भरली वांगी (stuff brinjals)
भरली वांगी (stuff brinjals)
( स्टेप बाय स्टेप कृती फोटोसहीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळ चू.भु.दे.घे.)
साहित्य : (वाटणा करिता )ओल्या नारळाचा कीस २ वाट्या ,धणेपूड १ मोठा स्पून ,१ स्पून मिरची पावडर,एक स्पून गरम मसाला ,आल ,लसून ,कोथिंबीर .
वरील साहित्याचे मिक्सी मध्ये थोड पाणी घालून वाटण तयार करून घ्या
वांग्याला आडवे उभे काप देऊन हा मसाला त्या मध्ये भरा
२ कांदे चिरून ,२ टोमाटो चिरून ,कोथिंबीर ,
फोडणीसाठी - जीर,मोहरी.कढीपत्ता ,एक दालचिनीचा छोटा तुकडा,हिंग
कृती :-
कढइत ३ चमचे तेल टाकून त्यात आधी मसाला भरलेली वांगी छान परतून घ्या ,ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .
आता त्याच तेलात जीर मोहरी ,कढीपत्ता तडतडवा,दालचिनीचा तुकडा घाला
नंतर कांदा गुलाबी परतून घ्या ,टमाटर घाला छान परतून घ्या आता पुन्हा आधी तळुन घेतलेली वांगी परतवा ,मीठ आणि हळद घाला आणि त्यात उरलेला मसाला घालून हलवत राहा .
वांगी कच्ची वाटत असतील तरं किंचित पाणी घाला परतून
परतून छान कोरडी करून घ्या ,कोथिंबीर घाला .
भरली वांगी चापण्यासाठी तयार आहेत
२ कांदे चिरून ,२ टोमाटो चिरून ,कोथिंबीर ,
फोडणीसाठी - जीर,मोहरी.कढीपत्ता ,एक दालचिनीचा छोटा तुकडा,हिंग
कृती :-
कढइत ३ चमचे तेल टाकून त्यात आधी मसाला भरलेली वांगी छान परतून घ्या ,ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .
आता त्याच तेलात जीर मोहरी ,कढीपत्ता तडतडवा,दालचिनीचा तुकडा घाला
नंतर कांदा गुलाबी परतून घ्या ,टमाटर घाला छान परतून घ्या आता पुन्हा आधी तळुन घेतलेली वांगी परतवा ,मीठ आणि हळद घाला आणि त्यात उरलेला मसाला घालून हलवत राहा .
वांगी कच्ची वाटत असतील तरं किंचित पाणी घाला परतून
परतून छान कोरडी करून घ्या ,कोथिंबीर घाला .
भरली वांगी चापण्यासाठी तयार आहेत
वाचने
13005
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
जो बोला वो करके दिखाया....
तो शेवटचा फोटो तर जीवघेणा आहे...:)
अवांतर : वांग्यांचे देठ काढायचे विसरलीस का?
अवांतर : वांग्यांचे देठ काढायचे विसरलीस का?
विसरले नाहि मला वान्ग्याचे देठ आवड्तात :)
धन्यु
यम्मी..... लय भारी.
शेवटचा फोटो बघून तर बादलीभर लाळ गळाली ग.....!!!!!
छान ...मस्त :)
झक्कास!!
आज मेस बंद असल्याने आमच्याकडे हाच बेत आहे. :)
पण आम्ही नारळाच्या किसाऐवजी कूट वापरतो.
ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क !! वांगी हा माझा सर्वांत नावडता प्रकार आहे ... नुस्तं वांगं म्हंटलं तरी भुक मरते . फोटु पाहुन तर पुढचा आठवडा भर जेवीन की नाही माहित नाही.
काय अक्कल सुचली आणि पाकृ क्लिक केली ! :(
असो !
( स्टेप बाय स्टेप कृती फोटोसहीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळ चू.धु.दे.घे.)त्यामुळ हा अभिनव प्रकार आवडला
,आल ,लसून ,कोथिंबीर .आल कुठे मिळते ? आल नसेल तर अंड टाकले तर चालेल काय ?
वरील साहित्याचे मिक्सी मध्ये थोड पाणी घालून वाटण तयार करून घ्यामी मिक्सी कुठे मिळते ? इकडे अमेरिकेत कुठे मिळते काय ?
ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .अवघड दिसते पाकृ .
आता त्याच तेलात जीर मोहरी ,कढीपत्ता तडतडवा,दालचिनीचा तुकडा घालाहे जीरवायचं की तडतडवायचं ?
नंतर कांदा गुलाबी परतून घ्यागुलाबी ? कोणत्या जातीचे कांदे वापरता तुम्ही ? जर्मनीत निळे कांदे मिळतात.
पुन्हा आधी तळुन घेतलेली वांगी परतवा ,परतवायची की तळायची वांगी ? काय झोल आहे नक्की ? अशाने कोळसा व्हायचा वांग्याचा एकंदरीत पहिला प्रयत्न हुकला तर आहेच , पण हे खाऊन बाकीच्यांची वांगी खायची वासना मेली तर त्याचे पाप तुमच्या माथी लागले नाही तर मिळवली. - बबुशा
In reply to ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क by टारझन
काय टारझनभय्या वांगेआळीकर
वांगे आवडत नाहीत तर मग वांगेआळीत कसे राहाता?
In reply to ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क by टारझन
ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .'ब्रावणे' म्हणजे नक्की काय?
In reply to ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क by टारझन
@ टारझन
काय अक्कल सुचली आणि पाकृ क्लिक केली !
मराठी आनि हिन्ग्लिश वाचता येत ना रे तुला? मग एवढ धड्धडीत भरलि वान्गि (stuff brinjals)लिहिलेल असताना वाचता नाहि आले ?
ढ कुठला ;)
In reply to @ टारझन काय अक्कल सुचली आणि by पियुशा
व्यक्तिगत टिका होते आहे , संपादक मंडळाने दखल घ्यावी.
माझा प्रतिसाद सदर लेखिकेच्या लेखनावर आणि लेखनातल्या मॅटर असताना माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करणार्या सदस्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी संपादक मंडळाला विनंती करण्यात येते.
- ढगुशा
पण आम्ही नारळाच्या किसाऐवजी कूट वापरतो.
आम्ही दोन्ही वापरतो...
टोमॅटो नाही वापरत...त्यामुळे तवंग कमी येतो ..
पियुशा,
वांगी शिजवताना प्रेशर पॅनचा उपयोग केला तर अगदी लोण्यासारखी मऊ होतात. शेवटचा फोटो बघून मनाचे समाधान झाले.
भरले वांगे करताना देठ तर ठेवला पाहिजेच. खाताना तो काढून फेकून द्यायचा, पण आधीच कापायचा नाही कारण देठही शिजल्याने वांग्याला छान चव येते.
खोबरे आणि कुटाचा एकत्रित वापर म्हणजे चैनच. पण वांगे वातुळ, शेंगदाणा पित्तकारक आणि तेल व खोबरे वजन वाढवणारे त्यामुळे ही डिश ओरपणार्यांचे लवकरच अंगाने भरलेले वांगे होण्याची शक्यता अधिक.
आमच्याकडची कृष्णाकाठची काळीभोर वांगी एकदम चवदार. सातारा, सांगली, कराडवरुन कुणी अशी वांगी आणली की मग मजाच मजा. :)
In reply to शेवटचा फोटो छानच.. by योगप्रभू
>>>आमच्याकडची कृष्णाकाठची काळीभोर वांगी एकदम चवदार. सातारा, सांगली, कराडवरुन कुणी अशी वांगी आणली की मग मजाच मजा
कृष्णा काठची हिरवी वांगी प्रसिद्ध आहेत. काळी नाहीत. अप्रतिम असतात चवीला.
-पटवर्धन्(सांगलीकर)
In reply to >>>आमच्याकडची कृष्णाकाठची by प्राजु
कृष्णा काठची हिरवी वांगी प्रसिद्ध आहेत. काळी नाहीत. >>
कृष्णा नदी आमच्याइथून पुढे सांगलीला आल्यावर बहुतेक वांग्याचा रंग बदलत असेल. आम्ही पण कृष्णाकाठचेच, पण छोटी अंड्याच्या आकाराची आणि काळी-जांभळी वांगी खात आलो आहोत.
असो. वाद नको. तुमची हिरवी वांगी आम्हाला द्या. आमची जांभळी खाऊन बघा. :)
हिरवी वांगी तिकडे जळगावकडे होतात. त्याचीच भरीत पार्टी करतात. तीही खाल्ली आहेत.
आमच्याकडे भरताचे वांगेपण काळे-जांभळेच असते.
- (सर्वभोक्ता) योगप्रभू
In reply to मतभेदास वाव आहे... by योगप्रभू
काळी वांगी माहिती नाही.. पण सांगलीला आम्ही नेहमीच हिरवी-पांढरी काटेरी वांगी आणतो. ती खूप आवडतात आणि चवही अप्रतिम असते.
आवांतर : योगप्रभू आपण पहिलेच भेटलात मला, कृष्णाकाठचे जे हिरव्या वांग्याचे नाही तर काळ्या वांग्याचा अभिमान बाळगून आहात. :)
In reply to काळी वांगी माहिती नाही.. पण by प्राजु
खरं सांगायचं तर काटेरी वांग्यांना जी चव असते ती दुसर्या वांग्यांना नसते.
एक टांगेची कोंबडीच...मस्त आवडता पदार्थ
मस्त्त ग
सुंदर फोटु
मी फक्त त्याची ग्रेव्ही खाते. त्यामुळे पॅन मधली नाही खता येत. अति शिजल्याने ग्रेव्ही अनि वांगे मिक्स होते
छान प्रगति आहे, किमान पाक्रु टाकण्यात तरी असं लिहिणार होतो, पण वांगं हे आमच्या घराचं पेशलिटि आहे, त्यामुळे छान झाली असावी भाजी असे म्हणतो , जो पर्यंत धागाकर्ता / कर्ती प्रत्यक्ष खाय्ला बोलवणार नाहीत तो वर उगा चवीचे कॉतुक का क्ररा नाही का ? आणि हे आवाहन किंवा आव्हान कसे ही समजले तरी चालेल.
बाकी आमच्याक्डे, शेंगा/ति़ळाचे कुट आणि काळा मसाला घालुन ही भाजी करतात, ती पण कल्हई केलेल्या पितळ्याच्या पातेल्यात.
आयला काय पण नशीब आहे. इथे भरली वांगी आणि आज डब्यात पण भरली वांगी. पण इथे हिरवी वांगी मिळत नाहीत त्यामुळे जांभळ्या वान्ग्यांवर भागवावे लागतेय.
विश्वास नाही वाटत तर हे बघा.


वाह !
जबर्याच पाकृ. काल नेमकी घरी साधारण अशाच प्रकारची पाकृ कुठल्याश्या खवय्या प्रॉग्रॅम मध्ये बघुन केली. त्यांनी ह्या पाकृचे नाव 'ढकल वांगी' असे दिले होते.
अवांतर :- भरली वांगी (stuff brinjals)
हे इंग्रजी मध्ये देण्याचे कारण कळले नाही. मध्ये कुठल्याश्या आगामी कट्ट्याच्या धाग्यावर काही विचारवंतानी 'कट्ट्याला येण्याची इच्छा असलेल्या मिपाकरांनी दारु पिउन येउ नये' वैग्रे मिपाकरांना अक्कल नसल्यासारखे दिलेले सल्ले ह्या निमित्ताने आठवले :)
असो...
शेवट चा फोटु लय भारि
नागपुर कडे सावजी लोकात वान्ग्याचं खुपच फ्याड आहे
म्हन्तात
बान्गा भात खाईस
डोरे बटारिस....
मस्त...उद्याच करुन बघते.
म्स्त मीपण करणार आहे उद्या.
भरल्या वांग्यांच्या रेशिपीमधे टमाटू नि कांदा? काय पंजाब्याची रेशिपी हाय काय ही? एवढं सगळं भरताड घातल्यावर वांग्याची काय चव लागणार हो. वांग्याची चवच एवढी स्वर्गीय असते की फक्त वांगी, काळा मसाला नि अंमळ दाण्याचा कूट एवढ्यावरच अशी फर्मास भरली वांगी होतात की यंव रे यंव. (पु.ल. म्हणतात तसे खरा संगीतकार एक दोन वाद्यात सुरांचा स्वर्ग उभा करतो...) आमचे खानदेशी दोस्त तिकडले भले मोठे वांगे कुटाऐवजी अख्खे भाजके दाणे घालून बनवत. ती ही एक वेगळी चव. मज्जानु लाईफ.
(साधासोपा) रमताराम
In reply to ईक्स by रमताराम
वांग्याची चवच एवढी स्वर्गीय असते की फक्त वांगी, काळा मसाला नि अंमळ दाण्याचा कूट एवढ्यावरच अशी फर्मास भरली वांगी होतात की यंव रे यंव.सहमत.. + सोबत नेमका चिंच-गुळही हवा.. अन्य कशाची खरंच गरज नसते.. तात्या.
In reply to ईक्स by रमताराम
@ रमताराम एकदा करुन बघा वान्ग्याचि चव छान लागेल ,आनि दान्याच कुट घातलेल वान्ग म्हनजे अप्रतिम !
पन माझ्या आज्जिला दान्याचा कुट घातलेल वान्ग अज्जिबत आवडत नाहि म्हनुन तिच्यासथि हा प्रकार केला होता :)
तोंडाला पानि सुटले.
जिव उतविळ झाला. पोटात भुकेने खड्डा पड्ला. पोटातल्या माष्या ओरडायला लागल्या.
कधि एकदा घरी जाउण करतोय, असं झालंय
In reply to तोंडाला पानि सुटले. जिव उतविळ by नरेशकुमार
कधि एकदा घरी जाउण करतोय, असं झालंयकोनाच्या घरी जाउन करनार तुम्ही ? ;)
In reply to कधि एकदा घरी जाउण करतोय, असं by मुलूखावेगळी
हे बघा मि माझ्या नाकासमोर सरळ चालनार मनुक्श्य.
माझ्या हापिसातले माझे काम संपले कि माझ्या घरि जानार, आनि माझ्या स्वताच्या हाताने मि आनालेल्या वांग्याची भाजि मिच कर्नार. आनि मि केलेली भाजि मात्र आम्हि दोघे(च) मिळुन वाटून खानार.
स्वगत : काय रे देवा, हल्लि काय बोलायचि सोय नाही.
जो बोला वो करके दिखाया.... तो