ठाणे खादाडी - क्षणचित्रे..
सुधांशू, वपाडाव, लीमाउजेट आणि विश्वनाथ मेहेंदळे यांनी मेन्यू पाहूनही चेहर्यावर ठेवलेलं हसू..
तदनंतर हात्तेच्या म्हणायची वेळ मजवर आली. कारण स्पावड्या धरुन पाच सहा जण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असे म्हणू लागले.
रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की..
असो.. पण व्हेज थाळीचा मेनू पाहून मजसारखे "पोहणारे, धावणारे आणि सरपटणारे जीव पोटात घालण्यास उत्सुक (आभार: शिरीष कणेकर)" सामिषाहारी मेंबर्सही व्हेज खाण्याचा विचार करु लागले.
आम्ही तासभर उभ्याने वाट पाहून अखेरीस लाभलेले विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले.
(त्यामुळे बहुधा समोर बसलेल्या मदनबाण आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींनाही काही मागवता येईना.)
शेवटी मदनबाणांनी नुसतीच सोलकढी मागवली. आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींची शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात अखेर रामदासकाका आले..
त्यांच्या सोबत गुलाबी पानांची डायरी होती. (मी फक्त निरिक्षण नोंदवले..). त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नाही असे जाहीर केले.
मी आणि मेहेंदळे हे दोघेच मांसाहारी उरलो होतो. त्यामुळे विजुभाऊंना मांसाहाराच्या गळास लावून आपली संख्या वाढवण्यासाठी तातडीने धनगरी मटणताट मागवून आम्ही दोघे त्यांच्यासमोर चापू लागलो.
अखेरीस विजुभाऊ आमच्या क्लबात आले.
मधेच जयपालही येऊन थोडावेळ गप्पा मारुन गेले.
तेवढ्यातच खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली. (एव्हाना ठ्ठोठ्ठो हसण्याच्या आवाजाने आणि एकूण गप्पागोंधळ घालून मिपाकरांनी त्या लहानशा खोलीचे "घटनास्थळ" बनवले होते..)
हे केक जेमतेम फोटो काढेपर्यंत टिकून राहिले. नंतर दहावीस सेकंदात रिकामा डबा उरला. केकची चटणी नावाची उत्स्फूर्त पाकृ समस्त उपस्थितांनी बनवली.
मग मात्र गप्पा आणि बडबडीने थकलेले सर्वजण गपागप खाण्यात गुंगले. तेवढावेळ एकदम शांतता झाली.
रामदासकाका उपास सोडायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर बाजूला बसलेल्या स्पावड्याने त्यांचा नाद सोडून आपली थाळी रिकामी केली आणि हात वाळवत बसला..मागे खादाडताईही उगीच मला जेवायचं नाही म्हणत पोळीभाजी घ्यावी तशी काहीतरी थोडंसं घेऊन बसली. अशा अल्पाहारी मेंबरांना आधी चोवीस तास उपास ठेवण्याची वेगळी सूचना यापुढे सर्व कट्टा करणार्यांनी द्यावी अशी विनंती.
शेवटी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आणि बाहेर वेटिंगलिस्ट वाढतेय असं दिसल्यावर अत्यंत नाईलाजाने कट्टेकरी हात धुवून रस्त्यावर आले. मदनबाण "निघतो" म्हणून गायब झाले. अमिताताईलाही निघावे लागले.
सर्वसाक्षी, विजुभाऊ आणि रामदासकाकांनी गप्पांना पुन्हा तोंड फोडले. फोटो काढण्यासाठी अनेकदा सर्वांचे कोंडाळे फोडून चेहरे कॅमेर्याकडे वळवावे लागत होते, इतका गप्पांना जोर चढला होता.
तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..", इति विजुभाऊ.. वगैरे अशी उपयुक्त वचने ऐकताना धमाल येत होती. कट्टा सार्थकी लागत होता आणि पाय मात्र दुखायला लागले होते.
तरीही दर दहा मिनिटांनी कोणीतरी म्हणायचं, "चला.निघूया आता..मजा आली..वगैरे.." आणि तरीही कोणीच तिथून न हलता परत गप्पा पुढे सुरु व्हायच्या.
असाच तास सव्वा तास गेला. मग नाईलाजाने एकेक गडी गळायला लागला. स्पावड्या, वपाडाव, सुधांशू वगैरे सांसारिक वेसणीत न अडकलेली मंडळी मध्यरात्र उलटून गेली तरी कट्ट्यात आणि गप्पांत रंगली होती. (त्यांनी नंतर एकट्याने आइस्क्रीम खाल्ले असे ऐकतो.. नोंद घेतली आहे. योग्य वेळी कारवाई करण्यात येईल.)
एकूण कट्टा आनंदात पार पडला. खूप मोठा कट्टा नव्हता, अगदी छोटासाच. पण जवळजवळ सर्वच जण एकमेकांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटत होते.
रोजच्या नोकरी आणि घर अशा साच्यात अडकून गेलेल्या लाईफमधे नवीन मित्र मिळणं ही किती गरजेची गोष्ट होती हे या कट्ट्यामुळे जाणवलं. कॉलेज संपल्यापासून अशा मनसोक्त गप्पा कोणाशीच कधी झाल्या नव्हत्या.
तात्यांची अगदी निघण्याच्या वेळेपर्यंत वाट पाहूनही ते आलेच नाहीत याचं मात्र खूप वाईट वाटलं.In reply to चाळीस ओळींची प्रतिक्रीय by परिकथेतील राजकुमार
In reply to अगीन कोल्हा नाही का वापरत by गणपा
शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली.हे खरचं फार फार अवघड असते हो... ;)
खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली.या बद्दल योग्य ठिकाणी तक्रार नोंदवल्या गेली आहे. मज्जा आली.... पहिलाच कट्टा वेन्जॉय केल्या गेलेला आहे. हा योग जुळवुन आणल्याबद्दल गवि आणि स्पा यांचे मनापासून आभार!! त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत हीच इ. प्रा.!!
In reply to मस्त वृत्तांत गवि by प्रीत-मोहर
In reply to वा वा... मस्त.. मिपाकरांचे by मराठमोळा
In reply to वा वा... मस्त.. मिपाकरांचे by मराठमोळा
In reply to वा वा... मस्त.. मिपाकरांचे by मराठमोळा
In reply to वा वा... मस्त.. मिपाकरांचे by मराठमोळा
वा वा... मस्त.. मिपाकरांचे असे कट्टे वारंवार होत रहावेत आणि आंतरजालीय मराठी परिवार असाच फुलत रहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना!!! पुढच्या कट्ट्याला नक्की हजेरी लावू.सहमत आहे! झकास वृत्तांत, गवि.
In reply to अतिशय छान वाटले वाचुन ... by गणेशा
In reply to क्या बात है.. by विशाखा राऊत
In reply to अरे वा ? : मस्त च स्पा by टारझन
In reply to अरे वा ? : मस्त च स्पा by टारझन
In reply to टारु तुम्हाला मोहन गोखले by स्पा
In reply to टारुने मोहन आगाशे म्हटल्यावर by गणपा
In reply to असच म्हणतो :) by आत्मशून्य
In reply to यमूनाबाइ आगाशे हाहाहा. by मृत्युन्जय
In reply to यमूनाबाइ आगाशे हाहाहा. by मृत्युन्जय
यमूनाबाइ आगाशेठ्ठो!!!! लै दिवसांनी ऐकला आणि हहपुवा झाली पुनरेकवार.
In reply to कट्टा एकदम झकास झाला रामदास by स्पा
In reply to कट्टा एकदम झकास झाला रामदास by स्पा
रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की..हेच मी देखिल म्हणालो असतो...... वैष्णवनिरामिषभोजनाभिलाषि -
In reply to चला हा धागा म्हणजेच कट्टा.. by डावखुरा
काही व्यक्ती डुप्लिकेट आयडी नसुन त्या खरंच अस्तित्वात आहेत.नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही?? ;)
In reply to वरून चौथ्या फोटोत by मी ऋचा
वरून चौथ्या फोटोत कोपर्यातल्या खुर्चीत बसलेला स्मार्ट प्राणी स्पा आहे का?तुम्हाला सपाट म्हणायचे आहे का? पसरट
In reply to वरून चौथ्या फोटोत by परिकथेतील राजकुमार
In reply to वरून चौथ्या फोटोत by मी ऋचा
In reply to अंदाज by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to मिका.. by गवि
In reply to नाही नाही by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to "सपाट" परा म्हणाला मी नाही by मी ऋचा
In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to लव्हलेटर लव्हलेटर by सूड
In reply to लव्हलेटर लव्हलेटर by सूड
In reply to ओ लव्हलेटरवाले! जरा दमानं by मी ऋचा
In reply to "सपाट" परा म्हणाला मी नाही by मी ऋचा
In reply to "सपाट" परा म्हणाला मी नाही by मी ऋचा
"सपाट" परा म्हणाला मी नाहीऑ ऑ ऑ ?? मी कधी म्हणालो ? मी तुम्हाला 'सपाट' म्हणायचे आहे का असे विचारले फक्त. निरागस
In reply to "सपाट" परा म्हणाला मी नाही ऑ by परिकथेतील राजकुमार
In reply to अगदी राम बनाये जोडी दिसते ही by वाहीदा
In reply to अगदी राम बनाये जोडी दिसते ही by वाहीदा
In reply to >>>>जिवश्च कंठश्च मित्र ! जीव by प्यारे१
In reply to एवढे सगळे by गवि
In reply to फोटू आणि कट्टा वर्णन by रेवती
तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..",ह्म्म्म्म्म्म.
In reply to क ड क!!! by प्रभो
In reply to आँ? by धमाल मुलगा
In reply to कट्ट्याला खरोखरच धमाल आली. by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मटणताटा मुळे जीभ लाळेच्या by इरसाल
In reply to मस्त वर्णन आणि फोटो, ते by पुष्करिणी
In reply to + १ by मेघवेडा
In reply to च्यायला हा "कट्टा काळजात by माझीही शॅम्पेन
चाळीस ओळींची प्रतिक्रीय