(येऊ कसा तुमच्यात मी)
योगेश वैद्य यांची 'येऊ कसा तुमच्यात मी' ही कैफियत ऐकली आणि एकदम वेगळीच तक्रार डोक्यात रुंजी घालून गेली! ;)
घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी?
तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी?
आरशात मावे न मी जाऊ कुठे, जाऊ कसा?
संपेचना हे दोंद, का एवढा बहरात मी?
आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले
एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी
वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा?
पोट येते आधी जरासे आणि त्या पश्चात मी
'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी
भेट घ्याया येत होतो अडकलो 'केकात' मी
चतुरंग
वर्गीकरण
मस्त!
हाहाहा मस्त !!!
झकास हो
मीटर
In reply to मीटर by लडदू
मीटर
In reply to मीटर by मुक्तसुनीत
अरे वा! क्या बात है!! एकदम 'मुक्त सु नीट'!!
In reply to मीटर by मुक्तसुनीत
हे बी लै भारी !!!
In reply to हे बी लै भारी !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी
मस्त..!