विनिल आणि...
In reply to सध्याच्या सिस्टिमचा काहीही by अवलिया
In reply to समजले नाही. by छोटा डॉन
In reply to त्यात न समजण्यासारखे काय आहे by अवलिया
In reply to समजले नाही. by छोटा डॉन
In reply to कृपया सोप्या (Layman's) भाषेत लिहावे ही विनंती. by सुधीर काळे
In reply to मध्यस्थ स्वामी अग्निवेश...!! by इन्द्र्राज पवार
In reply to इंद्रा, तुझा भाषेचा मुद्दा by बिपिन कार्यकर्ते
In reply to मन जिंकणे...!! by इन्द्र्राज पवार
In reply to उत्तम by चित्रा
राणी बंग यांनी पाय धुवून घेतले तर तेही त्यांच्या सुधारकांच्या व्यासपीठावरून झालेल्या अधःपतनाचे लक्षण होते.आयुष्यात अशा प्रकारे स्वतःचे पाय धुतले जाण्याची (तशी अपेक्षा असावी असे म्हणत नाही, पण तरीही) शक्यता सुतराम् नसल्यास तशी भूमिका (तीतही निश्चित काही गैर आहेच, असेही सांगता येत नाही, पण तरीही) घेणे कदाचित सोपे जात असावे. (दुसर्याकडून पाय धुवून घेणे आणि दुसर्याकडून पाय धुवून घेण्यास उघड विरोध करणे यांपैकी कोणते अधिक भंपक आहे, हे कधीकधी कळत नाही. मला वाटते व्यक्तीवर, प्रसंगावर आणि व्यक्त करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असावे. चूभूद्याघ्या.)
In reply to आशा आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +१ by राजेश घासकडवी
कर्तबगार व लोकप्रिय अधिकाऱ्याची सुटका होवो.सहमत. (पण 'कर्तबगार व लोकप्रिय' म्हणून नव्हे, तर केवळ 'अपहृत' म्हणून.)
एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला किंवा राजकारण्याला हे लोक का किडनॅप करत नाहीत ते कळत नाही. लोकही खुष होतील, त्या भ्रष्ट व्यक्तीचे पित्त्ये त्याच्या सुटकेची आटोकाट धडपड करतील - त्यासाठी किडनॅपर्सच्या मागण्या मान्य करायला तयार होतील. आणि त्यांच्याकडून काही सरकार पातळीवर सूत्रं हलली नाहीत तरी त्या माणसाने लपवून ठेवलेल्या काही काळ्या पेट्या तरी हाती पडतील. शेवटी काहीतरी फायदा करून घेऊन त्याला सोडून दिलं की एकंदरीत जनतेचा जीवही भांड्यात पडेल. व किडनॅपर्स तितके वाईट नाहीत अशी खात्री होईल. एव्हरीबडी विन्स.दुर्दैवाने अपहरणकर्त्यांची आणि माझी ओळख नाही. अन्यथा अपहरण करण्यापूर्वी आपल्याशी सल्लामसलत करण्यासंबंधी सूचना करता आली असती. आपला सल्ला होतकरू अपहरणकर्त्यांसाठी अमूल्य आहे याबाबत संदेह नाही. आपल्याला मदत करू न शकल्याबद्दल खेद वाटतो. मात्र, उपस्थितांपैकी कोणाची प्रस्तुत किंवा होतकरू अपहरणकर्त्यांशी ओळख असल्यास जरूर प्रयत्न करून पहावा, असे सुचवू इच्छितो.
In reply to +०.५ by पंगा
सहमत. (पण 'कर्तबगार व लोकप्रिय' म्हणून नव्हे, तर केवळ 'अपहृत' म्हणून.)हम्म्म्म... कसाबला कोणी किडनॅप केलं तर तुम्ही इतक्याच उत्साहाने 'अतिरेकी व खुनी' नव्हे, तर केवळ 'अपहृत' म्हणून, असं म्हणाल का?
आपल्याला मदत करू न शकल्याबद्दल खेद वाटतो.मुळात मदत मागितलीच नव्हती. पण तुम्हाला खेद झाल्याबद्दल मला वाईट वाटलं हे सांगू इच्छितो. राजेश - माझे बरेच प्रतिसाद कंस किंवा राखाडी अक्षरं न वापरता दिलेले असतात.
In reply to सहमत. (पण 'कर्तबगार व by राजेश घासकडवी
हम्म्म्म... कसाबला कोणी किडनॅप केलं तर तुम्ही इतक्याच उत्साहाने 'अतिरेकी व खुनी' नव्हे, तर केवळ 'अपहृत' म्हणून, असं म्हणाल का?हम्म्म्म्... कसाबला कोणी अपहृत केले, तर उत्साहाची पातळी ठरवण्याआधी त्याला एकदा 'काकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽ' अशी हाक निश्चित मारून घेऊ. उलटपक्षी, (जाऊ दे... परमेश्वर आपणांस सुखरूप ठेवो.) कोणत्याही व्यक्तीचे अपहरण झाले असता, 'संबंधित व्यक्तीची सुटका व्हावी' असे चिंतण्यापूर्वी, अत्यंत नोकरशाहीस साजेशा पद्धतीने संबंधित व्यक्तीच्या कर्तबगारीचा आणि लोकप्रियतेचा क्रेडिट चेक करण्यात वेळ घालवू, असे वाटत तरी नाही. (चूभूद्याघ्या.) सुज्ञांस अधिक स्पष्टीकरणाची गरज नसावी. बाकी,
माझे बरेच प्रतिसाद कंस किंवा राखाडी अक्षरं न वापरता दिलेले असतात.आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यास आमची आडकाठी असण्याचे कोणतेच कारण दिसत नाही. सबब, आपण आम्हांस या बाबतीत कोणतेही स्पष्टीकरण देणे लागत नाही, असे सुचवू इच्छितो.
In reply to उत्तर by पंगा
क्रेडिट चेक करण्यात वेळ घालवू, असे वाटत तरी नाही.क्रेडिट चेक का नाही होणार? नेहेमीच होतो. लेडी डायनाचा जो अपघाती मृत्यू झाला तसे हजारो होत नाहीत का? त्या सर्वांना तितकीच प्रसिद्धी मिळते का? इंदिरा गांधींची हत्या व कुण्या स्मगलरच्या गॅंगमधल्या माणसाची हत्या यात फरक नाही का? कुठच्या जगात राहाता तुम्ही? राजेश - माझे बरेच प्रतिसाद कंस किंवा राखाडी अक्षरं न वापरता दिलेले असतात, व शिवाय ते आठ दहा ओळींत आटपतात.
In reply to काका हाक मारण्याचं काही कळलं by राजेश घासकडवी
काका हाक मारण्याचं काही कळलं नाही.आत्याबाईस मिशा फुटल्यास तशीच हाक मारण्याचा प्रघात आहे.
क्रेडिट चेक का नाही होणार? नेहेमीच होतो.कंदाहारसारख्या अपहरणाचे वेळी 'अपहृतांची सुटका व्हावी' अशी इच्छा करण्यापूर्वी (आपण शेवटी केवळ इच्छाच व्यक्त करू शकतो!) उतारूंपैकी प्रत्येकाच्या कर्तबगारीचा आणि लोकप्रियतेचा क्रेडिट चेक करण्याची गरज, का कोण जाणे, निदान मला तरी वाटत नाही बुवा. असा प्रसंग तुम्हाआम्हावर न येवो, ज्यायोगे तिर्हाइतांस अशा प्रसंगी आपला क्रेडिटचेक करण्याची (आणि क्रेडिटचेक पास न झाल्यास आपल्यास कसाबच्या क्याटेगरीत फेकून देण्याची) गरज न पडो, हीच त्या जगन्नियंत्याचरणी प्रार्थना. बाकी चालू द्या.
- 'करड्या रंगाचा वापर' हे 'काळ्या आणि पांढर्यामधील प्रचंड ग्रे एरियाज़ दिसू शकण्या'चे रोगलक्षण असू शकेल काय? - फारा वर्षांपूर्वी वाचलेली एच. जी. वेल्स*ची 'द कंट्री ऑफ द ब्लाइंड' ही लघुकथा या निमित्ताने आठवली. - फारसे काही सांगण्यासारखे नसल्यास थोडक्यात आटोपते घेणे सोपे असावे. (चूभूद्याघ्या.) - * पहा कशी नावाची लेंडी टाकली की नाही ते? असो. अधिक माहिती आणि वाचनासाठी: कथेचे सारः दुवा १, कथेचे संदेशः दुवा २ आणि संपूर्ण कथा: दुवा ३. आगाऊ माहिती: कथेचे अपेक्षित संदेश रोचक आहेत.
In reply to उत्तरे by पंगा
आत्याबाईस मिशा फुटल्यास तशीच हाक मारण्याचा प्रघात आहे.ओह, मला ते काकाSSSSSSSSS मला वाचवा... मधलं काका वाटलं. खुलाशाबद्दल धन्यवाद.
प्रत्येकाच्या कर्तबगारीचा आणि लोकप्रियतेचा क्रेडिट चेक करण्याची गरजगरज आहे असं कोणी म्हटलं? असं घडतं यात वाद नाही. काहीही महत्त्व नसलेली एक व्यक्ती पळवण्यापेक्षा तशा व्यक्तींनी भरलेली बस पळवणं नक्षलांना अधिक फायदेशीर असावं. व एवढी लोकं पळवण्यापेक्षा एक मोठा सरकारी अधिकारी पळवणं तितकंच परिणामकारक व अधिक सोपं असावं. म्हणूनच तर नक्षलांनी एखाद्या कारकुनाला न पळवता जिल्हाधिकाऱ्याला पळवलं. शेवटी मानवतावाद हा आदर्श पातळीवर सर्वांना समान मानणारा असला तरी, सम आर मोअर इक्वल ही सध्याच्या समाजाची सत्यपरिस्थिती आहे. हे तथाकथित मानवतावादी म्हणवणाऱ्यांकडून केलं जातं का? हा या लेखाचा प्रश्न आहे. उत्तरे असं शीर्षक देऊनही प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलंत. तेव्हा चर्चा इथेच थांबवू. राजेश ग्रे मॅटर विषयी माझे विचार इथे व इथे वाचा. मोजक्या शब्दात उत्तर मांडणं ही एक कला आहे, तर पाल्हाळ लावून उत्तर टाळणं ही दुसरी.
In reply to +०.५ by पंगा
(पण 'कर्तबगार व लोकप्रिय' म्हणून नव्हे, तर केवळ 'अपहृत' म्हणून.)आपले म्हणणे नक्की कळले नाही. विनिल हे 'कर्तबगार व लोकप्रिय' आहेत याबद्दल आपण काहीसे अथवा पुरेसे साशंक आहात? की त्यांच्या 'कर्तबगार व लोकप्रिय' असण्याबद्दल आपल्याला काहीच सोयरसुतक वाटत नाही? अधिक जाणून घ्यायला आवडेल.
In reply to श्री. पंगा,(पण 'कर्तबगार व by बिपिन कार्यकर्ते
बिनायक सेन यांच्यासंदर्भात उठणारे आवाज गेल्या अठ्ठेचाळीस तासांत पुन्हा उठलेले दिसले नाहीत.यातील आवाजांमध्ये सरकारची प्रतिक्रिया, सामान्य लोकांची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया, मानवतावाद्यांची प्रतिक्रिया (हे महत्त्वाचे, कारण डॉ. सेन केसमध्ये यांनीच मोठा इश्यू केला होता.) येणे/न येणे/डॉ. सेन केसइतकी न येणे, याची कारणं वेगवेगळी आहेत. याची कारणं खालीलप्रमाणे वाटतात. सरकारच्या प्रतिक्रिया: डॉ. सेन केसमध्ये सरकारनेच ती शिक्षा केली होती. प्रतिक्रिया इतरांच्या होत्या, जास्त करून. सरकारच्या भूमिकेबद्दल एक भाग 'इन्द्रराज'नी लिहिला आहेच. (या माणसाच्याबदल्यात त्याला सोडा इ.) या घडामोडीमध्ये वाटाघाटींचा भाग आहे, त्यामुळे त्याला वेळ लागणार. तरी सरकारने एक ठाम आणि तर्कशुद्ध भूमिका घ्यायला हवीच. इतर राजकारण्यांनी जर डॉ. सेन केसमध्ये जी भूमिका घेतली होती ती आत्ता घेतली नसेल, तर अर्थात माओवादी/स्थानिक राजकारणाचे काही हितसंबंध निश्चित असणार (असायला हवेत). सामान्य लोकांची प्रतिक्रिया: सामान्य लोकांची प्रतिक्रिया जर काही फार गंभीर प्रसंग झाला तर येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, असं अपहरण अनेकदा होत असतं, त्यामुळे सामान्य लोकांना आता सवय झाली आहे. प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया: आपल्याकडे असं दिसतं की, पैसे/व्यावसायिक फायदा असेल; त्या गोष्टीचा देशपातळीवरील प्रसारमाध्यमांकडून लगेच गाजावाजा केला जातो (आठवा, २६/११ हल्ले, राज ठाकरे मुद्दा, क्रिकेट इ.). डॉ. सेन केसमध्ये कम्युनिस्ट/मानवी हक्क इ. वाद्यानी मोठा इश्यू केला होता, तो लगेच प्रसारमाध्यमांनी उचलला. दुसरं असं की, काही पुराव्यासहित कारण देता आलं नाही तरी, असं दिसतं की; उत्तेजक आणि पाश्चात्य संस्कृतीचा आंधळा अनुनय केला जातो. यात संस्कृतीवाद घुसडायचा नाहीये, आणि हे संस्कृतीरक्षक वगैरे अशा भूमिकेतूनही सांगत नाहीये. पाश्चात्य संस्कृतीत materialistic level ला अनेक उत्तम गोष्टी आहेत, सिस्टीम्स आहेत. पण त्या घेण्यासाठी डोळस आणि तर्कशुद्ध दृष्टीकोन हवा. तो प्रसारमाध्यमांकडे नाही (काही सन्माननीय अपवाद असू शकतील, पण अपवादच!). डॉ. सेनबाबतीत मानवी हक्कांचा मुद्दा निघाल्यावर प्रसारमाध्यमांनी त्याची पार्श्वभूमी/वादग्रस्तपणा न बघता उचलला. यावेळी मानवी हक्कवाला मुद्दा निघाला नाही/काढला गेला नाही, प्रसारमाध्यमांनी मोठा इश्यू केला नाही (डॉ. सेन केसइतका. तुलना त्या केसशी चालू आहे, म्हणून त्याच्याशी केली). मानवतावाद्यांची प्रतिक्रिया: यात काही लोक प्रामाणिक आहेत, काही दांभिक, काही इतरांचं ऐकून वागणारे, काहींचे हितसंबंध असल्यामुळे बोलणारे. प्रामाणिक लोक जितके असतील, ते याही वेळी बोलतील. इतर लोक बोलत नाहीत/वेगळी भूमिका घेतात; त्याचं कारण ते तसे (काही दांभिक, काही इतरांचं ऐकून वागणारे, काहींचे हितसंबंध असल्यामुळे बोलणारे) आहेत हेच. या गोष्टी लक्षात घेतल्या की वरच्या प्रश्नाचं उत्तर सोपं होईल. अमित. यत्र धूम्रो तत्र अग्नी: | (जिथे धूर असतो, तिथे आग असतेच.)
In reply to उपप्रश्न by अमित देवधर
In reply to मानवतावाद्यांबद्दल माहित नाही by चिगो
In reply to पोलिसफाट्यात फिरणारा अधिकारी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उत्तर.... by चिगो
In reply to नेमके by श्रावण मोडक
In reply to बरोबर by आळश्यांचा राजा
In reply to बरोबर by आळश्यांचा राजा
नक्षल्यांनी विनीलला हात लावला तरी तो त्यांच्यासाठी फार मोठा खड्डा होईल यात संशय नाही.हीच भावना मी अन्यत्र व्यक्त केली होती.
In reply to उत्तर.... by चिगो
In reply to आसामात काय पद्धत आहे हे मला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विनिल आणि इतर अपहृतांची by नितिन थत्ते
In reply to संबंध by श्रावण मोडक
PUCL expresses concern over the abduction and calls upon the Maoists to immediately and unconditionally release the abducted officer and others in their custody.मात्र पुढे सर्व माओवाद कसा राजकीयच आहे या संदर्भातच लिहीलेले आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे, छत्तीसगढ मधे देखील मध्यंतरी पाच पोलिसांना माओवाद्यांनी पळवले होते पण ते पियुसीएल आणि मानवाधिकार संघटनांमुळे सुटले. सरकारने काही केले नाही... अर्थात हे त्यांच्या प्रेस रिलीज मधले वाक्य आहे. सरकारने केले का नाही ह्याबाबत मला कल्पना नाही.
In reply to पियुसिएल ची भुमिका by विकास
PUCL expresses concern over the abduction and calls upon the Maoists to immediately and unconditionally release the abducted officer and others in their custody.लिप सर्व्हिस?
In reply to लिप सर्व्हिस? by बिपिन कार्यकर्ते
In reply to पियुसिएल ची भुमिका by विकास
In reply to दुवा by श्रावण मोडक
In reply to एक वर्ड डॉक्युमेंट आहे. by नितिन थत्ते
PUCL learns from the newspapers that the District Collector of Malkangiri, Orissa, Mr. R.Vineel Krishna has been abducted on 16th February 2011while returning from a visit to K Gumma block in the tribal-dominated district by an armed group suspected to belong to the Maoists.यातील सस्पेक्टेड हा शब्द कसा काय आला? हीच ती गोलमटोल भूमिका आहे. ज्या जोरकसपणे व्यवस्थेवर आपण टीका करतो, त्याच जोरकसपणे आत्ताच्या घटनेवरही टीका झाली पाहिजे. ती होताना दिसत नाही. पीयूसीएल जर तत्वतः अपहरणांच्या विरोधात असेल तर सध्याच्या घटनेबाबत निषेध झाला पाहिजे. तो होताना दिसत नाही. माओवादाच्या मूळ कारणांविषयी आपला लढा चालूच राहील. पण ती कारणे आहेत म्हणून अपहरणाचे समर्थन तर होत नाही ना? मानवतावादी हा शब्द हिणकस ठरू लागला तो या अशा भूमिकांमुळेच हे पीयूसीएलच्या ध्यानी येत नाही की काय?
In reply to धन्यवाद by श्रावण मोडक
In reply to एक वर्ड डॉक्युमेंट आहे. by नितिन थत्ते
In reply to एक वर्ड डॉक्युमेंट आहे. by नितिन थत्ते
In reply to संबंध by श्रावण मोडक
In reply to संबंध by श्रावण मोडक
सामान्य लोकांची प्रतिक्रिया जर काही फार गंभीर प्रसंग झाला तर येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, असं अपहरण अनेकदा होत असतं, त्यामुळे सामान्य लोकांना आता सवय झाली आहेअगदी अगदी. दर दिवसाआड एक अधिकारी अपहृत होतच असतो. त्यात विशेष काहीच नाही. आणि तसेही अधिकार्यांचा आणि सामान्य माणसांचा संबंध तो काय? त्यामुळे प्रस्तुत प्रसंग फार गंभीर तर नाहीच, पण साधा गंभीरदेखील नाही.
विनिल ह्यांची कळकळ, कर्तव्यपरायणता मलाही आवडली, पण त्यांना तिथल्या परीस्थितीची जाणिव असतांना हा धोका घ्यायला नको होता.. It's better to be a tactful soldier than being a fool-hardy hero..बरोबर आहे. विनील यांच्याकडे एकतर टॅक्ट नव्हती. मग गप्प घरात बसावे की नाही? जायचे नक्षल भागात एकटेच. मला उचला म्हणून सिटिंग डक व्हायचे. मग नक्षल्यांकडून काय अपेक्षा आहे? मुळात सिम्बॉल ऑफ स्टेट असलेल्या अधिकार्यांनी (अशा अधिकार्यांची एक यादी सरकारने प्रसिद्ध करावी, म्हणजे कळेल नेमके कोण 'सिम्बॉल' असतात ते) हे असं मोटरसायकलवरुन फिरणे असला फूलहार्डीपणा करु नये. आता टाकलं की नाही सरकारला पेचात? आता जे नक्षली सुटतील त्याला कोण जबाबदार? असो. अवलिया यांना (नेहेमीप्रमाणेच) काहीही कळत नाही हे त्यांनी (पुन्हा एकदा) यशस्वीपणे सिद्ध केले आहे. बाकी श्री विनील आणि त्यांच्यासोबत असलेले ज्यु. इंजिनियर श्री माझी (योगायोगाने हेही आदिवासीच आहेत) यांच्या सुटकेविषयी सर्वांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत.
In reply to काही दखलयोग्य प्रतिसादांविषयी by आळश्यांचा राजा
In reply to काही दखलयोग्य प्रतिसादांविषयी by आळश्यांचा राजा
In reply to बरोबर आहे. विनील यांच्याकडे by चिगो
कदाचित नव्हतीच टॅक्ट.. घरात बसले तरी गप्प रहायची गरज नाही. कलेक्टरच्या घरातही ऑफीस असतं, त्याला "कॅम्प ऑफिस" म्हणतात. तसेच फिल्डवरही जायलाच पाहिजे, पण सुरक्षिततेची काळजी घ्यायलाच पाहीजे. "आमचा विकास झाला नाही' म्हणणारे नक्षलवादीच त्यांच्या भागात झालेल्या विकासकार्याला ध्वस्त करत असतात. शाळा, दवाखाने तोडतात. डॉक्टर, मास्तरांचा जीव घेतात. पोलिसांना सहकार्य करणार्यांचे घरदार उध्वस्त करतात. त्यामुळे "गरीब, बिचारे नक्षलवादी. त्यांच्या भागात विकास करायला गेलो तर ते मला काहीच करणार नाहीत" हा ध्येयवाद जरा टोकाचा आहे. अहो, विकास झाला तर "बेस" जाणार ना त्यांचा. आणि तुम्ही बोललात तेच झालंय, सिटींग डकच झालेत की विनिल...नक्षलवादी गरीब बिचारे असतात असं कोण म्हणतंय? विनीलनेही असं कधी म्हणलं नाही. गरीब बिचारे आदिवासी असा शब्दप्रयोग हवा. तुमच्या मते विनीलकडे टॅक्ट नव्हती. आमच्या मते विनील ज्या प्रकारे काम करत होते ती बेस्ट पॉसिबल टॅक्ट होती. एवढंच आहे, की ही टॅक्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, निर्भयता, आणि असीम प्रेम मनात असावे लागते. ते नसेल तर कॅम्प ऑफिसमधून कट ऑफ भागाच्या विकासाचा टॅक्टफुली विचार करावा लागतो. घरात बसले, किंवा जिल्हा मुख्यालयातील कार्यालयात बसले तर अर्थातच अधिकारी सिटिंग डक होत नसावा बहुदा तुम्ही म्हणताय तसं. नाहीतर अशा परिस्थितीत अधिकार्यांना थेट राजधानीतल्या कॅम्प ऑफिसमधून टॅक्टफुली काम करावं लागेल. तिथंही धोका असेल, तर त्यांनी सीआरपी च्या छावणीत किंवा सरळ लष्करी मुख्यालयात आपले ऑफिस हलवावे. शेवटी टोकाचा ध्येयवाद काय कामाचा?
हे तुम्हाला माहित नसेल कदाचित, नक्षलवाद्यांना ठाऊक असतं. कुठल्याही नक्षल-हल्ल्याची बातमी बघा, लगेच कळेल. आणि जिल्हाधिकार्यापेक्षा मोठा चालता-बोलता प्रशासकिय "सिम्बॉल ऑफ स्टेट" कदाचित दुसरा कोणताच नसेल जिल्ह्यात..नाही ब्वॉ. मी नक्षलवादी नसल्यामुळे मला हे माहीत नाही. जिल्हाधिकारी एव~~~ढा मोठा असतो हे माहीत नव्हतं मला. विनील ला देखील माहीत नसावं. नाहीतर तो एका छॉट्याश्या छोट्याश्या ज्युनिअर इंजिनियरच्या मागे मोटरसायकलवर बसून गेलाच नसता. असल्या लोकांना आय ए एस मधे कोण घेतं कुणास ठाऊक. साधे प्रोटोकॉल समजत नाहीत. आपण किती मोठे प्रशासकीय "सिम्बॉल ऑफ स्टेट" आहोत हे पण समजत नाही. अॅकॅडमीत झोपा काढत असणार.
चांगला प्रश्न... उत्तर कळेलच आताया प्रश्नाचे उत्तर कळण्यासाठी...असो. आमचे एक गुरु म्हणायचे, एखादी योग्य गोष्ट करण्याचे १०० योग्य मार्ग असू शकतात. अमुक एक मार्ग चुकीचा आहे असं म्हणण्याअगोदर तो तसा खरंच चुकीचा आहे का, आणि का आहे, हे तपासून बघावे. असो. विनीलच्या बाबतीत जरा आम्ही हळवे आहोत. थोडे कडू बोललो असल्यास खेद आहे. आमचा नाइलाज आहे. क्षमाप्रार्थी नाही.
In reply to कदाचित नव्हतीच टॅक्ट.. घरात by आळश्यांचा राजा
In reply to वादाला वाद होतोय, पन by चिगो
In reply to बरोबर by आळश्यांचा राजा
In reply to ही लढाई by सहज
In reply to बरोबर by आळश्यांचा राजा
In reply to डेडलाईन अजून २४ तासांनी by बिपिन कार्यकर्ते
सध्याच्या सिस्टिमचा काहीही उपयोग नाही असे म्हणत सिस्टिमविरुद्ध लढणार्यांनाम्हणजे सरकारविरुद्ध/ एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध/ घटनेविरुद्ध/ कायद्या विरुद्ध लढणार्यांना, म्हणजेच नक्षल्यांना
सिस्टिममधील लोकांकडूनच त्रास होत आहे, त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत अशी भुमिका एकदा घेतली कीम्हणजे (भ्रष्ट) सरकारी अधिकार्भ्रष्ट)/ नेत्यांकडून त्रास होतोय, त्याचा आम्ही विरोध करतो अशी भूमीका एकदा घेतली की
सिस्टिममधे काही जण चांगले आहेत ते सिस्टिमविरुद्ध उभे राहणार्यांना मात्र अडचणीचे असतात हे मान्य करणे सोईचे नसतेम्हणजे विनील चांगला आहे हे नक्षल्यांना मात्र अडचणीचे असतात, हे मान्य करणे सोईचे नसते
कारण इथे सिस्टिमचा दोष नसुन त्यातील माणसांचा आहे म्हणुन सिस्टिम न बदलताही बदल घडवून आणता येतो हे सिद्ध होते, जे आधी घेतलेल्या भुमिकेशी विसंगत असतेहे समजायला सोपे आहे.
म्हणून अशा प्रकारचा आवाज येत नाहीआलं लक्षात? * डेडिकेटेड टू छोटा डॉन अॅण्ड काळे काका!
In reply to डिकोडिंग दि अवलिया कोड! by आळश्यांचा राजा
In reply to थोडे करेक्शन by प्रदीप
In reply to थोडे करेक्शन by प्रदीप
In reply to सहमत by विकास
In reply to डिकोडिंग दि अवलिया कोड! by आळश्यांचा राजा
In reply to असहमत. by ज्ञानेश...
In reply to विनिल ह्यांच्याप्रमाणेच एक by यशोधरा
In reply to हो by श्रावण मोडक
In reply to विनिल जिल्हाधिकारी आहेत. by यशोधरा
In reply to क्षमा by श्रावण मोडक
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादाची by यशोधरा
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादाची by यशोधरा
In reply to खरंय... by श्रावण मोडक
In reply to छे, छे! आपल्यासारखे मिपावरले by यशोधरा
त्यांचे म्हणणे असते की सरकारने कायद्याने जावे, पण आम्हाला पटले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ शकतो कारण आम्ही सरकार नाही!यात अजून थोडी भर टाकावी म्हणतो. हा त्यांच्या स्टेटमेंटमधला भाग -
In Orissa, there have been continuous reports of lawlessness and repressive action by the State security agencies resulting in large-scale arrests and incarceration of innocent ordinary people. Fake encounters are on the increase and even children are not being spared. We are constrained to point out that the Government of Orissa, apart from routinely denying any abuse of law by its forces, has only stepped up security operations. Ironically, the Governments seem to respond only when government officials, that too senior officers, are abducted or kidnapped.म्हणजे यांना असं म्हणायचं आहे, की या अपहरणाला तर पर्यायच नव्हता! अरे, मग तुम्ही निषेध कशाचा करताय? आणि पुन्हा विनीलला सोडा असंही त्याच एकाच दमात कसं काय म्हणताय? मान गये बाप!
Recently in Chattisgarh when on 25th January, 2011, 5 police constables were kidnapped, there was lukewarm response by the Government and senior officials to secure their release. It was only on the demand of the human rights groups that the Maoists unconditionally released the constables.इथे बघा अजून एक गम्मत. यांनी डिमांड केली म्हणून माओवाद्यांनी सोडलं. सरकारने माओवाद्यांच्या मागण्या मान्य करायला नकार दिला ही त्यांची लाडिक तक्रार आहे. म्हणजे अपहरण झाले पाहिजे, आणि सरकारने अपहृतांना सोडवण्यासाठी अपहरणकर्त्यांच्या मागण्या मानल्या पाहिजेत असे हे विधान आहे. सरकारने कारवाई अर्थातच करायची नाही. "has only stepped up security operations" यात कशी तक्रार आहे ते नीट बघा.
PUCL calls upon the Government of Orissa, as also the Government of India and other States where the conflict with Maoists exists, to immediately call a halt to Operation Green Hunt and other combing and paramilitary operations being conducted in the name of curbing the Maoists. Increased militarization and resort to repressive use of laws has created a climate of fear, insecurity and alienation among the local people. People’s legitimate democratic protests are also being brutally suppressed.इथे आवाहन सरकारला आहे. माओवाद्यांना नाही.
PUCL therefore demands that the State Government does not do anything to precipitate the issue. PUCL also demands the unconditional release of the abducted officials by the Maoists.माओवाद्यांकडे "अनकंडिशनल रिलिज" ची डिमांड करत असताना त्यांनीच माओवाद्यांची डिमांड सरकारला सांगून टाकलीय! क्या बात है! अविवेकाचा इतका नागडा नाच आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता.
In reply to पीयूसीएल ला झोडण्यामध्ये आमचेही योगदान! by आळश्यांचा राजा
In reply to पीयूसीएल ला झोडण्यामध्ये आमचेही योगदान! by आळश्यांचा राजा
In reply to राहवत नाही म्हणून by आळश्यांचा राजा
प्रसंग नीट समजून घ्यायचा प्रयत्न करावा. टिप्पण्या करण्याअगोदर एवढे भान राखले तरी खूप आहे. प्रश्न भावनांचा नाही. (आपल्या सर्वांच्याच) अस्तित्त्वाचा आहे. हे कुठेतरी दूर ओरीसात घडतंय, आपल्या अंगाला लागणार नाही असं समजू नये. ओरीसा तून जाणार्या आणि आपल्या महाराष्ट्राला जोडणार्या रेल्वे ऑलरेडी धोक्याच्या टप्प्यात आलेल्या आहेत. याही पलीकडे बर्याच लिंक्स आहेतच आहेत.अर्थात. सहमत. पण... एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. विनील आणि माझीच्याच संदर्भात नव्हे फक्त. इतरही. विनील जे काम करतोय त्यातून माओवाद्यांना मिळणारा पाठिंबा कमी होणार होता. माओवाद्यांचा प्रसार होण्यामागची जी कारणे मांडली जातात (विकासाचा अभाव, विषमता, डेफिसीट ऑफ गव्हर्नन्स वगैरे) तीच कारणे संपण्यासाठीची स्थिती (हीही एक प्रकारची कॉंक्रीट सिच्युएशनच, अर्थात उलट्या कारणांसाठीची) विनीलच्या कामातून, तो घालून देत असलेल्या कार्यपद्धतीतून निर्माण होत होती. एकीकडे विनीलसारखी मंडळी काम करतात, त्याचवेळी दुसरीकडे अशाच काही भागांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे अहिंसक संघर्षही सुरू असतात. विनीलचे काम आणि/किंवा हे अहिंसक संघर्ष यांना समाजातून किती साथ मिळते? विनीलच्या कामाचे प्रतिमान (आवश्यक त्या बदलांसह) इतरत्रही सरकारने राबवावे यासाठी किंवा त्या अंहिंसक चळवळींचे प्रश्न सरकारने त्वरेने हाती घेऊन सोडवावेत यासाठी समाज काही दबाव आणतो का? बहुदा अत्यल्प प्रमाणात. माओवादासारखा प्रश्न सोडवणे ही एकट्या सरकारचीच जबाबदारी आहे, असे बहुदा स्वतःला सरकारपासून वेगळे ठेवत समाज म्हणत असावा. हे थोडं जनरलायझेशन होत असावं. पण परिस्थिती समग्रपणे पाहिली तर असेच चित्र डोळ्यांसमोर येते. आता हे सारं समाजानं समजून घ्यायचं असेल तर हे काम समाजापर्यंत पोचलंही पाहिजे. तेही किती प्रमाणात घडतं? तिथं माध्यमंही कमी पडतात. त्याबाबतचा मुद्दा वर बिपिनने लिहिला आहेच.
In reply to अर्थात by श्रावण मोडक
In reply to एकूणच समाज स्वतःला सरकारपासून by विकास
इथे एक गंमत आहे. सरकारने विनीलला काही स्पेशल अधिकार दिले आहेत का? मला नाही वाटत. जी काही ध्येयधोरणे आहेत ती होतीच, फक्त विनीलसारख्या, "बाबू"ने त्याचा मनापासून वापर केला, इतर करत नाहीत. म्हणजे यात सरकार, पक्षी: राज्यकर्ते/राजकारणी हे प्रत्यक्ष दोषी ठरत नाहीत. त्यांच्या कुजकट राजकारणाने सगळी वाट लागली त्यामुळे त्यांना अर्थातच दोष देता येईल. पण तो वेगळा मुद्दा आहे.थोडे मतांतर. विनीलला सरकारने काही विशेष अधिकार दिले नाहीत. दिले जातही नसतात, हे मान्य. पण चाकोरीबाहेर जात असे काही अधिकारी सृजनशीलतेने काही गोष्टी करतात. व्यवस्थेच्या आतच राहून, व्यवस्थेचं सडलेपण दूर करत. व्यवस्था अशी झाली आहे की, या गोष्टी झाल्या की त्या ठळकपणे समोर येतातच. विनील ते करत होता. गव्हर्नन्सचा डेफिसीट भरून काढण्यासाठी ही मंडळी निम्म्याहून अधिक रस्ता चालण्याची तयारी ठेवतात. चालतातही (अगदी शब्दशःही). त्यातूनच जनसंपर्कसारख्या मोहीमा आकाराला येतात. त्या औपचारिक रहात नाहीत. त्या मोहीमांचे हेतू स्पष्ट असतात आणि हे अधिकारी अशा हेतूंसाठी हेतूपूर्वकच काम करतात. त्याचे प्रतिमान इतकेच मला म्हणायचे आहे. आरा यांनी दिलेले इतर दुवे पाहिले. एकूण, विनीलचे (आणि माझीचेही) अपहरण ही एक संधी आहे. माओवाद आणि एकूणच हिंसक चळवळींना विरोध करणाऱ्यांची किती ताकद अशा गोष्टींच्या मागे येते त्यावर बरेच काही अवलंबून राहील. अन्यथा, विनीलचे अपहरण ही आणखी एक घडून गेलेली घटना ठरेल.
In reply to थोडे मतांतर by श्रावण मोडक
In reply to थोडे मतांतर by श्रावण मोडक
In reply to आशावादी श्रामो by चिंतामणी
In reply to एकूणच समाज स्वतःला सरकारपासून by विकास
In reply to अर्थात by श्रावण मोडक
एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. विनील आणि माझीच्याच संदर्भात नव्हे फक्त. इतरही.
एकीकडे विनीलसारखी मंडळी काम करतात, त्याचवेळी दुसरीकडे अशाच काही भागांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे अहिंसक संघर्षही सुरू असतात. विनीलचे काम आणि/किंवा हे अहिंसक संघर्ष यांना समाजातून किती साथ मिळते?याचं कारण मला वाटतं मिसप्लेस्ड प्रायॊरिटीज. सर्वांच्याच.
In reply to राहवत नाही म्हणून by आळश्यांचा राजा
In reply to महत्त्वाचे by आळश्यांचा राजा
In reply to जय हो! by सुधीर काळे
In reply to अभिनंदन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अतिशय महत्त्वाचा प्रश्न. by आळश्यांचा राजा
In reply to आनंददायी खबर...!! by इन्द्र्राज पवार
In reply to श्रामोंचा निषेध. by चिंतामणी
In reply to अभ्यास कमी पडतो आहे अंकल. हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
मलकनगिरी