मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जॅम आणि कोकोनट केक

Mrunalini · · पाककृती
साहित्य :
  • मैदा - १०० ग्रॅम बटर - १०० ग्रॅम पिठिसाखर - १०० ग्रॅम अंडी - २ बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन वॅनिला ईसेन्स - २-३ थेंब मिक्स फ्रुट जॅम डेसिगेटेड कोकोनट
कृति : १. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. पिठिसाखर वेगळी चाळुन घ्यावी. २. बटर व पिठिसाखर चांगले फेटुन घ्यावे. ३. अंड्यातील बलक बटर मधे टाकुन मिक्स करावे. ४. दुसर्‍या भांड्यामधे अंड्याचे पांढरे घेउन त्यात वॅनिला ईसेन्स टाकुन Electric bitter ने फेटुन घ्यावे. ५. हे egg white बटर मधे मिक्स करावे. ६. ह्या मधे मैदा मिक्स करावा. ७. dropping constistancy साठी थोडे दुध टाकावे. ८. cup cakes च्या बेकिंग ट्रे ला थोडे बटर व मैदा लावुन greecing करुन घ्यावे. ९. Oven 180 degree celcius ला १० min preheat करुन घ्यावा. १०. 10 min नंतर बेकिंग ट्रे oven मध्ये ठेवुन १५-२० min साठी बेक करावा. ११. केक तयार झाल्यावर बाहेर काढावेत. गार झाल्यावर त्याचा वरचा भाग कापुन plain करुन घ्यावे. १२. Jam थोड्या गरम पाण्यात mix करुन पातळ करावा. १३. कापलेला केक Jam मधे बुडवुन डेसिगेटेड कोकोनट मधे घोळवावा. १४. एका plate मधे ठेवुन त्यावर थोडे cream टाकुन वर strawberry किंवा cherry ठेवुन serve करावे. Jam and Coconut cakes

वाचने 7155 वाचनखूण प्रतिक्रिया 34

Mrunalini 05/02/2011 - 04:47
thank u soo much कस केल तुम्ही हे?? मी खुप try केल, पण नाही जमले. मंडळ आपले आभारी आहे. :)

वडिल 05/02/2011 - 04:48
मृणालिनी ताइ.. एकदम मस्त फोटो... रेसीपी थोडि वेगळी वाटते.. नक्की ह्याच केक ची आहे ना ? आमच्या कडे वेगळ्या प्रकाराने हाच केक करतात. अंडि किती घातलीत ?

गणपा 05/02/2011 - 04:53
कृती वरुन बरेचसे केक सारखेच वाटतात.. थोडा फरक वगळल्यास. म्हणुन मुद्दाम फोटो येइस्तो वाट पहात होतो.. पण आता पश्चाताप होतोय. हाय रे कर्मा आधीच प्रतिसाद देउन मोकळा झालो असतो तर बर झाल असत.

वडिल 05/02/2011 - 05:19
तुमचे मि खरच लकि आहेत... आमच्या घरी कसला केक आणि कसलं काय. आइनी केलेल्या केकची आठवण झाली आणि डोळे भरुन आले. जर जवळ पास असता तर आलो असतो केक खायला. केक ची खरी चव आणि कन्सीस्टन्सी हि तुम्ही अंडि किती घालता त्या वर अवलंबुन असतं. बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो.

In reply to by प्राजु

बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो. ठ्ठ्यॉ!!! फुटले... जोरदार फुटले.. गणपा कधीपासून अंडी घालायला लागला? (ह. घे रे गणपा) हा हा हा ................आक्रितच म्हणायच

कच्ची कैरी 05/02/2011 - 09:04
आई ग फुटले,सांडले,वाहले,पिळुन निघाले काय ५ स्टार (५ *****) फटू आहे आणि केक पण !!! गूड वर्क ,कीप इट ऑन !

In reply to by मुलूखावेगळी

Mrunalini 05/02/2011 - 18:21
thank you. मी अजुन कधी coconut न वापरता केला नाहिये. पण मला वाटते, तुम्हि coconut एवजी कुठ्ल्याही biscuit चा चुरा करून त्या मधे केक घोळवला, तरी छान लागेल. हे try करुन मला पण सांगा, केक कसे झाले होते ते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

Mrunalini 05/02/2011 - 18:24
@ आमचे राज्य आहो, असे केले तर कसे होनार. अजुन बरेच पदार्थ येणार आहेत. ID बॅन केला, तर तुम्ही नेत्रसुखास मुकाल. ;)

In reply to by Mrunalini

वडिल 05/02/2011 - 23:59
मृणालिनी ताइ .. तुम्हि काहि मनावर घेवु नका.. फोटो टाकत रहा. इथे फार वात्रट लोकं आहेत.. काहि च्या काहि अर्थ काढतात. नाइल , गणपा हे उपाशी बोके केक खायला नेहमी अतुर असतात.

वेताळ 05/02/2011 - 19:48
पण वरचे फोटो नक्कीच तुम्ही केलेल्या केकचे आहे ना? एकदम जबराट झाला आहे केक, असले केक विकत देखिल मिळत नाहीत हो.तुम्ही कधी भारतात आला तर सांगा तुम्हाला भेटायला वाट वाकडी करुन येईन.

Mrunalini 05/02/2011 - 23:17
@ वेताळ आभारी आहे. हो, हे फोटो मी केलेल्या केकचेच आहेत. भारतात आल्यावर नक्की सांगेन.

In reply to by Mrunalini

वडिल 06/02/2011 - 07:57
मृणालीनी ताइ तुम्हि अमेरीकेला जिंकलत. आमच्या लेकानी तुमच्या केक चा फोटो पाहिला आणि बर्थ डे ला असाच केक हवा म्हणतो.. नेहमी बीया काढलेले हालपीनो मागतो.. आज केक पाहुन नुसता उड्या मारतोय.

In reply to by Mrunalini

वडिल 06/02/2011 - 09:51
अमेरीकेत मुलं फार जाड होत चालली आहेत ( ओबेसीटि ) म्हणुन अमेरीकन आया , मुलांना बीया काढुन हालापीनो देतात खायला.