नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो..
तर ..
वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं. आणि अधूनमधून कळतच असतं.
युवावर्गाची (मी पण युवा हं..!!) मुख्य तणतण ही की हे कपडे (म्हणजे सूक्ष्म वस्त्रे) कम्फर्टेबल असतात म्हणून आम्ही घालतो. त्यावर बंदी घालणारे हे कोण प्रिन्सिपॉल.. इट्स आवर लाईफ..
मी अजिबात संस्कृतीरक्षक नाही बाबा. आधीच सांगतो. मी अजिबात कुठल्याही फॅशन विरोधात नाही. उलट नव्या नव्या कपड्यांत नटलेल्या पोरी पाहून मी कौतुक करतो. पोरांचं मला कौतुक नाही. कारणं नैसर्गिक आहेत. मी पोरींविषयीच सगळं लिहिणार.
तंग किंवा लहान कपडे घालू नका असा प्रचार इथे नाही. मी तो करणारही नाही. मला उलट असल्या फटाकड्या पोरी बघायला आवडेलच. पण "कम्फर्ट"च्या मुद्दयामुळे आंबट ताक प्यायल्यासारखी माझ्या कपाळावर आठी आली आहे.
ज्या निर्वस्त्रांवर "उपाय" म्हणून ड्रेस कोड आला असावा ती निर्वस्त्रं मी नीट पहिली आहेत. हो. पहिली आहेत.
बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही.
दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (याचं नक्की नाव सांगून सहकार्य करावं):- हा कपडा मी घालू का असं मुलीनं विचारल्यावर "पण बाकीचे कपडे कुठे आहेत?" असा भाबडा प्रश्न जातो.. ही स्ट्रिंग स्कंधखळग्यांच्या दोन्ही बाजूस आणि कमरबंदाच्या जागेतून दिसत असते (चू.भू.द्या.घ्या.). ती ही मुलगी सारखी ओढत असते आणि कापडाच्या आत झाकायला बघत असते. म्हणजे लाज वाटते. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच ना?
खूप कमी उंचीचा स्कर्ट:- (वारा आला तरी उडणार नाही कारण उडायला काही शिल्लकच नाही असा.) तो घालून एअरपोर्टवर बसलेली मुलगी पाय अत्यंत आवळून क्रॉस करून बसते. मोकळेपणानं सरळ पाय पसरून बसू शकत नाही. दोन मांड्यांत उरला सुरला स्कर्ट खुपसून घट्ट धरून बसायचं..बाथरूम सापडत नसल्यासारखा चेहरा करून. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच.
मुलीच्या टी शर्टच्या छातीच्या उभारावरच्या एरियात जर लक्षणीय मजकूर छापलेला असला (भले गायत्री मंत्र का असेना..) तर तो आम्ही वाचायचा की नाही वाचायचा? वाचायचा नाही तर मग तो तिथे कशाला ?
मैत्रिणींनो..जर उत्तम वक्ष आणि मांड्या दाखवणारा ड्रेस तुम्ही घातलात तर त्यात तुम्हाला फक्त कम्फर्ट हवा असतो का? की उकडतं म्हणून घालता? की आपले असेट इतरांनी बघावेत असं वाटतं? खरं सांगू? इतरांनाही ते बघावेसे वाटतात. तुम्ही ते दाखवलेत तर आम्ही बघू. लाजून खाली मान घालूच असं नाही.
ऑफिसात एक मुलगी पूर्ण मांड्या दाखवणारा स्कर्ट घालून आली होती. बराच वेळ तिच्यासोबत काम (मराठी अर्थानं..) करताना, बोलताना छताकडे बघ, पूर्वेकडे बघ, ईशान्येकडे बघ असं केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कशाला लाजतोय? मी कशाला टेन्शन घेतोय? मी कपडे घातलेत. आता माझी नजर चोरायची मला काही गरज नाही. पण ते अवघड होतंच.
पावसात पांढरा टी शर्ट घातलात तर तो भिजल्यावर कोणी तुम्हाला बघू नये आणि बघितलं तर "तसल्या ओलेत्या" नजरेनं बघू नये अशी अपेक्षा जरा अनरियल नाही वाटत?
अरे माझ्या (सारख्याच) तरुण मित्र मंडळींनो. तुम्ही म्हणता की कॉलेजनं आमच्या कपड्यांत लक्ष घालू नये. तुम्ही म्हणता की "यहां का सिस्टीम ही है खराब". तुम्ही म्हणता की "आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य हवं."
तर मग घसा खरवडून विरोध करण्यापूर्वी "सारासार विचार" नावाची एक सोपी गोष्ट का करून बघत नाही?
त्यासाठी आधी नुसता "विचार" करण्याची सवय का लावून घेत नाही?
साधा शुद्ध शांत विचार. मग तो कसलाही असो. भिरभिर न करता शांत बसून "विचार".
रोज थोडी थोडी सवय केली तर हळू हळू जमेल.
काय आहे तो ड्रेस कोड? कशासाठी केला गेलाय? नागडं फिरायची परवानगी मिळाली तर तुम्ही फिराल का?
आपण तथाकथित "प्रगत" होत जाताना नुसते "कपडे" स्वीकारलेले नाहीत, त्यासोबत काही संकोचाच्या कल्पनाही तयार केल्या आहेत.. अपरिहार्यपणे.
कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. समाजाने बदलावं आणि नजर सुधारावी ही अपेक्षा चूक नसली तरी अतिआदर्शवादी आहे. ते होणे नाही. तोपर्यंत तरी स्वातंत्र्याची आजच्या दिवशी अस्तित्वात असणारी एक किंमत आहे. ती द्यायची तयारी आहे का?
निसर्गाकडे परत जाऊन वल्कलं नेसायची (किंवा तीही नाही) तर त्याच मार्गावर पुढे निसर्गाकडेच जाऊन मुक्त नर मादी संभोग चालेल का? तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का?
विचार..विचार..
किंमत द्यायची तयारी असेल तर जरुर घ्या ते स्वातंत्र्य.. हरकत घेणारे देणारे समाज किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल यापैकी कोणी कोणी नाही..प्लीज गैरसमज करू नका..तुम्हीच आहात स्वातंत्र्य घेणारे, किंमत देणारे आणि हरकत घेऊ शकणारे..
ग्रो अप बेब्ज. .. !! ... (आता यात कोणी डबल मीनिंग घेतलं तर तो प्रस्तुत लेखकाच्या आधीच डागाळलेल्या चारित्र्यावरचा आणखी एक दुर्दैवी डाग ठरेल..)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
64390
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुश्श..
In reply to केवळ दुसऱ्याची बरोबरी by शिल्पा ब
करेक्ट !
In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि
तो भुकेला आहे की नाही याचा
In reply to करेक्ट ! by सुहास..
माझ्या मते पुरुषाकडे
In reply to करेक्ट ! by सुहास..
काही प्रश्न
In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि
मुळात आपले कपडे इतरांसाठी
In reply to काही प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> म्हणूनच मग इतरांची पर्वा न
In reply to मुळात आपले कपडे इतरांसाठी by गवि
ज्या सगळ्या
In reply to >> म्हणूनच मग इतरांची पर्वा न by ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही
In reply to ज्या सगळ्या by गवि
मलाही ..
In reply to मलाही by आजानुकर्ण
डीवाय?
In reply to मलाही .. by टारझन
आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस
In reply to डीवाय? by आजानुकर्ण
एक पाय अकुर्डीच्या कँपस मधे
In reply to आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस by टारझन
पण टार्झणराव.... ब्रिटीश
In reply to आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस by टारझन
शाळेवर टीका?
In reply to मुळात आपले कपडे इतरांसाठी by गवि
टाय वगळून हा साधारण असा
In reply to शाळेवर टीका? by आजानुकर्ण
>>:आमच्या मराठी शाळेत त्याला
In reply to टाय वगळून हा साधारण असा by ३_१४ विक्षिप्त अदिती
पिन्हफोर
In reply to >>:आमच्या मराठी शाळेत त्याला by पक्या
पिनोफॉल नाही , पिनोफोर
In reply to काही प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो..
In reply to पिनोफॉल नाही , पिनोफोर by पक्या
ते संस्कृतीरक्षकांच्या आणि
In reply to चमचमीत by राजेश घासकडवी
बलात्कार हा शब्द न वापरता
In reply to चमचमीत by राजेश घासकडवी
हे ठीकच...पण स्त्रीकडे
In reply to बलात्कार हा शब्द न वापरता by मृत्युन्जय
असहाय्य माणसाला नेहेमीच
In reply to हे ठीकच...पण स्त्रीकडे by शिल्पा ब
>>मुद्दा हा आहे की अन्याय
In reply to असहाय्य माणसाला नेहेमीच by मृत्युन्जय
थोड अजुन आत जाउ या!
जबरी
In reply to थोड अजुन आत जाउ या! by सहज
बेंबीवर संपलेला शर्ट:- हा
आता !
In reply to बेंबीवर संपलेला शर्ट:- हा by अवलिया
अजून माहिती!
त्यांच्याकडे बघणार्या माणसांच्या वृत्तीवर त्यांची-त्यांची वागणू
In reply to अजून माहिती! by कवितानागेश
नऊवारी
In reply to अजून माहिती! by कवितानागेश
कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे
उत्तम चर्चा ...
अरे
In reply to उत्तम चर्चा ... by छोटा डॉन
अजाबात चालणार नाही
उद्या कपाळावर येणार्या बटा
In reply to अजाबात चालणार नाही by नितिन थत्ते
वा वा वा वा
गवि, तुमचे बरेच मुद्दे
आहो काकु ... लेख काय ...
In reply to गवि, तुमचे बरेच मुद्दे by मुलूखावेगळी
२दा आलाय
त्यावर तुम्ही लिहा..
In reply to २दा आलाय by मुलूखावेगळी
त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले
In reply to त्यावर तुम्ही लिहा.. by गवि
तुम्हाला ते खमंग वाटत नाही ?
In reply to त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले by मुलूखावेगळी
तुम्हाला ते खमंग वाटत नाही ?
In reply to तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? by टारझन
>> मग शोभा डे वाच << शोभा डे
In reply to तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? by मुलूखावेगळी
चौकश्या
In reply to >> मग शोभा डे वाच << शोभा डे by llपुण्याचे पेशवेll
शोभा डे लेखिका कम मॉडेल आहे
In reply to >> मग शोभा डे वाच << शोभा डे by llपुण्याचे पेशवेll
शोभा डे कोणी लिहीलं आहे? =))
In reply to >> मग शोभा डे वाच << शोभा डे by llपुण्याचे पेशवेll
कुठे हे स्त्री विषयक चर्चा
In reply to २दा आलाय by मुलूखावेगळी
नीट वाच हा मुद्दे दोघांनाही
In reply to कुठे हे स्त्री विषयक चर्चा by मुलूखावेगळी
आता हाच धागा सुरु आहे तर
In reply to नीट वाच हा मुद्दे दोघांनाही by टारझन
गविंच्या मताशी सहमत आहे.
पुणे तिथे काय उणे?
ये .... शंभर !!!!!!! हभिनंदन
मुद्दा मांडण्यासाठी मसाला
ज्यांना जे जे जशा फॅशन चे
खूप प्रतिसाद मिळालेला धागा
ट्रेंड सेटर
कुणाला वाटेल त्याने तसे कपडे
गविंचे मुद्दे समजून न घेता टीका
विनायकजी..
In reply to गविंचे मुद्दे समजून न घेता टीका by विनायक बेलापुरे
लेखनशैली अप्रतिम आहे
कुठलं महाविद्यालय ?
वा वा गवि भाय मजा आगया हे
लेख पटला
थॅंक्यू