पूर्वग्रहासंबंधीत विस्कळीत विचार
लेखनप्रकार
(१) क्वचित एखाद्या व्यक्तीबद्दल आपला एखादा ग्रह होऊन बसतो
(२) आणि आपण त्या पूर्वग्रहदूषित दृष्टीनेच त्या व्यक्तीकडे पहातो.
(३) खूपदा असे होते हेदेखील कळत नाही पण कधीकधी कळते की अरे आपला "विनाकारण(?)" असा ग्रह बनतो आहे.
(४) जेव्हा त्रयस्थ दृष्टीने आपण आपल्याकडे असे पाहू शकतो, तेव्हा दोन मार्ग खुले असतात -
(अ) आपण आपल्या पूर्वग्रहाशी = सहजप्रवृत्तीशी ठाम रहाणे
किंवा
(ब) दुसरा मार्ग हा की आपण आपल्या सहज प्रवृत्तीला = पूर्वग्रहाला विपरीत असे वर्तन करणे.
(५) पण मग असा विचार येतो का आपला पूर्वग्रह खोडून काढायचा? का म्हणून आपल्या सहजप्रवृत्तीशी प्रतारणा करायची?
(६) त्यापेक्षा आपल्या मताशी ठाम राहून ते मत आपोआप खोडून निघते आहे का हे पहावे हेच बरे. मग भलेही तो पूर्वग्रह दुसर्या व्यक्तीवर कितीका "अन्यायकारक" असेना, आपण आपल्या मताशी प्रामाणिक रहाणे हेच श्रेयस्कर.
(७) कारण जर आपण सहजप्रवृत्तीशी प्रतारणा केली आणि आपला पूर्वग्रहच खरा निघाला तर त्याचा विषादच होईल.
(८) पण जर स्वतःशी प्रामाणिक राहून , आपण चूकीचे ठरलो तर निदान स्वतःशी प्रामाणिक राहील्याचे समाधान तरी लाभेल.
थोडक्यात दुसर्या व्यक्तीवर अन्याय करायचा ........... संदर्भ - अ
की स्वतःवर अन्याय करायचा .......................संदर्भ ब
यामध्ये मी (अ) ची निवड केली.
कोणा ना कोणावर अन्याय करावयाची परिस्थिती मूळातच का आली? कारण मी "पूर्वग्रहदूषित" झाले. अर्थात मी समोरच्या व्यक्तीला कळत-नकळत "जज" केले.
रोजच्या जीवनात हे "जज" करणे टाळता येत नाही = ग्रह करून घेणे, तदनुसार वागणे टाळू शकत नाही = अन्याय टाळू शकत नाही.
वाचने
3210
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
अच्छा अच्छा . मला वाटले की
१००% सहमत!
ढोबळमानाने
In reply to ढोबळमानाने by गवि
काही अंशी सहमत!
In reply to काही अंशी सहमत! by स्वैर परी
मुळात पूर्वग्रह ही कन्सेप्ट्च
मिपाला प्रगल्भ करायचा जो
In reply to मिपाला प्रगल्भ करायचा जो by Nile
खी: खी:
पूर्वग्रहासंबंधीत चांगली माहीती आहे
ढोबळ मानाने साम्गायचे तर
In reply to ढोबळ मानाने साम्गायचे तर by विजुभाऊ
प्रतिसाद आवडला.
ढोबळ मानाने साम्गायचे तर
ढोबळ मानाने साम्गायचे तर
आपल्याविषयी लोकांचे पुर्वग्रह
विचार
रोजच्या जीवनात हे "जज" करणे
In reply to रोजच्या जीवनात हे "जज" करणे by मितभाषी
एवढा तुरुंग वगैरे पातळीवरचा
लेखातील मते पटली . आता आभासी