मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाशिवरात्रीनिमित्त --- रताळे खिस--

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य- दोन मध्यम आकाराची रताळी, एक चमचा तूप, दोन चमचे शेंगदाणा कुट, मीठ, साखर चविनुसार, तिन-चार मिरच्या. कॄती-- प्रथम रताळे स्वच्छ धुवुन-पुसुन घ्या, नंतर खिसुन घ्या, कढईत तुप गरम करुन त्यात थोडेशे जिरे(चालत असल्यास) घालावेत, तडतडले की मिरच्या तुकडे टाकावेत, खिस टाका, त्यात मिठ व साखर घाला, त्यावर झाकण ठेवा, खिस चांगला वाफ़ेलला की त्यात थोडे कुट टाका, पुन्हा परता, गरम गरम खायला घ्या...

वाचने 5912 वाचनखूण प्रतिक्रिया 17

पैसा Wed, 03/02/2011 - 18:10
रताळी लाल की पांढरी ग? लाल रताळी जास्त गोड असतात.

In reply to by पैसा

निवेदिता-ताई Wed, 03/02/2011 - 22:15
कोणतीही रताळी घ्या...मी पांढरी रताळी घेतली आहेत. आणी याच्या गोड काचर्या...(आता प्रत्येकाकडे काय काय नावे आहेत कुणास ठावुक)..तूप व गुळ घालून केलेल्या खुप छानच लागतात.

In reply to by स्वैर परी

निवेदिता-ताई गुरुवार, 03/03/2011 - 18:49
रताळ्याच्या पातळ (काप) काचर्या चिरुन घ्या, एक चमचा साजूक तूप गरम करुन त्यावर परतून घ्या, एक वाफ आली की त्यात गुळ घाला , त्याचा पाक होउन त्या काचर्या अजुन शिजतिल व खमंग होतील. पुन्हा थोडावेळ परतुन झाले की गार झाल्यावर खाव्यात.

प्राजु Wed, 03/02/2011 - 20:28
मला जाम आवडतो. आणखी एक खासियत अशी.. की, हा खिस उरला (सहसा उरत नाहीच) की, पोळीमध्ये त्याच सारण भरून त्याचा पराठा खूप छान होतो. लेकाच्या डब्यासाठी मी करते खूपदा. दह्यासोबत मस्त लागतो. :)

In reply to by प्राजु

रेवती Wed, 03/02/2011 - 22:41
अगदी! उरलेला रताळ्याचा असो कि बटाट्याचा खीस उपासाच्या भाजणीत खपवून ;) केलेले थालीपिठ भन्नाट लागते. छे छे छे! आजकाल मेल्या क्यालर्‍या मोजून खाताना हे पदार्थ विसरावे लागतात.

वारकरि रशियात Fri, 03/04/2011 - 15:03
उपवासाची पाकृ - ! अवांतर: अरे कोणीतरी कवठाच्या चटणीची ही पाकृ द्या रे ! (परवाच खाल्ली होती घरी पण ..) मला बनवता येत नसल्याने ..