मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फंडा फायबरचा

खादाड अमिता · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
फ्रूट ज्यूसपेक्षा फळ खावं, ब्रेडपेक्षा पोळी खावी इ. आहारातले फायबर वाढवण्यासाठीच्या सूचना आपण ऐकतो किंवा वाचतो. बिस्किटं, ब्रेड, कॉर्नफ्लेक्स असे बरेच मल्टी ग्रेन आणि हाय फायबर प्रोडक्टदेखील आज सर्रास मिळतात. पण हे फायबर नक्की काय असतं? आपल्या आहारात त्याचे काय महत्त्व आहे? कुठले पदार्थ मुळात फायबर रीच असतात? आहारातले फायबर आपल्याला वनस्पतीतून मिळते. फायबर म्हणजे अन्नातला असा पदार्थ, जो शरीरात शोषून घेतला जात नाही किंवा जो पचनक्रियेतून जात नाही. त्याचे मुळात दोन प्रकार असतात सोल्युबल किंवा विद्राव्य आणि इन्सोल्युबल किंवा अद्राव्य. दोन्ही प्रकारचे फायबर आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून ते मधुमेह, वाढलेला रक्तदाब, हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा बर्‍याच विकारांपासून आपले संरक्षण करतात. सोल्युबल फायबर हे शरीरातल्या पाण्याला शोषून घेऊन एक मऊ गोळा बनतं. त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि पोट जास्त काळ भरल्यासारखं वाटतं. यांनी आहारातल्या कॅलरी कमी करायला मदत होते आणि मेदोवृद्धी कमी होते. या फायबरमुळे शरीरातले इन्सुलिन कमी वेळात जास्त ग्लुकोज रक्तपेशींपर्यंत पोचवू शकते. तसेच कोलेस्टेरॉल पण कमी शोषले जाते. स्रोत: डाळी आणि कडधान्य, ओट्स, अक्रोड, खारीक, सफरचंद, पेर, जांभूळ, संत्रे, गाजर, काकडी, कोबी इ. इन्सोल्युबल फायबर या प्रकारचे फायबर आहारातले रफेज किंवा बल्क वाढवते. शरीरात जाणार्‍या अन्नाचा ऐवज वाढवून हे फायबर पचनक्रियेची गती वाढवतं. याचा मुख्य फायदा म्हणजे बद्धकोष्ठतेवर हा एकमात्र उपाय आहे. इसबगोलमध्ये पण याच फायबरचे प्रमाण खूप असते (पण जर रोज इसबगोल घेतलं तर अन्नातले बाकी पोषण पण मिळत नाही). दुसरा फायदा म्हणजे ज्या पदार्थांमध्ये इन्सोल्युबल फायबर जास्त असते त्यात कॅलरी पण तुलनेत कमी असतात (जर त्या पदार्थाच्या कृतीत तळणे, खूप मोहन घालणे किंवा गोड पदार्थ नसेल तर!). त्यामुळे कमी कॅलरी खाऊन पण भरपूर जेवल्यासारखं वाटतं. स्रोत: सर्व असोल्या भाज्या (सालं न काढलेल्या उदा. काकडी, बटाटा, गाजर, बीट) व फळे, कडधान्य, कंदमूळ, गहू, लाल तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी इ. आपल्या आहारात रोज २५-३० ग्रॅम फायबर असले पाहिजे. आहारातले फायबर वाढवले की त्याच बरोबर खूप पाणी पण प्यायला पाहिजे नाहीतर पोटात अन्न कोरडे पडून परत बद्धकोष्ठता होईल. आता २५ ग्रॅम फायबर म्हणजे नक्की काय खायचे? साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं. आहारातले फायबर अचानक वाढवले तर अतिवात पण होऊ शकतो. कायम लक्षात ठेवा, आहारात अचानक कुठला पण टोकाचा बदल केलात तर त्रास होतो. नेहमी हळूहळू पोषण वाढवा.

वाचने 6759 वाचनखूण प्रतिक्रिया 32

वपाडाव Fri, 04/01/2011 - 14:12
साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं.
हे कुठं मिळतं ? बाकी, आम्ही नायलॉन/रेक्झिन का काय (जे काय असेल ते) हे वाचायच्या तयारीने उतरलो होतो...

५० फक्त Fri, 04/01/2011 - 14:17
अतिशय धन्यवाद, एक किचकट गोष्ट अतिशय सहज सोपि करुन सांगितल्याबद्द्ल.

मराठमोळा Fri, 04/01/2011 - 14:19
चांगली माहिती.. थोडेसे अवांतरः पण प्रत्यक्ष आहारविषयक सुत्रे आयुष्यात आणणे नेहमीच कठीण होऊन बसते. आपल्या टीपिकल महाराष्ट्रीयन जेवणात आहाराचे नेमके संतुलन साधले गेले आहे असे मला नेहमी वाटते. म्हणजे पोळी भाजी, लोणचे, पापड, कोशिंबीर, थोडासा वरण भात, वर तूप. मट्ठा. एखादा गोड पदार्थ. आहाराबरोबरच थोडेसे शारिरिक श्रम सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे म्हणा. ;)

In reply to by मराठमोळा

प्रचेतस Fri, 04/01/2011 - 14:30
सहमत आहे. डाळींमध्ये फायबर असते ही नविनच माहिती समजली. डाळींमध्ये नुसती प्रथिने असतात असे आधी माहित होते. मागे एकदा डायेट करून बघितले होते. सुरुवातीला डीटॉक्स डायट केले होते. ३ दिवसांत २ किलोने वजन कमी झाले होते. पण नंतर परत कधी डीटॉक्स करायचा धीर झाला नाही. प्रचंड बंधने येतात.

गवि Fri, 04/01/2011 - 14:35
मी पुन्हा सुरमई तुकडी अनलिमिटेड खायला कधी येऊ? (त्यात फायबर असोत किंवा नसोत. तुमच्या हातची बनते अफलातून टेस्टी..) सोबत नुस्ता भात टाकला तरी चालेल.. :)

गणपा Fri, 04/01/2011 - 14:51
आम्ही अरबट चरबट खाणारी माणसे. असे काही माहिती प्रधान लेख आले की सुटलेल्या पोटाची काळजी अधिक वाढते आणि टेंशनमध्ये खा खा सुटते. :(

In reply to by गणपा

असुर Fri, 04/01/2011 - 15:56
+१ गणपाशी बाडीस! गणपा, अरे एखादी फायबरयुक्त चमचमीत पाकृ काढ की शोधून!!! पण लेखातली माहीतीदेखील स्पष्ट आणि सोपी असल्याने गणपा काही शोध लावेपर्यंत फायबरयुक्त बिस्किटं खाईन म्हणतो! --असुर

मुलूखावेगळी Fri, 04/01/2011 - 15:45
अमिता, तु चांगली माहिती दिलीस. पन ह्यात सर्व डाळी आनि कडधान्य येत नसावीत असे वाटते. आनि डाळी आनि कडधान्य ह्यांचा इन्टेक रात्री नसावा असे ऐकलेय. तु जास्त योग्य सांगशीलच. ओट्सच्या रेसिपीज टाक ना जमल्यास.

In reply to by मुलूखावेगळी

खादाड अमिता Fri, 04/08/2011 - 15:45
डाळी आणि कडधान्य ह्यात साधारण ५-१० ग्राम (प्रती १०० गरम) असे dietary fibre असते. ज्यांची वात प्रकृती असते त्यांनी रात्री कडधान्य खाणे टाळावे. ओट्स च्या पाक्रु पण टाकेन. धन्यवाद.

In reply to by खादाड अमिता

गवि Fri, 04/08/2011 - 16:05
"वात प्रकृति", एखादा पदार्थ तब्येतीला "थंड" किंवा "उष्ण" पडणे, वगैरे गोष्टी नवीन मेडिकल सायन्स मानत नाही असे ऐकले होते. कृपया टिप्पणी द्यावी.. -(अ‍ॅलोपॅथीभक्त) गवि.

In reply to by गवि

खादाड अमिता Fri, 04/08/2011 - 16:20
एखादा पदार्थ तब्येतीला "थंड" किंवा "उष्ण" पडणे, वगैरे गोष्टी नवीन मेडिकल सायन्स मानत नाही असे ऐकले होते.- हे बरोबर ऐक्ले आहे. पण एखादा पदार्थ flatulent असू शकतो हे वेस्टर्न मेडिकल सायन्स पण सांगतं.

चांगली माहिती . विषय फायबरची होडी, फायबरचा गणपती, फायबरचे कारंजे तसा फायबरची एखादी पाकृ असेल असा समज झाला होता. ( महागाइ काय वाढलीये ... पर्याय शोधतोय तोंडी लावायला. )

पिवळा डांबिस Sun, 04/03/2011 - 21:18
नाय म्हंजे फायबर पायजेच आहारांत, त्यात काय वाद नाय... पन, साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं. म्हंजे चार जनांच्या फॅमिलीला (हां, आमी त्ये कुटुंबनियोजन पाळलंय!!!) रोजच्याला दीड ते दोन किलो भाजी आनि १०-१२ फळं? कसं परवडायचं हो? कोन खातो आसं ह्ये? मिपावर हाय का कोनी?:( जरा गायडन्स करा की....

In reply to by पिवळा डांबिस

खादाड अमिता Fri, 04/08/2011 - 15:54
जर तुम्ही: ब्रेकफास्ट ला: १.५ वाटी उपमा (कांदा टोमाटो घालून) + १ फळ जेवणात: १ वाटी भाजी (बटाटा नाही), १ वाटी पालेभाजी, १ वाटी कोशिंबीर व सोबत पोळ्या (हा आपला पारंपारिक मराठी आहार आहे, बरोबर?) संध्याकाळी: १ व्हेजिटेबल sandwich रात्री च्या जेवणात: १ वाटी भाजी, १ वाटी कोशिंबीर आणि आमटी भात व पोळी जेवणा नंतर: १ फळ असा खाल्लं तर? झालं न ४०० ग्राम भाजी आणि दोन फळं शिवाय पोळी आमटी भात? तुमचा प्रश्न साहजिक आहे, कारण आपल्या पैकी बहुतांश लोक कोशिंबीर रोज खात नसतील. पाले भाजी चा तर मग प्रश्नच उद्भवत नाही! :)

In reply to by खादाड अमिता

रेवती Sat, 04/09/2011 - 17:31
भाजी आमटीच्या वाटीतली वाटी केवढी? रोज दोन भाज्या काही खाणं होत नाही. कोशिंबीर नियमीत पण एक भाजी (पाला किंवा फळ) असेच करणे होते. केले तरी खाणार कोण? त्यावर उपाय म्हणून एक दिवस पालेभाजी तर एक दिवस फळभाजी हा प्रकार मानवण्याजोगा आहे.

धनंजय Mon, 04/04/2011 - 22:19
चांगली माहिती. (पिवळा डांबीस यांच्यासारखेच म्हणतो) ते जरा प्रमाणांचे बघा ना. थोडे रासायनिक वर्णन अधिक करून : सोल्युबल फायबरचे पचन लहान आतड्यात होत नाही, पण मोठ्या आतड्यातील जीवजंतू त्याचे पचन पुष्कळ प्रमाणात करतात. इनसोल्युबल फायबरचे पचन लहान आतड्यात तर होतच नाही, मोठ्या आतड्यातही फारसे होत नाही. इसबगोलात इनसोल्युबल फायबर खूप आहे हे खरेच. पण सोल्युबल फायबरही मोठ्या प्रमाणात आहे.