चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -१
चेन्नई - पुणे - चेन्नई.
नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो,
आयुष्याच्या प्रवासात आपण बरेच काही अनुभवतो. चुका करतो, हसतो रडतो, गमती बघतो. केलेल्या चुकांना आपण अनुभव म्हणतो आणी ईतर गोष्टींना आठवणी. आयुष्याच्या शेवटी हेच काय ते उरत असावं बहुदा. असो...
चार महिन्यापुर्वी कंपनीने आम्हाला चेन्नईला जाणार का विचारले, अर्थातच विचार न करता "नो" म्हणालो. कंपनीला या उत्तराची अपेक्षा होतीच, मग लगेच बाहेर जावं लागेल असा दम दिला. अर्थात मला खाजगी कारणास्तव २-३ महिने भारत सोडता येणार नाही हे माहित असल्याचा गैरफायदा कंपनीने बरोबर घेतला आणि नाइलाजास्तव मी चेन्नईचे काम हाती घेतले, आठवड्याकाठी पुण्याला येऊ शकेल इतकी काळजी कंपनीने दाखवली. अर्थात दर आठव्ड्याला प्रवास करण हे एखाद्याला प्रतिष्ठेचं, सोपं, आणि गमतीचं वाटत असलं तरी ते करणार्याला किती त्रास होतो हे त्यालाच माहित. ( कृपया गैरसमज नकोत. इथे काहीही दाखवण्याचा क्षीण/ताकदवान प्रयत्न नाहीये. धिस इज ओन्ली बॅकग्राउंड ;) ).
उतरलो तेव्हा पहिली जाणीव झाली ती दमट हवा आणि आपण पासपोर्ट शिवाय एका नव्या देशात आलोय याची. इथे पासपोर्ट म्हणजे तामिळ भाषा बोलता-समजता येणे. संध्याकाळची वेळ. चेन्नईमधे वादळी पाऊस झाला होता. टॅक्सी, रिक्षा सर्वांचीच कमतरता झाली होती. प्रीपेड कॅब घ्यायचा प्रयत्न केला तर १-२ तास लागतील अशी माहिती मिळाली. बाहेर आलो. काही काळ्या-पिवळ्या टॅक्सी शेअरींग मधे चालु आहेत असं दिसलं. ८-१० किमी अंतरासाठी किती पैसे लागतील असा विचार करुन जवळ गेलो तर चक्क ३५० रुपये म्हणाला, त्यात पण दाटीवाटी करुन ४-५ जण टॅक्सीत बसणार, मला इथे आपल्या १०-१२ कमी कपड्यातल्या ललनांना आजुबाजुला घेउन बसणार्या बॉलीवुड हिरोंची फार आठवण झाली. पण काय करणार आलेया भोगासी.. मी ३५० रुपये द्यायला नकार दिला, माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकुन एकही शब्द न बोलता टॅक्सी ड्रायवर ने माझी बॅग काढुन बाहेर चिखलात ठेवली, दरवाजा बंद केला आणी निघून गेला. पाऊस पुन्हा सुरु झाला मी बिचारा भर पावसात दोन बॅग घेऊन टॅक्सी ची वाट बघत उभा.
एका टॅक्सीवाल्याला माझी दया आली की त्याला घरी जायचं होतं म्हणून मला केवळ ३०० रुपयात घेऊन जायला तयार झाला. गाडीत बसलो, टॅक्सी जी.एस.टी रोडच्या दिशेने निघाली. ड्रायवर उगाचच ईंग्लीश बोलता येते हे दाखवायचा क्षीण प्रयत्न करत होता, अर्थातच हिंदी त्याच्या माग्च्या ७ पिढ्या ही बोलल्या नसतील आणि पुढच्याही कदाचित बोलणार नाहीत.
ड्रायवरः "सार. फस्ट टैम चेन्नई सार?"
मी: "येस्स. फस्ट टाईम" खरं सांगाव की नाही या भ्रमात होतो, कारण रात्रीची वेळ, लुटले जाण्याची शक्यता.
ड्रायवरः "विच कांट्री सार?" मला चक्कर आली... मी समोरच्या आरशात फॉरेनर तर दिसत नाहीये याची खात्री करुन घेतली आणि कदाचित त्याला कोणत्या राज्यातुन आलास असे विचारायचे असेल असा समज करुन घेतला. मग मी पुणे म्हणालो.
ड्रायवरः "वोके वोके. हिंदी.. हिंदी..." च्यामारी ह्यांच्या.. नॉर्थ ईंडीया मधे दुसरी भाषाच नाही काय?
मी: "नो हिंदी.. ओन्ली मराठी अँड ईंग्लिश."
ड्रायवरः "चेन्नई गुड सार.. तामिळ इजी.. काना काया - सापटिंगला.. " ड्रायवर मला तामीळ शिकवायचा क्षीण प्रयत्न करु लागला. अर्थात त्याला राज्याबाहेर राहण्याची जाणीव असावी अशी मला शंका आली.
मी: "सापटिंगला??? म्हणजे जेवण केलं का?" आयला इथे किती साप माझ्या किती टिंगला करणार आहेत देव जाणे असं म्हणून मी सुस्कारा सोडला. तेवढ्यात माझं हॉटेल आलं, पैसे दिले सामान घेतलं रिसेप्शन लॉबीमधे आलो.
रिसेप्शन मधे मॅनेजर फोनवर बोलत होता.
मी: एक्स्क्युज मी. मी असं म्हणताच मॅनेजर ने माझ्याकडे पाठ फिरविली आणि फोन संपेपर्यंत माझ्याकडे वळला नाही.
मॅनेजरः "कडतडडज्ड्ड्कल्जज्द्लज " बाम्बू तुटताना जसा आवाज येतो तसं काहीसं तो बोलला.
मी: "आय हॅव रेजर्वेशन." मी त्रासिक मुद्रेने त्याच्याकडे पहात.
मॅनजरः "क्द्कजद्ग्द्ट्ट्सोस्द्द॑झ्झ." त्याने एक फॉर्म पुढे केला. नशिबाने तो ईंग्रजी मधे होता.
फॉर्म भरुन मी रुमवर आलो, टीवी लावला.. सर्व चॅनेल्स वर बांबु तुटत होते.. शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो.
क्रमशः
आपला मराठमोळा.
वाचने
11276
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
>>>>शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर
वाचतो आहे ...
In reply to वाचतो आहे ... by छोटा डॉन
बाकी बर्याच दिवसांनी
In reply to बाकी बर्याच दिवसांनी by गणपा
तो त्यांनी लेख म्हणुनच लिहिला
In reply to वाचतो आहे ... by छोटा डॉन
+∞ असहमत..
In reply to +∞ असहमत.. by नि३
+१
In reply to वाचतो आहे ... by छोटा डॉन
माझे बंगलोरमधील दिलखेचक अनुभव
एवढ काही वाइट नाहीए
छान सुरुवात चोता दोन चा
वाट पाहतोय !!!!!
सर्वना भवन मध्ये भोजन...
छान
छान! पहिला भाग आवडला. छोटा
In reply to छान! पहिला भाग आवडला. छोटा by नगरीनिरंजन
+१
रुंब नल्ला !!! रुंब नल्ला
चेन्नई त आहात तिथल्या मैलापूर
माझा मित्र चैन्नै ला गेला आहे
मस्त वर्णन आहे. लिहित राहा..
झकास रे राक्या .. एकदा मरीन
मस्त लिहिले आहे ... वाचत आहे
"इनक तामिल तेरियद.." अस
अजूनही तिथेच असाल तर जीआरटी
लेखण छाण आहे .... पुढिल भाग
मस्त रे राकु ! बर्याच
+१ टु तर्री, मी आज पर्यंत
In reply to +१ टु तर्री, मी आज पर्यंत by ५० फक्त
+१
मस्त
हं...
सहमत
सहमत!!
वाचते आहे. मला चेन्नैमध्ये
मस्त लेख..
लेख आणि छोटा डॉनचा प्रतिसाद
हैद्राबाद
In reply to हैद्राबाद by अन्या दातार
अस्सल हैद्राबादी
म.मो. आणि छो.डॉ. यान्चे लेख
In reply to म.मो. आणि छो.डॉ. यान्चे लेख by मृगनयनी
बाकी इथल्या बायका, मुली
In reply to बाकी इथल्या बायका, मुली by llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. आणि त्यांचे पंखे
मस्त!
त्यांचे पंखे इथे मराठी
येन्ना रास्कला.