मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्वग्रहासंबंधीत विस्कळीत विचार

शुचि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(१) क्वचित एखाद्या व्यक्तीबद्दल आपला एखादा ग्रह होऊन बसतो (२) आणि आपण त्या पूर्वग्रहदूषित दृष्टीनेच त्या व्यक्तीकडे पहातो. (३) खूपदा असे होते हेदेखील कळत नाही पण कधीकधी कळते की अरे आपला "विनाकारण(?)" असा ग्रह बनतो आहे. (४) जेव्हा त्रयस्थ दृष्टीने आपण आपल्याकडे असे पाहू शकतो, तेव्हा दोन मार्ग खुले असतात - (अ) आपण आपल्या पूर्वग्रहाशी = सहजप्रवृत्तीशी ठाम रहाणे किंवा (ब) दुसरा मार्ग हा की आपण आपल्या सहज प्रवृत्तीला = पूर्वग्रहाला विपरीत असे वर्तन करणे. (५) पण मग असा विचार येतो का आपला पूर्वग्रह खोडून काढायचा? का म्हणून आपल्या सहजप्रवृत्तीशी प्रतारणा करायची? (६) त्यापेक्षा आपल्या मताशी ठाम राहून ते मत आपोआप खोडून निघते आहे का हे पहावे हेच बरे. मग भलेही तो पूर्वग्रह दुसर्‍या व्यक्तीवर कितीका "अन्यायकारक" असेना, आपण आपल्या मताशी प्रामाणिक रहाणे हेच श्रेयस्कर. (७) कारण जर आपण सहजप्रवृत्तीशी प्रतारणा केली आणि आपला पूर्वग्रहच खरा निघाला तर त्याचा विषादच होईल. (८) पण जर स्वतःशी प्रामाणिक राहून , आपण चूकीचे ठरलो तर निदान स्वतःशी प्रामाणिक राहील्याचे समाधान तरी लाभेल. थोडक्यात दुसर्‍या व्यक्तीवर अन्याय करायचा ........... संदर्भ - अ की स्वतःवर अन्याय करायचा .......................संदर्भ ब यामध्ये मी (अ) ची निवड केली. कोणा ना कोणावर अन्याय करावयाची परिस्थिती मूळातच का आली? कारण मी "पूर्वग्रहदूषित" झाले. अर्थात मी समोरच्या व्यक्तीला कळत-नकळत "जज" केले. रोजच्या जीवनात हे "जज" करणे टाळता येत नाही = ग्रह करून घेणे, तदनुसार वागणे टाळू शकत नाही = अन्याय टाळू शकत नाही.

वाचने 3210 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अमोल केळकर 24/02/2011 - 12:39
अच्छा अच्छा . मला वाटले की पूर्वग्रह नावाचा कुणी नवीन ग्रह निघून आमचे काम वाढले की काय ? :) कृ.प्र. ह.घे. बाकी लेखातील विचार आवडले हे वेगळे सांगायला नको अमोल केळकर

स्वैर परी 24/02/2011 - 12:56
शुचि शी अगदी सहमत आहे! रोज 'जज' करणे टाळता येणार नाही. म्हणजे, निदान मला तरी असे नाहीच करता येणार. बरेचदा प्रयत्न करुन पाहिला, पण जमलेच नाही. शेवटी सुरुच ठेवले.. 'जज' करणे.. ;)

गवि 24/02/2011 - 12:57
ढोबळमानाने पटले. पण बारीकात गेल्यास टिकत नाही. एक टिप्पणी करावीशी वाटते. शून्यातून ग्रह आधी उभे राहतात का ते अनुभवातून डेव्हलप होतात हे नीट पहावे लागेल. पूर्वग्रह : "क" हा उर्मट वाटतो.... (मनात : कारण मागच्या दोन्ही वेळी तो तसा वागला...किंवा अशा कपाळावर आठ्या घेतलेली लोकं नेहमीच उर्मट निघतात्..इ.इ.इ. दहा पॉईंट्स..) व्यक्तीविषयी जे अनुभव येतात त्याला पूर्वग्रह जास्त प्रमाणात म्हटलं जातं आणि इतर अनुभवांना मात्र अनुभवच म्हटलं जातं. "व्यक्ती" नसलेल्या एन्टिटीजविषयी असलेल्या ग्रहांना अनुभवसिद्ध ज्ञान म्हणण्याची प्रथा आहे.. उदा. आगीत हात घातला की चटका बसतो असा माझा आगीविषयी पूर्वग्रह आहे हे बरोबर वाटत नाही. (खरं तर ती आग वेगळी होती. ही वेगळी आहे.. इथे स्वच्छ मनाने नव्याने हात घालून अनुभव घेतल्याशिवाय पूर्वग्रहदूषित होऊ नये.) इथे मात्र अनुभवाचे बोल, पुढच्यास ठेच वगैरे गोष्टी येतात. आपण ज्याला "पूर्वग्रह" म्हणतो आणि त्याचा प्रादुर्भाव रोगाप्रमाणे होत आहे असे समजून "दूषित" हे विशेषण वापरतो, त्यालाच अनुभव म्हटले की समीकरण बदलते. अनुभवातून शिकणे ही मनुष्यच नव्हे तर सर्वच प्राण्यांची एक मोठी जमेची बाजू आपण समजतो आणि तेच जिवंत राहण्याचे महत्वाचे हत्यारही आहे. जिवंत म्हणजे स्वतःही आणि स्वतःची स्पेसीजही. जर पूर्वग्रहातून... , सॉरी, पुर्वानुभवातून, काही लक्षात ठेवायचे / धडा घ्यायचा/ शिकायचे नसेल तर हे मूळ अनुभवाने जगण्याच्या कन्सेप्टशी विसंगत नाही का?

In reply to by गवि

स्वैर परी 24/02/2011 - 13:56
पूर्वग्रह हे सामान्यतः कुणी तिसर्याकडुन एखाद्या वस्तु किंवा व्यक्तिविषयिच्या बोलण्यातुन बनतात. नाहीतर, एखाद्या व्यक्तिचे वागणे पाहुन / न्ह्याहाळुन मग बनतात.
जर पूर्वग्रहातून... , सॉरी, पुर्वानुभवातून, काही लक्षात ठेवायचे / धडा घ्यायचा/ शिकायचे नसेल तर हे मूळ अनुभवाने जगण्याच्या कन्सेप्टशी विसंगत नाही का?
मुळात पूर्वग्रह ही कन्सेप्ट्च अशी आहे कि जी नव्याने बनलेल्या मतांमुळे ठळक बनते. किंबहुना, त्या मतांना पूर्वग्रहांमुळेच महत्त्व येते! त्यामुळे पूर्वग्रह तसेच राहतात. बदलतात ती फक्त मते. आणि या मतांनुसार वागायला पूर्वग्रह मान्यता देत नाहीत. अशी बरीच माणसे असतात, जी पहिल्यांदा आपल्याला भेटतात, तेव्हा त्यांच्याबद्दलचे बनलेले मत हे फारसे बदलत नाही. of course, there are exceptions to every rule!

In reply to by स्वैर परी

गवि 24/02/2011 - 14:26
मुळात पूर्वग्रह ही कन्सेप्ट्च अशी आहे कि जी नव्याने बनलेल्या मतांमुळे ठळक बनते. किंबहुना, त्या मतांना पूर्वग्रहांमुळेच महत्त्व येते! त्यामुळे पूर्वग्रह तसेच राहतात. बदलतात ती फक्त मते. आणि या मतांनुसार वागायला पूर्वग्रह मान्यता देत नाहीत. कन्फ्युजिंग परस्परांना छेदणारी वाक्ये .. पण (सुधारित/अद्ययावत) मतांनुसार वागायला पूर्वग्रह मान्यता देत नाहीत.. एवढे वेगळे काढून वाचल्यास एकदम परफेक्ट. निर्विवाद मान्य..

Nile 24/02/2011 - 14:16
मिपाला प्रगल्भ करायचा हा कुटील डाव शुचिकाकुंनी मांडलाय असा माझा ग्रह झाला आहे, तर मी त्याचा अप्रगल्भ निषेध करतो. ;-)

In reply to by Nile

शुचि 25/02/2011 - 01:07
ए बाबा मी रोज रतीब घालणं बंद केलय त्यामुले मिपा विद्युल्लतेच्या वेगाने प्रगल्भ होण्याकडे वाटचाल करू लागलं आहे असं म्हणायचय का तुला? हाहा.

विजुभाऊ 24/02/2011 - 14:30
ढोबळ मानाने साम्गायचे तर पूर्वग्रह हे बर्‍याचदा समोरील व्यक्तीची बॉडीलँग्वेज आणि आपला कम्फर्ट झोन यावर अवलंबून असतात. शहरातील व्यक्तींचा कंफर्ट झोन एरीया थोडा कमी असतो. खेड्यातील व्यक्तीचा त्यामानाने अधीक असतो. ( कम्फर्ट झोन =आपल्याला एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या किती अंतरापर्यन्त जवळ आलेली खुपत नाही ही मर्यादा) काही वेळा आपल्या वर जाणतेअजाणतेपणी झालेली संस्कार हे देखील त्याला कारणीभूत असतात. उदा: बिडी पिणारी व्यक्ती /दारूचा पिल्याचा वास येत असलेली व्यक्ती हे आपल्याला विश्वासपात्र नसतील असे उगाचच वाटते. दाढी ठेवणार्‍या व्यक्ती रागीट असतात. सुंदर स्त्रीया मठ्ठ असतात. दिल्लीतले लोक लबाड असतात इत्यादी. अर्थात कोणालाही जज केल्याशिवाय आपले व्यवहार होणारच नाहीत. जज करण्यासाठी त्यासाठी पूर्वग्रह हे मदत करत असतात. ( परदेशात आपली मातृभाषा बोलणारी अधीक व्यक्ती विश्वासार्ह वाटते ) त्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रीया लवकर होते. कदाचित यामुळे अन्याय होत असेलही. ( आयसीसी बोर्डाने पॉन्टिंग हा गोरा असल्याने फक्त सामन्याची अर्धी फी कापून घेणे इतकीच शिक्षा दिली. त्याजागी एखादा अशियाई खेळाडू असता तर त्याला काही सामन्यांची बंदी घातली असती.) पण या गोष्ती होत रहातात. पूर्चग्रह संपूर्ण नाहीसे करणे शक्य नाही. पुर्वग्रह वाईटच असतात असे नाही. ते चांगले देखील असू शकतात. ते नेहमी इतरांबद्दलच असतील असेही नाही ते स्वतःबद्दल देखील असू शकतात. उदा: मुले एखादे काम सहज करू शकतात. / ही गाडी गाडी चालवता येईलच . अशा चांगल्या पूर्वग्रहांमुळे एखाद्या कामाबद्दलचा आत्मविश्वास वाढवण्यास मदतच होते

विजुभाऊ 24/02/2011 - 14:31

तिमा 24/02/2011 - 19:22
विचार करायला लावणारा लेख . मी शुचिताईंशी सहमत आहे. मी सुध्दा 'अ' पर्यायच निवडला असता. कारण आजपर्यंतच्या अनुभवावरुन ९९% लोकांच्या बाबतीतला माझा पूर्वग्रह (प्रत्यक्ष भेटीनंतरच) हा खरा ठरला आहे. बाकी फोनवरच्या बोलण्यावरुन वा लेखन वाचून ठरवणे कठीण आहे.

मितभाषी 24/02/2011 - 23:06
रोजच्या जीवनात हे "जज" करणे टाळता येत नाही = ग्रह करून घेणे, तदनुसार वागणे टाळू शकत नाही = अन्याय टाळू शकत नाही.
हे पटले नाही. तिहार तुरुंगात किरण बेदीने कैद्यांसाठी केलेल्या कामाबद्दल लेखिकेचे काय विचार आहेत? जाणण्यास उत्सुक....

In reply to by मितभाषी

शुचि 25/02/2011 - 01:03
एवढा तुरुंग वगैरे पातळीवरचा विचार करून हा लेख लिहीला नव्हता. सामान्य, दैनंदिन जीवनात घडणार्‍या पूर्वग्रहांवर ते भाष्य होते. पण तुम्ही जर एखादा लेख "किरण बेदीचे कार्य" या विषयावर लिहीलात तर प्रतिसाद द्यायला नक्की आवडेल.