मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(एका तळ्यात होती)

मूकवाचक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते अतिशहाणे पिल्लू तयात एक घेताच कोणी त्याला खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे बळेच ते तरंगे दावूनी बोट त्याला म्हणती खजिल लोक आहे अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक पिल्लास माज भारी खुळे म्हणे सर्वांसी पाखंड अविचारी सांगेल ते जनांसी जो जो तयास टोची दावी उगाच धाक होते अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक एके दिनी परंतु पिल्लास ना कळाले ढापीव ज्ञान त्याचे डबक्यामध्ये बुडाले घाणीत डुंबताना जन्मांतरी कित्येक कधी न त्या कळाले तो मंडूकच एक

वाचने 6974 वाचनखूण प्रतिक्रिया 31

निनाव Mon, 04/04/2011 - 23:17
भन्नाट. अस्त्र-शस्त्र-सर्वत्र !! पाड्व्या च्या दिवशी - बेगॉन चा मारा करू नका हो :). कविता खूपच सुंदर. (थोडी गम्म्त केली बर का..राग मानून घेउ नका..) आपणांसः गुढीपाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. :) - आपला निनाव.

राजेश घासकडवी Mon, 03/05/2012 - 15:20
ही वाचायची कशी राहून गेली? भन्नाट लिहिली आहे. प्रेरणा नक्की कुठे मिळाली? (अर्थातच मूळ कवितेबद्दल बोलत नाहीये)

In reply to by राजेश घासकडवी

मूकवाचक Mon, 03/05/2012 - 21:21
(सहज लिहीता लिहीता सुचलेले विडंबन आहे. त्यामागची प्रेरणा नक्की कुठे मिळाली हे सांगता येणे अवघड आहे.)

चौकटराजा Tue, 08/28/2012 - 21:03
अशी किती अतिशहाणी बदके आहेत तळ्यात?. कविला तर एकच दिसत आहे ! की काही अतिशहाणी यापूर्वीच मंडूकात रूपां तरित झालेली आहेत.?बरं विडंबनाची प्रेरणा खुल्ला सांगायला काय हरकत आहे? मिपावर भरपूर विटंबन क्षमा करा विडंबनकार भरपूर आहेत ! त्यानाही सुचेल काहीतरी !

तिमा Tue, 08/28/2012 - 21:13
बरीचशी दुसर्‍या तळ्यात, आय मीन समुद्रात, गेली आहेत. त्यामुळे आता एकच दिसत आहे.

प्यारे१ Mon, 05/27/2013 - 17:27
वाह वाह! कसं काय सुचतं ब्वा लोकांना. ;) मूकवाचकाला एक प्यार्टी लागू.

होकाका Mon, 07/29/2013 - 09:02
खूपच सुंदर! ही कविता आधी कधी वाचण्यात आली नव्हती. अगदी अलगदपणे केलेले विडंबन आहे. मला वाटतं, आजच्या स्पर्धेच्या काळात, प्रत्येक मुलावर नकळत एकमेकांशी स्पर्धा करण्याचे चुकीचे संस्कार होत असतात आणि त्यातूनच अशी टोकाची 'मी'पणाची भावना आणि स्वत:बद्दलची फाजील समजूत दॄढ होत जाते. विशेषकरून मुलग्यांमध्ये ही स्पर्धेची tendency खूप दिसते. पुन्हा एकदा, सुंदर काव्य!