(रेडा म्हणे वडाला)
लेखनविषय:
आमची प्रेरणा
रेडा म्हणे वडाला "भलताच जाच आहे
दोरे बरे अरे हा यमराज त्रास आहे.
ने-आण मी करावी, यमभार मी वहावा
तरी मजसी तो म्हणे की, "तू बावळाच आहे!"
ना इंक्रिमेंट काही, ना सुट्टी घे कधी जो
ऐसा गुलाम त्याला नेहमी हवाच आहे.
जातो आता निघोनि धाडून मेल त्याला
कैसे हरेल प्राण ? मग कोण भार वाहे ?
वैविध्य वाहनाचे त्या पाहूदेच आता
सांगेन जॉब माझा हा सातवाच आहे."
बघा जमलंय का ते !!
अवांतरः त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही, ते समस्यापूर्ती साठी दिल्यासारखं वाटतं. ;)
वाचने
11609
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
हा हा हा.
लै भारी रे सूड. मजा आली.
हाहाहा सुडक्या :)
विडंबन जमलं! या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांची मनोगतं कळतायत! मस्त!
:)
मस्त रे सुड्या.
आता कोण कंपूबाज याचा आडवा छेद घेणार? ;)
लई भारी रे, मस्त मजा आली, आता वटपॉर्णिमा सोप्पं लाईफ जगणा-या पुरुषांना जवळचा सण वाटेल आणि वडाची अनामिक भिती वाटणार नाही.
हा हा हा! क्लास!
हा हा मस्तच :)
अमोल केळकर
मस्त रे! रेड्याचेही मस्त चितारलेस अंतरंग!
हा.हा.हा
सुड लयं भारी रे.
आयटी हमालांच्या दु:खाला वाचा फोडणारे जळजळीत लेखन.
हमाल मुलगा
हे विडंबन बाकी क्लासच आहे...
वर पर्या म्हणतोय तसं आयटी हमालांच्या दु:खाला वाचा फोडणारे जळजळीत लेखन.
लगे रहो भाई, हम आयटीवाले तुम्हारे साथ हैं (जब तक अच्छी ऑफर नही मिलती तब तक :) )
बिचारा रेडा. आणि त्याला स्विच मारायलाही फारसे पर्याय नाहीत, स्पेशलायजेशनचा हाच त्रास असतो साला.
(स्पेशलायजेशनवाला) रमताराम
In reply to ज-ह-ब-ह-रा by रमताराम
जे ब्बात, ररा काका!! :D
In reply to ज-ह-ब-ह-रा by रमताराम
ररा, कंस संपायच्या आधी ' रेडा' हा शब्द लिहायचा राहिला का?? ;)
सुड, भारी रे!!
In reply to ररा, कंस संपायच्या आधी ' by प्रभो
लिहिला होता आधी, पण नंतर रेडे मोर्चा घेऊन येतील या भीतीने डिलिटला.
उत्तम जमलंय.. धन्यवाद
छान ,छान
मस्त जमली आहे कविता
समस्त यमग्रस्त रेड्यांची तळमळ ओतलेली आहे.
मस्त :-)
हाहाहा , मस्त जमलंय रे सुडक्या!!!!
तू वटपौर्णिमेला रेड्याचे मनोगत लिहिले होते इतके आठवत होते. पण नेमकी लिंक सापडेना! हा धागा वर आणणार्यांना धन्यवाद!
वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत आहे. ;)
In reply to वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत by सूड
त्या आणखी दोन कवितांची पण आठवण झाली होती!
अजरामर काव्य!
In reply to अजरामर काव्य! by रेवती
पुनर्वाचनाचा आनंद घेतला. :)
कविता मनापासुन आवडली, पण रेड्याचीच किव आली.
रेड्याला हे माहितच नाही की आता बुलेटट्रेन(स्पीड)चा जमाना आलाय!
यावर यमराजाचे मनोगत....!
वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत आहे. ;)
:)
आज हिच कविता मला व्हॉट्सअॅपला आली रे बाबा =))
हायला..त्यांना ओरजिन सांगा!! =))
चला वॉट्सअॅपला आली म्हणजे तुम्ही फेमस झालात राव. कविता चोरी व्हायला सुद्धा भाग्य लागतं. ;)
बाकी भन्नाटच ,लै भारी
कहर ! जाम आवडली !
लई भारी ! विडंबन मस्तच झालंय !!
त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही.
आज सकाळी सौ. ने वट पूजा केली (मला माहितच नव्हते आज वट पूर्णिमा आहे.). आत्ता येताच चहा बरोबर साबूदाण्याची उसळ होती. मी विचारले आज काय आहे. ती आज वट पूर्णिमा आहे. मी गमतीने म्हणालो आपला सातवा आहे. सौ. म्हणाली माझा तर पहिलाच आहे, पुढील ६ जन्मे आणखीन तुमच्या डोक्यावर मिरे वाटायचे आहे.....
In reply to त्या 'सातवाच आहे' ला काही by विवेकपटाईत
माझा तर पहिलाच आहे, पुढील ६ जन्मे आणखीन तुमच्या डोक्यावर मिरे वाटायचे आहे.....म्हणूनच म्हणतो..
हाहाहा. सूड काढलायत अगदी.
In reply to हाहाहा. सूड काढलायत अगदी. by नूतन सावंत
सूड उगवतात; काढत नाहीत.
सध्या ज्या धागे वर दिसतायत ते म्हणजे (रेडा म्हणे वडाला) आणि (चा)वटपौर्णिमा.
हेच का अच्चे दिन?
जमले जमले