बॅचलर्स भाजणीचे वडे
आता एका कढईत तेल तापत ठेवावं, आम्ही नमनालाच घडाभर तेल घातल्याने जे काही बेतास बात तेल शिल्लक होतं ते ओतलं. आता हे तेल नीट तापलं की वडे मध्यम आचेवर बदामी/ सोनेरी/ खरपूस अश्याच कुठल्याशा रंगावर तळावेत.
खाताना काळ्या वाटाण्याची उसळ या वड्यासोबत वाढावी, सामिषाहारींनी त्यांना जे आवडेल ते वड्यांसोबत खाण्यासाठी घ्यावं.
वाटाण्याच्या उसळीची पाकृ नंतर सवडीने देण्यात येईल.
टीप: 'फोटोतली कढई कडेला जराशी काळसर दिसत्ये, नीट घासली नाही का ??' असा खवचट प्रतिसाद कृपया कोणी देऊ नये. वडे तळून झाल्यावर ती नीट घासून ठेवण्याची खबरदारी घेण्यात आलेली आहे.
पोटटीप: हे वडे तांदळाच्या खिरीसोबत छान लागतात असा माझा अनुभव आहे. अर्थात कुणी कसं खावं हे सांगायचा अधिकार मला नाही, मी फक्त निरिक्षण नोंदवलं.
तळटीप:
हे बॅचलर्स वडे आहेत म्हणून मी भाजणी कशी करावी हे दिलेलं नाही, मला माहित असलेलं भाजणीचं साहित्य व कृती खालीलप्रमाणे;
अर्धा किलो गहू,
पाव किलो साधे तांदूळ,
पाव किलो उकडा तांदूळ,
पाव किलो ज्वारी,
१२५ ग्रॅम हरभरा डाळ,
१२५ ग्रॅम उडीद डाळ,
थोडे धने बडीशेप.
आता गहू वगळता इतर सर्व साहित्य धुवून वाळवून घ्यावे आणि मंद आवेवर खरपूस भाजावे. थंड झाले की मिसळून भरड दळून आणावे. ( इकडे* भैयाला वड्यांची भाजणी आहे म्हटलं की नीट दळून देतो.)
यात गणपाभौ, जागुतै आदि बल्लवाचार्य/ सुगरण मंडळींनी काही ज्ञानात भर घातल्यास उत्तमच.
जाता जाता: फोटु कसेही आले असले तरी चव उत्तम होती, फोटो काय खाता येतात का ?
शब्दार्थ: इकडे*= बदलापूर (याचाच अर्थ तिकडे म्हणजे अदर दॅन बदलापूर).
In reply to फोटो by गवि
In reply to पाकृ सर्वार्थाने आवडली. by नगरीनिरंजन
पाकृ सर्वार्थाने आवडली. फोटोही चांगलेच आहेत. वडे पाहून वडेसागोती खाण्याची अनावर इच्छा निर्माण झाली आणि खळ्कन पाणी जमा झालं तोंडात. वड्यांसारखेच खुसखुशीत वर्णन. विशेषतः इकडे-तिकडे, असुर-डेमन्स आणि गविंच्या (सहीतल्या) छिद्राचा वापर करून केलेली टिप्पणी तर लईच खास.पूर्ण सहमत!
In reply to छान छान ह्या विकांतास करुन by परिकथेतील राजकुमार
In reply to अरे वा.. पण हे वडे आहेत की by मराठमोळा
In reply to हम्म by रमताराम
In reply to ओ काका, आठवण करू नका हो देऊ.. by मेघवेडा
In reply to >>आम्ही जर पक्या पेताड असतो by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to लेख छान आणि पाकक्रुति पण !! by दीविरा
In reply to पाकृच्या आडून काय काय चाल्लंय by प्राजु
In reply to पाकृच्या आडून काय काय चाल्लंय by प्राजु
In reply to भाजणीइतकीच खमंग by रेवती
In reply to भाजणीइतकीच खमंग by रेवती
In reply to भाजणीइतकीच खमंग by रेवती
In reply to धन्यवाद रेवतीताई. by सूड
In reply to धन्यवाद रेवतीताई. by सूड
In reply to अग्गो बाऽऽई, मुलगा खरंच मोठा by यशोधरा
In reply to जरा जास्तच शहाणा झालाय by रेवती
In reply to रेवती आजी, तुझ्या त्या by स्पा
In reply to जाऊ दे! तिचा विचार सोडून by रेवती
In reply to जरा जास्तच शहाणा झालाय by रेवती
In reply to अग्गो बाऽऽई, मुलगा खरंच मोठा by यशोधरा
In reply to अग्गो बाऽऽई, मुलगा खरंच मोठा by स्पा
In reply to भाजणीइतकीच खमंग by रेवती
In reply to इकडे*= बदलापूर by चिंतामणी
In reply to छान ! by प्राजक्ता पवार
In reply to पाकृ लिहीताना मी जेवढी एन्जॉय by सूड
भाजणीचे वाडे हि