वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! . त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे.
१. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी
२.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते
३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची
४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची
५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची
६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची
७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची.
८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप
९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल.
हे झाले पुराणातील वर्णन, भास्कराचार्य सारखा गणिती ही ह्या वर्णनाला आपल्या ग्रंथात पुष्टी देतो. सूर्यसिध्दान्ता सारख्या प्रमाण ज्योतिष ग्रंथात तर प्राचीन शहरांची ही माहिती आहे. आपण जसे आता विषुवृत्त, रेखावृत्त इ. नकाशा करण्यासाठी संकल्पना वापरतो. तशाच कल्पना प्राचीन भारतीय ही वापरायचे. त्यांनी लंका हे प्राचीन बेट शून्य विषुवृत्तावर व शून्य पृथ्वी मध्य वृत्तावर मानले आहे. हे पृथ्वी मध्ये वृत्त आजच्या उज्जैन शहरातुन दक्षिण-उत्तर जाते. ह्या वृत्तावर दक्षिणेला हिन्दी महासागरात कुठे तरी लंका हे बेट होते .(कदाचित ते आताची लंका ही असू शकेल. सध्याची लंका विषुवृत्तापासुन ६ अंश उत्तरेला आहे)
ह्या प्राचीन लंका ह्या दिव्य शहरापासुन ९० अंशावर पूर्व-पश्चिम दोन शहरे होती. व १८० अंश विरूध्द एक शहर होते. ही चार शहरे देवांनी बांधलेली व अत्यंत प्रगत होती असा ज्योतिष ग्रंथात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तात खालील उल्लेख आहे.
समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः /
द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः //
भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता /
भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा //
याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी /
पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता //
उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता /
तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः /
{लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे}
(लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल.
मी आजच्या नकाशानुसार ह्यांचे अक्षांश-रेखांश खाली देत आहे, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना अधिक शोध घेता येईल. गुगल अर्थ तसेच इतर देशांच्या मायथोलोजिचा हि उपयोग करता येईल.
लंका- ० अंश उत्तर, ९० अंश पूर्व
सिध्दपुरी-० अंश उत्तर ९० अंश पश्चिम
यमकोटी-० अंश उत्तर १८० अंश पश्चिम
रोमक- ० अंश उत्तर ० अंश पूर्व (ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे)
लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे.
ता.क.- वरील भूगोलानुसार एखादा नकाशा बनवता आला तर मी ह्या लवकरच ह्या लेखातच अपडेट करेन
संदर्भ-
सूर्यसिध्दान्त
विष्णु पुराण
सिध्दान्त-शिरोमणी-भास्कराचार्य
वाचने
28872
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
मह्त्वाची माहिती
मौलिक लेखन
+१
In reply to मौलिक लेखन by अरुण वडुलेकर
हे जरी ...
औत्सुक्यपूर्ण
+१, जरा सोपी भाषा वापरता आली
In reply to औत्सुक्यपूर्ण by अन्या दातार
काही प्रश्न - काही सूचना
इतर द्वीपांविषयी माहिती आहे. पण ती निव्वळ गूढ स्वरुपाची आहे.
In reply to काही प्रश्न - काही सूचना by प्रास
उत्तर कुरु
In reply to इतर द्वीपांविषयी माहिती आहे. पण ती निव्वळ गूढ स्वरुपाची आहे. by ईश आपटे
ते पूर्वी उत्तरेला होते का?
In reply to उत्तर कुरु by प्रियाली
+१
In reply to ते पूर्वी उत्तरेला होते का? by llपुण्याचे पेशवेll
भारतीय उपखंड वरती (उत्तरेला)
In reply to +१ by प्रियाली
अगदी उत्तरेला नाही
In reply to भारतीय उपखंड वरती (उत्तरेला) by एक
>> अग्नेयेला (पण पर्यायाने
In reply to अगदी उत्तरेला नाही by प्रियाली
हो
In reply to >> अग्नेयेला (पण पर्यायाने by विश्वनाथ मेहेंदळे
मेरुच्या उत्तरेला आहे
In reply to उत्तर कुरु by प्रियाली
उत्तर कुरु???
In reply to मेरुच्या उत्तरेला आहे by ईश आपटे
शंका
In reply to मेरुच्या उत्तरेला आहे by ईश आपटे
वाह छान माहीती आहे.
पुरावा
In reply to वाह छान माहीती आहे. by llपुण्याचे पेशवेll
चांगली माहिती संकलित केली
?
सहमत आहे. परंतु लेटेस्ट
In reply to ? by नितिन थत्ते
पृथ्वी गोलच आहे
In reply to सहमत आहे. परंतु लेटेस्ट by पक्का इडियट
काय सांगता? अरे हो खरेच की !
In reply to पृथ्वी गोलच आहे by अगोचर
थत्ते साहेब, वैदिक काळात
In reply to ? by नितिन थत्ते
जम्बुनद्
जम्बुनद नव्हे जांबूनद..
In reply to जम्बुनद् by प्रियाली
जांबुनद
In reply to जम्बुनद नव्हे जांबूनद.. by योगप्रभू
महात्मा
In reply to जांबुनद by प्रियाली
चांगली कविता आहे
In reply to महात्मा by राजेश घासकडवी
छान संकलन केले आहेत आणि उत्तम
असेच म्हणते
In reply to छान संकलन केले आहेत आणि उत्तम by परिकथेतील राजकुमार
रोचक माहीती
ऊत्तम लेख
काही प्रश्न
गुर्जी पिरी रीसचे नकाशेही
In reply to काही प्रश्न by राजेश घासकडवी
कोण पिरी रीस?
In reply to गुर्जी पिरी रीसचे नकाशेही by मृत्युन्जय
चुकताय तुम्ही
In reply to कोण पिरी रीस? by राजेश घासकडवी
पिरी रीस १६ व्या शतकातील
In reply to कोण पिरी रीस? by राजेश घासकडवी
पिरी रीसवरील लेख वाचायला
In reply to पिरी रीस १६ व्या शतकातील by मृत्युन्जय
लिहित राहा......!
चांगला लेख. वाचतोय. अजून
+१
In reply to चांगला लेख. वाचतोय. अजून by बबलु
हेहेहे!
In reply to +१ by पिवळा डांबिस
फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला
In reply to +१ by पिवळा डांबिस
छान
सहमत आहे.
In reply to छान by आळश्यांचा राजा
-१
In reply to छान by आळश्यांचा राजा
प्रियाली यांच्याशी सहमत
In reply to -१ by प्रियाली
तिरकस
In reply to प्रियाली यांच्याशी सहमत by राजेश घासकडवी
थोडासा असहमत
In reply to छान by आळश्यांचा राजा
आदल्या लेखांचा संबंध नसावा...
In reply to थोडासा असहमत by धनंजय
असहमत
In reply to आदल्या लेखांचा संबंध नसावा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. "फुटकी तपेली" ही कविताबालकवी ठोंबरे यांनी लिहिली आहे. हे सर्व असताना, परिच्छेद "टाकाऊ-नसलेला मानावा" असे कोण म्हणेल? तुम्ही तुमच्या सहकार्याकडून वरील वाक्ये खपवून घ्याल काय? नाही, अशी खात्री वाटते. मग या इतिहासाच्या बाबतीत अशी हेळसांड कशाकरिता? आळशांच्या राजा यांनी संबंध जोडला नाही, ही जर नजरचूक असेल, किंवा त्यांनी आदले लेखन बघितले नसेल. तर ती नजरचूक मी त्यांच्या लक्षात आणून दिली. "प्रतिसाद धाग्यात स्वतंत्र आहे" म्हणजे नेमके काय? हा धागा सोडल्यासही "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असा या "स्वतंत्र"चा मथितार्थ आहे काय? म्हणजे या धाग्यात नव्हे तर अन्यत्र "स्वतंत्रपणे" या "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असे म्हणायचे आहे काय? "अन्यत्र" म्हणजे त्या "काहीं"च्या लेखनाचा इतिहासाचा संदर्भ आहे काय? तर मग मला मुद्दा समजलाच नाही : या धाग्याच्या लेखकाच्या अन्य लेखांचा इतिहास संदर्भात घ्यायचा नाही, पण प्रतिसादकांच्या अन्य लेखनाचा इतिहास संदर्भात घ्यायचा? त्यातही भारताबद्दल आदर व्यक्त करणारा प्रतिसादकांचा इतिहास सोडून संदर्भात घ्यायचा? हे काही ठीक वाटत नाही.+१
In reply to छान by आळश्यांचा राजा
छान माहिती
येऊ द्यात अजून
ठ्ठो......
In reply to येऊ द्यात अजून by गोगोल
वक्रोक्ती??
In reply to ठ्ठो...... by मन१
कोण बुद्धीजीवी?
In reply to वक्रोक्ती?? by गोगोल
तुम्ही म्हणाताय ते SG1
In reply to येऊ द्यात अजून by गोगोल
सायन्स फिक्शन मालिका
In reply to तुम्ही म्हणाताय ते SG1 by चतुरंग
<<खूप दूर च्या ग्रहांवर
In reply to येऊ द्यात अजून by गोगोल
अमेरिकेत असाल
In reply to <<खूप दूर च्या ग्रहांवर by शिल्पा ब
<<<फक्त जरा जपून .. अमेरिकन
In reply to अमेरिकेत असाल by गोगोल
+१
हे गोगोल महाराजांच्या
In reply to +१ by पिवळा डांबिस
अमेरिकन सरकार असले म्हणून काय झाल?
In reply to हे गोगोल महाराजांच्या by पिवळा डांबिस
काय बोलणार? आम्हाला वाटलं की
In reply to अमेरिकन सरकार असले म्हणून काय झाल? by गोगोल
लो टीआरपी
In reply to काय बोलणार? आम्हाला वाटलं की by पिवळा डांबिस
हम्म!
In reply to लो टीआरपी by गोगोल
याय
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह
हो हो!
In reply to आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह by प्राजु
स्क्रीबो एर्गो सुम्
In reply to हो हो! by पंगा
आभार, पण...
In reply to स्क्रीबो एर्गो सुम् by धनंजय
जम्बोजेट जम्बोजेट झुईंग ची
In reply to स्क्रीबो एर्गो सुम् by धनंजय
वेगळे
सूर्यसिध्दान्त
आकार म्हणजे काय? आकाराचे एकक
In reply to सूर्यसिध्दान्त by निनाद
डायामिटर
In reply to आकार म्हणजे काय? आकाराचे एकक by Nile
डायमीटर म्हणजे व्यास.
In reply to डायामिटर by निनाद
अच्छा
In reply to डायमीटर म्हणजे व्यास. by Nile
आकार म्हणजे
In reply to अच्छा by आनंदयात्री
प्रत्युत्तराची अपेक्षा
In reply to आकार म्हणजे by Nile
सर्वद्वेष्टे
In reply to प्रत्युत्तराची अपेक्षा by श्रावण मोडक
हाहाहाहा
In reply to सर्वद्वेष्टे by आनंदयात्री
आकार म्हणजे..?
In reply to अच्छा by आनंदयात्री
धन्यवाद
In reply to सूर्यसिध्दान्त by निनाद
अजून काही मनोरंजक माहिती
In reply to सूर्यसिध्दान्त by निनाद