१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे,
२) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो.
३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे.
तरीही असे लिहावेसे वाटते की,
पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. अन्यथा पोलिस लहानमुलांना आणि बायकांना फटकावताहेत, हे चित्र कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर नक्कीच दिसले असते; कारण प्रत्येकच वाहिनी मध्यरात्रीची ती प्रत्यक्ष दृष्ये दाखवत होती. अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे..
तरीही पोलिस हरकत में आ गई आणि केवळ शक्तिप्रदर्शनाकरता जमवलेल्या ५०००० च्या त्या गर्दीला तेथून रातोरात हाकलले ते एका अर्थी बरेच झाले. त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते..!
बाकी सांगायचे म्हणजे एकूणच रामबाबाच्या ह्या आंदोलनात त्याने **अत्यंत ढोबळ अन् बेफाट** मागण्यांच्या निमित्ताने केलेले राजकीय (?) शक्तिप्रदर्शनच अधिक होते.
** १) आत्ताच्या आत्ता परदेशात जा अन् तेथील बँकातील काळा पैसा घेऊन या..!
- म्हणजे पोतीच्या पोती घेऊन परदेशात गेले आणि तेथील सारा काळा पैसा घेऊन पुढच्याच विमानाने भारतात परत आले इतके हे सोप्पे आहे का?
**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!
- अहो पण याला काही अन्य पर्याय..?
**३) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत द्या..
- पण तुमच्याकडे तसा अभ्यासक्रम तयार आहे का? तसे शिक्षक आहेत का? तश्या काही ठोस योजना तयार आहेत का?
वगैरे वगैरे.. **
योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे. त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला. त्यातच अण्णांच्या आंदोलनाला सार्या देशाने आणि आंतरजाल जगताने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे रातोरात ष्टार झालेले अण्णा, हे पाहून रामबाबाही अंमळ खुळावला असावा, किंबहुना त्याचा जळफळाटच अधिक झाला असावा. आणि त्यामुळेच अण्णांचे हे आंदोलन तो काहीही करून हायजॅक करू पाहू लागला. मिडियाचे आपल्याकडे लक्ष जाऊन आपण सतत प्रकाशाच्या झोतात कसे राहू हे तो पाहू लागला.
अण्णांच्या आंदोलनाला/उपोषणाला जशी काही एक भक्कम वैचारीक बैठक आहे तशी काहीही बैठक रामबाबाची नाही. शिवाय अण्णांच्या मागे अरविंद केजरीवाल नामक एक चाणक्यही आहे जो अत्यंत हुशार मनुष्य आहे, काही एक चांगले करू पाहणारा आहे. अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का?
रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? (तिला सारेजण 'साध्वी' ऋतंबरा असे संबोधतात. परंतु तिच्याबद्दल कुठलीही व्यक्तिगत माहिती मला नसताना मला व्यक्तिश: तिला 'साध्वी' असे संबोधणे उचित वाटत नाही. मनुष्यप्राणी हा जबर स्खलनशील आहे असा माझा ठाम विश्वास आहे. असो..!) :)
दिल्लीहून हुसकून हरिद्वारला पाठवलेला रामबाबा तिथे गेल्यावर अजूनही काही वाट्टेल ते बरळतो आहे. म्हणे ५००० माणसे बेपत्ता आहेत, मला ठार मारण्याचा सरकारचा डाव होता वगैरे वगैरे..
अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात पुलं म्हणाले होते की सन्याशाची वस्त्र ही भयंकर असतात, ती सारे अंग भाजून काढतात. रामबाबा, तूर्तास तुझीही नेमकी तशीच अवस्था झाली आहे. लेका, तुझ्यासारख्या योग्यापेक्षा आठवड्याला एक-दोनदा क्वार्टर अन् मच्छीचं जेवण जेवणारे, सुंदर-आकर्षक आणि कमनीय बायकांकडे पाहून मनातल्या मनात पाघळणारे आमच्यासारखे भोगी बरे की रे..! :)
तेव्हा रामबाबा, जागा हो. आजही तू एक मोठा योगाचार्य आहेस. तेव्हा तू आपला तुझी योग्यविद्याच आम्हा सार्या भारतीयांना शिकवून सोड कसा..!
जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ;)
काय बोल्तो..? :)
तुझा,
तात्या.
वाचने
48533
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
विशेषतः **२) ५०० आणि १०००
२) ५०० आणि १००० च्या नोटा
In reply to विशेषतः **२) ५०० आणि १००० by गवि
मोठ्या नोटा रोखीच्या (गैर)व्यवहारातच वापरायला सोयीच्या असतात
In reply to विशेषतः **२) ५०० आणि १००० by गवि
तुमचे म्हणणे मान्य आहे. अगदी
In reply to मोठ्या नोटा रोखीच्या (गैर)व्यवहारातच वापरायला सोयीच्या असतात by सुधीर काळे
मागे एकदा
In reply to तुमचे म्हणणे मान्य आहे. अगदी by इरसाल
जुने मिपा चाळताना हा लेख
In reply to विशेषतः **२) ५०० आणि १००० by गवि
सरकारने जर रामदेवांची
कृत्रिम कशाला?
In reply to सरकारने जर रामदेवांची by ५० फक्त
अत्यंत ये**वा आणि फालतू लेख
प्रचंड सहमत...........
In reply to अत्यंत ये**वा आणि फालतू लेख by llपुण्याचे पेशवेll
पुपेंशी सहमत.
In reply to अत्यंत ये**वा आणि फालतू लेख by llपुण्याचे पेशवेll
तात्या
असा मनुक्श्य तय्यार करायला टाकला आहे.
पब्लिसिटी
खुदा त्यांना चांगला रस्ता
In reply to पब्लिसिटी by आंसमा शख्स
.
काहीतरीच लिहितो वाद होतात पण
चढेल तो पळेल!
वाह्वा ! आमची ती क्रांती
In reply to चढेल तो पळेल! by चिंतातुर जंतू
फार्स
In reply to वाह्वा ! आमची ती क्रांती by llपुण्याचे पेशवेll
म्हणजे वेशांतर करून
In reply to फार्स by चिंतातुर जंतू
भूमिगत?
In reply to म्हणजे वेशांतर करून by llपुण्याचे पेशवेll
एक शंका अशी:रामदेव बाबांनी
In reply to भूमिगत? by चिंतातुर जंतू
+१००
In reply to एक शंका अशी:रामदेव बाबांनी by गवि
स्त्री वेशात पळून गेलो हे मी
In reply to भूमिगत? by चिंतातुर जंतू
+१
In reply to म्हणजे वेशांतर करून by llपुण्याचे पेशवेll
लगे रहो पुपे.
In reply to वाह्वा ! आमची ती क्रांती by llपुण्याचे पेशवेll
त्या गर्दीत फुकाचे साधुसंत
मस्त लेख..
थोडे फोटो वगैरे आणि किरण बेदी.
किरण बेदी आणि अण्णा हजारे या दोघांनी....
In reply to थोडे फोटो वगैरे आणि किरण बेदी. by चित्रा
हे आधि करा
जो तो उठतो आंदोलन
In reply to हे आधि करा by उदयन
पटला नाही...
रामदेव ब्रिगेड..
In reply to पटला नाही... by विकास
अगदी अगदी
In reply to रामदेव ब्रिगेड.. by अजातशत्रु
अगा या या या ! अजातशत्रु
In reply to रामदेव ब्रिगेड.. by अजातशत्रु
अरेरे..विंचू चावल्या सारखेच झालेय तुमचे तर..
In reply to अगा या या या ! अजातशत्रु by परिकथेतील राजकुमार
ऑबॉबॉबॉ.....
In reply to अगा या या या ! अजातशत्रु by परिकथेतील राजकुमार
ऑबॉबॉबॉ.....
In reply to ऑबॉबॉबॉ..... by धमाल मुलगा
खुलाशाबद्दल धन्यवाद. मंडळ
In reply to ऑबॉबॉबॉ..... by अजातशत्रु
खुलासे...
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद. मंडळ by धमाल मुलगा
भय्या हातपाय पसरी...
पुपेंशी अतिशय सहमत, कुणीतरी
इंतरेस्तींग टोपीक.
भगोडा रामदेवबाबा..
शिक्षणासंदर्भात
In reply to भगोडा रामदेवबाबा.. by अजातशत्रु
आणि किती मंत्री अशिक्षित आहेत
In reply to शिक्षणासंदर्भात by विकास
+१
In reply to आणि किती मंत्री अशिक्षित आहेत by रणजित चितळे
+११....
In reply to +१ by नितिन थत्ते
कुंदनला बसवा रे उपोषणाला
In reply to +११.... by कुंदन
कुणाच्याच
In reply to +१ by नितिन थत्ते
राहूल गांधी यांचे शिक्षण
In reply to आणि किती मंत्री अशिक्षित आहेत by रणजित चितळे
शक्य आहे
In reply to राहूल गांधी यांचे शिक्षण by अजातशत्रु
अगंबाबो!
In reply to भगोडा रामदेवबाबा.. by अजातशत्रु
त्यात आर एस एस/भाजपवालेही होतेच
In reply to भगोडा रामदेवबाबा.. by अजातशत्रु
एक
अनेक भोंदू लोक पदोपदी समाजात
तात्याच्या आयुष्यातला पहीला बिनडोक लेख...
साला बाकी काय आसो नासो पण
पर्या मेल्या, मला पिशाच्च
In reply to साला बाकी काय आसो नासो पण by परिकथेतील राजकुमार
पुप्या मेल्या तु जिवंतच असतोस
In reply to पर्या मेल्या, मला पिशाच्च by llपुण्याचे पेशवेll
अतिशय खेद्जनक लिखाण. -१०००
अर्धशिक्षित आणि अशिक्षित
सु'शिक्षित' असणे आणि
फरक कळतो हे ही नसे थोडके..
In reply to सु'शिक्षित' असणे आणि by प्यारे१
अहो
बाबांचे मानसिक
In reply to अहो by तिमा
बाबांचे मानसिक संतुलन बिघडले
In reply to बाबांचे मानसिक by निल्या१
+
In reply to बाबांचे मानसिक संतुलन बिघडले by llपुण्याचे पेशवेll
मला वाटते
In reply to अहो by तिमा
तात्याकडून अशा लेखाची अपेक्षा
सर्कसचा खेळ चालू आहे सगळा.
५०० आणि १००० .....पण याला काही अन्य पर्याय..?
गल्लत होतीय का?
In reply to ५०० आणि १००० .....पण याला काही अन्य पर्याय..? by कुंदन
रामदेव बाबा
हे संसारी संन्याशी आहेत का
In reply to रामदेव बाबा by वेताळ
बाबा कि जय हो
In reply to हे संसारी संन्याशी आहेत का by llपुण्याचे पेशवेll
१) पहिला मुद्दा ते संसारी
In reply to बाबा कि जय हो by वेताळ
अपेक्षाभंग...
सुपरलाईक!!!!!
In reply to अपेक्षाभंग... by योगप्रभू
...
सहमत.
आपला भारत देश म्हणजे
आपला भारत देश म्हणजे
In reply to आपला भारत देश म्हणजे by अविनाशकुलकर्णी
हा हा हा ..!!
In reply to आपला भारत देश म्हणजे by arunjoshi123
उपोषणानंतर...
..
कुठे जुनी पोष्ट शोधायला गेलात
In reply to .. by मनिम्याऊ
जमल्यास तुझ्या