मला आठवते, मी लहान असताना, मामाच्या गावाला गेले होते. माझे आजोळ म्हणजे, जळगाव मधील चाळीसगाव. तर, आम्ही सगळे माझ्या मामाच्या लग्नासाठी गेलो होतो. मी तेव्हा साधारण ३री मधे होते. लग्न लावुन आम्ही सगळे घरी आलो होतो. मी माझ्या मामे भावांसोबत खेळत होते. ते सगळेजण मला जेवायला घेउन गेले. तिथे मी सगळ्यात पहिल्यांदा ही खिचडी खाल्ली.
तेव्हा त्या सगळ्यांनी मला मसाले भात आहे असे सांगितले. मला आठवते, आम्ही सगळे अक्षरशः पराती मधे ही खिचडी घेउन मस्त ओरपली होती.
तेव्हा पासुन ही वर्हाडी खिचडी माझा अगदी weak ponit आहे. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या मामीनी मला केळवण म्हणुन ही खिचडीच केली होती.
हा भात तसा गुरगुट्याच व तिखट असतो आणि तसाच मस्त लागतो. वर्हाडा मधे ते लोक ह्या खिचडी वर कच्चे तेल टाकुन व सोबत पापड आणि लोणचे असे खातात.
म्ह़णुन मी आज ही माझी सगळ्यात आवडती पाकॄ देत आहे. आशा आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल.
साहित्यः
तांदुळ - १ वाटी
तुरीची डाळ - १/२ वाटी
कांदा - १ लांब चिरुन
सुके खोबरे - १ इंचाचा तुकडा
लसुण - ३ पाकळ्या
लाल तिखट - २ चमचे
हळद - १ चमचा
पाणी - २-३ वाटी
मिठ - चवीनुसार
कृति :
१. तांदुळ व तुरीची डाळ २-३ वेळा चांगली धुवुन १/२ तास एकत्र भिजवुन ठेवावी.
२. सुके खोबरे, लसुण व लाल तिखट एकत्र mixer ला वाटुन घ्यावे.
३. पातेल्या मधे तेल गरम करुन त्यात हळद व खोबरे, लसुण, तिखट याचे वाटण टाकावे. हे निट परतुन घ्यावे.
४. पातेल्यामधे भिजवलेला तांदुळ व तुरीची डाळ टाकुन परतावे.
५. भाताच्या अंदाजा नुसार गरम पाणी व मिठ टाकुन झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे भात मंद आचेवर शिजुन द्यावा.
६. भात शिजुन झाल्यावर आवडत असल्यास वरुन कच्चे तेल किंवा तुप टाकुन पापड व लोणच्या सोबत गरम serve करावे.
टिपः
१. आवडत असल्यास तुम्ही त्यात कडिपत्ता, बटाट्याच्या फोडि किंवा शेंगदाणे सुद्धा टाकु शकता.
वाचने
14298
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
कांद्याचं काय करायचं?
वर्हाडी खिचडी एकदम जोरदार
In reply to कांद्याचं काय करायचं? by नगरीनिरंजन
कांद्यानं तुमचा वांदा केला ली
In reply to कांद्याचं काय करायचं? by नगरीनिरंजन
कांदा तेलात परतायचा असेल
खोबरे कच्चेच घ्यायचे. कारण
In reply to कांदा तेलात परतायचा असेल by रेवती
ओ ओ, सॉरी. लक्षात आणुन
छान दिसतेय खिचडी...करुन बघते.
सगळ्यानीं असली खिचडि सकाळि
In reply to छान दिसतेय खिचडी...करुन बघते. by शिल्पा ब
नाश्ता ( breakfast) करु नये?
In reply to सगळ्यानीं असली खिचडि सकाळि by वडिल
त्याआधी...
In reply to नाश्ता ( breakfast) करु नये? by शिल्पा ब
आई कुठेय ? कधी येनारे?
In reply to सगळ्यानीं असली खिचडि सकाळि by वडिल
फोटो झकास!!!
वर्हाडी की खानदेशी? हे नक्की
In reply to फोटो झकास!!! by वेदनयन
माफी कसली मागता हो
In reply to वर्हाडी की खानदेशी? हे नक्की by Mrunalini
बहुदा वर्हाडीच असावी | सोनार खिचडी??
In reply to फोटो झकास!!! by वेदनयन
धन्यवाद. खिचडी कशी झाली, ते
In reply to बहुदा वर्हाडीच असावी | सोनार खिचडी?? by बेसनलाडू
एकटेच खाउ नका , आम्हालापण
In reply to बहुदा वर्हाडीच असावी | सोनार खिचडी?? by बेसनलाडू
पुन्हा एकदा भात, इकडे बायको
खिचडिचा हा प्रकार खान्देशी
अवांतर
हा हा हा.... खुप हसले मी
In reply to अवांतर by पंगा
व्वा झक्कास दिस्तेय
हि आहे खान्देशीच खिचडी पण
चिकनी चा पापड आणि कच्चे
In reply to हि आहे खान्देशीच खिचडी पण by इरसाल
सहमत
In reply to हि आहे खान्देशीच खिचडी पण by इरसाल
कैरी बाई.. हे चिकणी/नागली..
In reply to सहमत by कच्ची कैरी
आवडले.
In reply to हि आहे खान्देशीच खिचडी पण by इरसाल
मस्त मेनू.........
चिकनी चा पापड.... व्वा....
सगळ्यांचे मनापासुन आभार.
चिकनिचा पापड
मृणालिनी सुगरीणी जरा तुमचा
+१
In reply to मृणालिनी सुगरीणी जरा तुमचा by परिकथेतील राजकुमार
लाल ज्वारीला चिकनी
बिबडी
In reply to लाल ज्वारीला चिकनी by इरसाल
खिचडी म्हणजे माझा वीक पॉईंट..
मस्तच!
मस्त..
हो ना. काय नक्की माहित नाही.
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
मस्त दिसते आहे वर्हाडी
नाही, सुके खोबरे तसेच
In reply to मस्त दिसते आहे वर्हाडी by यशोधरा
ए खूप खूप मस्त ह .
thank u
In reply to ए खूप खूप मस्त ह . by निवेदिता-ताई
:)
अरे वा .. याला वर्हाडी खिचडी
आणखिन एक यात कच्चे शेंगदाने
छान
सहमत. तळलेली (फोडणीत घातलेली)
In reply to छान by धनंजय
अह्हाहा!
खरच. खुप खुप आभारी आहे.
In reply to अह्हाहा! by गुंडोपंत
खिचडी...