मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(रेडा म्हणे वडाला)

सूड · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमची प्रेरणा रेडा म्हणे वडाला "भलताच जाच आहे दोरे बरे अरे हा यमराज त्रास आहे. ने-आण मी करावी, यमभार मी वहावा तरी मजसी तो म्हणे की, "तू बावळाच आहे!" ना इंक्रिमेंट काही, ना सुट्टी घे कधी जो ऐसा गुलाम त्याला नेहमी हवाच आहे. जातो आता निघोनि धाडून मेल त्याला कैसे हरेल प्राण ? मग कोण भार वाहे ? वैविध्य वाहनाचे त्या पाहूदेच आता सांगेन जॉब माझा हा सातवाच आहे." बघा जमलंय का ते !! अवांतरः त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही, ते समस्यापूर्ती साठी दिल्यासारखं वाटतं. ;)

वाचने 11608 वाचनखूण प्रतिक्रिया 40

पैसा Sat, 06/18/2011 - 09:58
विडंबन जमलं! या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांची मनोगतं कळतायत! मस्त!

धन्या Sat, 06/18/2011 - 13:12
हे विडंबन बाकी क्लासच आहे... वर पर्‍या म्हणतोय तसं आयटी हमालांच्या दु:खाला वाचा फोडणारे जळजळीत लेखन. लगे रहो भाई, हम आयटीवाले तुम्हारे साथ हैं (जब तक अच्छी ऑफर नही मिलती तब तक :) )

रमताराम Sat, 06/18/2011 - 19:44
बिचारा रेडा. आणि त्याला स्विच मारायलाही फारसे पर्याय नाहीत, स्पेशलायजेशनचा हाच त्रास असतो साला. (स्पेशलायजेशनवाला) रमताराम

पैसा Sun, 06/23/2013 - 16:40
तू वटपौर्णिमेला रेड्याचे मनोगत लिहिले होते इतके आठवत होते. पण नेमकी लिंक सापडेना! हा धागा वर आणणार्‍यांना धन्यवाद!

विवेकपटाईत Tue, 06/02/2015 - 19:34
त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही. आज सकाळी सौ. ने वट पूजा केली (मला माहितच नव्हते आज वट पूर्णिमा आहे.). आत्ता येताच चहा बरोबर साबूदाण्याची उसळ होती. मी विचारले आज काय आहे. ती आज वट पूर्णिमा आहे. मी गमतीने म्हणालो आपला सातवा आहे. सौ. म्हणाली माझा तर पहिलाच आहे, पुढील ६ जन्मे आणखीन तुमच्या डोक्यावर मिरे वाटायचे आहे.....