मोडीलिपीची ओळख
१.शिवाजी महाराजांनी त्यांच्या हवालदार व जुमलेदारांना लिहिलेल्या पत्रातील भाग - "रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही, साहेबी खजानातून वाटणिया पदरी घातलिया आहेती............ ............... वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, कोण्हावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोणास कलागती करावयाची गरज नाही.... हा रोखा तपशिले ऐकणे आणिक हुश्शार राहणे. " २.उत्तर पेशवाई काळातील (दुसरा बाजीरावाचे काळात)पत्रः दुसरे बाजीरावाचे दौलतराव शिंदे (ग्वाल्हेर) यांना लिहिलेल्या पत्रातील भाग - "मौजे वडगाव पोI (पोI= प्रांत) खर्डे हा गाव राजेश्री रामराव जीवाजी चिटणीस यांजकडे आहे, तेथे तुम्ही रोख केला म्हणोन हुजुर विदीत जहाले, त्याजवरुन हे पत्र लिहिले असे तेथे रोखा केला असेल तो मना करुन दर येक मीसी गावास उपद्रव न लगे ते करणे. "मोडी एकदा वाचायला येऊ लागली की आप्ल्यापुढें ५००-६०० वर्षांचा इतिहासच उघड होतो. मग त्याकाळचे समाजजीवन, रुढी, परंपरा इत्यादीचीही माहिती मिळते. सामाजिक स्थित्यंतरे अभ्यासता येतात. मग, कधी वळताय परत मोडीकडे?
In reply to व्वा! by धमाल मुलगा
In reply to व्वा! by धमाल मुलगा
माझ्या आजोबांची सही मोडीत असायचीमाझ्यापण....आजोबा,पणजोबा पाटील होते...त्यामुळे त्यांच्याकडची कागदपत्र बघितलेली,कळत काई नव्हतं पण बघायला छान वाटायचं. तशी पुणेकर मिपाकरांना चांगली संधी आहे मोडी शिकायची....भारत इतिहास संशोधक मंडळात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मोडी वर्ग आहेत...जमेल त्यांनी लाभ घ्या.
In reply to धन्यवाद, पण लेख विस्तारुन by यशोधरा
त्यामुळे शब्द / वाक्य कुठे तोडायचे हे सरावाने आणि तत्कालीन भाषेच्या अभ्यासाने कळू लागते. नविनच मोडी वाचणार्यांच्या संदर्भात एक विनोद नेहमी सांगितला जातो. "रस्त्यातनाचतमासेचाललेहोते" हे वाक्य नवशिका हमखास "रस्त्यात नाचत मासे चालले होते" असे वाचतो. मुळात ह्या वाक्याचा अर्थ "रस्त्यात नाच, तमासे चालले होते" असा असतो.
इतिहाससंशोधनासाठी मोडी वाचता येणे हे अगदी महत्वाचे आहे.
मोडी एकदा वाचायला येऊ लागली की आप्ल्यापुढें ५००-६०० वर्षांचा इतिहासच उघड होतो.यावरून आठवले. मोडीत 'लो' आणि 'के' ही अक्षरे म्हणे एकसारखी लिहिली जातात. (ऐकीव माहिती. पडताळून पाहिलेली नाही.) तर कोणत्याशा बखरीत कोणत्याशा लढाईच्या संदर्भात कोणत्याशा सरदाराने '५०० लोकांचा फडशा पाडला' हे वाक्य एका हौशी इतिहासतज्ज्ञाने '५०० केकांचा फडशा पाडला' असे वाचून, त्यावरून 'त्या काळातसुद्धा केक खाण्याची पद्धत होती' असे अनुमान काढल्याबद्दलची किंवदंता ऐकण्यात आलेली आहे. (प्रस्तुत सरदाराने मारी आंत्वानेतच्या विधानातून स्फूर्ती घेतली असावी अथवा ते विधान फारच गंभीरपणे घेतले असावे अथवा यांपैकी कोणतेही एक अथवा दोन्ही, अशी आमची अटकळ आहे. चूभूद्याघ्या.)

In reply to महाराष्ट्र राज्य पुरातत्व by मनिम्याऊ
In reply to यातील ई व ज ही अक्षरे तंतोतंत by नितिन थत्ते
बरीच अक्षरे मराठीतल्या सध्याच्या (देवनागरी) अक्षरांपेक्षा इतकी वेगळी दिसतात की ही मराठीची कर्सिव्ह लिपी आहे की दुसर्याच भाषेची लिपी आहे असा प्रश्न पडावा. (इंग्रजी कर्सिव्ह लिपी जवळजवळ रोमन लिपीसारखीच असते).भाषा आणि लिपी यांचा काही अन्योन्यसंबंध असावा किंवा असायलाच हवा असे वाटत नाही. एकच कोंकणी भाषा (किंवा तिची प्रादेशिक रूपे) ही देवनागरी, रोमन, कन्नड आणि बहुधा मलयाळी लिपीसुद्धा वापरून लिहिली जाते, एकच सिंधी भाषा ही देवनागरी आणि अरबी लिपी वापरून लिहिली जाते, आणि एकच पंजाबी भाषा ही गुरुमुखी, देवनागरी आणि उर्दू लिपी वापरून लिहिली जाते, यावरून हे लक्षात यावे. (बहुधा पूर्व युरोप, भूतपूर्व सोविएत संघाचे काही भाग आणि मंगोलिया येथील काही भाषांचीही अशीच काहीशी परिस्थिती आहे असे वाटते. फार कशाला, माझ्या कॉलेजच्या दिवसांतील एक पिढ्यानपिढ्या तमिळनाडूस्थित मित्र आपल्या घरी 'मराठी' म्हणवली जाणारी परंतु कोणाही महाराष्ट्रवासीयास न समजण्यासारखी एक अगम्य भाषा - ही बहुधा तंजावर मराठी असावी असा कयास आहे - बोलत असे, तो घरी पत्रे लिहिताना या मराठीत परंतु तमिळ लिपी वापरून लिहीत असे, असे आठवते.) त्यामुळे, केवळ 'देवनागरी अक्षरांपेक्षा मोडीची अक्षरे दिसावयास वेगळी आहेत' या कारणास्तव मोडी ही मराठीकरिता कर्सिव लिपी म्हणून कोणे एके काळी आयुक्त होण्यास काहीही प्रत्यवाय दिसत नाही. बहुसंख्य तत्कालीन मराठी लेखकांनी 'एक सोय' या कारणास्तव तीस स्वीकृती देणे आणि तीस अंगीकारणे एवढेच त्याकरिता पुरेसे आहे. (तसेही, मोडीचा अपवाद वगळता मराठी ही नेहमी देवनागरीतच लिहिली जात होती किंवा कसे, याबद्दलही निश्चित कल्पना नाही.)
In reply to महाराष्ट्र राज्य पुरातत्व by मनिम्याऊ
In reply to र्हस्व-दीर्घ: एक निरीक्षण by पंगा
In reply to इ आणि ई सध्याच्या गुजरातीत पण by नितिन थत्ते
In reply to तसे नसावे by पंगा
In reply to तसे नसावे by पंगा
In reply to इ आणि ई सध्याच्या गुजरातीत पण by नितिन थत्ते
[अवांतर शंका : दासबोधात देवनागरी (बाळबोध) लेखन करण्याची भलामण आहे का?]याबद्दल निश्चित कल्पना नाही. मात्र तशी ती असल्यास, 'बाळबोध लिप्या या क्लिष्ट काव्यग्रंथादि प्रगल्भ रचनांकरिता सर्वस्वी असमर्थ' हे काही आधुनिक तज्ज्ञांचे मत वाचनात आलेले आहे, ते लक्षात घेता, याचा दोन दृष्टिकोनांतून विचार करता येईल. क्लिष्ट काव्यग्रंथादि रचना या ऐकायलावाचायला जरी कितीही भारदस्त वाटत असल्या, तरी त्या जर मुळात कोणाला कळल्या नाहीत, तर त्यांचा खरोखर काही उपयोग असतो काय? 'इट्स लाइक शेक्स्पियर. साउंड्ज़ ग्रेट, बट डज़ नॉट मीन अ थिंग.' ही उपमा पी.जी वुडहाउस यांनी ठिकठिकाणी वापरली आहे. (शेक्स्पियर बहुधा कर्सिव - आणि तेही अतिशय घाणेरड्या हस्ताक्षरात - लिहीत असावा, अशी आमची अटकळ आहे. अन्यथा, रोमन ही तशी बर्यापैकी बाळबोध लिपी आहे, असे वाटते. सबब, एवढी क्लिष्ट रचना त्या लिपीत होऊ नये.) निदान मराठी काव्यग्रंथादि रचनांबद्दल तरी पुढेमागे कोणी असे म्हणू नये, या उदात्त हेतूनेच समर्थांनी तशी सुचवण केली असू शकेल काय? मुळात लिपीच जर बाळबोध वापरली, तर कवीने किंवा ग्रंथकर्त्याने कितीही म्हटले, तरी तो क्लिष्ट रचना कशी काय करू शकणार? जे आडातच नाही, ते पोहर्यात येणे नाही. किंवा, वंशच खुंटला, तर वेणुवादनावरील निर्बंध हे आपोआप सुनिश्चित. त्यामुळे, समर्थांची ही दूरदृष्टी आणि पुढील पिढ्यानपिढ्यांतील मराठी रसिकांबद्दलची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे, हे मान्य करावेच लागेल. उलटपक्षी, दुसर्या बाजूने विचार करावयाचा झाल्यास, रचनेची क्लिष्टता आणि प्रगल्भता यांचा अन्योन्यसंबंध विसरून चालणार नाही. रचना जितकी क्लिष्ट, तितकी ती दुर्बोध, आणि जितक्या कमी लोकांना ती कळते, तितका तिचा वाचकवर्ग हा अधिक विरळ (किंवा, आजमितीस प्रचलित असलेल्या मराठीत व्यक्त करावयाचे झाल्यास, अधिक एक्स्क्लूज़िव), पर्यायाने रचना तितकी अधिक प्रगल्भ, हे समीकरण सर्वपरिचित असावे. तेव्हा, बाळबोध लिपीच्या समर्थनातून मराठी वाङ्मयाच्या क्लिष्टतेचे पंख छाटून तिची प्रगल्भतेकडे होणारी गरुडभरारी मुळातच रोखण्याच्या पापाचे समर्थ हे गुन्हेगार ठरतात. समर्थांच्या समर्थनामुळे मराठी आपल्या प्रगल्भतेची अपेक्षित उंची कदाचित कधीच गाठू शकणार नाही. मराठीप्रेमींच्या पिढ्या समर्थांना याबद्दल कधीही क्षमा करू शकणार नाहीत. (रचना नुसत्याच समजून काय चाटावयाच्या आहेत? त्यांवर प्रगल्भतेचे शिक्कामोर्तब झाल्याशिवाय काय उपयोग?) अतिअवांतर: जगात चिनी लिपी हीच काय ती सर्व क्लिष्ट, गहन, वैचारिक, प्रगल्भ एवंगुणविशिष्ट रचनांसाठी एकमेव समर्थ लिपी आहे, असे आजकाल आमचे प्रांजळ मत झाले आहे. बाकीच्या सर्व (तुलनेने खूपच बाळबोध) लिप्या या फार फार तर 'लहान माझी बाहुली' किंवा 'बा बा ब्ल्याक शीप' (किंवा फारच झाले तर 'फ्रेरऽ ज्याकऽ') इतपत रचनांसाठी ठीक.
In reply to र्हस्व-दीर्घ: एक निरीक्षण by पंगा
In reply to नाहीत! by धमाल मुलगा
In reply to फार छान by चित्रा
हे ब्रिटिशांनी केले का हळूहळू मराठीसाठी देवनागरी लिपीच प्रमाण झाली?ब्रिटिशांनी बहुधा केले नसावे. कारण ब्रिटिश जमान्यात वाढलेल्या पिढीस पावकी, निमकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि अकरकीप्रमाणेच मोडी लेखनवाचन (किमान कित्ता गिरवण्याइतपत परिचयापुरतेतरी) हेदेखील प्राथमिक अभ्यासक्रमात असावे, असे वाटते. (खात्री नाही.) हे सगळे प्रकार बहुधा स्वातंत्र्योत्तर काळात बंद झाले असावेत, अशी शंका आहे. (लहानपणी पुण्यात - आणि नक्की आठवत नाही, पण बहुधा मुंबईत गिरगांवात किंवा दादरलासुद्धा - एखादी अपवादात्मक का होईना, पण मोडी लिपीतली दुकानावरची पाटी पाहिल्याचे आठवते. बहुधा जुन्या पिढीतला उरलासुरला दुकानदार असावा. 'फेमस राजापुरी पंचे' अशी काहीतरी पाटी होती. मला अर्थातच वाचता येण्याचा प्रश्न नव्हता, पण विचारणा केल्यावर आईने वाचून दाखवली होती, असे आठवते.) (अतिअवांतर: 'दुकानाच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत'च्या राज्यात मोडी लिपीतील पाट्या चालून जाव्यात काय?)
In reply to फार छान by चित्रा
In reply to छान लेख by नितिन थत्ते
In reply to अपेक्षित प्रतिसाद. विशेषतः by अवलिया
In reply to येताय का गारगोटीने विस्तव कसा by नितिन थत्ते
In reply to धागा मोडीचा असतांना संस्कृत by अवलिया
In reply to आँ by नितिन थत्ते
In reply to आँ by नितिन थत्ते
असहमत. माझे लेखन वैयाकरण लोकांच्या दृष्टीने शुद्धच असे. पण त्याच्या जोरावर मला चांगले गुण कधीही मिळाले नाहीत. Sad मराठीच्या पेपरात गुण मिळवण्यासाठी एक किंवा तीन ओळीत लिहिता येणारे उत्तर २० ते २५ ओळींएवढे लिहिण्याचे कौशल्य लागते. Sad ते ज्यांना जमते त्यांना जास्त गुण मिळतात. (येथे तसे गिगाबायटी लिहू शकणारी अनेक मंडळी आहेत) Wink शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही.'मराठीच्या पेपरात गुण मिळवण्यासाठी एक किंवा तीन ओळीत लिहिता येणारे उत्तर २० ते २५ ओळींएवढे लिहिण्याचे कौशल्य लागते' या भागाशी सहमत आहे. मात्र, त्याच संदर्भात 'शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही' याबाबत साशंक आहे. मराठीच्या पेपरात गिगाबायटी उत्तरे वाक्यावाक्यागणीक शुद्धलेखनाच्या धडधडीत चुकांसहित लिहून पहावीत. पेपरतपासनिसास मराठीत ज्याला 'कॉन्शन्स' म्हणतात ते ('सदसद्विवेकबुद्धी' हा शब्द येथे चपखल बसेलच, याबद्दल खात्री नाही. 'कॉन्शन्स' हा शब्द येथे 'मनाला खाणारी एक वस्तू' अशा अर्थी घ्यावा.) आणि मराठी शुद्धलेखनाबद्दलचे ज्ञान, या दोन्ही गोष्टी असल्यास गुण तरीही - आणि भरपूर प्रमाणात - कापले जावेत, असे वाटते. (निदान मी शाळेत असताना आमच्या मास्तरमंडळींनी तरी कापले असते, असे वाटते. अर्थात, शुद्धलेखनाबद्दलच्या वाढत्या अनास्थेच्या - आणि (बहुधा) टेंप्लेटवार तपासणीच्या - आजच्या काळात वरील दोन्ही गोष्टी तपासनिसाठायी सापडणे उत्तरोत्तर अधिकाधिक दुरापास्त वाटते, सबब आजच्या काळात आपल्या म्हणण्यात तथ्य असू शकेलही. चूभूद्याघ्या.)
In reply to छान लेख by नितिन थत्ते
In reply to छान लेख by नितिन थत्ते
मोडी