पालक-छोले
साहित्यः
३ कप बारीक चिरलेला पालक
२ कप काबुली चणे रात्रभर भिजवून, सकाळी बोटचेपे उकडून घेणे.(कॅनमधले काबुली चणे देखील वापरू शकता)
२ टोमॅटो+ ३-४ लसुण पाकळ्या+ १ इंच आले+ २-३ हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घेणे.
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ टेस्पून छोले मसाला
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून जीरे
२-३ तमालपत्र
३-४ दालचिनीच्या काड्या
तेल
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून जीरे, तमालपत्र आणी दालचिनीच्या काड्या घालून परतावे.
कांदा, मीठ व टोमॅटोची प्युरे घालून चांगले परतावे. वरील मसाले (गरम-मसाला सोडून) घालून सगळे नीट एकजीव करावे.
त्यात चिरलेला पालक घालून एकत्र करणे व झाकून पालक शिजवणे.शिजलेल्या पालकात उकडलेले काबूली चणे घालावे व शिजवावे.
शिजल्यावर वरून गरम-मसाला भुरभुरावा.
लिंबु पिळून गरमा-गरम पालक-छोले रोटी, चपाती सोबत सर्व्ह करा.

वाचन
6365
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वा!!! छानच दिसतेय पाक्रु.
व्वा !!!!!!!!!!
वा... एकदम सही.... एकदा नक्की
मस्त
मस्त!
In reply to मस्त! by आनंद
खरंय!
अहाहा............मस्त ग...
मस्त
आवडेश.
सानिका,मस्त रेसिपी...
ही पाकृ चांगली असणार असे
सगळ्यांना धन्स
मस्त ...