पालक-छोले
साहित्यः
३ कप बारीक चिरलेला पालक
२ कप काबुली चणे रात्रभर भिजवून, सकाळी बोटचेपे उकडून घेणे.(कॅनमधले काबुली चणे देखील वापरू शकता)
२ टोमॅटो+ ३-४ लसुण पाकळ्या+ १ इंच आले+ २-३ हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घेणे.
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ टेस्पून छोले मसाला
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून जीरे
२-३ तमालपत्र
३-४ दालचिनीच्या काड्या
तेल
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून जीरे, तमालपत्र आणी दालचिनीच्या काड्या घालून परतावे.
कांदा, मीठ व टोमॅटोची प्युरे घालून चांगले परतावे. वरील मसाले (गरम-मसाला सोडून) घालून सगळे नीट एकजीव करावे.
त्यात चिरलेला पालक घालून एकत्र करणे व झाकून पालक शिजवणे.शिजलेल्या पालकात उकडलेले काबूली चणे घालावे व शिजवावे.
शिजल्यावर वरून गरम-मसाला भुरभुरावा.
लिंबु पिळून गरमा-गरम पालक-छोले रोटी, चपाती सोबत सर्व्ह करा.

वाचन
6365
प्रतिक्रिया
0