हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?
... जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य...हेदेखील 'हा अत्युच्च कोटीचा विनोद आहे' अशा गैरसमजुतीखाली करता येणे शक्य असावे काय? दडपलेल्या अभिव्यक्तीतून उसळी मारू पाहणारा विनोद आणि गॉसिप यांच्यातील सूक्ष्म सीमारेषा कोणती?
पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक/राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच.आणि
खरं तर जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य अशांचा राजकीय परिणाम विनोदांहून अधिक घातक असतो.या दोहोंचा विचार करता, "ज्याच्यातून बजबजपुरी माजते ते गॉसिप, अन्यथा तो दडपलेल्या अभिव्यक्तीतून उसळी मारू पाहणारा विनोद" असे ढोबळमानाने म्हणता यावे काय? असो. "लेख प्रगल्भ आहे" एवढेच तूर्तास म्हणतो.
अनेकदा असे विशिष्ट जमाती/समाजांविषयीचे विनोद सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून किंवा अभिरुचीहीन असल्याचे मानले जातात आणि म्हणून संपादित होतात.ही पोलिटिकल करेक्ट भावना तशी नवीनच असावी असं वाटतं. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा एखाद्या वर्गाची, वर्णाची, वंशाची हेटाळणी करणं जनमान्य होतं तेव्हा हे कमी असावं.
थोडक्यात, ज्यांना इतरांवर प्रच्छन्न टीका करायची असते त्यांना ती स्वत:वर झालेली मूग गिळून सहन करून घ्यावी लागते; त्याची तयारी ठेवायला लागते.या नाण्याची दुसरी बाजूदेखील आहे - जी खरीतर तुम्ही आधीच्या उदाहरणात मांडलीत. ती म्हणजे एका विशिष्ट वर्गाने स्वतःवर विनोद करणं हे पोलिटिकली करेक्ट असतं, तेच 'विरुद्ध' किंवा एके काळी स्वतःला त्यांच्यापेक्षा वरचे समजणाऱ्या वर्गाने तो विनोद केला तर तो प्रचंड अपमान समजला जातो. उदा. अमेरिकेतले काळे लोक एकमेकांना बिन्धास 'hey, nigger' म्हणू शकतात, म्हणतात. पण तेच जर गोऱ्याने म्हटलं तर त्याला हेट क्राइम म्हटलं जाईल. मला वाटतं नुसत्या शब्दांपेक्षा त्यांना चिकटलेले हेत्वारोप महत्त्वाचे ठरतात. ते खरे असोत नसोत, ते तसे आहेत हे गृहित धरलं जातं. हुकुमशहांच्या बाबतीत मला असं वाटतं की असे शब्द बुडबुडे फोडत बसलं तर जनतेचं लक्ष त्यांच्या मूलभूत भुकांपासून, कमतरतांपासून वळवता येतं, हे एक कारण असावं. दुसरं कारण बहुधा शक्तीप्रदर्शनाचं असावं. आपली जनतेवर इतकी पकड आहे की एक विनोदही आपल्या परवानगीशिवाय होत नाही; आपल्याविरुद्ध ब्र काढणं, आवाज उठवणं सोडाच पण विनोद करण्याइतकाही कणा जनतेत नाही (कारण तो पद्धतशीरपणे लेचापेचा केला गेलेला आहे). तिसरं कारण हे एखाद्या पूजनीय व्यक्तीविषयी बोललं की समाज चवताळून उठतो त्या प्रकारचं असावं. हुकुमशहांना स्वतःला सर्वात पूजनीय व्यक्ती म्हणजे अर्थातच ते स्वतः असतात. त्यामुळे ते चवताळून उठतात.
In reply to विनोद हे शस्त्रही आहे... by योगप्रभू
मला आवडलेला हुकूमशाहीविरोधातला एक विनोद नमूद करतो. कामातून कंटाळा आल्यावर एकदा हिटलर आपल्या ड्रायव्हरला घेऊन कारमधून ... ' हेल हिटलर. डुक्कर मेले' त्यावर त्या शेतकर्याने प्रेमाने माझा हात दाबला आणि म्हणाला, 'बरे झाले' आणि तो ते बायकोला सांगण्यासाठी घरात पळाला. विचित्रच वाटला मला तो शेतकरी.याच धर्तीवरचा एक विनोद रोमेनियाचे हुकूमशहा निकोलाय चाउसेस्क्यू (उच्चार?) यांच्या संदर्भात ऐकलेला आहे. या साहेबांना म्हणे हरून-अल-रशीदाप्रमाणे वेषांतर करून जनतेत फेरफटका मारायची सवय होती. फरक एवढाच, की यामागचा उद्देश अर्थातच जनतेची हालहवाल बघणे हा नसून लोक आपल्याविषयी काय बोलतात, यावर लक्ष ठेवणे हा. तर एकदा महाशयांनी टॅक्सी पकडली. दूरचा प्रवास होता, म्हणून टॅक्सीवाल्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलताबोलता विचारले, "काय रे, तुला चाउसेस्क्यूबद्दल काय वाटते?" टॅक्सीवाल्याने आजूबाजूला बघितले, आणि हलक्या आवाजात म्हणाला, "इथे नको. कोणी ऐकेल." टॅक्सी थोड्या विरळ वस्तीत गेल्यावर साहेबांनी पुन्हा विचारले. टॅक्सीवाल्याचे पुन्हा तेच उत्तर. मग टॅक्सी गावाबाहेर आली आणि शेतेबिते दिसू लागली, तशी साहेबांनी म्हटले, "आता तरी सांग." टॅक्सीवाला म्हणाला, "गाडीत नको. त्या शेतात जाऊन बोलू." गेले शेतात. मग पुन्हा एकदा आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत टॅक्सीवाला साहेबांच्या कानात कुजबुजला, "साहेब, कोणाला सांगू नका हं प्लीज, पण मला तो खूप आवडतो." ================================================================== आणखी एक (नक्की कोणाबद्दल ते आठवत नाही.): एकदा अशाच कोण्या एका हुकूमशहाने, लोकांना आपले तोंड रोज दिसावे, आणि आपली लोकप्रियता वाढावी, म्हणून म्हणे आपल्या पोष्टखात्याच्या प्रमुखास हुकूम देऊन आपले चित्र असलेले एक पोष्टाचे तिकीट बनवून घेतले. काही दिवसांनंतर पो.खा.प्र.स बोलावून, तिकिटाचा खप कसा आहे याबद्दल चौकशी केली. "काय सांगू साहेब, पण लोक तिकीट फारसे विकत घेत नाहीत." "का?" "ही तिकिटे पत्रास चिकटत नाहीत अशी लोकांची तक्रार आहे." "अरे मग डिंक बदला, जरा चांगल्या प्रतीचा डिंक वापरा..." "तसे नाही साहेब. डिंक उच्च प्रतीचा आहे." "मग?" "आता लोक पण अडाणी आहेत ना साहेब! चुकीच्या बाजूवर थुंकतात त्याला काय करणार!"
In reply to असेच आणखी by पंगा
In reply to विनोदाचे वावडे...!! by इन्द्र्राज पवार
In reply to अवांतर माहिती by योगप्रभू
In reply to अवांतर माहिती by योगप्रभू
In reply to छान लेख by प्रदीप
सरदाराने 'मला वाटते' असे म्हणताच डिटेक्टर खणखणू लागतो.जम्या नै. तो "आय थिंक" म्हणतो हो. विचार करतो म्हटल्यावर मशिन बोंबलते. नुसता वाटल्यावर नाही. (आनंद वाटून घेणारा) गोपाळ
In reply to उत्तम by चित्रा
In reply to आमचा जन्म... वगैरे वगैरे by Nile
In reply to :) by चित्रा
In reply to >>अभिव्यक्तीस्वातंत्र्याची by Nile
In reply to चाचणी by विकास
In reply to अॅडवाईजर अमेरीकन असेल तर. by Nile
In reply to अच्छा! by विकास
In reply to अहो मानसिकता हो. आता उदाहरणच by Nile
In reply to चाचणी by विकास
In reply to अशीच काहीतरी कारणं देउन दमन by Nile
In reply to चांगला लेख by प्रियाली
प्रत्येक समाजात काही क्षुद्र जीवांना सत्ताधार्यांविषयीचा आपला राग बाहेर काढण्यासाठी अशा विनोदांची गरज लागत असावी. अन्यथा, या रागाचे रुपांतर निराशेत, मनोस्वास्थ बिघडण्यात, कधीकधी साखर वाढणे, ब्लडप्रेशर वाढणे अशाप्रकारेही होऊ शकते.क्षूद्र लोक क्षूद्र असतातच, त्यामुळे त्यांना असे सर्व होणे ठीकच आहे. प्रश्न हा आहे की सत्ताधार्यांना अशा त्यांच्याविषयीच्या विनोदांमुळे निराशा/मनोस्वास्थ्य बिघाड/साखर-रक्तदाब वाढणे अशा गोष्टी का बरे होऊ लागतात? ते तर क्षूद्र नव्हेत?
In reply to क्षूद्र आणि सत्ताधारी by चिंतातुर जंतू
क्षूद्र लोक क्षूद्र असतातच, त्यामुळे त्यांना असे सर्व होणे ठीकच आहे.अगदी! अगदी!! याच्याशी सहमती आहेच.
प्रश्न हा आहे की सत्ताधार्यांना अशा त्यांच्याविषयीच्या विनोदांमुळे निराशा/मनोस्वास्थ्य बिघाड/साखर-रक्तदाब वाढणे अशा गोष्टी का बरे होऊ लागतात? ते तर क्षूद्र नव्हेत?सत्ताधार्यांना असे रोग झाल्याचे ऐकिवात नाही कारण रागाचे शमन करण्याची पावर/ ताकद त्यांच्या हातात असते. आपल्याकडे उदाहरणे असल्यास अवश्य द्यावीत. सत्ताधार्यांना राग येतो आणि फतवे काढले जातात हे मात्र ऐकले आहे. हं! मिपावर संपादकांना त्रास होऊ नये म्हणून सरपंचांनी मध्यंतरी काही घोषणा केल्या होत्या हेही या प्रतिसादाच्या निमित्ताने आठवले.
In reply to कोणत्या सत्ताधार्यांना? by प्रियाली
In reply to चांगला लेख by प्रियाली
सत्ताधार्यांना असे रोग झाल्याचे ऐकिवात नाही कारण रागाचे शमन करण्याची पावर/ ताकद त्यांच्या हातात असते.क्षुल्लक विनोदांचे दमन करावेसे वाटणे हेच रोगाचे एक लक्षण आहे. राजा-उंदीर-टोपी या गोष्टीमध्ये 'राजा भिकारी! माझी टोपी पळवली' किंवा 'राजा घाबरला! माझी टोपी दिली' असे म्हणणारा उंदीर हास्यास्पद ठरतो, की त्याची टोपी जप्त करणारा राजा हे तुमचे तुम्हीच ठरवा.
In reply to रोगाची लक्षणे by चिंतातुर जंतू
राजा-उंदीर-टोपी या गोष्टीमध्ये 'राजा भिकारी! माझी टोपी पळवली' किंवा 'राजा घाबरला! माझी टोपी दिली' असे म्हणणारा उंदीर हास्यास्पद ठरतो, की त्याची टोपी जप्त करणारा राजा हे तुमचे तुम्हीच ठरवा.जेव्हा राजा किंवा प्रजा नवा विनोद निर्माण करते (उदा. केक नसेल तर भाकरी खा असा राज्यकर्त्यांकडून किंवा वर आलेल्यापैकी काही प्रजेकडून) तेव्हा ते क्षुल्लक आहेत त्यात काय एवढे रागवण्यासारखे, बंड करण्यासारखे किंवा फतवे काढण्यासारखे असे त्या त्या व्यक्तिला वाटत असते. असे अनेक क्षुल्लक लोक एकत्र जमून विनोद निर्मिती करतात किंवा अनेक क्षुल्लक विनोद एका ठिकाणी जमा होतात तेव्हा त्याला क्षुल्लक म्हणणे राजाला किंवा प्रजेला डोईजड होत असावे. विशेषतः आपण पांचट विनोद केला तरी तो विनोद हा आतापर्यंतचा सर्वात ग्रेट विनोद आहे असे त्या निर्मात्याला वाटू शकते आणि मग त्यावर निर्बंध लावला की त्रास होऊ शकतो. राजा उंदराची गोष्ट ही बोधकथा आहे. त्यात सत्यांश असला तरी पूर्णतः सत्यकथा नव्हे. राजाने उंदराकडे लक्ष देऊ नये हे खरे असले तरी अनेक उंदिर एकत्र येऊन रोज राजाची फजिती करू लागणे किंवा एकच उंदिर रोज येऊन राजाची फजिती करू लागणे याची शक्यता नाकारता येत नाही. वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पोलिटिकल करेक्टनेस ही काळाची गरज असू शकते. इथे राजा आणि प्रजा सर्वच रोगी असले तर राहिले कोण? :(
In reply to क्षुल्लक क्षुल्लक म्हणून by प्रियाली
जेव्हा राजा किंवा प्रजा नवा विनोद निर्माण करते (उदा. केक नसेल तर भाकरी खा असा राज्यकर्त्यांकडून किंवा वर आलेल्यापैकी काही प्रजेकडून)हा विनोद खरोखरच नवीन असावा, कारण मी ऐकला आहे तो 'भाकरी नसेल तर केक खा' या धर्तीचा होता.
इथे राजा आणि प्रजा सर्वच रोगी असले तर राहिले कोण?इतकी नकारात्मक भूमिका बाळगू नये असं वाटतं. जगात काही लोक तरी चांगले आहेत यावर विश्वास ठेवा. चीअर अप.
In reply to जेव्हा राजा किंवा प्रजा नवा by राजेश घासकडवी
'भाकरी नसेल तर केक खा' या धर्तीचा होताभाकरी नसेल तर केक खा असेच हवे. माझ्या गडबडीत लिहून जाण्यात हे होतेच. यात नाविन्य नाहीच. ;) असं होतं कधीतरी. माणूस सुविधा दिलेली नसतानाही धन्यवाद मानून जातो. असो. सुधारणेबद्दल धन्यवाद.
इतकी नकारात्मक भूमिका बाळगू नये असं वाटतं. जगात काही लोक तरी चांगले आहेत यावर विश्वास ठेवा. चीअर अप.ही माझी भूमिका नाही. वरील प्रतिसादांतून तसे सिद्ध झाल्याचे दिसते आहे. कल्जी नसावी.
In reply to हाहाहा! by प्रियाली
माणूस सुविधा दिलेली नसतानाही धन्यवाद मानून जातो.हा हा... अहो सुविधेचा उपभोग घेतल्यानंतर तृप्त मनाने यजमानाला दिलेला धन्यवाद आहे तो. खोटा कसा असेल? प्रत्यय पहायचा असल्यास तुम्हीही क्रिकेट विभागात थोडं लेखन करून पहा.
ही माझी भूमिका नाही.नक्की ना? तुम्हाला नसलेली भुतं दिसतात म्हणून विचारलं. पण तुम्ही सांगितल्यावर दिलासा मिळाला. आता काळजी कसली?
In reply to माणूस सुविधा दिलेली नसतानाही by राजेश घासकडवी
प्रत्यय पहायचा असल्यास तुम्हीही क्रिकेट विभागात थोडं लेखन करून पहा.प्रत्यय सर्वत्रच यायला हवा. फक्त क्रिकेटविभागात असून चालत नाही. योग्य शहानिशा न करता निष्कर्षावर येण्याची पद्धत विनोदी वाटते. ;)
तुम्हाला नसलेली भुतं दिसतात म्हणून विचारलं. पण तुम्ही सांगितल्यावर दिलासा मिळाला. आता काळजी कसली?नसलेली भुतं नाही पण उगा उभी केलेली भुतं नक्कीच दिसतात पण तुम्हाला दिलासा मिळाला हे बरे झाले.
In reply to सत्ताधार्यांना लेख फारस by Nile
In reply to गडबड आहे by प्रियाली
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची स्वतंत्र अमेरिकेतही कशी गळचेपी होते हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न आहेहे होतं हे मान्यच आहे. याचं उदाहरण तर मूळ लेखातच दिलेलं आहे. पण अगदी राष्ट्राध्यक्षांविषयीची प्रच्छन्न टिंगल तिथे जाहीर करता येते. त्यामुळे शासनव्यवस्था दुर्बळ होते असं दिसत नाही. याउलट -
राजा उंदराची गोष्ट ही बोधकथा आहे. त्यात सत्यांश असला तरी पूर्णतः सत्यकथा नव्हे. राजाने उंदराकडे लक्ष देऊ नये हे खरे असले तरी अनेक उंदिर एकत्र येऊन रोज राजाची फजिती करू लागणे किंवा एकच उंदिर रोज येऊन राजाची फजिती करू लागणे याची शक्यता नाकारता येत नाही.बोधकथा आहे हे बरोबरच आहे. नक्की कोणत्या गोष्टींमुळे शासनव्यवस्था दुर्बळ होते याविषयी सारासार विचार करून नक्की कशाचं दमन करायचं आणि कशाकडे क्षुल्लक मानून दुर्लक्ष करायचं याविषयी शासनकर्ते वेळोवेळी निर्णय घेत असतात. त्या निर्णयांवरून शासनकर्त्यांचा वास्तवावर कितपत ताबा आहे हे जनसामान्यांना दिसत असतं. किरकोळ गोष्टींचं दमन होऊ लागतं, तेव्हा शासनकर्त्यांचा वास्तवावर ताबा सुटत चाललेला आहे याचं ते एक निदर्शक लक्षण बनतं. राजा-उंदीर गोष्टीत हेच दिसतं. हा एक प्रकारचा पॅरानोईआ असतो. प्रत्येक क्षुल्लक गोष्टीत स्वतःच्या (किंवा स्वतःच्या सत्तेच्या) नाशाची बीजं दिसू लागणं हे म्हणून धोक्याचं ठरतं. 'शासनकर्त्यांचा पॅरानोईआ' याची इतिहासात पुष्कळ उदाहरणं दिसतात.

नक्की हुकूमशहांना वावडे असते असे काही त्या लेखातील उदाहरणावरून स्पष्ट होत नाही, असे मला वाटले. किंबहूना मला वाटते प्राडॉं.नी दिलेल्या उदाहरणात क्रुश्चेव अथवा मी दिलेल्या उदाहरणातील बाळासाहेब (जे हुकूमशाहीचे समर्थक आहेत) हे दोघेही स्वतःवर विनोद केला तरी हसताना दिसतात.क्रुश्चेवच्या किश्श्याची सत्यासत्यता मला माहीत नाही, पण दिलेल्या उदाहरणांत हसणार्या व्यक्ती खाजगीत हसत आहेत ही कळीची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कम्युनिस्ट शासनकर्त्यांबद्दलचे विनोद त्यांच्या कारकीर्दीत एखाद्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ शकत नव्हते. खाजगी अवकाश आणि सार्वजनिक अवकाश यांत मोठा फरक आहे. इतकंच काय, कम्युनिस्ट राजवटीत तुमचा जोडीदार किंवा पालक/पाल्य अशी एखादी तुमच्या जवळची व्यक्ती खबर्या असू शकत असे. त्यामुळे अगदी खाजगी अवकाशही संकुचित होता. उद्या जर तुमचे व्य.नि. कुणी वाचत आहे आणि त्यांतल्या शासनकर्त्यांविषयीच्या टिप्पणीवरून तुमचं खातं उडवलं जाऊ शकतं अशी परिस्थिती आली तर कसं वाटेल? तसंच काहीसं हे आहे. लेखातला या विषयीचा मजकूर खाली पुन्हा दिलेला आहे:
त्यांच्या गैरसोयीचे विनोद एका छोट्याशा खाजगी अवकाशापुरते मर्यादित कसे राहतील आणि तो अवकाश अधिकाधिक संकुचित कसा होईल, याची काळजी ते घेत रहातात.
In reply to लेख आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
काही मतं संपूर्णपणे पटलीच असं नाही, उदा: विनोदामधे सत्तापालट करण्याची शक्ती नसते.याबद्दल काही विवेचन करू शकाल काय? काही उदाहरणे वगैरे?
In reply to ? by पंगा
In reply to उदाहरण देता येणार नाही. ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
एखादी गोष्ट आवडत नाही* हे सांगण्यासाठी गंभीर निबंध लिहीता येतो नाहीतर त्या गोष्टीचं विडंबनही करता येतं. माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही. *उदा: पूर्वी मिपावरच्या खादाडीत ज्या प्रकारची चित्रं दिसायची.मतपरिवर्तन... कदाचित. पण सत्तापालट?
"Imitation, though often not the sincerest form of flattery, is certainly the cheapest." © 2011.
माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही.मुळात अभिव्यक्ती आणि प्रत्यक्ष कृती यांमध्ये मूलभूत फरक आहे आणि तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादेविषयी कळीचा मुद्दा ठरतो. एखाद्याला थोबाडीत मारणं आणि त्याच्याविषयी अद्वातद्वा बोलणं यांत फरक केला जातो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांविषयी विनोद करणं कायदेशीर असेल, पण त्याला थोबाडीत मारणं किंवा त्याच्या खुनाची धमकी देणं मात्र तसं ठरणार नाही. विनोद, खुनाची धमकी आणि थोबाडीत मारणं या उतरंडीत विनोद सगळ्यात मवाळ ठरेल असं वाटतं. अवांतरः अगदी स्वामित्वहक्क कायद्यांमध्येही स्वामित्वहक्क असणार्या एखाद्या कृतीचा पॅरडीसाठीचा वापर (उद्धृत करणं वगैरे) मान्य होऊ शकतो. आता मूळ लेखातल्या हुकुमशाहीच्या विशिष्ट मुद्द्याकडे वळायचं म्हटलं तर असं सांगता येईल, की कम्युनिस्ट देश असोत किंवा अगदी आताची इजिप्तमधली परिस्थिती असो, निव्वळ विनोदानं (किंवा अभिव्यक्तीनं देखील) सत्ताबदल होत नाही. त्यासाठी लोक रस्त्यावर उतरणं, मोर्चे, धरणं, संप अशा अहिंसक कृती किंवा हिंसक क्रांतिकारी कारवाया अशा सरकारविरोधी कृतींची गरज भासते. म्हणून विनोद आपोआप सत्ताबदल करत नाही. या बाबतीत अभिव्यक्ती आणि विनोद दोन्ही अपुरे मानता येतील.
जबर्या लिवलय