In reply to सहमत by पंगा
संघटना
सिव्हिल सोसायटी यावर कधी
थोड्याफार माहितीवर आधारीत
एखाद्या जाती, धर्म किंवा
ह्म्म...
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
+१
In reply to +१ by छोटा डॉन
अगदी! हेच.
In reply to +१ by छोटा डॉन
अगदी बरोबर.
In reply to +१ by छोटा डॉन
प्रयत्न
इतर प्रश्न: याबद्दल अधिकृत उत्तर अर्थात परिषदच देऊ शकेल. पण सदर व्यक्तीस सदस्य करून घेताना जर परिषदेस कोणताही अडथळा आला नाही, तर त्यापुढे जाऊन सदर व्यक्तीस कार्ड देण्यास परिषदेस अडथळा येण्याचे काही कारण दिसत नाही. माझ्या समजुतीप्रमाणे यात बीएसएनएलचा संबंध हा केवळ परिषदेस ग्रूप प्लान विकण्यापुरता आणि त्यानंतर प्लानकरिता आवश्यक अशी किमान सभासदसंख्या मिळत आहे याची खात्री करण्यापुरता असावा. प्लानचे निकष ठरवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यात बीएसएनएलचा हात नसावा; ते स्वातंत्र्य परिषदेकडे असावे, आणि त्याबद्दल अंतिम निर्णयही परिषदेचाच असावा. शेवटी, कार्डवाटपासाठी 'परिषदेचे सदस्यत्व' याहून वेगळा निकष असण्याचे काही कारण दिसत नाही. मात्र सदस्यत्वाकरिता 'ओबीसी समाजांचा घटक असणे' हा जर सामान्यतः अपेक्षित निकष असेल, तर तो अपवादात्मक परिस्थितीत शिथिल करण्याची मुभा परिषदेला असावीच, आणि आपल्या काल्पनिक उदाहरणातील सदर व्यक्तीच्या बाबतीत (माझ्या वरील काल्पनिक उदाहरणातील 'श्रीवास्तवा'प्रमाणे) परिषदेचे सदस्यत्व देताना जर असा नियम शिथिल केला गेला असेल, तर त्यापुढे कार्डवाटप करण्यास कोणताच अडथळा येण्याचे काही कारण दिसत नाही. (हे अर्थात माझे रीडिंग आहे.) दोनपैकी एक कारण असू शकते. (किंवा कदाचित दोन्ही.) - गैरसमज: तसाही 'वृत्तांकनातील अचूकतेकडे भर' हा सर्वसाधारणतः मराठी पत्रकारितेचा फारसा "स्ट्राँग पॉइंट" (मराठी?) नसावा. (हल्ली इंग्रजी पत्रकारितेतही फारसा राहिलेला नाही म्हणा, पण तो मुद्दा वेगळा.) - जाणूनबुजून अपप्रचार: प्रस्तुत वर्तमानपत्राच्या वाचकांचा 'बेस' अथवा 'टार्गेटेड बेस' लक्षात घेता, अशा प्रकारच्या अपप्रचाराने अशा 'बेस'मधील प्रस्तुत वर्तमानपत्राच्या 'क्रेडिबिलिटी'ला धक्का तर पोहोचणार नाही अथवा 'वाचकांच्या पत्रां'चा भडिमारही होणार नाहीच, उलट वर्तमानपत्राचा खप अवाच्या सवा वाढण्याची शक्यता भरपूर. यांपैकी कोणती शक्यता प्रत्यक्षात खरी असू शकते, ते आपणच ठरवा! (या एकाच वर्तमानपत्राने या गोष्टीला एवढे जोरदार 'कवरेज' दिल्याचे आढळते. सविस्तर बातमी, आणि चक्क दोनदोन संपादकीये! 'ओबीसी-टू-ओबीसी कॉलिंग फ्री' वगैरे जोरदार 'स्पिन'ही बहुधा फक्त येथेच वाचला. बाकी, उर्वरित 'मेनस्ट्रीम मीडिया'मध्ये या बाबीचा साधा उल्लेखही नाही, आणि इतरत्र छोट्यामोठ्या ठिकाणी जेथे आहे, तेथे अगदी थोडक्यात आणि संयत कवरेज आहे. आणि बीएसएनएलच्या संस्थळावर याचा उल्लेखही नाही. बरोबरच आहे, तशीही ही बीएसएनएलची योजना नव्हेच.) वर म्हटल्याप्रमाणे, माझ्या समजुतीप्रमाणे कार्डवाटप कोणाला करावे हे ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे परिषदेकडेच राहावेत. बीएसएनएलचा यात संबंध नसावा. परिषदेने नोंदवलेल्या यादीतील व्यक्तींना कार्डवाटप करणे एवढेच बीएसएनएलचे काम. यादीत कोणाकोणाला नोंदवायचे हे ठरवण्याचा अधिकार परिषदेचा. अशा परिस्थितीत, ओबीसी नसूनसुद्धा सदर व्यक्तीस परिषदेचा सदस्य म्हणून नोंदवण्यास परिषदेस जर अडचण नसेल, तर त्यापुढे कार्डवाटपाच्या यादीत सदर व्यक्तीचे नाव नोंदवण्यास परिषदेस अडचण असण्याचे काही कारण दिसत नाही, सबब सदर व्यक्तीवर अन्यायाचा प्रश्न उद्भवत नाही. येथे एक लक्षात घेणे प्राप्त आहे, की प्लानचा वर्गणीदार होण्याकरिता 'ओबीसी समाजांचा घटक असणे' हा बीएसएनएलचा निकष नाही. बीएसएनएलचे निकष हे फक्त 'परिषदेने अर्जदाराची नोंदणी कार्डवाटपाच्या यादीत केलेली असणे' आणि 'कार्डवाटपाच्या यादीत अशा पुरेशा अर्जदारांची नोंदणी झालेली असणे' एवढाच आहे. त्यापुढे, कार्डवाटपाच्या यादीत नोंदणी करण्यासाठी 'ओबीसी समाजांचा घटक असणे' ही परिषदेची 'सामान्य अपेक्षा' असावी, 'सक्त निकष' असण्याचे कारण नाही. (सामान्यतः, कार्डवाटपाच्या यादीत नोंद करण्यासाठी 'परिषदेचे सदस्यत्व' एवढा एकच निकष परिषदेकडून पुरेसा असावा. त्यापुढे, परिषदेच्या सदस्यत्वाकरिता 'ओबीसी समाजांचा घटक असणे' ही परिषदेची केवळ 'अंतर्गत सामान्य अपेक्षा' असावी. अशा परिस्थितीत, ओबीसी समाजांचा घटक नसूनसुद्धा जर एखाद्या व्यक्तीस सदस्यत्व दिले गेले असेल, तर त्यापुढे त्याची कार्डवाटपाच्या यादीत नोंदणीही नियमांप्रमाणे विनासायास होण्यास हरकत नसावी.) वरील विवेचनानुसार यात जातिभेद होण्याचे कारण दिसत नाही. (तसेही, अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता, कितीशा बिगर-ओबीसी व्यक्ती या योजनेत नाव नोंदवावयास उत्सुक असतील, याबद्दल साशंक आहे. त्यामुळे, हा प्रश्न मूलतः निव्वळ अॅकॅडेमिक आहे.)
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
मग मला पडणारा अत्यंत बाळबोध
In reply to मग मला पडणारा अत्यंत बाळबोध by llपुण्याचे पेशवेll
तसं नव्हे हो. आपल्याकडं
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
उत्तराचा प्रयत्न
उत्तराचा प्रयत्न आवडला
प्रूफ ऑफ द पुडिंग
In reply to प्रूफ ऑफ द पुडिंग by नितिन थत्ते
कै च्या कै
In reply to कै च्या कै by चिंतामणी
कै च्या कै ^ २
In reply to कै च्या कै ^ २ by बिपिन कार्यकर्ते
हेहेहेहे
जे होईल ते बघुन घेऊ.. अजुन
मिपा मेंबर टु मिपा मेंबर
In reply to मिपा मेंबर टु मिपा मेंबर by कुंदन
का नाही?
In reply to का नाही? by पंगा
एकदा ठरवा.
In reply to मिपा मेंबर टु मिपा मेंबर by कुंदन
कळ्ळं!
In reply to कळ्ळं! by श्रावण मोडक
३%
बातमी आहे गमतीशीर.
जरा विसावू...
In reply to जरा विसावू... by श्रावण मोडक
माननीय सम्पादक "छोटा डॉन"
In reply to जरा विसावू... by श्रावण मोडक
घटना आड येईलशी वाटत नाही