मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्‍हाडी खिचडी

Mrunalini · · पाककृती
मला आठवते, मी लहान असताना, मामाच्या गावाला गेले होते. माझे आजोळ म्हणजे, जळगाव मधील चाळीसगाव. तर, आम्ही सगळे माझ्या मामाच्या लग्नासाठी गेलो होतो. मी तेव्हा साधारण ३री मधे होते. लग्न लावुन आम्ही सगळे घरी आलो होतो. मी माझ्या मामे भावांसोबत खेळत होते. ते सगळेजण मला जेवायला घेउन गेले. तिथे मी सगळ्यात पहिल्यांदा ही खिचडी खाल्ली. तेव्हा त्या सगळ्यांनी मला मसाले भात आहे असे सांगितले. मला आठवते, आम्ही सगळे अक्षरशः पराती मधे ही खिचडी घेउन मस्त ओरपली होती. तेव्हा पासुन ही वर्‍हाडी खिचडी माझा अगदी weak ponit आहे. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या मामीनी मला केळवण म्हणुन ही खिचडीच केली होती. हा भात तसा गुरगुट्याच व तिखट असतो आणि तसाच मस्त लागतो. वर्‍हाडा मधे ते लोक ह्या खिचडी वर कच्चे तेल टाकुन व सोबत पापड आणि लोणचे असे खातात. म्ह़णुन मी आज ही माझी सगळ्यात आवडती पाकॄ देत आहे. आशा आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. साहित्यः तांदुळ - १ वाटी तुरीची डाळ - १/२ वाटी कांदा - १ लांब चिरुन सुके खोबरे - १ इंचाचा तुकडा लसुण - ३ पाकळ्या लाल तिखट - २ चमचे हळद - १ चमचा पाणी - २-३ वाटी मिठ - चवीनुसार कृति : १. तांदुळ व तुरीची डाळ २-३ वेळा चांगली धुवुन १/२ तास एकत्र भिजवुन ठेवावी. २. सुके खोबरे, लसुण व लाल तिखट एकत्र mixer ला वाटुन घ्यावे. ३. पातेल्या मधे तेल गरम करुन त्यात हळद व खोबरे, लसुण, तिखट याचे वाटण टाकावे. हे निट परतुन घ्यावे. ४. पातेल्यामधे भिजवलेला तांदुळ व तुरीची डाळ टाकुन परतावे. ५. भाताच्या अंदाजा नुसार गरम पाणी व मिठ टाकुन झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे भात मंद आचेवर शिजुन द्यावा. ६. भात शिजुन झाल्यावर आवडत असल्यास वरुन कच्चे तेल किंवा तुप टाकुन पापड व लोणच्या सोबत गरम serve करावे. टिपः १. आवडत असल्यास तुम्ही त्यात कडिपत्ता, बटाट्याच्या फोडि किंवा शेंगदाणे सुद्धा टाकु शकता. Image removed.

वाचन 14295 प्रतिक्रिया 51